भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी | Bharat Ratna Atal Bihari Vajpayee

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव भारतीय राजकीय इतिहासात एक उज्ज्वल प्रतिष्ठा असून, त्यांचे कार्य आणि योगदान भारतीय राजकारणात सन्मानीय आहेत. हे ब्लॉग आपल्याला अटलजींचं जीवन, कर्तव्ये आणि अतिशय सोप्पया प्रभावी कौशल्य सांगणारं आहे. यात, त्यांच्या राजकीय प्रवासाचं आणि राजकारणातलं कार्य अभ्यास करून घेण्यात त्यांच्या सामर्थ्याची प्रेरणा घेऊन नवीन दिशा मिळवू शकता.

Atal Bihari Vajpayee

जो राजकारणी असतो तो कवी नसतो आणि जो कवी असतो तो राजकारणी नसतो. परंतु आपल्या देशात कवी हृदयाचा राजकारणी कालपर्यंत होता. तो आपल्या एका कवितेत म्हणतो,

‘गीत नया गाता हूँ मैं,
टूटे हुओ सपने की सुने कौन सिसकी ,
अंतः को चीर व्यथा, पलकोंपर ठिठकी,
हार नाही मानूंगा,
रार नहीं ठानूँगा काल के कपालपर लिखता हूँ ,
गीत नया गाता हूँ ।

जन्म, बालपण व शिक्षण

अशा त-हेचे गीत गाणारा हा राजकारणी कवी म्हणजे सर्वश्री अटलबिहारी वाजपेयी होय. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात देशव्यापी लोकप्रियता आणि देशाचे नेतृत्व केलेल्या नेत्यांच्या यादीत अटलबिहारी वाजपेयींचे नाव अग्रभागी आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये २५ डिसेंबर १९२४ रोजी कृष्णादेवी आणि कृष्णबिहारी वाजपेयी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वाजपेयींचे वडील चांगले कवी आणि शिक्षक होते. वडिलांकडूनच त्यांना काव्याचा वारसा मिळाला. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाल्याने बालपणीच चांगले संस्कार घडले.

BharatRatna Atal Bihari Vajpayee

सुरुवातीला त्यांना डाव्या विचारसरणीचे आकर्षण होते. पण नंतर ते उजव्या विचारसरणीकडे वळले. १९३९ मध्ये आर्यकुमार सभेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आर. एस. एस.) प्रवेश केला.

अटलजींनी १९४१ मध्ये नागपूरहून ओ.टी.सी.चे पहिले वर्ष पूर्ण केले.
१९४२ मध्ये लखनौच्या कालिचरण हायस्कूलमधील शिबिरात त्यांनी ओ.टी.सी.चे दुसरे वर्ष पूर्ण केले आणि ओ.टी.सी. च्या तिसऱ्या वर्षांचे शिक्षण नागपूरहून १९४४ मध्ये पूर्ण केले.

ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजिएट हायस्कूलमधून हायस्कूल व इंटर पास झाल्यावर राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातून ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना ते वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असत. त्यावेळी त्यांनी, ‘हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय’ ही कविता लिहिली. अटलजींनी तीन वर्षात एम.ए.चा व एल.एल.बी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. एल. एल. बी.चा अभ्यासक्रम अटलबिहारींनी आपल्या वडिलांबरोबर पूर्ण केला. बापलेक दोघेही एकाच वेळी परीक्षेला बसले व उत्तीर्ण झाले. दोघांचा एकाचवेळी विनंती अर्ज बघून कानपूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजचे प्राचार्य कालिकाप्रसाद भटनागरदेखील आश्चर्यचकित झाले होते.

ब्राह्मण कुलात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांची लहानपणी मुंज झाली होती. पण रा.स्व. संघाचे प्रशिक्षण घेऊन ते घरी परतले की त्यांच्या गळ्यात जानवे नसायचे ‘जानव कुठं आहे?’ म्हणून विचारले तर ते म्हणत, ‘खुंटीला टांगून ठेवलं. जोपर्यंत प्रत्येक हिंदूमात्राला गळ्यात जानवं घालण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझ्या गळ्यात घालणार नाही.’

‘ स्वदेश व पांचजन्य ‘चे संपादक

ते उदारमतवादी असले तरी रा. स्व. संघाचा मुखवटा अशीच त्यांची ओळख राहिली. रा. स्व. संघ ही सांस्कृतिक संघटना असल्याने तिला राजकारणाचे वावडे होते. त्यामुळे रा. स्व. संघाने भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीही भाग घेतला नाही. ही संघटना राजकीय चळवळीपासून अलिप्त राहिली. अर्थात, असे असले, तरी वाजपेयींना राजकारण मुळीच वर्ज्य नव्हते. १९४२ च्या काळात ब्रिटिशांच्या विरोधातील ‘भारत छोडो’ या अभियानातील सहभागापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ब्रिटिशांच्या वसाहतवादाला विरोध केल्याप्रकरणी त्यांना तरुणपणी काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला. सुरुवातीला कम्युनिस्ट म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली असली, तरी नंतर हिंदू राष्ट्रवादाचा अजेंडा असलेल्या आर.एस.एस.चे सदस्य होण्यासाठी त्यांनी कम्युनिझमपासून फारकत घेतली. १९५० च्या दशकात संघाचे नियतकालिक चालविण्यासाठी वाजपेयींनी लॉ स्कूलमधून शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पाळेमुळे आर एस एस मध्येच खोलवर रुजली. त्यानंतर संघाचा मुखवटा आणि भाजपचा मध्यम आवाज म्हणून ते पुढे

Atal Bihari Vajpayee

आले. देशहितासाठी वाजपेयींनी आजन्म अविवाहित राहण्याचे ठरवले. अटलबिहारी वाजपेयी जसे कवी होते, तसेच ते पत्रकारही होते. १९४६ मध्ये ‘राष्ट्रधर्म’ या मासिकाचे, १९५० मध्ये ‘स्वदेश’ या दैनिकाचे आणि २००४ मध्ये ‘पांचजन्य’ या साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. ते ‘राष्ट्रधर्म’चे संपादक असताना त्या अंकाच्या मुखपृष्ठावरच, त्यांची ‘हिंदू तनमन हिंदू जीवन’ ही कविता छापली जात असे. यावरून अंकाचा उद्देश काय असेल ते वेगळे सांगण्याची गरज नाही. अटलजींनी काढलेले ‘पांचजन्य’ या साप्तहिकाचे विविध विशेषांक पत्रकारितेच्या क्षेत्रात मैलाचे दगड ठरले आहेत आणि त्यातून भावी काळासाठी संग्रहणीय माहिती प्रकाशित करून त्यांनी भारतीय पत्रकारितेला समृद्ध करण्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. अटलजी दैनिक ‘स्वदेश’चे संपादक असताना त्यांचे अग्रलेख विशेष चर्चिले जात. विशेषतः त्यावेळी त्यांनी लिहिलेले ‘टंडनजीसे तिब्बतपर आक्रमण’, ‘ठक्कर बाप्पा’, गोवध बंदी’ हे लेख विशेष गाजले आणि लोकांना ते लोकसभेचे दहा वेळा खासदार आवडले.

लोकसभेचे दहा वेळा खासदार

१९५१ मध्ये डॉ. शामाप्रसाद मुखर्जीनी भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी हे जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. भाजपची मातृसंस्था असलेल्या भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून वाजपेयींची ओळख होती. शामाप्रसाद मुखजींनी
काश्मिरात १९५३ मध्ये केलेल्या आमरण उपोषणांच्या आंदोलनात अ टलबिहारी

Atal Bihari Vajpayee 2

वाजपेयी हे शामाप्रसाद मुखर्जीच्या बाजूने सहभागी झाले. काश्मीर मुस्लीमबहुल असल्यामुळे त्या राज्यात प्रवेश करताना परमिट बाळगावे लागे. तसेच काश्मीरला भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. त्या विरोधात डॉ. शामाप्रसादांचे हे आंदोलन होते. त्यांच्या या आंदोलनामुळे काश्मीरचा भारतीय संघराज्यात समावेश होण्याला एक प्रकारची गती मिळाली. मात्र अनेक आठवडे तुरुंगवास व आजारपण, या कारणामुळे डॉ. शामाप्रसादांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद ठरला. ही घटना त्यावेळी तरुण असलेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या मनावर खोलवर जखम करणारी

ठरली. डॉ. शामाप्रसाद मुखर्जीचा वारसा घेऊन पुढे चाललेल्या अटलजींनी १९५७ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९६७, १९७१, १९७७, १९८०, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये निवडून येऊन अटलबिहारी यांनी सलग १० वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

अटलबिहारी वाजपेयींचे संसदेतील पहिलेच भाषण ऐकल्यावर भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, ‘तू एक दिवस देशाचा पंतप्रधान होशील !’ अशी थाप वाजपेयींच्या पाठीवर मारली होती. दशसहस्त्रे वक्ता असलेल्या अटलबिहारींची पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या सरकारमधील १९७७ ते ७९ मधील परराष्ट्रमंत्रिपदाची कारकीर्द चांगली गाजली.

हिंदुत्वनिष्ठ विचारवंत

भाजपा हा मुस्लिमांचा द्वेष्टा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अटलजी परराष्ट्रमंत्री झाल्यावर भारत पाक संबंध बिघडतील, अशी अनेकांची अटकळ होती. परंतु अटलजींनी ती खोटी ठरवली. परराष्ट्रमंत्री झाल्यावर अटलजी स्वतः पाकिस्तानला गेले आणि त्यांनी फराक्का गंगा जलाच्या वाटपासंबंधी करार करून पाण्याचा पेच सोडवला. त्यांनी भारत पाक यांच्यात रेल्वे यात्रा पुन्हा सुरू केली. परराष्ट्रमंत्री म्हणून अटलजींची भारताची परराष्ट्र नीती ही ‘वसुधैवव कुटुंबकम’ या तत्त्वावर आधारित

pm Atal Bihari Vajpayee

होती. अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे खासदार, मंत्री, पंतप्रधान तर होतेच, पण सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते हिंदुत्वनिष्ठ विचारवंत होते. वेळोवेळी त्यांनी आपल्या लेखनातून व भाषणातून भाजपची विचारप्रणाली स्पष्ट केलेली आहे.
भाजपचा सेक्युलरवाद (Secularism) स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘हिंदू हा एक विशेष असा पंथ नाही. तो कुठल्याही उपासना पद्धतीचा द्योतक नाही, तर तो एका जीवनपद्धतीचा परिचायक असून त्याच्या अंतर्गत अनेक संप्रदाय, मतमतांतरे आणि उपासना पद्धती यांचा समावेश झालेला आहे. ‘सेक्युलर (Secular) या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा नसून त्याचा खरा अर्थ संप्रदायनिरपेक्ष असाच आम्ही मानतो. कुठलेही राज्य हे धर्मसापेक्ष परंतु संप्रदाय निरपेक्ष असले पाहिजे’ असे ते म्हणत.

रामजन्मभूमी, बाबरी मशीद, काश्मीरबद्दलचे घटनेचे ३७० वे कलम आणि समान नागरी कायदा हे भारतीय जनता पक्षाचे तीन वादग्रस्त कळीचे प्रश्न आहेत. याबाबत अटलबिहारींचे विचार स्पष्ट आहेत.

घटनेच्या वादग्रस्त ३७० व्या कलमाबद्दल अटलबिहारी वाजपेयी म्हणतात, ‘जम्मू काश्मीर भारताचा अखंड हिस्सा आहे. परंतु जम्मू काश्मीरची नागरिकता निराळी आहे. काश्मीरला आम्ही भारताचा मुकुटमणी म्हणतो. परंतु काश्मीरचा ध्वज वेगळा आहे. त्याचे कारण काय? आमचा तिरंगा ध्वज साऱ्या राष्ट्राला प्यारा आहे. मग काश्मीरचा ध्वज वेगळा का? जम्मू काश्मीर आणि शेष भारत यांच्यामध्ये आज एक मनोवैज्ञानिक भिंत उभी आहे. आज वेळ अशी आली आहे की, आता ही मनोवैज्ञानिक भिंत बाजूला सारायलाच हवी. मी सभागृहाचे ध्यान याकडे आकर्षित करू इच्छितो की, घटनेचे कलम ३७० चे प्रावधान हे तात्पुरते आणि प्रसंगोपात् (Temporary and Transitional Provision) असल्याने ते प्रावधान भारतीय राज्यघटनेचे स्थायी अंग होऊ शकत नाही. काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवणे हा कुटिल डाव आहे. जर आमचे सरकार केंद्रात सत्तेवर आले, तर आम्ही काश्मीरचे हे ३७० वे कलम लगेच रद्द करून टाकू.’

समान नागरी कायद्याबद्दल बोलताना अटलबिहारी वाजपेयी म्हणतात, ‘आम्ही समान नागरी कायद्याचा आग्रह धरतो म्हणून आम्ही संप्रदायी असल्याचे म्हटलं जातं. मला हेच समजत नाही की, घटनाकारांनी विवाहासंबंधी कायदा करण्याची शिफारस केली होती. मग ते काय सांप्रदायिक कारणानी प्रेरित होतं? हा काय सांप्रदायिक मुद्दा आहे का? हा तर लैंगिक समानतेचा (जेंडर इक्वालिटी) मामला आहे. इस्लामिक देशामध्येसुद्धा व्यक्तिगत कायद्यात संशोधन आणि बदल होत आहेत. त्याचप्रमाणे इथंही परिवर्तन व्हायला हवं. गोव्यात आज एकच सिव्हिल लॉ लागू आहे. आपल्या देशात जर क्रिमिनल लॉ एक आहे, तर मग सिव्हिल लॉसुद्धा एक का असू शकत नाही?’

अयोध्येत राममंदिर बांधले जावे अशी समस्त हिंदूंची भावना आहे. परंतु
व्होट बँकेच्या राजकारणामुळे त्यात अनेक अडथळे आलेले आहेत. याबाबत अटलबिहारी म्हणतात, ‘अयोध्येचीच एक गोष्ट घ्या. जिथं रामाचा जन्म झाला तिथं पूर्वी मंदिर होतं. पण बाबरानं ते मंदिर तोडून त्या ठिकाणी मशिद उभारली. बाबर हा विदेशी असल्यानं हिंदुस्थानला अपमानित करण्यासाठीच त्यानं हिंदूंचं मंदिर पाडून त्याठिकाणी मशीद उभारली. सरदार वल्लभभाई पटेलांनी सोरटी सोमनाथाचे मंदिर राष्ट्राच्या अस्मितेसाठी निर्मिले होते. त्यावेळी कोणाही मुसलमानाला राग आला नाही. जर गुजराथेत सोमनाथाचं मंदिर उभारलं जातं, तर मग अयोध्येत राममंदिर का नको? याबाबत विचित्र गोष्ट अशी की, बाबर जिथून आला तिथं निघून गेला. परंतु इथले लोक मात्र बदलायला तयार नाहीत. याचं कारण इथलं व्होट बँकेचं राजकारण त्यांना बदलू देत नाही. अरे बाबांनो! राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारलं गेलं, तर तुमचं काय बिघडणार आहे? कुठलं आकाश तुमच्यावर कोसळणार आहे?’

‘वक्तादशसहस्त्रेषु’

परराष्ट्रमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदी भाषेतून केलेले भाषण आजही नावाजले जाते.

हातवारे करून बोलण्यातील विराम आणि नर्मविनोदी भाषाशैली यांच्या मदतीने त्यांनी अनेक विरोधकांच्या फिरक्या घेतल्या. त्यांचा दीर्घविराम, ते पुढे काय बोलतात यासाठी क्षणभर श्रोत्यांना वाव देत असे. त्यांची ही बोलण्याची लकब सर्वांना चांगलीच भावली.

त्यांच्या सांसदीय कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय नेत्यांचे मृत्यू झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना अटलजींनी वापरलेले शब्दप्रयोग म्हणजे गद्यकाव्येच आहेत. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज, मृत्यूनं ज्यांना आमच्यातून ओढून नेलं, परंतु ज्यांची कीर्तिगाथा काळाच्या पडद्यावर चिरंतन अक्षरांनी अंकित होईल, त्या राजेंद्रबाबूंच्या स्मृतीस मी देखील आपली विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. वज्राप्रमाणे कठोर परंतु फुलासमान मृदुल असं त्यांचं जीवन भावी प्रजेला निरंतर प्रेरणा देत राहील. परमेश्वराजवळ आपण अशी प्रार्थना करू की तो आम्हाला हा वज्राघात सहन करण्याचं सामर्थ्य देवो. त्यातूनच आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकू. त्यांच्याबरोबरच एका युगाची समाप्ती झाली

आहे.’ ६ मे १९६१ रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांची एक संयुक्त बैठक हुंडा समस्येवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केली गेली होती. त्यावेळी बोलताना
अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, ‘आपल्या देशात हुंड्याचा राक्षस अनेक वर्षापासून सुकुमार तरुणींना गिळंकृत करीत आहे. दररोज अनेक तरुणी आपले पती, सासू सासरे, नणंदा इत्यादींच्या हातून जाळल्या जात आहेत. विहिरीत लोटल्या जात आहेत त्या स्वतःच आपल्या पीडित जीवनास कंटाळून नदी, विहिरी, विष, रेल्वेचे रूळ आणि आग इत्यादींच्या चरणी शरण जात आहेत आणि आपलं जीवन समाप्त करीत आहेत. अर्धवट उमललेल्या कळ्यांवर वज्राघात होतो आहे. स्वप्न रंगविणाऱ्या यौवनाला अर्ध्या वाटेतच निरोप दिला जातो आहे. विवाहाच्या मेंदीने रंगविलेल्या हातांना पुन्हा मेंदी लावण्याची वेळच येत नाही. त्यापूर्वीच हुंड्याचा राक्षस त्यांना काळाच्या स्वाधीन करीत आहे. भारताच्या ललाटी हा एक निःसंशय काळा डाग आहे.’ या भाषणात अटलजींनी हुंडाबळीचे किती समर्पक व विदारक वर्णन केले आहे. शेवटी दोन्ही सभागृहांच्या सर्व खासदारांनी एकमताने असे सांगितले की, हुंडा पद्धत समाप्त करण्याच्या दृष्टीने एक कडक कायदा करायला हवा. अशा त-हेने अविवाहित असलल्या अटलबिहारी वाजपेयींनी विवाहितांच्या समस्या वेशीवर टांगल्या.

अस्पृश्यतेच्या दुष्ट प्रथेला कडाडून विरोध करताना अटलजी म्हणतात, ‘शिवाशिव हे पाप आहे. तो अभिशाप आहे. अस्पृश्यता हा एक कलंक आहे. मला तर असं वाटतं की, हिंदूधर्मशास्त्रात जर अस्पृश्यतेला मान्यता दिली असेल, तर ते चुकीचं असून त्याला आम्ही मान्यता देणार नाही. याहीपुढे एक पाऊल टाकून मी

तर म्हणेन की, प्रत्यक्ष ईश्वर जरी मला येऊन म्हणाला, की ‘तू शिवाशिव मानीत जा’, तर मी त्या ईश्वरालाही मानणार नाही!’ अशी रोखठोक भूमिका घेणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना त्यांचे विरोधक जातीयवादी व प्रतिगामी का म्हणतात हे एक न उलगडणार कोडे आहे.

अटलबिहारी वाजपेयी हे ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या मालिकेतले एक महान वक्ते आहेत. १९७१ मध्ये बांगलादेशाच्या युद्धाच्या वेळी ते म्हणाले होते, ‘भारत वंदनभूमी आहे. आम्ही जगू तर हिच्यासाठी आणि मरू तेही तिच्यासाठीच!’

भारतीय जनता पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष

१९५७ ते १९७७ अशी सुमारे २० वर्षे ते भारतीय जनसंघ पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते होते. १९६२ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. १९६७ ते ७० या अवधीत ते सार्वजनिक लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे सर्व पक्षात मित्र होते. त्यामुळे भाजपसाठी ते अनेक मित्र पक्ष जोडू शकले. ते विरोधी पक्षनेता असले, तरी ‘अजातशत्रू’ होते.

त्यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या पक्षापुरतीच मर्यादित नव्हती. त्यामुळेच जवाहरलाल नेहरूंनंतर त्यांना ‘स्टेट्समन पोलिटिशियन’ असे म्हटले जाते. इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारल्यावर साथी जयप्रकाश नारायण यांनी

आंदोलन पुकारले. या आंदोलनात सर्व विरोधी पक्ष सामील झाले. त्यात अटलबिहारींचा जनसंघ हा पक्षही सामील होऊन आघाडीवर होता. इंदिरा गांधींनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्यासह सर्व विरोधी पक्ष नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबले होते. अटलबिहारी वाजपेयींनाही तुरुंगात जाऊन बसावे लागले. तुरुंगात जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी हे जनता पक्षाचे संस्थापक सदस्य झाले. १९७७ ते १९८० पर्यंत जनता पक्षाचे अस्तित्व होते. त्यानंतर जनता पक्ष फुटून त्यातून जनसंघ बाहेर पडला. पण बाहेर पडताना त्याने आपले जुने नाव बदलून भारतीय जनता पक्ष असे नवीन नाव धारण केले. आजही तेच नाव कायम आहे. १९८० ते १९८६ पर्यंत अटलबिहारी

वाजपेयी हेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहिले. अध्यक्षपदाचे काम करतानाही त्यांनी कधी बडेजाव गाजवला नाही. ते पायी, सायकल व टांग्यातून पक्षकार्य करत. १९७१ ची गोष्ट आहे. खासदार असताना ते ग्वाल्हेरला राज्यातून घरी आले आणि घरी चहापाणी झाल्यावर शिंदे की छावणीमधून संभाजी कॉलनीत आपले बंधू प्रेमबिहारी यांच्याकडे सायकलवरून गेले. १९७७ मध्ये अटलजी भारताचे परराष्ट्रमंत्री असताना एका खाजगी लग्नसमारंभाला जाताना
सरकारी गाडीतून आपल्या पुतणीला नेण्याचे नाकारले. ते म्हणाले, ‘ही मोटार भारताच्या विदेश मंत्र्याची आहे, तुझ्या काकाची, अटलबिहारींची नाही.’ घरी आल्यावर ते आपल्या पुतणीला म्हणाले, ‘ज्यावेळी मी पार्टीच्या वा सरकारी कामासाठी येतो, त्यावेळी माझा घराशी संबंध नसतो आणि जेव्हा मी घरी येतो तेव्हा पार्टी वा सरकारी कामाशी माझा संबंध नसतो.’

भारताचे तीन वेळा पंतप्रधान

भारतीय जनता पक्ष हा देशभर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावानेच ओळखला जाऊ लागला. सुमारे चार दशके विरोधी पक्षात काम केल्यानंतर १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी हे पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान बनले.

पंतप्रधान होण्यापूर्वी जेव्हा ते लोकसभेच्या निवडणुका लढवीत, तेव्हा भाजपचे कार्यकर्ते म्हणत असत की, ‘पंतप्रधानकी अगली बारी, अटलबिहारी, अटलबिहारी’, ‘राजतिलक की करो तैयारी। आ रहे हैं अटलबिहारी.’

अटलबिहारी वाजपेयी हे काँग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांच्यापूर्वी मोरारजीभाई देसाई हे काँग्रेस विरोधी पक्षाचे पंतप्रधान झाले होते. पण मुरारजीभाई देसाई हे मूळ काँग्रेसवालेच होते. कट्टर विरोधातून झालेला पहिला विरोधी पक्षाचा पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयीच. मात्र संख्याबळाअभावी त्यांचे सरकार त्यावेळी फक्त १३ दिवसच टिकू शकले. यावेळी ते १६ मे १९९६ ते ३१ मे १९९६ असे फक्त सोळा दिवसांचे औटघटकेचे पंतप्रधान ठरले. नंतर पुन्हा १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. मात्र यावेळी त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या तमिळनाडूच्या अण्णाद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या जयललिता यांनी अचानक आपला पाठिंबा काढल्याने अस्थिर झालेले त्यांचे सरकार अवघ्या १३ महिन्यातच पडले. १९९९च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले आणि वाजपेयी इजा बिजा अन् तिजा या न्यायाने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. यावेळी मात्र त्यांच्या सरकारने ५ वर्षांचा कालावधी पूर्ण केला. १३ ऑक्टोबर १९९९ ते १३ ऑक्टोबर २००४ पर्यंत ते पंतप्रधानपदी आरूढ झाले. वाजपेयी हे सर्वांत जास्त काळ पंतप्रधानपदावर बसलेले बिगरकाँग्रेसी पक्षाचे एकमेव नेते होते. या अवधीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कायदे व सुधारणा केल्या. त्यांच्या काळात भारत पाकिस्तानचा प्रश्न फार ज्वलंत होता.

भारत-पाक संबंधांचा नवा अध्याय वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळात सुरू झाला, हे त्यांचे सर्वात मोठे राजनैतिक यश मानले जाते. पाकिस्तानबरोबर असलेले संबंध सुधारणे हे वैयक्तिक पातळीवरही त्यांचे ध्येय असल्याचे वाजपेयींचे
निकटवर्तीय सांगतात आणि त्याची सुरुवात १९७० च्या दशकात मोरारजीभाई देसाईंच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्रिपद सांभाळताना झाली होती.

१९९९ मध्ये त्यांनी पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी बरीच टीका सहन करावी लागली. परंतु वाजपेयी डगमगले नाहीत. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या बससेवेच्या उ‌द्घाटनासाठी पहिल्या बसमधून त्यांनी स्वतः प्रवास केला. अटलबिहारींच्या पुढाकाराने सुरू झालेली ही योजना पुढे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळातही सुरूच होती. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे वाजपेयी भाजपच्या राजकीय अजेंड्याच्या पलीकडे जाऊन पोहोचले.

‘ भारतरत्न ‘ पुरस्कार मानाचा शिरपेच

१९९९ मध्ये कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. डिसेंबर १९९९ मध्येच काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या भारतीय विमानाचे अपहरण झाल्यावर तीन दशहतवाद्यांच्या सुटकेच्या मोबदल्यात सर्व भारतीय प्रवाशांची सुखरूप सुटका करून घेतली. त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेला सुरुवात झाली. ही

परंतु अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे १९९८ मध्ये त्यांनी ‘पोखरण’ येथे जमिनीखाली घेतलेली अणुचाचणी. अणुचाचणी करून वाजपेयींनी जगात भारताचा दबदबा निर्माण केला.

‘ पोखरण ‘ येथील अणुचाचणी

त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आजपर्यंत त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. १९९२ साली त्यांना ‘पद्मविभूषण’, तर १९९३ मध्ये कानपूर विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ ही पदवी मिळाली. त्यांच्या जीवनात १९९४ हे साल संस्मरणीय ठरले. कारण या एकाच वर्षात त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू, लो. टिळक पुरस्कार आणि गोविंद वल्लभपंत पुरस्कार हे सन्मान प्राप्त झाले. २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या मस्तकी मानाचा शिरपेच खोवला.

अटलबिहारी हे जसे राजकारणी होते तसेच ते महान साहित्यिकसुद्धा होते. राजकारणात धकाधकीच्या मामल्यात वावरूनही त्यांच्या नावावर पुढीलप्रमाणे साहित्यसंपदा आहे.

१) डायनॅमिक्स ऑफ अॅन ओपन सोसायटी (१९७७)
२) न्यू डायमेशन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७९)

३) कुछ लेख, कुछ भाषण (१९९६)

४) विकास बिंदू (१९९७)

५) बॅक टु स्क्वेअर (१९९८)

६) शक्तिशांती (१९९९)

७) नयी चुनौती, नया अवसर (२००२)

८) इंडियाज पस्पॅक्टिव्ह अन एशियान अॅण्ड एशिया पॅसिफिक रिजन (२००३)

परंतु त्यांच्या या गद्य लेखनापेक्षा त्यांचे कवितासंग्रह अधिक लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावावर पुढील संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.

१) क्या खोया क्या पाया (१९९९)
२) मेरी इक्यावन कविताएँ (१९९५)
३) टेवेंटीवन पोएम्स (२००३)

यापैकी अटलबिहारी वाजपेयींनी लिहिलेले ‘गीत नया गाता हूँ’ हे गीत भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांनी गायिलेले आहे.दुसऱ्या एका गीतात अटलबिहारी म्हणतात,
‘हम पडाव को समझे मंझिल
लक्ष्य हुआ आँखोंसे ओझल
वर्तमानके मोहजालमें
आनेवाला कल ना भुलाए
आओ फिरसे दिया जलाए ।’


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Leave a Comment