भारतरत्न लता मंगेशकर
भारतरत्न लता मंगेशकर यांची माहिती मराठीत उपलब्ध करून तुमच्या वाचकांना लाभान्वित करण्याची वेळ आली आहे. लता मंगेशकर जी ह्या आपल्या स्वरात अमूल्य मोहकता आणि सर्वाधिक सामर्थ्याने भारतीय संगीताच्या इतिहासात अपूर्व स्थान ठेवले आहे. त्यांच्या संगीताच्या साधनेने मराठी चित्रपटांपासून बॉलिवूड गाण्यांपर्यंत, त्यांचे स्वर आपल्या मनाचा तारक झाले आहेत.
लता मंगेशकर यांना भारतरत्न घोषित करण्याचा कारण त्यांच्या संगीताच्या शैलीच्या अद्वितीयतेमुळे आहे. ह्या ब्लॉगवर, तुम्हाला लता मंगेशकर यांच्या जीवनाचे महत्त्वपूर्ण प्रसंग, त्यांचे कृती, संगीताची महत्त्वाची भूमिका, आणि अद्यापही त्यांच्या संगीताच्या विशेषतेची चर्चा मिळेल. त्यांच्या संगीताच्या विरुद्धात वापरलेल्या विविध भावनांचे संगीत आणि त्यांच्या कौशल्यातील अत्यंत अनमोल विचार तुम्हाला या ब्लॉगवर मिळवायला मिळेल.
‘ ए मेरे वतनके लोगों
जरा आँख में भरलो पानी
जो शहीद हुये हैं उनकी
जरा याद करो कुर्बानी ‘…
भारत चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांसाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी १९६२ साली हे देशभक्तीपर गीत गाऊन निधड्या छातीच्या जवानांच्या बलिदानाची आठवण साऱ्या देशवासीयांना करून दिली. हिमालयाच्या कुशीत लढली गेलेली चीनविरुद्धची लढाई भारताने गमावल्यानंतर सारा देश सुन्न झाला होता. चीनच्या अत्यंत सुसज्ज सशस्त्र दलाशी बोल्टन रायफली घेऊन लढताना असंख्य जवान धारातीर्थी पडले. त्यांच्यासाठी लतादीदींनी म्हटलेल्या गाण्याने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याही डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळू लागले…
‘बेटी, तूने मुझे रुला दिया!’
पंडितजींचे हे एकच वाक्य, गाण्याच्या हेलावून सोडणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांची आणि लतादीदींच्या स्वरांची अफाट ताकद सांगून गेले. अशा कितीतरी आठवणी लता मंगेशकर यांच्याबद्दल सांगता येण्यासारख्या आहेत. प्रेस फोटोग्राफर सर्वश्री मोहन वाघ यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबद्दलची एक आठवण पुढीलप्रमाणे सांगितली आहे, ‘स्वामी नाटकाच्या वेळची एक आठवण आजही मी जपून ठेवली आहे. त्या नाटकाच्या मुहूर्ताच्या वेळी मी लता मंगेशकरांना नेण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो. मला पाहिल्यावर त्या म्हणाल्या की, ‘मोहन, जरा गडबड झाली आहे. गाडी बिघडलीय, काय करावं?’
त्याकाळात माझ्याकडे गाडी नव्हती. त्यामुळे मी नाराज होऊन नाइलाजानं म्हटलं, ‘काय करणार? पुन्हा कधीतरी बघूया!’ असं म्हणून मी निघणार, तोच त्या म्हणाल्या की, ‘थांबा!’ आणि काय सांगावं? त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला लगेच टॅक्सी आणायला पाठवलं. टॅक्सी आली. त्यावेळी त्यांचा ड्रायव्हर त्यांना म्हणाला, ‘मी सोबत येऊ का?’ दीदी त्याला लगेच म्हणाल्या, ‘काळजी करू नका. मी एकटी जाईन. सोबत मोहन आहेच ना! मला काळजी नाही!’
काळ्या घोड्याजवळ हा मुहूर्त एका एम्पोरियममध्ये झाला. सर्व मंडळी चाट पडली, दीदी आलेल्या पाहून! पुन्हा मी त्यांना टॅक्सीनेच त्यांच्या घरी सोडले. वाटेत त्या माझ्याशी एकच वाक्य बोलल्या, जे मी माझ्या मनात कोरून ठेवलंय. त्या म्हणाल्या, ‘मोहन, तुम्हाला आता तरी पटलं ना, केवळ मर्सिडिजमध्ये बसल्यामुळे माणूस मोठा ठरतो असं म्हणणाऱ्यापैकी
लतादीदींच्या या एका वाक्यामुळं मी आयुष्यात माझा तोल कधीच जाऊ दिला नाही. त्यामुळं मला जमीन सोडून चालण्याचा कधीच मोह झाला नाही!’
मी नाही ते!’ आहे हवेत
जन्म, बालपण व शिक्षण
एवढा मोठा आदर्श समोर असल्यावर मोहन वाघांसारख्यांची काय बिशाद तरंगण्याची? भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवूनही सदैव जमिनीवर चालणाऱ्या लता मंगेशकर याचा जन्म इंदूरला २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. मा. दीनानाथांच्या पहिल्या पत्नीचे नाव नर्मदा. तिलाही माई असेच संबोधले
जायचे. तिला झालेल्या मुलीचे नावही होते ‘लता’च. मा. दीनानाथांची ही पहिली पत्नी बाळंतपणातच वारली आणि तिच्यापाठोपाठ ती लता नावाची मुलगीही गेली. त्यानंतर दीनानाथांनी नर्मदेची धाकटी बहीण शुद्धमती हिच्याशी विवाह केला. तिलाही ‘माई’ असेच संबोधले गेले. दीनानाथांच्या दुसऱ्या छोट्या बालिकेचे जातक त्यांनी मांडले, तेव्हा विश्वविख्यात होणाऱ्या दिव्य स्वराच्या गायिकेच्या आगमनाची वार्ताच जणू
त्यांना समजली होती. ती आपल्या कुटुंबाला व भावंडांना सांभाळेल अशी खात्री होती.
मास्टर दीनानाथ व माई यांच्या पोटी जन्मलेल्या अपत्यांत लता ही सर्वांत मोठी व हूड मुलगी होती. तिच्या पाठोपाठ जन्मलेली मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही सगळीच मुले गुणी व संगीतातील दर्दी निघाली.
लता मंगेशकरला जन्माक्षराप्रमाणे जरी ‘हेमा’ आणि ‘हृदया’ ही नावे मिळाली असली, तरी पुढे ‘लता’ या नावानेच ती ओळखली जाऊ लागली. लता मंगेशकर यातील ७ अक्षरांनी गेली ८४ वर्षे मंगेशकर कुटुंबीयांना झळाळती
देदीप्यमान कारकीर्द लाभली. लताच्या स्वरांची चुणूक दीनानाथांना तिच्या लहानपणीच दिसून आली. वडिलांनी शिकविल्याप्रमाणे त्यांचा शिष्य गात नाही हे लताने त्यांच्या निदर्शनास आणून दिले; नव्हे तसे गाऊन दाखवले. त्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिला गाणे शिकवण्याचा निर्णय घेतला. थोरल्या मुलीच्या गळ्यातल्या अलौकिक गंधारवर त्यांची दृढ श्रद्धा होती. इंदूरच्या राजवाड्यावर निशाण चढविताना व उत्तरविताना वाजवले जाणारे संगीत अल्पवयातच या मुलीच्या गळ्यातून अवतरले होते. दीनानाथ मंगेशकरांची बलवंत संगीत नाटक कंपनी होती. त्यांनी ‘संगीत सौभद्र’ नाटक बसवलं होतं. या नाटकात नारदाची भूमिका करणारा नट अचानक आजारी पडला. त्यावेळी प्रश्न उभा राहिला असता, दीनानाथांची थोरली मुलगी, आठ-दहा वर्षांची, किरकोळ शरीरयष्टीची लता पुढे येऊन म्हणाली, ‘मी होते नारद. मला सर्व संवाद आणि गाणी तोंडपाठ आहेत आणि बाबा, आज मीदेखील तुमच्यासारखाच गाण्यांना वन्समोअर घेऊन दाखविणार आहे!’ चिमुकल्या नारदानं पैजेवर सांगितल्याप्रमाणे ‘वन्समोअर’ मिळवून दाखवला, तेव्हा विंगेत उभे राहून मुलीकडे भिजलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या दीनानाथांना तिच्याबद्दल अपार कौतुक वाटत होते.
तसेच दीनानाथ बाबांबाबत लतादीदी फारच हळव्या बनतात. त्या म्हणतात, ‘गाणं हे बाबांचं देणं होतं. त्यांची सूर लावायची पद्धत, सूर सोडताना ते जोर द्यायचे त्या जागा, आता मला सगळं आठवतं नाही. मी लहान होते. पण ते सारं विलक्षण होतं. स्टेजवर ते फार अद्भुत गायचे. ‘धिक्कार मन साहिना’ या गाण्याला मुंबईच्या अँड थिएटरात १४ वेळा वन्समोअर पडला की ते राग बदलून गाणं गात. राग इतका पटकन बदलत की, कमाल वाटे. ते सफेद चार पाचच्या सुरात किंवा त्याही वरती गायचे. लाईट्स नाहीत, माईक्स नाहीत. गॅसबत्त्यांच्या प्रकाशात पिटापर्यंत आवाज गेला पाहिजे. बाबांचा वरच्या पट्टीतच आवाज लागायचा!’
उस्ताद अमान अली खाँ भेंडीबजारवाले यांचा गंडा लताने बांधला होता. अमानखान देवासवाले, पं. तुळशीदास शर्मा यांचे मार्गदर्शन लताला तिच्या गायकीच्या प्रवासात मिळाले. इ.स. १९३९ मध्ये बळवंत संगीत नाटक कंपनीतर्फे सोलापुरात मा. दीनानाथ व लता या पितापुत्रींचा जलशाचा कार्यक्रम झाला. तेव्हा १० वर्षाच्या त्यांच्या मुलीने – लताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. लताचा बालपणाचा काही काळ सांगलीत गेला.
मुलांना सिनेमातली गाणी ऐकायला आणि सिनेमे बघायला मनाई करणारे दीनानाथ सैगलची गाणी ऐकायला आणि न्यू थिएटर्स व भालजी पेंढारकरांचे चित्रपट बघायला आनंदानं परवानगी द्यायचे. लहानपणी लता सैगलची प्रचंड फॅन होती. ‘मोठेपणी मी सैगलशीच लग्न करणार’ या लताच्या अजब हट्टावर दीनानाथ म्हणायवे,
‘अगं, पण तू मोठी होशील तोवर सैगल म्हातारे होतील ना!’
२४ एप्रिल रोजी पुण्यात दीनानाथ मंगेशकरांचे अकाली निधन झाले आणि मंगेशकर कुटुंबावर आकाशच कोसळले. त्या वेळच्या बिकट परिस्थितीचे वर्णन करताना लतादीदी म्हणतात, ‘त्यावेळची आमची परिस्थिती फार गरिबीची होती. जगण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले. दोन दोन दिवस आम्हाला अन्नपाण्यावाचून आणि झोपेवाचून काढावे लागले!’ एखादा कलावंत मोठा झाला की त्याच्याभोवती मधमाशा घोंगावू लागतात. परंतु नाव मिळवण्यापूर्वीचा त्याचा जो प्रवास असतो, त्याचा कुणीही फारसा विचार करीत नाही. निखाऱ्यावरून ज्यांना चालावे लागते, त्यांनाच ते चटके सहन करावे लागतात. मरणसमयी वडिलांनी लताला जवळ बोलावून कोपऱ्यात ठेवलेला तंबोरा व गीतांची वही दिली आणि तिला सांगितले, ‘हेच तुझे धन आहे असे समज!’ आपला वडिलांचा अखेरचा संदेश शिरोधार्य मानून लताने कठोर गानतपश्चर्या केली व खऱ्या अर्थाने तिने आपल्या वडिलांचे ऋण फेडले व पितृधन लाखपटीने वाढवले. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी, लावुनिया बाबा गेला’ हे भावगीत कविवर्य पी. सावळाराम यांनी लिहिले, तेव्हा त्यांनी लताला ते फोन करून ऐकवले. दुसऱ्या बाजूने ते गीत ऐकताना लताला हुंदके अनावर झाले. ही पी. सावळाराम यांनी सांगितलेली हृद्य आठवण सर्वश्रुत आहे.
मा. दीनानाथांच्या मृत्यूनंतर अवघ्या १३ वर्षाच्या लताने मा. विनायक यांच्याकडे नोकरी धरली. ‘नवयुग’ आणि नंतर ‘प्रफुल्ल’ पिक्चर्सच्या चित्रपटात छोट्या भूमिका सादर केल्या. ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात तिने पहिले गाणे गायले. ‘नटली चैत्राची नवलाई’ या ध्वनिमुद्रिकेवर नाव होतं, ‘बेबी लता!’ आणि संगीतकार दादा चांदेकर! ही इ.स. १९४३ ची घटना आहे. त्यानंतर मा. विनायक कोल्हापुरात आले. त्यामुळे सर्व मंगेशकर कुटुंबाला कोल्हापुरात यावे लागले. कोल्हापूरनंतर मुंबईत आल्यावर त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ‘सुभद्रा’, ‘मंदिर’, ‘जीवनयात्रा’ या चित्रपटांतून कामे करीत असतानाच १९ ऑगस्ट १९४७ रोजी मा. विनायकांचे अकाली निधन झाले. नाना चौकात शंकरशेट वाड्यात राहणाऱ्या मंगेशकर कुटुंबावर पुन्हा एकदा दुसरे संकट कोसळले. पण लता दीदींनी मोठ्या धैर्यानं मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. त्यावेळी देशाच्या फाळणीमुळे मुंबईच्या चित्रनगरीची अवस्था बिकट झालेली होती. सैगलचे निधन झाले होते, नूरजहाँने पाकिस्तानात स्थलांतर केले होते. याच सुमारास ‘आपकी सेवामे’ मध्ये संगीतकार दत्ता डावजेकरांनी लता मंगेशकर नावाच्या एका मुलीकडून एक पार्श्वगीत गाऊन घेतलं. ते लता मंगेशकरचं हिंदी चित्रपटातलं पहिलं वहिलं पार्श्वगीत होतं.
यावी खबर जाणकारांना लागल्यावाचून राहिली नाही. यावेळी संगीतकार गुलाम हैदर यांनी या मुलीचं गाणं ऐकून अशी भविष्यवाणी केली, ‘सारी चित्रपटसृष्टी हिच्या पायाशी लोळण घेईल!’ त्यांनी ‘मजबूर’ आणि ‘पद्मिनी’ मध्ये तिच्याकडून गाऊन घेतले आणि ते पाकिस्तानात निघून गेले. घरातील थोरली मुलगी म्हणून आणि भावाबहिणीची जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून त्यांनी विवाह केला नाही. त्या आजन्म अविवाहितच राहिल्या.
मराठी भावगीतांचा अमोल खजिना
मा. दीनानाथांच्या मृत्यूनंतर लताने घरखर्चासाठी ‘नवयुग’ मध्ये नोकरी धरली. नवयुग कंपनीशी लताला नाइलाजाने करार करावा लागला. हळूहळू लताच्या आवाजाला चित्रपटांतून जास्त मागणी येऊ लागली. सुरुवातीला तिला या गाण्याबद्दल ४०० रुपये मिळू लागले. त्यानंतर लता राजकपूरच्या स्टुडिओत गाऊ लागली. राजकपूरच्या ‘बरसात’ मधील गाण्याबद्दल तिला ३५०० रुपये मिळाले. मा. विनायक यांनी इ.स. १९४६ मध्ये ‘राजकपूर व लता मंगेशकर हे दोन कलावंत देदीप्यमान यश मिळवतील’ असे भविष्य वर्तवले होते आणि ते पुढे खरे ठरले. राजकपूर यांच्या ‘बरसात’ या चित्रपटापासूनच पार्श्वगायिकांचे नाव तबकडीवर येऊ लागले. त्यामुळे पार्श्वगायिकांचे महत्त्व राजकपूरच्या चित्रपटापासून सुरू झाले. राजकपूर जिवंत असेपर्यंत त्यांची गायिका लता मंगेशकरच होती.
‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाच्या निर्मितीचे वेड राजकपूर यांना इ.स. १९५५ पासून लागले होते. राजकपूर-नर्गिस ही जोडी विभक्ती झाल्यानंतरदेखील येणाऱ्या राजच्या प्रत्येक
नायिकेची गायिका लता मंगेशकरच होती. व्यक्तिरेखा व कलाकारानुसार आवाज मोल्ड करण्याचे कसब फक्ती लतादीदीच करू जाणे! याचे उदारहरणच जर द्यायचे झाले तर, ‘इचक दाना बिचक दाना’ ची कोवळीक, ‘मैं क्या करू राम, मुझे बुड्ढा मिल गया’ चा खट्याळपणा, ‘दमभर जो उधर मुँह फेरे’ चा दर्जेदारपणा, तर ‘ये शामकी तनहाईयाँ’ मधील दर्द नेमका लताच सादर करू शकते. ‘साजनकी गलियाँ छोड चलें’ असे दुःखी अंतःकरणाने गाणारा आर्त स्वर ‘दीदी तेरा देवर दिवाना’ म्हणताना एकदम अवखळ होतो. मधुबालापासून काजोलपर्यंतच्या सर्वांच्या गळ्यांत तो सजतो. ‘हाय, कैसे दिन बीते, कैसी बीती रतियाँ’ (अनुराधा) या गाण्यातील उच्छ्वास टाकणारा ‘हाऽय’ चा उच्चार फक्त लताच करू जाणे! आपल्या श्वासावरही लताची हुकुमत जाणवते.
गाताना लताला स्वर लावावा लागत नाही. तिने गायला तोंड उघडताच तो आपोआप लागतो. आपल्या गाण्यात गायकीच्या दृष्टीने कितीही अवघड चाल, जागा, हरकती, मुरक्या, पलटे, तानाआड, लय असली तरी लताने कधी तडजोड केली नाही. त्या गाण्याचे तिने चीजच केले, मग ते कोणत्याही संगीतकाराचे असो.
ज्याला प्युअर क्लासिकल म्हणता येतील अशी अत्यंत अवघड ताना असलेली वजनदार गाणी तेच माधुर्य राखून तरलपणे भावनावेगाने ओथंबून गाणे, लता सोडून अन्य कुणाला जमले असते काय? तिचे गद्यसंवादही इतके सुरेल असतात की बस्स, नुसते ऐकत राहावेत. उदाहरणार्थ ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील ‘नैन से नैन’ या गाण्यातील, ‘अच्छा! रुक क्यूँ गये?’ किंवा ‘आराधना’ मधील ‘बागो में बहार है’ हे संवाद आठवून पहावेत. तीच गोष्ट लोकगीतांबाबतही लागू पडते. एखादे लोकगीत म्हटल्यावर तीच चाल, तोच ठेका, फक्ती शब्दांची कुशल अदलाबदल असे त्यांचे पूर्वापार स्वरूप असे, पण ‘मी डोलकर’ या कोळीगीताला लताने अशा काही उंचीवर नेऊन ठेवले आहे की, तिथपर्यंत पोहोचण्याचे भविष्यात कुणी धाडसही करू शकणार नाही. ‘या गो दरियाचा दरियाचा दरारा मोठा, तवा पाण्यामधून उठताना डोंगर लाटा लाटा’ ही अप्रतिम जागा म्हणजे तिच्या प्रज्ञेची एक
छोटीशी झलकच होय. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सुधीर फडके त्यांच्याबद्दलची एक आठवण सांगताना म्हणतात की, ‘गीतरामायणातील सीतेची सर्व गाणी त्याच गाणार होत्या. पण तब्येत बिघडल्याने तो योग आला नाही. पुढे ५५ वे गाणे आले. ‘मज सांग
लक्ष्मणा जाऊ कुठे?’ तेव्हा त्यांनी सुचविलेल्या माणिकबाईही आजारी पडल्या होत्या. आम्ही सर्वांनी लताबाईंकडे धाव घेतली. त्याही आमच्या मदतीला धावून आल्या. पुण्याला रेडिओवर येऊन त्या गाणं गाऊन गेल्या. आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटलं!’ ‘महाराष्ट्र लताच्या गळ्याने गातो’ असे जे म्हटले जाते, ते काही खोटे नाही.
उदाहरणार्थ कण्वमुनींनी आपली मानसकन्या शकुंतला हिची दुष्यंताच्या घरी पाठवणी करताना काढलेले पुढील उद्गार प्रसिद्ध आहेत, ‘ज्या मुलीला जन्म दिला नाही पण फक्ती पालनपोषण मात्र केले, तिची पाठवणी करताना जर मला एवढं दुःख होते तर स्वतःच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्याच्या घरी पाठवताना आईवडिलांना काय वाटत असेल बरे? याची कल्पनाच न केलेली बरी.’ दळणवळणाची अपुरी साधने, खडतर प्रवास, यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयात आईवडिलांचे प्रेमपाश तोडून अपिरिचित अशा घरी – सासरी जाताना विरह वेदनेने त्या काळच्या नवऱ्यामुली रडवेल्या होत असत. अशा प्रसंगी त्यांना आधार असे तो आपल्या आईचा. त्यामुळे, ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’
हे लताच्या आवाजातील आईचे प्रेमळ बोल ऐकताना आजही अनेक सासुरवाशिणींच्या डोळ्यात आसवे तरळल्यावाचून राहणार नाहीत. लग्न समारंभाची सांगता आजही लताने गायिलेल्या ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ या भावगीताने नववधूची सासरी पाठवणी करून होते.
लता मंगेशकर अस्सल मराठी आहेत. पण त्यांची गाणी मराठीत खूपच कमी आहेत. याबद्दल त्या म्हणतात की, ‘मी हिंदीत खूपच बिझी होते. यामुळं मराठीत फारसं गाता आलं नाही!’ अर्थात त्यांची मराठी गाणी संख्येने कमी असली तरी गुणाने मुळीच कमी नाहीत. ‘बाई, बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला!’ हे ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटातील गीत ‘आनंदघन’ या नावाने लताजींनीच स्वरबद्ध केले आहे. तसेच ‘साधी माणसं’ चित्रपटातील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे! आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.’ या गीताच्या ओळी ऐकताना डोळ्यासमोर मूर्तिमंत चित्र उभे करतात. विरहवेदनेचा कळस म्हणजे मातृवियोग होय. ते दुःख, ती वेदना काय असते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माधव ज्युलियन यांचे, ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधु आई ! बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी?’ हे भावगीत! ते ऐकून न रडलेला माणूस विरळाच!
‘मराठा तितुका मेळवावा’ मधील लताच्या ‘अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव, दऱ्यादऱ्यातून मावळ देवा देऊळ सोडून धाव’ गीतातून जे आर्तभाव व्यक्ती झालेत, ते हृदयात कायमचे घर करून राहतात. असेच एक मनाला भुरळ पाडणारे, अप्रतिम प्रेमभावाने परिपूर्ण असे मनाला भावणारे गीत म्हणजे,
‘प्रेमा, काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला’ (शिकलेली बायको) उषा किरण यांच्यावर चित्रीत झालेले हे गीत हृदयाचा ठाव घेते, जे कधीही विसरता येणे शक्य नाही. तसेच ‘कन्यादान’ मधील ‘लेक लाडकी या घरची। होणार सून मी त्या घरची’ असो की ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (कामापुरता मामा), ‘दिवा पाहून लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना’ असं म्हणून शुभंकरोती म्हणायला लावणारी ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चीही अनमोल रचना मनाला मोहून टाकते. तसेच ‘पिंजरा’ मधील ते अप्रतिम गाणं, ‘देरे कान्हा चोळी अन् लुगडी’ रागदारीवरील एक उत्तम शास्त्रोक्त गीत ऐकून मन देहभान विसरून समाधीस्थ होते.
हिंदी चित्रपटातील पार्श्वगायन
लता मंगेशकर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाचा प्रवास १९४६- ४७ सालापासून सुरू झाला. ‘आएगा आएगा आनेवाला’ हे खेमचंद प्रकाश यांनी स्वरबद्ध केलेले गीत म्हणजे लता मंगेशकरच्या कारकिर्दीतील एक ‘माईल स्टोन’ होता. सी. रामचंद्र यांच्या ‘अलबेला’ या चित्रपटातली सगळीच गाणी उडत्या चालीची होती आणि वेस्टर्न संगीतावर आधारित होती. पण सी. रामचंद्रांनी लताकडून ‘धीरेसे आजारे’ हे गाणे गाऊन घेतले. ते बघताना व ऐकताना एका वेगळ्याच वातावरणात आपल्याला घेऊन जाते. ‘जागो, मोहन प्यारे जागो’ हे सलीलदांनी स्वरबद्ध केलेले आणि लताने म्हटलेले गाणे म्हणजे एक परमोच्च बिंदू होता. ‘जागते रहो’ मधील गीत राजकपूरनी शैलेंद्रकडून खास लतासाठीच लिहून घेतले होते. हे गाणे पडद्यावर जरी नर्गिसच्या तोंडी असले, तरी या चित्रपटाची नायिका होती लताच! या शिवाय लता मंगेशकरनी गायिलेली पुढील गीते कोण विसरेल? १) ये जिंदगी उसीकी है (अनारकली), २) रसिक बलमा (चोरीचोरी), ३) मोहे भूल गये सावरिया (बैजू बावरा), ४) राधा ना बोले ना बोले ना बोले रे (आझाद), ५) मेरा दिल ये पुकारे आजा (नागिन), ६) आजा रे परदेसी (मधुमती), ७) ओ बसंती पवन पागल (जिस देशमें गंगा बहती है), ८) दिल का खिलौना टूट गया (गूंज उठी शहनाई), ९) बिंदिया चमकेगी (दो रास्ते) १०) जीवन के सफरमें राही (मुनीमजी), ११) ज्योती कलश छलके (भाभी की चूडियाँ) ही सर्व गीते गाताना लताच्या गोड गळ्याची विविधता दिसून येते. भारतातील जवळ जवळ सर्व भाषांमधून तिने गाणी गायिलेली असून त्यातील ४ हजार गाणी लोकप्रिय झालेली आहेत. विस्तारभयास्तव त्या सर्वांची यादी देणे शक्य नसले, तरी मराठी व हिंदीतील काही लोकप्रिय झालेली गीते येथे देणे मला सोयीस्कर वाटते. असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी लता मंगेशकरचा आवाज रेडिओवर किंवा दूरदर्शनवर ऐकू येत नाही.
‘ आनंदघन ‘ टोपण नावाने संगीतदिग्दर्शन
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ या भूपाळीने जागविण्याऱ्या आणि ‘धीरे से आजा री अँखियनमे निंदियाँ’ या अंगाईगीताने सुखाची झोप देणाऱ्या लता मंगेशकर यांचे जीवन म्हणजे समर्पण, त्याग, निष्ठा या चिरंतन मूल्यांचे साक्षात दर्शन आहे.
लता मंगेशकर यांनी इ.स. १९५० मध्ये ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाला प्रथम संगीत दिले, ते लता मंगेशकर नावानेच. पण त्यानंतर मात्र त्यांनी ‘आनंदघन’ हे टोपणनाव स्वीकारून ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’ आणि ‘तांबडी माती’ या ४ मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. मराठी रसिकांना त्या आनंदघन संगीतकार म्हणूनही माहीत आहेत. त्याबद्दल त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या, ‘मोहित्यांची मंजुळा’ च्या वेळी बाबांचा म्हणजेच भालजी पेंढारकरांचा मला फोन आला की, ‘म्युझिक डायरेक्टर’ मिळत नाही. बळवंत देसाई शांतारामबापूकडे बिझी आहेत आणि फडकेसाहेब पुण्यात बिझी ! बाबा म्हणाले, ‘लता माझ्या चित्रात म्युझिकला फारसा स्कोप नाही. शिवाजी, लढणं, थोडे रिलिफ म्हणून गाणी, तर नाव सुचव.’ मी काही नावं सुचवली. ती नावं बाबांना मॉडर्न वाटली. म्हटलं विचार करून सांगते. बाबा तिकडून फोनवर म्हणाले, ‘गाणी पाठवतो.’ बाबांनी फोनवर तीन गाणी सांगितली. ‘निळ्या आभाळी’ ‘बाई बाई मनमोराचा’ आणि ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’ मी चटकन म्हटलं, ‘बाबा, मीच म्युझिक करते.’ बाबा म्हणाले, ‘अगं तुला वेड लागलंय की काय?’ तुझं गायिका म्हणून मोठं नाव आहे. जर तू संगीतकार म्हणून यशस्वी झाली नाहीस तर उगाच तुझं नाव खराब होईल आणि संगीतच द्यायचं तर हिंदी चित्रपटाला दे. माझं म्युझिकल पिक्चर नाही. साधं ऐतिहासिक आहे.’ मी म्हटलं, ‘टोपणनाव घेऊ बाबा!’ पहिली अस्ताई, ‘निळ्या आभाळी’ गाण्याची मी बाबांना फोन करून ऐकवली. बाळ-हृदयनाथ तेव्हा हैदराबादला होता. वादकांसाठी, म्युझिक अॅरेंजरसाठी, मला त्याची मदत हवी होती. पण तो येऊ शकत नव्हता. मग मदतीसाठी मी दत्ता डावजेकरांना बोलावलं. त्यांना सांगितलं, ‘कोणाही वादकाला मी संगीत देतेय हे बोलायचं नाही. कुणी विचारलं तर त्यांना सांगा की, ‘कोल्हापूरचा एक मुलगा संगीतकार आहे. तो येऊ शकत नाही पण लता गातेय’ आणि मग मी दोन गाणी प्रथम केली. ‘निळ्या आभाळी’ आणि ‘सोन सकाळी सर्जा’ त्यावेळी बाबांनी संगीतकार म्हणून जयशंकर असं नाव सुचवलं होतं. पण मी त्यावेळी ‘रामदास’ वाचत होते. त्यामुळे ‘आनंदवन भुवनी’ डोक्यात होतं. माझ्या डोक्यात एकदम ‘आनंदघन’ आलं आणि तेच नाव मी घेतलं!’
राज्यसभेच्या खासदार
राजकारणात लता मंगेशकरांना फारसा रस नव्हता. तरीही त्या स्वातंत्र्यवीर सावरकर व भालजी पेंढारकर यांच्या निस्सीम भक्त आहेत. सावरकर लता मंगेशकरांकडे येत असत. एकदा लता मंगेशकरांनी सावरकरांना राजकारणाबद्दल सल्ला विचारला असता सावरकर त्यांना म्हणाले, तू या फंदात पडू नकोस. तुझं क्षेत्र निराळं आहे. राजकारणात घरादारावर पाणी सोडावं लागतं. तू घरातील थोरली मुलगी आहेस. तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. तेव्हा तू राजकारणात भाग घेऊ नकोस!’ सावरकरांचा हा सल्ला लता मंगेशकरांनी मानला आणि राजकारणापासून त्या सतत दूर राहिल्या. लोकांच्या आग्रहाखातर त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. पण आतापर्यंत त्या सभागृहात तीन-चार वेळाच हजर राहिल्या आहेत. त्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्य नाहीत. त्यांची स्वतःची अशी वेगळी मते आहेत. आपला देश चांगला व्हावा एवढीच त्यांची
इच्छा आहे. त्यांचे पद्धतशीर असे शालेय शिक्षण जरी झालेले नसले, तरी त्यांनी आपल्या जिद्दीने एक अद्भुत चमत्कार करून दाखवला आहे. ‘मला लाभलेला आवाज मी दैवी देणगीच समजते. वयाच्या पाचव्या वर्षापासून ऐकलेले लक्षात ठेवून मी गात असे.’
असे त्या म्हणतात. हाती कागद न धरता अगदी जुन्या काळातील गाणीदेखील त्या न अडखळता गाऊ शकतात. ‘मला गाताना कागद असा लागतच नाही. फक्त सवय म्हणून हाती कागद असतो. पण ५ मिनिटात माझं गाणं पाठ होतं. मला टेपरेकॉर्डरच म्हटलं जातं. ‘तुकाराम’ सिनेमा मला फार आवडला तर बॅकग्राऊंड म्युझिकसकट सारं पिक्चर माझं तोंडपाठ होतं!’ असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे.
प्रभूकुंज निवासस्थान
परदेशांपैकी स्वित्झर्लंड देश त्यांना खूप आवडतो. ‘पण हे सगळे थोड्या दिवसांपुरते. बाकी भारतात फार बरं वाटतं. कारण इथं आपलं स्वतःचं वातावरण असतं!’ असं त्यांचं मत आहे. ‘आवाजासाठी मी काही पथ्य पाळत नाही. पण मला ‘सायनस’चा त्रास असल्याने मी थंड पदार्थ घेत नाही.’ असं त्या सांगतात. इंग्रजी चित्रपटांच्या व्हिडिओ कॅसेट्सचा संग्रह त्यांच्याकडे आहे. गमतीची गोष्ट म्हणजे जोरदार हाणामारीचे चित्रपट लतादीदींना फार आवडतात. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन सतत चालू असते. त्या क्रिकेटच्या शौकीन आहेत. त्यांची सचिन तेंडुलकरांशी मैत्री आहे. फोटोग्राफीचा छंद त्यांनी जोपासला आहे. सर्व व्यापातून निवृत्त झाल्यावर त्यांचा आत्मचरित्र लिहिण्याचा मानस आहे. कोणी मदतीसाठी याचना करावयास गेल्यास त्या विन्मुख पाठवत नाहीत. मुंबईच्या पेडर रोडवरील त्यांच्या घराचं नाव आहे ‘प्रभुकुंज’! घरात प्रवेश करताच डाव्या हाताला मोठे देवघर आहे. आत जाताना आणि बाहेर पडताना घरातील माणसे देवाचे दर्शन घेऊनच पुढे सरकतात ! सदा शुभ्र धवल वेष हे लताजींचं खास वैशिष्ट्य. हाती तंबोरा घेऊन तिरुपती व्यंकटेशापुढे किंवा गोव्यातील मंगेशापुढे बसून गानपूजा बांधणाऱ्या लतादीदी पाहिल्या की साक्षात
संत मीराबाईंचीच आठवण येते. साक्षात वीणावादिनी सरस्वतीच जणू ! व्यक्ती स्वरलता, गानसम्राज्ञी, स्वरसुंदरी अशा अनेक विशेषणांनी अलंकृत झालेली म्हणजे लता मंगेशकर ! संगीत क्षेत्रात भारतातील व जगातील कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याएवढी अपरंपार कीर्ती, मानसन्मान, यश व पैसा अन्य कुणालाही लाभलेला नसावा. मुंबईमध्ये फक्ती दोनच व्यक्ती अशा आहेत की त्यांची घरे कुठे आहेत याचा अंदाज सर्वाना असतो. त्या व्यक्ती म्हणजे एक लता मंगेशकर आणि दुसरे अमिताभ बच्चन ! टॅक्सीमध्ये बसल्यानंतर लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांचे नुसते नाव जरी घेतले, तरी टॅक्सीवाला तुम्हाला पत्ता वगैरे न विचारता थेट या व्यक्तीच्या घरापर्यंत घेऊन जातो. पेडर रोडचा पत्ता सांगताना लोक ‘लता मंगेशकरच्या प्रभुकुंज या बंगल्यापासून थोडं पुढं जा किंवा बाजूला जा असा पत्ता सांगतात. एवढी लोकप्रियता लता मंगेशकरना लाभलेली आहे. इ.स. १९६९ मध्ये
त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये आले असून फक्त लता मंगेशकरचीच पार्श्वगायिका म्हणून नोंद झालेली आहे. हा एक जागतिक विक्रम आहे.
ही तर भगवंताची बासरी
लता मंगेशकर यांच्या जीवनात काही अविस्मरणीय प्रसंगही आले आहेत. इ.स. १९६२ मध्ये चीन आक्रमणाच्या वेळी ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गीत लता मंगेशकरनी अशा काही तन्मयतेने गाऊन दाखवले की, प्रत्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले. त्यादिवशी पंडितजी लतादीदींना म्हणाले, ‘बेटी, आज तूने मुझे रुला दिया’ एका भारतरत्नाने दुसऱ्या ‘भारतरत्ना’ला दिलेली ही मानवंदनाच होती. इ.स. १९७९ मध्ये लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये झालेला लता मंगेशकरांचा कार्यक्रमही असाच प्रचंड गाजला. मध्य प्रदेश सरकारने इ.स. १९८४ पासून लता मंगेशकर पुरस्कार सुरू केला. इ.स. १९७७ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर केला. त्यांना शिवाजी, उस्मानिया, खैरापूर (चंदीगढ) आणि पुणे विद्यापीठांनी ‘डी.लिट्’ ही पदवी दिली आहे. याशिवाय ‘शांतिनिकेतन’ ची ‘देशिकोतमा’, तिरुपती देवस्थानाची ‘अस्थानविद्वान’ ही पदवी आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे. लतादीदींना इ.स. १९५८, १९६२, १९६५ व १९६९ मध्ये ४ वेळा फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले असून त्यानंतर त्यांनी नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या स्पर्धेत यानंतर आपल्या नावाचा विचार करू नये असे कळवून एक
आदर्श समोर ठेवला आहे. लता मंगेशकर ही साक्षात ‘भगवंताची बासरी’ आहे. या बासरीचे वर्णन कोण्या एका कवीने पुढीलप्रमाणे केलेले आहे:-
‘ही तर भगवंताची बासरी
किती भाषा, किती गाणी
किती भावना, किती विराणी
किती अभंग, किती लावणी
रसिकांच्या मनी कोंदणी
ही तर भगवंताची बासरी
सात सुरांच्या सर्गामधुनी
स्वर शिल्पांची विविध लयकारी
रसिकांना अखंड झुलवी
ही तर भगवंताची बासरी!
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.