Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा

Shri GuruCharitra Adhyay 9

श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा | Shri GuruCharitra Adhyay 9

ShriGuruCharitra Adhyay 9

अध्याय नववा


श्रीगणेशाय नमः ।। ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन। विनवीत कर जोडून । भक्तिभावें करोनिया ।।१।।

श्रीपाद कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा। विस्तारोनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ।।२।।

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें कथा अपूर्व देखा । तया ग्रामीं रजक एका । सेवक झाला श्रीगुरुचा ।।३।।

भक्तवत्सल श्रीगुरुराव। जाणोनि शिष्याचा भाव । विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ।।४।।

नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती । लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ।।५।।

ज्याचें दर्शन गंगास्नान । त्यासी कायसें आचरण । लोकानुग्रहाकारण। स्नान करीत परियेसा ।। ६ ।।

वर्ततां ऐसें एके दिवशीं। श्रीपाद यति येती स्नानासी। गंगा वाहत असे दशदिशीं। मध्यें असती आपण ।।७।।

तया गंगातटाकांत’ । रजक असे वखें धूत । नित्य येऊनि असे नमित । श्रीपाद्गुरुमूर्तीसी ।।८।।

नित्य त्रिकाळ येवोनिया । दंडप्रमाण करोनिया । नमन करी अतिविनया। मनोवाक्कायकर्मे ।।९।।

वर्ततां ऐसें एक दिवशीं। आला रजक नमस्कारासी। श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्तें परियेसा ।।१०।।

श्रीपाद म्हणती रजकासी। कां नित्य कष्टतोसी । तुष्टलों मी तुझ्या भक्तीसी । सुखें राज्य करीं आतां ।।११।।

ऐकतां गुरूचे वचन । गांठी बांधी पल्लवीं शकुन। विनवीतसे कर जोडून । सत्यसंकल्प गुरुमूर्ति ।।१२।।

रजक सांडी संसारचिंता । सेवक जाहला एकचित्ता । दुरोनि करी दंडवता । मठा गेलिया येणेंचि परी ।।१३।।

ऐसे बहुत दिवसांवरी। रजक तो सेवा करी। आंगण झाडी प्रोक्षी वारी । नित्य नेमें येणें विधी ।।१४।।

असतां एके दिवशीं देखा। वसंतऋतु वैशाखा । क्रीडा करीत नदीतटाका। आला राजा म्लेंच्छ एक ।।१५।।

स्त्रियांसहित राजा आपण । अलंकृत आभरण। क्रीडा करीत स्त्रिया आपण । गंगेमधून येतसे ।।१६।।

सर्व दळ येत दोनी थीं। अमित असती हस्ती घोडीं। मिरविताती रत्नकोडी । अलंकृत सेवकजन ।।१७।।

ऐसा गंगेच्या प्रवाहांत। राजा आला खेळत । अनेक वाद्यनाद गर्जत। कृष्णावेणी थडियेसी ।।१८।।

रजक होता नमस्कारित । शब्द झाला तो दुश्चित । असे गंगेंत अवलोकित । समारंभ राजयाचा ।।१९।।

विस्मय करी बहु मानसीं । जन्मोनिया संसारासी । जरी न देखिजे सौख्यासी । पशुसमान देह आपुला ।। २० ।।

धन्य राजयाचें जिणें। ऐसें सौख्य भोगणें। स्त्रिया वखें अनेक भूषणें । कैसा भक्त ईश्वराचा ।।२१।।

कैसें याचें आर्जव फळलें। कवण्या देवा आराधिलें। कैसे श्रीगुरु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ।।२२।।

ऐसें मनीं चिंतित । करीतसे दंडवत । श्रीपादराय कृपावंत । वळखिली वासना तयाची ।।२३।।

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति। जाणोनि अंतरीं त्याची स्थिती। बोलावूनिया पुसती। काय चिंतिसी मनांत ।।२४।।

रजक म्हणे स्वामीसी । देखिलें दृष्टीं रायासी । संतोष झाला मानसीं । केवळ दास श्रीगुरूचा ।।२५।।

पूर्वी आराधोनि देवासी । पावला आतां या पदासी। म्हणोनि चिंतितों मानसीं । कृपासिंधु दातारा ।। २६ ।।

ऐसें अविद्यासंबंधंसी । नाना वासना इंद्रियांसी। चाड नाही या भोगासी। चरणीं तुझे मज सौख्य ।। २७।।

श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी । वांछा असे भोगावयासी । राज्यभोग तमोवृत्ति ।। २८।।

निववीं इंद्रियें सकळ । नातरी मोक्ष नव्हे निर्मळ । बाधा करिती पुढें केवळ । जन्मांतरीं परियेसीं ।। २९ ।।

तुष्टवावया इंद्रियांसी । तुवां जावें म्लेंछवंशासी। आवडी जाहली तुझे मानसीं। राज्य भोगीं जाय त्वरित ।। ३० ।।

ऐकोनि स्वामीचें वचन । विनवी रजक कर जोडून । कृपासागरू तूं गुरुराज पूर्ण। उपेक्षू नको म्हणतसे ।।३१।।

अंतरतील तुझे चरण । द्यावें मातें पुनर्दर्शन। तुझा अनुग्रह असे कारण। ज्ञान द्यावें दातारा ।।३२।।

श्रीगुरु म्हणती तयासी । वैदुरानगरीं जन्म घेसी । भेटी देऊं अंतकाळासी। कारण असे येणें आम्हां ।। ३३ ।।

भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होईल तुझे मानसीं। न करीं चिंता भरंवसीं । आम्हां येणें घडेल ।।३४।।

आणिक कार्यकारणासी । अवतार घेऊं परियेसीं । वेष धरोनि संन्यासी। नाम नृसिंहसरस्वती ।।३५।।

ऐसें तया संबाधूनि । निरोप देती जाय म्हणोनि । रजक लागला तये चरणीं । नमस्कारीत तये वेळीं ।। ३६ ।।

देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती। इह’ भोगिसी की पुढतीं। राज्यभोग सांग मज ।। ३७ ।।

रजक विनवीत श्रीपादासी। झालों आपण वृद्धवयेसी । भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनगोड’ राज्यभोग ।। ३८ ।।

ऐकोनि रजकाचें वचन । निरोप देती श्रीगुरु आपण । त्वरित जाईं रे म्हणोन । जन्मांतरीं भोगीं म्हणती ।। ३९ ।।

निरोप देतां तया वेळीं। त्यजिला प्राण तत्काळीं । जन्मता झाला म्लेंछकुळीं । वैदुरानगरीं विख्यात ।।४० ।।

ऐसी रजकाची कथा । पुढें सांगेन विस्तारता । सिद्ध म्हणे नामधारका आतां। चरित्र पुढतीं अवधारीं ।।४१।।

ऐसें झालिया अवसरी। श्रीपादराय कुरवपुरीं । असतां महिमा अपरंपारी । प्रख्यात असे परियेसा ।।४२।।

महिमा सकळ सांगतां । विस्तार होईल बहुकथा । पुढील अवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ।।४३।।

महत्त्व वर्णावया श्रीगुरूचें । शक्ति कैची या वाचे। नवल हें अमृतदृष्टीचें। स्थानमहिमा ऐसा ।।४४।।

श्रीगुरु राहती जे स्थानीं। अपार महिमा त्या भुवनीं। विचित्र जयाची करणी। दृष्टान्तें तुज सांगेन ।।४५।।

स्थानमहिमाप्रकार। सांगेन ऐक एकाग्र । प्रख्यात असे कुरवपूर । मनकामना पुरती तेथें ।।४६ ।।

ऐसें कित्येक दिवसांवरी । श्रीपाद होते कुरवपुरीं। कारण असे पुढें अवतारीं। म्हणोनि अदृश्य होते तेथें ।।४७।।

आश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसीं। श्रीगुरु बैसले निजानंदेंसी । अदृश्य झाले गंगेंत ।।४८।

लौकिकीं दिसती अदृश्य जाण। कुरवपुरीं असती आपण । श्रीपादराव निर्धार जाण । त्रयमूर्तीचा अवतार ।।४९।।

अदृश्य होवोनि तया स्थानीं। श्रीपाद राहिले निर्गुणीं। दृष्टान्त सांगेन विस्तारोनि । म्हणे सरस्वतीगंगाधरू ।। ५० ।।

जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ । कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ । असे प्रख्यात भूमंडळीं ।।५१।।

सिद्ध सांगे नामधारकासी । तेचि कथा विस्तारेंसी । सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ।।५२।।

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ।।९।। ओवीसंख्या ।।५२।।
।। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

।। अध्याय नववा ।। ।। परिटास वरदान ।।


श्रीगणेशाय नमः ।। नामधारक सिद्धाला म्हणाला, “महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखविल्या ? सिद्धयोगी म्हणाला, “तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत. त्या ग्रामात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा.
एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले, “मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही.” ती आपुलकी पाहून परिटाला खूप बरे वाटले. संसारचिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, सडासंमार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे.
वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकाविहारासाठी आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या. गप्पागोष्टी करीत होत्या. शृंगारलेली नौका, नदीतीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवकवर्ग, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, “हा राजा किती भाग्यवान आहे ! जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरूची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झालं ? आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जिणे व्यर्थच होय.” तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, “परिटा, मनात काय चिंतन चालले आहे ?” तो म्हणाला, “स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण असा विचार मी का करू? तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे.”
त्यावर श्रीगुरू म्हणाले, “परिटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत. अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल.” परीट म्हणाला, “पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका.” श्रीगुरू म्हणाले, “तू माझा निस्सीम भक्त आहेस. मी तुला कसे अंतर देईन ? तुझ्या वृद्धापकाळी ‘नृसिंहसरस्वती’ रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग.” परीट म्हणाला, “त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन.” तेव्हा ‘तथाऽस्तु !’ म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे.”

परिटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला, “नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे माहात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरू आश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने तेथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते.”

  • Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
    Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ( Shri Guru Charitra ) हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या… अधिक वाचा: Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
  • Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा | Shri GuruCharitra Adhyay 18 अध्याय अठरावा श्रीगणेशाय नमः । जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणीं। पूर्ण केला दातारा ।।१।। गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां न धाय माझें मनु। कांक्षा होतसे अंतःकरणं । कथामृत ऐकावया ।।२।। ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं । कथामृतसंजीवनीं। आणिक निरोपीं दातारा ।।३।। येणेंपरी सिद्धासी… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा
  • Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा | Shri GuruCharitra Adhyay 9 अध्याय नववा श्रीगणेशाय नमः ।। ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन। विनवीत कर जोडून । भक्तिभावें करोनिया ।।१।। श्रीपाद कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा। विस्तारोनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ।।२।। सिद्ध म्हणे नामधारका । पुढें कथा अपूर्व देखा । तया ग्रामीं रजक एका । सेवक झाला… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा
  • Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा | Shri GuruCharitra Adhyay 10 अध्याय दहावा श्रीगणेशाय नमः । ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरींचे महिमान । केवी जाहलें परियेसा ।।१।। म्हणती श्रीपाद नाहीं गेले। आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळें । निरोपावें म्हणतसे ।।२।। सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी। अनंतरूपें होती परियेसीं । विश्वव्यापक’ परमात्मा ।।३।।… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा
  • Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा
    श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा | Shri GuruCharitra Adhyay 14 अध्याय चौदावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कौतुका । प्रश्न करी अतिविशेखा। एकचित्तें परियेसा ।।१।। जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ती ज्ञानसागरा । पुढील कथा विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ऐसी ।।२।। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी। प्रसन्न झाले श्रीगुरु कृपेंसी। पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रती ।।३।। ऐकोनि… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा
  • Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम
    Shri Guru Charitra Parayan Niyam | श्रीगुरुचरित्र पारायण ​गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जुन या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून… अधिक वाचा: Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम


Keyword – gurucharitra adhyay 9 , gurucharitra adhyay 9 pdf​ , gurucharitra 9 adhyay​ , gurucharitra 9 va adhyay​ , shri gurucharitra adhyay 9 ​, gurucharitra 9 adhyay in marathi​ , 9 adhyay gurucharitra​ , 9 va adhyay gurucharitra​ , gurucharitra adhyay 9 marathi​ , gurucharitra adhyay 9 pdf download​


टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top