Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम

Shri Guru Charitra Parayan Niyam

Shri Guru Charitra Parayan Niyam | श्रीगुरुचरित्र पारायण

​गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जुन या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे, असे सांगितले जाते. श्री गुरु चरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते.

सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.

गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

​श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय | Shri Guru Charitra Adhyay

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे.

shri guru charitra

गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी नियम | Rules to follow before starting the Guru Charitra Parayan

१. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा. साप्ताहाच्या सुरुवातीला, साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्रीगुरुचरित्राची पूजा आणि श्रीगुरुची पंचपदी व आरती करावी.

२. श्री दत्तजयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा साप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता, जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.

३. सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे चांगले.

४. घरात जागा एकांत हवी तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह करावा.

५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे.

६. शक्य असल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा.

७. अखंड दीप असावा. साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा.(वाचन चालू असे पर्यंत)

८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे.

९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओवळ्याचे नियम पाळावेत.

  • साप्ताह वाचण्यास बसल्यानंतर मध्येच आसन सोडून उठू नये.
  • दुसऱ्याकडे बोलू नये.
  • हविषान्न एक वेळ घ्यावे. संध्याकाळी फक्त दुध घ्यावे. हविषान्न म्हणजे दुध भात. खारट – तिखट – आंबट (दही, ताक  इत्यादी) खाऊ नये. साखरेचा वापर केल्यास चालेल गुळ वापरू नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप साखर घेता येते.
  • ब्रम्हचर्य पालन करावे.
  • भूमिशयन म्हणजेच पलंग किंवा खाटेवर निजू नये, गादी घेऊ नये, चटई किंवा पांढरे घोंगडे अथवा सतरंजी वर झोपावे, सप्ताहाच्या ७ वे दिवशी समाराधना करण्यास हरकत नाही, त्या दिवशी महानैवेद्य झालाच पाहिजे.
shri gurucharitra

धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ

साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटणे ई .धान्ये; पांढरा मुळा, सुरण ई. कंद; सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे; गायींची दही, दुध आणि तूप; फणस, आंबा, नारळ, हरीतकी, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, केळे, रायआंवळे ही फळे व साखर ही सर्व अतैलपक्व हविष्ये जाणावी (गायींचे ताक व म्हशीचे तूप ही हविष्ये आहेत असेंही कोणी म्हणतात.) – धर्मसिंधु प्रथम परिच्छेद व्रतपरिभाषा.

अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ

साळीचे तांदूळ, साठ दिवसांनी पिकणाऱ्या भाताचे तांदूळ, मूग, वाटणे, तिळ, दूध, सांवे, तृणधान्य व गहूं हे व्रताविषयी हितकारक आहेत. कोहळा, भोंपळा, वांगे, पोईशाक, घोसाळे ही वर्ज्य करावी. भिक्षा मागून मिळालेले अन्न, पीठ, कण्या, शाक, दही तूप, मधु, सांवे, साळीचे तांदूळ, तृणधान्य, यव, मुळा, तांदुळजा हे पदार्थ हविष्यव्रत, नक्त इत्यदि विषयी व अग्निकार्य इत्यदि विषयी हितकारक होत.

shrigurucharitra

गुरुचरित्र – पारायण कसे करावे | How should I start Guru Charitra Parayan?

  • वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
  • वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
  • वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
  • श्रीदत्तात्रायांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
  • सप्ताहकाळात ब्रम्हाचार्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
  • रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव आहे.
  • वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
  • सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
  • सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

गुरुचरित्र – पारायण रोज किती अध्याय वाचावे ? | How to do Guru Charitra Parayan in 7 days?

५२ अध्यायी गुरुचरित्र असेल त्यांनी

  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पहिला अध्याय १ ते ७
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस दुसरा अध्याय ८ ते १८
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस तिसरा अध्याय १९ ते २८
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस चौथा अध्याय २९ ते ३४
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पांचवा अध्याय ३५ ते ३७
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सहावा अध्याय ३८ ते ४३
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सातवा अध्याय ४४ ते ५२

५३ अध्यायी गुरुचरित्र असेल त्यांनी

  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पहिला अध्याय १ ते ९
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस दुसरा अध्याय १० ते २१
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस तिसरा अध्याय २२ ते २९
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस चौथा अध्याय ३० ते ३५
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस पांचवा अध्याय ३६ ते ३८
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सहावा अध्याय ३९ ते ४३
  • श्री गुरुचरित्र पारायण – दिवस सातवा अध्याय ४४ ते ५३

  • Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
    Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ( Shri Guru Charitra ) हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या… अधिक वाचा: Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
  • Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा | Shri GuruCharitra Adhyay 18 अध्याय अठरावा श्रीगणेशाय नमः । जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणीं। पूर्ण केला दातारा ।।१।। गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां न धाय माझें मनु। कांक्षा होतसे अंतःकरणं । कथामृत ऐकावया ।।२।। ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं । कथामृतसंजीवनीं। आणिक निरोपीं दातारा ।।३।। येणेंपरी सिद्धासी… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा
  • Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा | Shri GuruCharitra Adhyay 9 अध्याय नववा श्रीगणेशाय नमः ।। ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन। विनवीत कर जोडून । भक्तिभावें करोनिया ।।१।। श्रीपाद कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा। विस्तारोनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ।।२।। सिद्ध म्हणे नामधारका । पुढें कथा अपूर्व देखा । तया ग्रामीं रजक एका । सेवक झाला… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा
  • Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा | Shri GuruCharitra Adhyay 10 अध्याय दहावा श्रीगणेशाय नमः । ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरींचे महिमान । केवी जाहलें परियेसा ।।१।। म्हणती श्रीपाद नाहीं गेले। आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळें । निरोपावें म्हणतसे ।।२।। सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी। अनंतरूपें होती परियेसीं । विश्वव्यापक’ परमात्मा ।।३।।… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा
  • Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा | Shri GuruCharitra Adhyay 14 अध्याय चौदावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कौतुका । प्रश्न करी अतिविशेखा। एकचित्तें परियेसा ।।१।। जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ती ज्ञानसागरा । पुढील कथा विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ऐसी ।।२।। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी। प्रसन्न झाले श्रीगुरु कृपेंसी। पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रती ।।३।। ऐकोनि… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा
  • Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम
    Shri Guru Charitra Parayan Niyam | श्रीगुरुचरित्र पारायण ​गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जुन या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून… अधिक वाचा: Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top