Mother Teresa
भारतरत्न मदर टेरेसा Mother Teresa यांच्यावर विशेष मराठी ब्लॉगला हार्दिक स्वागत! मदर टेरेसा ह्या अद्वितीय महान व्यक्तीच्या जीवनातील त्यांच्या अनुपम योगदानाचा सज्जनीकृत वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कर्तुत्वाचे, विश्वासाचे, आणि सेवा करण्याचे अमूर्त संदेश ह्या ब्लॉगमध्ये उचलण्यात येत आहे. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अद्भुत पहिल्या दृष्टीत त्यांच्यावर पुन्हा दृष्टिकोन कसा दाखवू शकतो, याचा पारंपारिक विचार मराठीत आपल्या समक्ष प्रस्तुत करण्याचा हा अवसर आहे.
गोरगरिबांची सेवा करताना आम्ही प्रभू येशूच्या शरीरालाच स्पर्श करीत असतो, गरिबाला जेवण देताना जणू आम्ही येशूलाच भरवीत असतो, उघड्या नागड्यांना कपडे देताना येशूलाच कपडे घालत असतो आणि बेघरांना दिलेला आसरा म्हणजेच येशूला दिलेला निवारा होय. म्हणून गरिबांची सेवा करणे म्हणजे येशूपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करणे होय.’ वरील उद्गार ‘दीन दलितांची सेवा हीच प्रभूची भक्ती’ हे ज्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले, त्या मदर तेरेसा यांनी काढलेले आहेत.
जन्म, बालपण व शिक्षण
अनाथ आणि अपंगांच्या सेवेला ज्यांनी स्वतःला आजन्म वाहून घेतले, त्या मदर तेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी स्कोपजे ‘मॅसिडोनिया’ येथे एका अल्बानियन कॅथॉलिक कुटुंबात युगोस्लाव्हियात झाला. १९२० साली गोक्षाचा जन्म झाला, तेव्हा जगाचा नकाशा आजच्यापेक्षा बराच वेगळा होता. त्या काळात ऑटोमन साम्राज्यात त्यांचा जन्म झाला. आज त्या देशाला ‘मॅकडोनिया’ असे म्हणतात.
त्यांचे पूर्ण नाव होते अॅग्नेश गांक्षा बेंजाक्षुव्ह (Agnes Gonxha Beiaxhiu) अल्बेनियन भाषेत गोंक्षा म्हणजे ‘गुलाबकलिका’ होय. त्यांचे वडील ‘निकोलस बेंजाक्षुव्ह’ एक व्यापारी बांधकाम व्यावसायिक होते. ते एका प्रसिद्ध पेढीचे भागीदार होते. त्यांनी स्कोपजेमधील पहिले नाट्यगृह बांधले होते. अॅग्नेसच्या आईचे नाव होते रॅनाफाईल बर्नारी! अॅग्नेसच्या बालपणीच्या जीवनावर तिच्या आईचा फार प्रभाव पडलेला होता. अॅग्नेस आपल्या तीन भावंडांत सर्वांत लहान होती. आईने आपल्या मुलांना जगातील जे अभागी, दुर्दैवी जीव आहेत, त्यांना मदत करण्याची शिकवण दिली. ती दररोज गरीब, भुकेल्यांना जेवण नेऊन देत असे. त्यावेळी तिच्या सहवासात असे अॅग्नेस.
एकदा पावसाळ्याच्या दिवसात अॅग्नेस आणि तिची आई चर्चमधून परत येत होत्या. इतक्यात त्यांना एक मांजराच्या पिल्लाचे केकाटणे ऐकू आले. एका मरतुकडे आणि मागचे दोन्ही पाय अपंग झालेले मांजर पाण्याने वाहणाऱ्या गटारीत पडले होते. त्यावेळी आई अॅग्नेसला म्हणाली, (“Go and help him) ‘जा आणि त्याला मदत कर.’ पण अॅग्नेस तशीच ढिम्म उभी राहिली. त्या घाणेरड्या मांजराला हात लावण्याची तिची इच्छा होत नव्हती. हे तिच्या आईच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. ती अॅग्नेसला म्हणाली ‘शरीरापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेव. शरीर कुठल्याही रंगाचे वा अवस्थेचे असेल, पण जीव सगळ्यांचा सारखा असतो. जो जीव तुझ्या शरीरात, तोच जीव त्या मांजराच्याही शरीरात आहे. त्याला मदत करणे तुझे कर्तव्य नव्हे काय?’ एवढे झाल्यावर अॅग्नेसने त्या मांजराला बाहेर काढले.
अॅग्नेसचे वडील निकोलस यांची आपल्या मुलीने चारचौघांसारखे लग्न करून सुखाचा संसार करावा एवढीच अपेक्षा होती. ती ९ वर्षाची असताना तिचे वडील वारले. अॅग्नेस दिसायला सुंदर, सुदृढ आणि गुलाबी रंगाची होती. त्यामुळे तिला घरात सर्वजण ‘गोन्शा’ म्हणजे ‘फुलाची कळी’ असे म्हणत असत. घरातील सर्व मुलांना लहानपणापासून परोपकारी वृत्ती आणि दयाबुद्धीचे बाळकडू मिळालेले होते. अॅग्नेसची बालपणापासूनच देव, धर्म व अध्यात्माकडे ओढ होती. तिला चर्चमध्ये जाऊन धार्मिक वाचन, गायन व प्रार्थना करण्यास आवडे. वयाच्या १८व्या वर्षी ऐन तारुण्यात अॅग्नेसने आपल्या आईवडिलांच्या संमतीने ‘जोगीण’ (Nun) बनून देवाच्या आणि मानवजातीच्या सेवेला वाहून घ्यायचे असा निश्चय केला. १९२८ साली ती आयर्लंडमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ दी ब्लेस्ड व्हर्जिन मेरी’ या संस्थेत ‘ नन’ (Nun) होण्यासाठी दाखल झाली. नन झाल्यानंतर संस्थेने तिला दार्जिलिंग येथील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून पाठविले. तेथे १८ वर्षे तिने मुलांना शिकवले. या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्यासाठी ती यायला निघाली, तेव्हा तिला निरोप देताना तिची आई म्हणाली, ‘तू विद्यार्थ्यांना शिकवायला जात नाहीस. तू तुझ्या स्वतःच्या लेकरांना ज्ञान देण्यासाठी जाते आहेस, हे विसरू नकोस. स्वतःला दुःख झाले की प्रत्येकालाच रडू कोसळते. कोणीतरी आपल्याला मदत करावी असे वाटते. पण दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याचे डोळे भरून येतात, ज्याला त्याच्या मदतीसाठी धाव घ्यावीशी वाटते, तोच . असा खरा माणूस. व्हायला आपण शिकलं पाहिजे.’
खरा माणूस यावेळी अॅग्नेसला क्षयरोगाने ग्रासले होते. त्यापासून मुक्तता मिळवण्याकरिता अॅग्नेस दार्जिलिंगला हवा पालटासाठी जात आतानाच तिच्या शरीरात आणि मनात अशी प्रभू संवेदना जागृत झाली की, यापुढचे आपले सारे आयुष्य आपण रुग्ण आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी वेचले पाहिजे. त्यानुसार अॅग्नेसने आपले सारे आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी खर्च केले.
रोमन कॅथॉलिक चर्चची जोगिणीची, म्हणजेच ननची, दीक्षा घेतल्यावर अॅग्नेसचे ‘मदर तेरेसा’ असे नामकरण झाले. त्यानंतर १९२९ मध्ये तिची कलकत्ता येथील सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. ती इतिहास व भूगोल हे विषय शिकवू लागली. कलकत्त्यातील लारेटा शाळेत गणमान्य व्यक्ती आपल्या मुलांना शिकवायला पाठवीत असत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची कन्या याच शाळेत शिकत होती. अॅग्नेसने शाळेतील काम मोठ्या निष्ठेने व प्रामाणिकपणे केल्याने तिला बढती मिळून दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ती शाळेची मुख्याध्यापिका झाली.
‘संत तेरेसा’ ‘नावावरून मदर तेरेसा’ –
परंतु शाळेतील कामाने समाधान मिळत नाही, म्हणून फावल्या वेळात ती कलकत्त्याजवळील मोतीझील भागातील झोपडपट्टीत जाऊन गरीब व आजारी माणसांची सेवा करू लागली. त्यांचे अश्रू पुसणे, त्यांना स्वच्छ आंघोळ घालणे, सांत्वनपर व धीर देणारे चार शब्द सांगणे, अशी कामे ती करू लागली. तिला त्यात एक प्रकारचा आंतरिक आनंद मिळू लागला. यातूनच पुढे सारा देदीप्यमान इतिहास घडला. १० सप्टेंबर १९४३ रोजी अॅग्नेस दार्जिलिंगला जात असता तिला अचानक दैवी हाक ऐकू आली. तिच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘त्या दिवशी मी दार्जिलिंगला एकांतवासात राहण्यासाठी म्हणून चालले असता, काय सांगावे? त्या गाडीत मला अज्ञाताची हाक ऐकू आली. ती हाक मला सांगत होती की, ‘हे सर्व सोडून दे आणि देवाचा शोध घे. तो तुला झोपडीतून गरिबाहून गरिबामध्ये सापडेल.’ त्या दिवशी गरिबांच्या सेवेला वाहून घेण्याचे अॅग्नेसने ठरवले. पण रोममधील पोपच्या परवानगीशिवाय तिला लॉरेटा चर्चच्या पंथातून बाहेर पडता येत नव्हते. म्हणून तिने सतत ४ वर्षे परवानगी मागण्याचा सपाटा लावा. कलकत्यातील त्यावेळचे आर्चबिशप फादिनांद पेरियर्स यांना अॅग्नेसची ही चर्च सोडण्याची कल्पना मूर्खपणाची वाटत होती. जिला चर्चमध्ये एक साधी मेणबत्तीही नीट लावता येत नाही, ती स्वतःची मिशनरी संस्था कशी काय काढू शकते व ती कशी चालवणार? हा त्यांचा व्यवहारी प्रश्न होता. अॅग्नेसच्या डोक्यातून हा विचार नाहीसा व्हावा म्हणून तिची ‘असनसोल’ येथे बदली करण्यात आली. तेथे शिक्षकी पेशा न देता स्वयंपाकघराची देखभाल करण्याचे काम तिच्यावर सोपवले. पण जिद्दी अॅग्नेसने आपल्या कल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी
सरळ पोप महाशयांशीच पत्रव्यवहार सुरू केला. अखेर त्यांना हवी ती परवानगी मिळाली.
८ ऑगस्ट १९४८ रोजी पांढऱ्या रंगाची निळी किनार असलेली सुती साडी (कोणतीही गरीब बंगाली बाई वापरेल अशी साडी) आणि हाती जपमाळ घेऊन त्यांनी लॉरेटा कॉन्व्हेट स्कूल सोडले. त्यांनी १९४९ मध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ नावाची संस्था स्थापन केली. यावेळी त्यांच्याजवळ फक्त ३ साड्या व ५ रुपयांची एक नोट होती. तसेच यावेळी त्या कलकत्त्यातील शांतीनगरच्या बकाल वस्तीत मासिक ५ रुपये भाड्याच्या खोलीत राहत होत्या.
यावेळी त्यांनी ‘तेरेसा’ म्हणजे अगदी लहान व्यक्ती, हे नवीन नाव धारण केले आणि संस्थेच्या पहिल्या सेविका म्हणून स्वतःचे नाव नोंदवले. तेरेसा हे नाव १५१५ मध्ये स्पेनमध्ये होऊन गेलेल्या ‘संत तेरेसा’ या नावावरून घेतले.
वास्तविक पाहता ‘तेरेसा’ या शब्दाचा खरा अर्थ लहान असा असतानाही त्या आपल्या कर्तबगारीने ‘महान’ ठरल्या. सेवा, प्रार्थना, शांतता, जपमाळ व मातृभाव यामुळे त्या सर्वांच्या ‘मदर’ झाल्या. त्यामुळे पुढे त्या ‘मदर तेरेसा’ या आदरयुक्त नावानेच सर्वत्र ओळखल्या जाऊ लागल्या. अफाट विश्वात आपण लहान आहोत या जाणिवेने त्यानी तेरेसा हे नाव स्वीकारले असावे. या नावाने त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले.
‘निर्मल हृदय’ संस्थेची स्थापना
मदर तेरेसा ८’×६’ आकाराच्या एका लहानशा खोलीत अत्यंत साधेपणाने राहत. फाईल्स व प्रार्थना पुस्तके यांच्या सोबतीने त्या जमिनीवर झोपत. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या जोगिणींना सेवा व माणुसकी या गुणांबरोबरच करडी शिस्त पाळावी लागे. त्यांना २४ तास ड्यूटीवर असणाऱ्या अधिकाऱ्याप्रमाणेच सतत तयारीत असावे लागे. त्यांना खाजगी वैयक्तिक जीवन नाही असे समजले जाई. आश्रमाबाहेर जाताना व परत येताना वेळेची अचूक नोंद ठेवावी लागे. सिनेमाला जाण्यास त्यांना मनाई होती. बाहेरच्या माणसाला आश्रमात आणून त्याचा वैयक्तिक पाहुणचार करता येत नसे. अर्थात, हे सर्व नियम खुद्द मदर तेरेसा पाळत असत आणि इतरांनीही ते पाळावेत असा त्यांचा आग्रह असे. शरीराने ठेंगणीठुसकी, फक्त हाडे व चामडी असलेल्या, सर्वांगावर सुरुकुत्यांचे जाळे, चेहऱ्यावर सदैव मुग्ध पण कधीकधी दुःखाची छटा असलेले हास्य, शांत नंदादीपासारखे व्यक्तित्व त्यांना लाभले होते. थोडे पोक काढून त्या चालत असत. डोक्यावर निळ्या किनाऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र साडीचा पदर ही त्यांची निशाणी होती.
मदर तेरेसांचे साधे सरळ शब्द ऐकणाऱ्याच्या थेट हृदयाला जाऊन भिडत आणि किलकिले डोळे समोरच्या माणसाचे हृदय काबीज करत. गांधीजी व मदर तेरेसा ही भारतातील दोन महान व्यक्तिमत्त्वे आहेत. मदर तेरेसा या महारोग्यांनी विणलेल्या साध्या साड्या नेसत असत, तर गांधीजी चरख्यावर विणलेल्या सुताचा पंचा वापरत असत. गांधी हिंदू होते तर तेरेसा ख्रिश्चन होत्या. पण मानवतेच्या सेवेत त्यांचा धर्म कधीही आडवा आला नाही. दीनदलितांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हेच ह्या दोघांचे ध्येय होते. महात्मा गांधी व मदर तेरेसा हे दोघेही गरिबांसाठी ‘देवदूत’ होत. त्यामुळे दोघांनाही पुढील विशेषणे चपखल लागू पडतात.
‘दयेचा देवदूत’ (The Angel of Mercy)
‘ममतेची मूर्ती’ (The gentle mother)
पतितोद्धारक’ (The Champion of the poor) ‘
‘मिशनरी ऑफ चॅरिटीज’ या संस्थेत काम करीत असताना एके दिवशी त्यांना तेथील प्रसिद्ध कालिमाता मंदिराजवळ अखेरचे क्षण मोजीत असलेला कुष्ठरोगी तडपडणारा दिसला. हजारो कालिभक्तांनी देवीच्या दर्शनासाठी भलीमोठी रांग लावली होती. पण एकही हरीचा लाल त्या दुर्दैवी माणसाकडे ढुंकूनही पाहत नव्हता. त्याला पाहून फक्त तेरेसांना दया आली. त्यांनी त्याला धर्मशाळेत नेले व पाणी पाजले. थोडेसे खायला दिले. त्याच्या जखमांवर पट्ट्या बांधल्या. परंतू कालिकामातेच्या भक्तांना एका परधर्मीय बाईने मंदिराजवळ नेऊन ढवळाढवळ करणे आवडले नाही. ते मदरशी हुज्जत घालू लागले. तेव्हा ‘तुमच्या बांधवाची सेवा करणे हा अधर्म आहे काय? या मदरच्या प्रश्नांच्या सरबत्तीने विरोधक खजील झाले आणि ते मदर तेरेसाला कार्यात मदत करू लागले.
इ.स. १९६२ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी मदर तेरेसांनी दिल्लीत सुरू केलेल्या एका बालकाश्रमाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांच्या सोबत व्ही. के. कृष्णमेनन हे होते. तेथे दिल्लीतील तथाकथित समाजसेवकांचा गराडा पडला होता. त्या गोतावळ्यातून स्वतःची सुटका करून घेऊन ते मदर तेरेसांजवळ गेले आणि भावविवशतेने त्यांना म्हणाले, ‘मदर, खरोखरच तुमच्यासारख्या कितीतरी मदर्स याची खात्री असू द्या.” त्यांच्या आम्हाला हव्या आहेत. गरबांना जेवढी तुमची गरज आहे तेवढीच आम्हालाही आहे, कार्यासाठी त्यांनी १९५० मध्ये कलकत्ता नगरपालिकेला जागेसंबंधी विनंती केली. तेव्हा प्रसिद्ध कालिमंदिराजवळची धर्मशाळा त्यांच्या कार्यासाठी दिली गेली. या ठिकाणी त्यांनी ‘मिशन यंग ऑफ चॅरिटीज’ तर्फे अनेक शाळा उघडल्या.
आंधळे, वृद्ध, महारोगी, अपंग, दुबळे आणि मरणासन्न यांच्यासाठी उपचार केंद्रे आणि पुनर्वसन केंद्रे उघडली. दुःखी, पीडित व उपेक्षित लोकांसाठी त्यांनी ‘निर्मल हृदय’ या संस्थेची कलकत्त्यात स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी आजारी, मरणासन्न लोकांसाठी आधारगृहे तर अपंग व मानसिक, विकलांग मुलांसाठी ‘शिशुभवन’ काढले. कचराकुंडीत टाकलेल्या बेवारस अपंग अशा अर्भकांना आणून त्या त्यांचे संगोपन करीत. त्या म्हणत, ‘देवाचे प्रतिरूप असलेली, ज्यांचा जन्म जगण्यासाठी, प्रेम देण्याघेण्यासाठी होणार असतो, अशी ही बालके ज्या देशात जन्मण्यापूर्वी मारली जातात तो देश खरोखरच दारिद्री होय!
दया आणि करुणेचे प्रतीक –
एक दिवस कलकत्यात असाच कोलाहल माजला आणि त्यांच्या ‘निर्मल हृदय’ वर दगडांचा वर्षाव होऊ लागला. मदर तेरेसांना जेव्हा हे कळाले तेव्हा त्या आपल्या संस्थेच्या खिडकीतून बाहेर पाहू लागल्या आणि म्हणाल्या ‘तुम्हाला जर मारायचेच असेल तर प्रथम मला मारा, कारण ते बिचारे मृत्यूच्या वाटेवरचे अखेरचे वाटसरू आहेत. त्यांना त्रास होईल असे तुम्ही काहीही करू नका. हे त्यांनी सांगितले मात्र, अचानक ‘निर्मल हृदय’ वरील दगडफेक थांबली. मदर तेरेसांचे हे वर्णन बघितल्यावर मला साक्षात येशू ख्रिस्ताची आठवण झाली. येशू ख्रिस्ताच्या जीवनातही असाच एक प्रसंग घडला होता. एका पापी स्त्रीने गैरवर्तन केले म्हणून लोक तिच्यावर जेव्हा दगडफेक करू लागले, तेव्हा येशू ख्रिस्तही असेच म्हणाले नव्हते का? ‘त्या स्त्रीवर दगड माराण्याचा अधिकार त्याच माणसाला आहे ज्याने आयुष्यात एकही पापकृत्य केलेले नाही!’ आणि त्याचक्षणी अचानक दगडफेक थांबली होती. सुमारे ६० हजारांच्या जवळपासच्या जीवांना मदर तेरेसानी आपल्या ‘निर्मल हृदय’ मध्ये अढळ स्थान दिले आणि त्यांना मृत्यूसुद्धा किती सुंदर असू शकतो ते सांगितले.
‘आपण जनावरांप्रमाणे जगलो तरी देवदूताप्रमाणे मरू.’ असे ब्रीदवाक्य त्यांच्या हृदयावर कोरले. एकदा एका मुलाने टाकून दिलेली त्याची आई मदर टेरेसाने एका कचरा कुंडीत पाहिली. तिचे निम्मे शरीर उंदीर, घुशी व मुंगळे यांनी खाऊन टाकले होते. तिच्या अंगातून जीव जात नव्हता म्हणून, ती तडफडत होती. अशा परिस्थितीत मदर तेरेसांनी त्या महिलेला उचलले, तिला स्नान घालून स्वच्छ केले आणि घाणीतून वर काढून इस्पितळात नेले. आपल्याकडे अशावेळी जशी उत्तरे मिळाली असती, अगदी तशीच उत्तरे तिला त्यावेळी मिळाली. ‘आम्ही त्या स्वीच्या देहावर उपचार करू शकत नाही.’ असे डॉक्टरांकडून नेहमीप्रमाणे थंड उत्तर मिळाल्यावर मदर तेरेसांनी त्या इस्पितळाच्या दरवाजावर बैठा सत्याग्रह करण्याचे जेव्हा जाहीर केले, तेव्हा कुठे त्या डॉक्टर लोकांना जाग आली आणि त्यांनी त्या स्त्रीवर औषधोपचाराला सुरुवात केली.
परंतु दुर्दैवाने उपचाराला फार उशीर सुरुवात केली गेल्याने काही तासातच ती स्त्री मरण पावली.
मदर तेरेसाविषयी पुष्कळदा असे म्हटले जाते, ख्रिश्चन धर्मानुसार त्या कुटुंब नियोजनाला विरोध करतात. त्यामुळे असेल कदाचित, पण दरमहा त्यांना एकटीलाच अनेक मुले होतात. अर्थात, असे असले तरी त्यांच्या ‘निर्मल हृदय’ मध्ये त्यांना झालेली ही मुले मातेच्या ममतेने त्यांनी सांभाळली, वाढवली आणि लहानाची मोठी केली. कचराकुंडीत टाकून दिलेल्या नवजात अर्भकालाही जीवदान देणारी जगाच्या पाठीवरील ती एकमेव मदर (आई) बनली.
मायकेल गोम्स या कलकत्त्यातील कुटुंबाने मदर तेरेसांना आपल्या घरातील एक मोठा भाग वापरण्यास दिला. तेथे मदर तेरेसांनी एक शाळा सुरू केली. रस्त्यावरची मुले आणि चोऱ्यामाऱ्या करणारी मुले पकडून आणून त्यांना शिकविणे व सुधारण्याचा प्रयत्न करणे, हाच या शाळेचा उद्देश होता. त्याची पूर्वीची जागा कमी पडू लागली म्हणून फादर एक्झम यांच्या मुसलमान मित्राकडून मदर हाऊसला जागा मिळाली. मदर हाऊसची जागा म्हणजे शांतता व पावित्र्य यांचे नंदनवनच आहे. शाळा चालवताना आणि समाजसेवा करताना त्या ज्या अडचणी आल्या, त्याविषयी सुप्रसिद्ध पत्रकार श्री. खुशवंत सिंह यांना त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मोठे मर्मस्पर्शी वर्णन केले आहे. अनेक वेळा त्यांना उपाशीपोटी रहावे लागले, असाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण त्यामुळे मदर तेरेसा कधीही आपल्या विचार आणि कृतिपासून विचलित झाल्या नाहीत.
त्या म्हणत,
Sometime we may be short of money, but we are never short of love and affection!’
(आम्ही पैशाने तंग असूनही प्रेम आणि सद्भावना यांची आमच्यात कधीच उणीव नव्हती.’)
कुटुंब नियोजनाला मदरचा विरोध नव्हता. पण त्या गर्भपाताचा मात्र अगदी विरुद्ध होत्या. रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेत पडलेल्या लोकांना आधार देऊन त्या त्यांची सेवा करीत म्हणजे निदान मरताना तरी काही क्षण त्यांना आनंदाचे व सुखाचे मिळावेत, त्यासाठी त्यांची अखंड धडपड चाले. भारतातील गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांनी देशांतर केले होतेच, पण भारतीय लोकांशी एकरूप होण्यासाठी त्यांनी वेशांतर केले. स्कर्ट ब्लाऊजच्या जागी पांढरी शुभ्र साडी आली. त्या साडीला निळी किनार असे. उंच टाचांच्या बुटांच्या ऐवजी साधी चप्पल आली.पौष्टिक आहार सोडून भात, रोटी हा गरिबांचा शाकाहार मदर सेवन करू लागली.
इंग्रजी सोडून बंगाली व हिंदी भाषा बोलू लागली. मूळची युगोस्लाव्हीयन असूनसुद्धा भगिनी निवेदिता, डॉ. अॅनी बेझंट व अरविंदाच्या फ्रेंच शिष्या या अन्य पाश्चात्त्य भगिनींप्रमाणेच मदर तेरेसांनीसुद्धा भारत हीच आपली कर्मभूमी मानली. ‘भारताबद्दल तुमचे काय मत आहे असे विचारले असता त्या ताडकन उतरल्या, ‘चांगलेच आहे. म्हणून तर मी भारतीय झाले. भारत हा माझा देश आहे.’ मी भारतीय नागरिकत्वाची मुद्दाम निवड केली आहे. तुम्ही मात्र केवळ योगायोगानेच भारतीय झालेले आहात !
भारताचे माजी पंतप्रधान कै. इंद्रकुमार गुजराल मदर तेरेसांबद्दल आपल्या भाषणात म्हणाले होते, ‘दया आणि करुणा यांचे जागतिक पातळीवर काम करण्यासाठी मदर तेरेसांनी प्रथम भारतात कलकत्ता येथे कार्यक्षेत्र निवडले म्हणून आपण भारतवासी खरोखरच नशीबवान आहोत’ मदर तेरेसांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते. त्यांनी सर्वार्थाने भारत हा आपला देश मानला आणि भारतानेही त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. १९६२ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब
बहाल केला. १९७२ मध्ये आंतरराष्ट्रीय शांततेसाठी असलेला जवाहरलाल नेहरू पुरस्कार त्यांना मिळाला. १९९३ साली त्यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार देण्यात आला.
भारतात राहून महान सेवाकार्य केल्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९८० मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. त्यावेळी ‘माझा सन्मान कशासाठी? हा सर्वोच्च सन्मान प्राप्त करीत असताना मी माझे कर्तव्यच बजावले आहे. कृपया आणखी सन्मानासाठी मला बोलावू नका. या समारंभात वाया जाणारा तेवढाच वेळ मी गरिबाच्या सेवेसाठी उपयोगात आणीन !’ असे मदर तेरेसांनी नम्रपणे जाहीर केले होते.
‘प्रभूची कृपा हेच संस्थेचे बजेट’
स्वतःच्या वाढदिवसाला त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले, ‘माझे वाढदिवस कसले साजरे करता? जगातील कितीतरी मुले, गरीब माणसे तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्याकडे जा!’
भारत सरकारने जिवंतपणीच टपाल तिकिटावर मदर तेरेसांची प्रतिमा छापली होती, याची कृतज्ञ नोंद भारतीय टपाल तिकीटांच्या इतिहासात निश्चलणे केली जाईल.
१९५० मध्ये स्थापन झालेल्या त्यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ संस्थेचे आज जगातल्या ५२ देशांत कार्य पसरलेले आहे. शे सव्वाशेच्या वर विविध आश्रम, घरे, शाळा, दवाखाने इ. संस्था चालवल्या जातात. ३५ पेक्षा जास्त देशातून त्यांना कार्यकर्ते येऊन मिळाले आहेत. गोरगरीब, आजारी, झोपडपट्टीतील लोकांना जेवण, औषधोपचार व शिक्षण यावर मिशनतर्फे दररोज साधारणपणे १० लाख रुपये खर्च केले जातात. जगातील १६० शहरातल्या १४० झोडपट्ट्यांतून शाळा चालविल्या जातात. ७० अनाथ बालकाश्रमात ४ हजारांहून अधिक मुलांना आसरा दिलेला आहे. दरवर्षी हजारोवर मुलांना योग्य पालक निवडून दत्तक देण्यात येते. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या व ज्यांची सेवा करण्यास कोणीही तयार नाही अशाच्यासाठी चालविण्यात येणाऱ्या ६२ आश्रमांतून सुमारे १३००० लोकांची सोय करण्यात आली आहे. १२००० स्त्रियांना निरनिराळे उद्योग शिकवून त्यांना कामाला लावण्यात आले आहे. या प्रचंड आकडेवारीकडे पाहिल्यावर मन थक्क होते. नवीन चावला नावाच्या एका लेखकाने एकदा मदर तेरेसांना विचारले, ‘तुमच्या कामाला स्पर्श नाही, असा जगात कोणता देश असेल? त्यावेळी मदर तेरेसांनी तत्काळ उत्तर दिले, ‘अहो, ज्ञात देशाबद्दल का बोलता ? उद्या चंद्रावरदेखील गरजू आणि पीडित लोक आहेत, असं कळलं मी तिथे देखील काम करण्यास जाईन !’
मदर तेरेसांना त्यांच्या कार्यासाठी जगातल्या निरनिराळ्या श्रीमंत व गरीब लोकांकडूनसुद्धा देणग्या मिळाल्या. त्या सर्व पैशांचा विनियोग मदर तेरेसांनी संस्था उभारण्यासाठी केला. तरीसुद्धा मदर तेरेसा काही संशयास्पद चारित्र्याच्या व्यक्तींकडून देणग्या स्वीकारतात’ असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. यावर मदर तेरेसा म्हणायच्या, ‘लोक जर स्वरखुषीने देणग्या देत असतील, तर मी कोण त्यांना अडविणारी?’ मदर तेरेसांच्या संस्थांचे जाळे एवढे मोठे झाले आहे, त्यावर लक्ष ठेवणे त्यांना अवघड होते? हिंदुस्थान लिव्हरचे माजी अध्यक्ष टी. थॉमस यांनी त्यांच्या व्यवस्थापनाच्या सवयीनुसार एकदा मदर तेरेसांना विचारले, ‘मदर, तुमचे बजेट वगैरे काही आहे की नाही?’ यावर मंदपणे हसत मदर बोलल्या ‘मि. थॉमस खरं सांगा, तुम्हाला इथं यायला कुणी सांगितलं बरं?’
‘कुणीच नाही? मला माझ्या अंतरात्म्याने इथे येण्याची प्रेरणा दिली म्हणून मी आलो. कुणाच्याही आदेशाने नव्हे!’ थॉमस म्हणाले.
‘होय ना? तुमच्याप्रमाणेच इथे आलेले अनेकजण हीच उत्तर देतातत. हेच माझे ‘बजेट’ आहे. प्रभूची कृपा अपरंपार आहे. तोच माझा बँकर आहे. माझ्या गरजेपुरते पैसे सतत माझ्या खात्यावर शिल्लक असतात!’
पुढे आणखी काही बोलण्यासारखे शिल्लक नव्हतेच. थॉमस नम्रपणे मान घालून स्तब्धपणे उभे राहिले. खाली
जागतिक किर्तीचा नोबेल पुरस्कार
सर्वसाधारणपणे श्रीमंत माणसेच देणग्या देतात, असे आपण मानतो. पण मदर तेरेसांच्या कार्याचे वैशिष्ट्य असे की, त्यांना गरिबातली गरीब माणसेसुद्धा मदत करायला पुढे सरसावत असत. याबाबत एक किस्सा लक्षात ठेवण्यासारखा आहे. मदर तेरेसांच्या दारात एकदा एक भिकारी असाच येऊन उभा राहिला. पत्र्याच्या दोन डब्यांत सुट्टी नाणी खुळखुळवत तो मदर तेरेसांच्या दर्शनासाठी उत्सुक होता. ते दोन्ही डबे तो त्यांच्या स्वाधीन करू इच्छित होता. मदर तेरेसांना काय करावे ते कळेना. कारण त्याचे पैसे घेतले तर तो त्या दिवशी उपाशी राहिला असता आणि घेतले नसते तर त्याचा तो अवमान झाला असता. अखेरीस त्यांनी ते पैसे घ्यायचा केला. तेव्हा त्या भिकाऱ्याने मदर तेरेसांच्या हाताचे एक दीर्घ चुंबन घेतले.
निर्णय भिकाऱ्याचे डोळे आनंदाने लकाकले. त्यावेळची त्याची ती जेमतेम दोन रुपयांची जेमतेम मदत आपल्याला नोबेल पुरस्कारापेक्षा मोठी वाटली, असे मदर तेरेसांनी त्यावेळी म्हटले होते.
मदर तेरेसांच्या कार्यात प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व असे. प्रार्थनेतून दातृत्वाची शिकवण मिळते. आपल्याजवळ जे काही असेल ते गरजूला देत सुटावे, अशी वृत्ती अंगी बाणली की आपली झोळी आपोआप भरत राहते. ती कधीही रिती राहत नाही, असा माझा आजवरचा अनुभव आहे’ असे मदर तेरेसा म्हणत असत.
इ.स. १९६४ला पोप पॉल पाचवे भारतात आले असता त्यांनी मदर तेरेसाच्या कार्याची प्रशंसा केली व त्यांना मोटार भेट दिली. पण ती त्यांनी लिलावात विकून आलेला पैसा कुष्ठ रोग्यांच्या वसाहतीसाठी वापरला.
१९७१ साली रेमन मॅगसेसे अॅवॉर्डची २१५०० डॉलर्सची रक्कम त्यांनी आग्रा येथील कुष्ठरुग्णांसाठी आश्रम उभारण्यास उपयोगात आणली. वॉशिंग्टन येथे एका सोहळ्यात त्यांना १५००० डॉलर्सचे जोसेफ केनेडी अकादमीचे पारितोषिक देण्यात आले होते. त्या पैशातून त्यांनी कलकत्याच्या डमडम उपनगरातील मनोदुर्बल मुलांसाठी रुग्णालय बांधले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मदर तेरेसांना पोप जॉन पॉल शांतता पुरस्कार, गुड सामरिटन अॅवॉर्ड, डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स, ऑर्डर ऑफ मेरिट या सारखे
निरनिराळे सुमारे १०० मानसन्मान मिळाले. ‘जगात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी महिला’ म्हणून मदर तेरेसा यांचा उल्लेख करावयास हरकत नाही. १९७९ साली त्यांना जगातील सर्वोच्च ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘हा पुरस्कार मी या गरीब निराधारांच्या नावे स्वीकारीत आहे. कारण मला मिळालेल्या पुरस्काराने हेच सिद्ध केले आहे, गरीबांचे जगात अस्तित्व आहे हे या प्रस्थापितांना मान्य आहे’ मदर तेरेसा यांचा कार्याचे कुणी गोडवे गायला लागला तर त्या म्हणत माझे काम म्हणजे टिटवीने समुद्र आटविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.’
मदर टेरेसांना पारितोषिक मिळाले, तेव्हा त्यांना असे सांगितले गेले की, हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी येताना विशिष्ट पोषाखातच यावे लागते.’ तेव्हा मदर तेरेसांनी कळवले, मी माझी नेहमीची निळ्या बॉर्डरची पांढरी साडी आणि तसलाच ब्लाऊज घालून याच पेहेरावात येणार. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही माझा हा पुरस्कारच रद्द करून टाका.’ केवळ एवढेच करून त्या थांबल्या नाहीत तर नोबेल पुरस्कारानंतरची मिळणारी टोलेजंग मेजवानीही त्यांनी नाकारली. त्या मेजवानीवर काही लाख डॉलर्सचा खर्च होणार होता. तो रद्द करायला लावून त्या रकमेची देणगी त्यांनी नोबेल फौंडेशनकडून मिळवली आणि तिचा विनियोग त्यांनी अनाथ विद्यार्थ्यांसाठी केला.
पवित्र आत्मा, संत आणि देवदूत
कितीही पारितोषिके मिळोत अगर न मिळोत, पण मदर तेरेसांचे गोरगरिबांची सेवा करण्याचे काम तेवढ्याच आस्थेने, निष्ठेने आणि उत्कृष्टपणे अखंड चालू राहिले. १८८९ साली दोनदा हृदयविकाराचे झटके येऊन गेल्यावर त्यांना ‘पेसमेकर’ यंत्र बसविण्यात आले. १९९० साली त्यांनी आपल्या पंथाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा देण्यासाठी म्हणून एकदा बैठक बोलावली आणि जोगिणींना (नन्स) आपला वारस निवडण्यास सांगितले. पण गुप्त मतदानानंतर फक्त एकच मत विरोधात गेले आणि ते म्हणजे त्यांचे स्वतःचे. त्यांच्या याचा अर्थ त्यांच्या मार्गदर्शनाची व नेतृत्वाची अजूनही त्यांच्या अनुयायांना गरज वाटत होती. त्यामुळे त्यांना परत आपला पदभार सांभाळावा लागला. अर्थात, असे असले तरी वयोमाननुसार त्यांचे स्वास्थ्य चांगले राहत नव्हते. १९९६ साली मदर तेरेसांच्या प्रकृती स्वास्थ्यात बिघाड झाला. या खेपेस मात्र त्यांनी कोणाचेही न ऐकता स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आपल्या जागेवर त्यांनी सिस्टर निर्मला यांची नेमणूक केली. १३ मार्च १९९७ रोजी ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’च्या प्रमुखपदावरून त्या पायउतार झाल्या. ५ सप्टेंबर १९९७ रोजी ही गोरगरिबांची कैवारी, उदात्त मूल्य, विचारांची आणि दयेची साक्षात देवता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आपल्या पंथाच्या मुख्य छावणीत ख्रिस्तवासी झाली. त्यावेळी सर्व जगावर दुःखाची छाया पसरली. आपल्या सांत्वनपर संदेशात अमेरिकेचे बिल क्विंटन म्हणाले, ‘मदर तेरेसा आज आपल्यातून निघून गेल्या आहेत, पण त्यांनी जगाला हेच दाखवून दिले आहे की, दुसऱ्यासाठी तळमळीने व करुणेने कसे जगावे, दुसऱ्याची दुःखे हलकी करण्यातच जीवनाचा खरा अर्थ आहे!’
मदर तेरेसा ख्रिस्तवाशी झाल्या असल्या, तरी १९ ऑक्टोबर रोजी त्यांना व्हॅटिकन सिटी येथे ‘पवित्र आत्मा’ ही उपाधी प्रदान करण्यात आली. त्यांना संतपदाच्या जवळ नेणारा सोहळा पार पडला. व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात हा सोहळा ३ लाख चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला भारतातील मदर तेरेसांना माननारे सुमारे ३००० चाहते उपस्थित होते. भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री पी.सी. थॉमस हे उपस्थित होते.
ख्रिस्ती धर्मात ‘संत’ म्हणून पीठाची मान्यता मिळवण्यासाठी ज्या कसोट्या सांगण्यात आल्या आहेत, त्यापैकी चमत्कार ही एक महत्त्वाची कसोटी आहे. जो संत बनेल त्याने मानवजातीच्या उद्धारासाठी काहीतरी चमत्कार केलेले असावेत, असे ख्रिस्ती धर्म सांगतो. या कसोट्यांनुसार मदर तेरेसांच्या संतपदाची प्रक्रिया त्यांच्या मृत्यूनंतर सुरू झाली. ५ सप्टेंबर १९९७ रोजी मदर तेरेसा यांना ५ वर्षात ‘देवदूत’ म्हणून जाहीर करण्यासाठी आर्चबिशप हेन्री डिसूजा यांचा अर्ज दाखल म्हणून जाहीर झाला. १२ डिसेंबर १९९८ ला अर्ज मंजूर करण्यात येऊन १९ मार्च १९९ रोजी फादर ब्रायन कोलोडि चक यांची या प्रक्रियेतील देखभालीसाठी नियुक्ती झाली. ६ जून १९९९ ला सिस्टर एमलिन मस्कारेन्हा यांचीही नियुक्ती करून २६ जुलै १९९९ रोजी सेंट मेरी चर्च कलकत्ता येथे अधिकृत चौकशीला सुरुवात झाली. १५ ऑगस्ट २००१ ला मोनिका बसेरा यांची साक्ष नोंदवून चौकशीचे काम पूर्ण झाले. २० डिसेंबर २००२ ला पोप जॉन पॉल यांनी बसेराच्या (दैवी) चमत्काराला मान्यता देऊन २३ ऑक्टोबर २००३ ला मदर तेरेसा देवदूत असल्याचे जाहीर केले.
मदर तेरेसांचे ज्ञान पुस्तकी नव्हते. त्यांचे तत्त्वज्ञान त्यांच्या जीवनातून स्फुरलेले होते. माणसांचे संबंध शांततापूर्ण, प्रेमाचे व सलोख्याचे असावेत असे त्यांना वाटे. त्या म्हणत, ‘तुम्ही दयाळू व करुणासंपन्न व्हा! तुमच्याकडे आलेला कोणताही माणूस आनंदी व समाधानी होऊ द्या. केवळ तुमच्या हास्यानेसुद्धा अनाथ पोरक्या मुलांचे, गरिबांचे व निराश्रितांचे दुःख हलके होईल. तुमच्या मदतीपेक्षा
तुमच्या दयाळू अंतःकरणाची त्यांना अधिक जरुरी आहे. परमेश्वर हा शांततेचा मित्र आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या वागण्यात, चारित्र्यात, दृष्टीत, श्रवणात व वाणीत शांती आवश्यक आहे. आम्ही लोकांची हृदये बदलतो. माणसाला माणूस बनविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही हिंदूस अधिक चांगला हिंदू व मुस्लिमास अधिक चांगला मुस्लीम बनवतो. मृत्यूविषयी त्या म्हणतात, ‘मृत्यू म्हणजे स्वगृही परत जाणे होय.
मृत्यू खरोखरच सुंदर आहे, पण तो नैसर्गिक असला पाहिजे. मानवी जीवनात मृत्यू नसता, तर आपण कुणालाच घाबरलो नसतो. आपण सतत जगत असतो, पण मरत असतो, एकदाच. मृत्यूमुळे अनंत जीवनाची अखंडता टिकून राहते. मृत्यूशिवाय मानवी जीवन कधीही पूर्णत्वास जाऊ शकणार नाही.’ असे होते मदर तेरेसांचे थोडक्यात तत्त्वज्ञान.
उत्तर बंगालमधील आदिवासी महिला मोनिका बसरा या ३५ वर्षीय महिलेला पोटाचा कर्करोग झाला होता. मदर तेरेसांनी त्यांच्या पोटावर हात फिरवल्याने त्यांचा कर्करोग (कॅन्सर) कायमचा बरा झाला. ती मोनिका बसराही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. मोनिका बसरांचा हा कर्करोग बरा करण्याचा मदर तेरेसांचा चमत्कारच व्हॅटिकन सिटीचे पोप जॉन पॉल यांनी मान्य केला आहे. पोप जॉन पॉल २ यांनी मदर तेरेसा यांचे ‘बी ए टी फिकेशन’ केले. आतापर्यंत भारतातील ५ व्यक्तींचे ‘बी ए टी फिकेशन’ झाले असून त्यामध्ये मदर तेरेसा यांचा पाचवा क्रमांक आहे. मृत्यूनंतर अवघ्या ६ वर्षांनी मदर तेरेसा यांना ‘पवित्र आत्मा’ ही उपाधी प्राप्त झाली. मानवी देह मर्त्य असला तरी आत्मा अमर आहे, असे हिंदू धर्माचे सुद्धा तत्त्वज्ञान आहे आणि म्हणूनच भगवद्गीतेत आत्म्याचे वर्णन, ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका’ असे केले आहे.
मदर तेरेसा ख्रिस्तवासी झाल्या असल्या, तरी संतपदाच्या रूपाने त्या अजरामर झाल्या आहेत, हे निश्चित !
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.