राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद | Dr. Rajendra Prasad
डॉ. राजेंद्र प्रसाद ~ Dr. Rajendra Prasad , स्वातंत्र्याच्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती, भारतीय इतिहासात एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून उचलले जातात. त्यांची या उजळणारी व्यक्तिमत्वाची गोडी बिहारच्या एक साधारण गावातून भारताच्या संविधानाच्या रचनाकार म्हणून व राष्ट्राच्या उच्चतम पदावर प्रतिष्ठापित होण्याची साहसी कथा आहे. ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरिक सम्मानाची प्राप्ती केलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाची व धरोवारीचा धडाकेबाज वर्णन करणारा हा लेख भारतीयांच्या मनाचा आधार आणि प्रेरणास्पद स्थान घेतो.
भारतीय पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याबद्दल राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांनी आपल्या भावना पुढीलप्रमाणे काव्यबद्ध केल्या आहेत
‘देशने तुमको बनाया राष्ट्रपति श्रीमंत
किन्तु अपने आपको तुमने बनाया संत
उभय रूपोंमें हमारे पूज्य तुम राजेंद्र
धन्य है तुमसे हमारे देश, काल, दिगन्त !
डॉ. राजेंद्रप्रसाद सलग १२ वर्षे राष्ट्रपतिपदावर आरूढ झालेले भारताचे पहिले राष्ट्रपती होते. खरोखरच ते ‘अजातशत्रू’ होते. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. राजेंद्रप्रसाद महादेव सहाय असे होते. परंतु त्यांचे आडनाव ‘सहाय’ हे कुणाला फारसे परिचित नाही. डॉ. राजेंद्रप्रसाद या नावानेच ते सर्वत्र ओळखले जातात.
डॉ. राजेंद्रप्रसाद जन्म, बालपण व शिक्षण
बिहारच्या सारन जिल्ह्यातील जिरादेई या लहानशा खेड्यात श्रीवास्तव या कुटुंबात ३ डिसेंबर १८८४ रोजी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्म झाला. डॉ. राजेंद्रप्रसादांचे घराणे हे बिहारमधील उच्चवर्णीय कायस्थांचे घराणे म्हणूनच ओळखले जाई. डॉ. राजेंद्रप्रसाद हे पाचवे आणि सर्वांत धाकटे अपत्य होते. डॉ. राजेंद्रप्रसादांना ३ बहिणी आणि एक थोरला भाऊ होता. महेंद्रबाबू हा त्यांचा वडील बंधू. तो त्यांच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठा होता. त्यांना बहिणीचे सौख्य फारसे लाभले नाही. एक बहीण तिच्या लहानपणीच वारली. दुसरी बहीणही लग्नानंतर निपुत्रिक अवस्थेत वारली. तिसरी लहानपणी लग्न होऊन गेली, पण तिचा नवरा अकाली मृत्यू पावल्याने वैधव्यप्राप्तीनंतर ती बहीण जिरादेईलाच त्यांच्या घरी राहायला आली. राजेंद्रबाबूंना महेंद्रबाबूंची साथ मात्र चांगली मिळाली. त्यांचे आजोबा चौधुरलाल हे हथवा संस्थानचे दिवाण होते, तर वडील महादेव सहाय हे जमीनदार होते. ते संस्कृत व फारसी भाषेचे तज्ज्ञ होते, तसेच ते आर्य व युनानी या दोन्ही पद्धतीची वैद्यकी करीत असत. राजेंद्र प्रसादांची आई कमलेश्वरीदेवी ही आर्य संस्कृती व जुन्या परंपरेतील सात्त्विक व धार्मिक वृत्तीची स्त्री होती. ती राजेंद्र प्रसादांना त्यांच्या लहानपणी रामायण महाभारतातील कथा सांगत असे. विशेषतः रामकथेचा राजेंद्र प्रसादांच्या मनावर विशेष परिणाम झाला होता. राजेद्रप्रसादांच्या आईचे निधन झाल्यावर त्यांचा सांभाळ त्यांच्या मोठ्या बहिणीने केला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पालनपोषण व शिक्षण त्यांचे मोठे काका (चुलते) महेंद्रप्रसाद यांनी केले. मार्गदर्शन थोरले भाऊ महेंद्रबाबू यांनी केले. महेंद्रप्रसादांच्या वयाच्या १३व्या वर्षी राजबन्सीदेवीबरोबर त्यांचा विवाह झाला. त्या अतिशय लाजाळू व मर्यादशील होत्या.
डॉ. राजेंद्र प्रसादांच्या गावात एकही प्राथमिक शाळा नव्हती. त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी एका मुसलमान मौलवीची नेमणूक करण्यात आली. बालपणी घरातच शिक्षणाला सुरुवात झाली. त्यावेळी राजेंद्रबाबूंचे पाचवे किंवा सहावे वर्ष असेल. कायस्थांच्या रीतिरिवाजानुसार मौलवी साहेबांच्या हस्ते अक्षरारंभ करण्यात आला. त्यावेळी मौलवी साहेबांनी त्यांना पहिलाच शब्द शिकविला आणि तो म्हणजे ‘बिसमिल्लाह’! प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर राजेंद्रबाबूंना ‘छपरा’ येथील शाळेत इंग्रजी शिकण्यााठी धाडण्यात आले. १९०२ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, तेव्हा त्यांचे वय १७ वर्षांचे होते. उच्च शिक्षणासाठी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला आणि ते बी.ए. ची परीक्षा
उत्तीर्ण झाले. कलकत्ता विद्यापीठातून एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९०८ मध्ये त्यांनी मुझफ्फरपूरच्या ब्राह्मण कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापनकार्य केले. काही काळ ते या कॉलेजच्या प्राचार्यपदावरही राहिले. परंतु त्यांचे अध्यापनात फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी वकील होण्याचे ठरविले.
१९१५ साली ते मास्टर ऑफ लॉज ही परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. हिंदू कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला होता. पुढील दोन वर्षांत त्यांनी डॉक्टर ऑफ लॉज ही कायद्याची सर्वोच्च पदवी मिळवली. त्यामुळे त्या दिवसापासून ते कायमचे ‘डॉक्टर राजेंद्रप्रसाद’ झाले.
कायदेभंगाच्या चळवळीत तुरुंगवास
विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडली. १९११ मध्ये राजेंद्रबाबूंनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला. नंतर ते पाटण्याला आले आणि १९१६मध्ये त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. वकिलीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर थोड्याच अवधीत त्यांची गणना चांगल्या दर्जाच्या यशस्वी वकिलांत होऊ लागली. १९२४ मध्ये डॉ. राजेंद्रबाबूंची पाटणा महापालिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. राजेंद्रबाबूंची त्याकाळची कमाई सालीना तीस ते चाळीस हजारांवर होती, पण देशसेवेसाठी त्यांनी वकिली सोडली आणि आजन्म फकिरी पत्करली. स्वातंत्र्य चळवळीतील लाला लजपतराय, अरविंद्र घोष आणि मदनमोहन
मालवीयांसारख्या नेत्यांच्या विचाराने ते प्रभावित झाले. १९२८ मध्ये हॉलंडमध्ये जागतिक युवक शांतता परिषद भरली होती. त्यात राजेंद्रबाबूंनी भारतातर्फे भाग घेतला. त्यांनी केलेले विद्यार्थी संघटनेचे काम पाहून गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना ‘भारत सेवक समाज’ मध्ये दाखल होण्याचे आमंत्रण दिले. पण घरच्या लोकांच्या विरोधामुळे त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले नाही. वडील बंधू आणि आई यांच्या शब्दास मान देऊन त्यांनी भारत सेवक समाजाचे सभासदत्व स्वीकारले नाही, पण देशसेवेचे व्रत कधी सोडले नाही. त्यांनी अखंड सामाजिक कार्याला वाहून घेतले. देवी सरोजिनी नायडू आणि टिळक या नेतेमंडळींच्या प्रभावी भाषणांचा त्यांच्यावर परिणाम होऊन, त्यातूनच त्यांना देशसेवेची स्फूर्ती मिळाली. काँग्रेसच्या अधिवेशनांना राजेंद्रबाबू हजर राहू लागले. देशसेवा करण्याचा त्यांचा मार्ग निश्चित झाला होता आणि या मार्गावर आणून सोडण्यास त्यांना गांधीजींसारखा महात्मा भेटला. १९१६ सालच्या लखनौ कॉग्रेस अधिवेधनास डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. याच अधिवेशनात गांधीजीही आले होते. त्यावेळी एखाद्या लोहचुंबकासारखे राजेंद्रबाबू गांधीजीकडे
आकर्षिले गेले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेच नाही. गांधीजींच्या व काँग्रेसच्या सर्व आंदोलनांत ते सहभागी झाले. १९२० च्या असहकार आणि १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला. यावेळी राजेंद्रबाबूंना अटक झाली. परंतु तुरुंगात खराब अन्न खाण्यात आल्याने त्यांना दम्याचा विकार जडला आणि अखेर या दम्यानेच त्यांचा बळी घेतला. यावेळी बिहारमध्ये मोठा भूकंप झाला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी बिहार सेंट्रल रिलीफ कमिटी स्थापन
केली. त्यांनी याच काळात सुमारे २८ लाख रुपयांची मदत भूकंपग्रस्तांना वाटली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलने केली. प्रत्येकी वेळी स्वातंत्र्य त्यांना हुलकावणी देत होते. पण त्यामुळे ते कधी नाउमेद झाले नाहीत. उलट १९३४ साली ते म्हणाले, ‘आमचा एकदा पराजय होईल, दोनदा होईल, परंतु एक दिवस असा येईल की त्यादिवशी आमचा हमखास विजय होईल!’ १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला.
समाजसुधारणा क्षेत्रात सक्रीय सहभाग
काँग्रेसचे एक अग्रगण्य धुरीण म्हणून डॉ. राजेंद्र प्रसादांनी देशाची सेवा केली. परंतु केवळ राजकारणातच रममाण होण्याचा त्यांचा पिंड नव्हता. त्यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रातही सक्रिय भाग घेतला. राजेंद्रबाबू केवळ विचारांनीच सुधारणावादी नव्हते, तर त्यांचे आचरणही त्याला अनुसरून होते. सुधारणेचे पहिले पाऊल त्यांनी आपल्या घरातूनच उचलले. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या लग्नात एक पै ही हुंडा म्हणून घेतली नाही. तसेच लग्नावर होणारा अफाट खर्च टाळून अत्यंत साध्या पद्धतीने लग्नसमारंभ साजरे केले. कायस्थ ज्ञातीच्या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून बोलताना हुंडाबंदीचा काटेकोटपणे अंमल झाला पाहिजे, यावर त्यांनी अधिक भर दिला.
डॉ. राजेंद्र प्रसादांनी हरिजनांचा मंदिर प्रवेश, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरणे, शाळा, कॉलेज, हॉटेल अशा ठिकाणी मुक्तद्वार असावे; या संदर्भात अमोल कार्य केले. राजगोपालाचारी यांच्याबरोबर त्यांनी दक्षिण भारताचा दौरा केला व तेथील जनतेला हरिजनांसाठी मंदिर खुले करण्याच्या बाबतीत जाहीर आवाहन केले. हरिजन उद्धाराचे कार्य त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचे वाटले. हिंदूधर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक लवकरात लवकर धुवून निघावा, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी आपल्या वागणुकीत उच्च-नीच किंवा स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव कधीच केला नाही. उत्सव १९३० मध्ये हजारीबाग सेंट्रल जेलमध्ये जेव्हा राजकीय कैद्यांनी होळीचा साजरा केला, तेव्हा राजेंद्रबाबू जेलच्या एका मेहतराला प्रेमाने आलिंगन देताना आढळले. राजेंद्रबाबूंना पददलितांबद्दल कणव व सहानुभूती होती.
हिंदी भाषेच्या अभिवृद्धीसाठी डॉ. राजेंद्र प्रसादांनी खूप परिश्रम घेतले. राजेंद्रबाबूंचे हिंदी भाषेवर केवळ हार्दिक प्रेम होते किंवा ते तिचे फक्त समर्थक होते असे नव्हे, तर स्वतः झीज सोसूनही त्यांनी आपले हिंदी भाषेवरील प्रेम व्यक्त केले. भारतीय प्रशासनात हिंदीचा वापर करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. सरकारी नोकरांना कामातील थोड वेळ बाजूला काढून हिंदी शिकण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचना त्यांनीच राष्ट्रपती असताना गृहमंत्री गोविंद वल्लभ पंतांना केली होती. पूर्वी काँग्रेसच्या अधिवेशनातही अध्यक्षीय भाषण इंग्रजीतून करण्याची प्रथा किंवा फॅशन होती. पण डॉ. राजेंद्र प्रसादांनीच बिहारच्या प्रांतिक काँग्रेस सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानावरून हिंदीमधून प्रथम भाषण केले व नवीन प्रथा रूढ केली. खादी आणि ग्रामोद्योग या कार्याविषयी त्यांना निष्ठापूर्वक प्रेम होते. खादीचा प्रचार त्यांनी आयुष्यभर केला. स्वतः ते सूतकताई नियमितपणाने करीत असत. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांच्या या निष्ठेत कधी फरक पडला नाही. उलट राष्ट्रपती झाल्यावर राष्ट्रपतीभवनातील दारांचे व खिडक्यांचे पडदे, पलंगपोस, टेबलक्लॉथ, कोच व खुर्ध्यावरील कापडी आवरणे खादीच्या कपड्याची करण्यास भाग पाडले. अशा त-हेने आधी केले आणि मग सांगितले, असे राजेंद्रप्रसादांचे आचरण होते.
गांधीवादाचे भाष्यकार
“माझ्याबरोबर अनेक चांगल्या चांगल्या लोकांनी काम केले आहे, परंतु या चांगल्या लोकांतही सर्वश्रेष्ठ असे राजेंद्रबाबू आहेत. त्यांनी माझ्यावर एवढे अपरंपार प्रेम केले आहे की, त्यामुळे मी अपंग बनलो. त्यांच्या साहाय्यावाचून एक पाऊलही पुढे टाकणे मला शक्य नव्हते. त्यांच्याइतका नम्रपणा मी कोठेही पाहिला नाही.” गांधीजींचे हे उद्गार सर्वार्थाने उचित असेच होते.
गांधीजींच्या सहवासामुळे राजेंद्र प्रसादांच्या जीवनात मोठी क्रांती झाली. गांधीजींच्या दीर्घकालीन निकट सहवासामुळे राजेंद्र प्रसादांच्या मुळातच असलेल्या सात्त्विक वृत्तीला, ऋजुतेला व सत्यनिष्ठेला मनोहर पैलू पडले. गांधीजींच्या विचारांचे योग्य ते सार राजेंद्रबाबूंनी ग्रहण केले आणि तेच आपल्या सरल, सुबोध व सोप्या भाषेत त्यांनी मांडले. आपल्या आत्मकथेत अहिंसेचे विवेचन करताना ते म्हणाले, “अहिंसेचे तत्त्वज्ञान मोठे गूढ आहे. ते जीवनात उतरविणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी अहिंसेची शक्ती आणि मर्यादा नीट जपली पाहिजे. अहिंसेमुळे मनुष्य भेकड बनतो. देशाचे स्वातंत्र्य अहिंसेने कसे राखता येणार? अहिंसा हे अव्यवहार्य तत्त्वज्ञान आहे, असे म्हणून लोक अहिंसेची थट्टा करीत असतात. परंतु अहिंसेचा विचार
करताना पहिल्याप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, हिंसेमध्ये भ्याडपणा आहे पण अहिंसेत तो नाही. जेथे निर्भयता नसेल, तेथे अहिंसाही नसेल. अहिंसात्मक प्रवृत्ती म्हणजे आपण ज्याला न्याय आणि उचित समजतो तेच ते निर्भयपणाने व कर्तव्यबुद्धीने अखंड करीत राहणे होय! थोडक्यात काय? तर गांधीजी अहिंसा ही शूरांची अहिंसा आहे. भेकडांची नव्हे!”
एकदा मौलाना आझादांनी दिल्लीमध्ये गांधी विचारांवर एक परिसंवाद आयोजित केला होता. देशातील आणि परदेशातील अनेक विचारवंतांनी त्यात भाग घेतला होता. राजेंद्र प्रसादांनी त्यावेळी गांधींचे विचार आणि आदर्श यावर मौलिक विवेचन केले. ते ऐकून सर्वच विद्वान चकित झाले. ‘मँचेस्टर गार्डियन’ नावाच्या एका परदेशी वृत्तपत्राने (इंग्रजी) लिहिले, ‘गांधीवादाची एवढी विद्वतापूर्ण आणि सुसूत्र व्याख्या करता येणे शक्य आहे, याची कल्पना राजेंद्रप्रसादांच्या व्याख्यानापूर्वी कधीही आली नव्हती.’
१९३९ मध्ये डॉ. राजेंद्र प्रसादांनी त्यांचा द्विखंड भारत India divided हा ग्रंथ प्रकाशित केला. त्या ग्रंथात फाळणीचे दुष्परिणाम सांगितले आहेत. मात्र त्याचवेळी उद्या जर फाळणी झाली, तर ती नेमकी कशी होईल? कोणते प्रदेश कोणाच्या वाट्याला जातील? आणि जनमताची चाचणी कोठे घ्यावी लागेल? याही प्रश्नांचा त्यात खल आहे. शिवाय फाळणी झालीच तर अस्तित्वात येणाऱ्या दोन्ही देशांचे राज्यवार उत्पन्न व जिल्हावार मिळकत याचाही तपशील या ग्रंथात आहे. प्रत्यक्षात जेव्हा फाळणी झाली, तेव्हा राजेंद्रबाबूंनी त्यांच्या ग्रंथात दिलेल्या आराखड्यानुसारच ती झाली, हे जाणकारांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. राजेंद्र प्रसाद हे गांधीवादाचे भाष्यकार होते. भारतामध्ये त्यांना गांधीजींची प्रतिमूर्ती म्हणूनच ओळखण्यात येऊ लागले. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी एकदा म्हटले होते, ‘गांधीजींची प्रतिष्ठापना मी माझ्या मानसात केलेली आहे, सरदार पटेलांनी ती आपल्या कर्मात केली आहे, जवाहरलालजींनी त्यांच्या चारित्र्यशक्तीत केली आहे. परंतु राजेंद्रप्रसादाच्या अंतःकरणात ते श्रद्धेच्या रूपाने आहेत!’
राष्ट्रीय काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष
‘वैष्णवजन त्यालाच म्हणावे, जो परपीडा जाणी रे’ हे महात्मा गांधीजींचे आवडते भजन होते. परपीडकांना जवळ घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करणारी, त्यांच्याकडे शीतल दृष्टीने पाहणारी वैष्णवी वृत्ती राजेंद्रबाबूच्या ठिकाणी पुरेपूर होती, हे अनेक लहानमोठ्या प्रसंगांवरून दिसून येते.
पाटण्याच्या हायकोर्टात एक विद्वान कायदेपंडित म्हणून राजेंद्रबाबूंची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. वकिलीच्या व्यवसायात त्यांना कमाईदेखील चांगली होत होती. एक सज्जन व हुशार गृहस्थ अशी अन्य वकिलांमध्ये त्यांची ख्याती होती. एकदा काय झाले, श्रीभवानी दयाळ यांच्या एका नातेवाइकास हायकोर्टात एक खटला दाखल करावयाचा होता. ते गृहस्थ कागदपत्रांचा गठ्ठा आणि एक ओळखपत्र घेऊन पाटण्यास आले. राजेंद्रबाबूंनी सारी कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, ही केस जिंकली गेली तर विरोधी पक्षात असणाऱ्या विधवा बाईला अन्नाच्या कणासही महाग होऊन बसावे लागेल. त्यामुळे राजेंद्रबाबूंनी त्या गृहस्थास सल्ला दिला की, ‘मित्रा, हा दावा तू दाखलच करू नकोस. एका विधवेची मालमत्ता बळकावशील तर तुला जन्मभर शांती लाभणार नाही.’
ते गृहस्थ परत गेले आणि भवानजींना सांगू लागले की, ‘अहो भाईसाहेब, तुम्ही मला वकिलाकडे पाठविले होते की एखाद्या महात्म्याकडे? अहो राजेंद्रबाबू हे खरे वकील नसून साधू संत आहेत. त्यांनी माझ्याजवळील कागदपत्रे पाहून दावा दाखल करण्याचे तर लांबच राहिले परंतु मलाच वर धर्म व नीतीवर उपदेशाचे डोस पाजले आणि मला परत धाडून दिले!’
सरतेशेवटी त्यांनी दावा दाखल करणे सोडून दिले, हे सांगणे नकोच!
वकिलीचा व्यवसाय म्हणजे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे सिद्ध करणे होय. पण डॉ. राजेंद्र प्रसाद तर सत्याचे पुजारी होते. त्यामुळे त्यांनी वकिली सोडली आणि आजन्म फकिरी पत्करली. त्यांनी जेव्हा वकिलीचा त्याग केला, तेव्हा त्यांच्याजवळ
फक्त १५ रुपये शिल्लक होते. १९३४ मध्ये मुंबई येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. पुढे १९३९ व १९४७ मध्येही ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पहिल्यावेळी सुभाषचंद्र बोस निवडून आले होते. पण गांधीजींशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वसंमतीने राजेंद्र प्रसादांवर अध्यक्षपदाची जबाबदारी येऊन पडली. दुसऱ्यावेळी आचार्य कृपलानी आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात वाद झाल्याने कृपलानींनी राजीनामा दिल्याने ऐनवेळी सर्वसंमतीने राजेंद्र प्रसादांकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. दरम्यान १९४९ मध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले, तेव्हा गांधीजींच्या आग्रहामुळे राजेंद्र प्रसादांनी अन्न व कृषी खात्याचे मंत्रिपद स्वीकारले होते. तीन वेळा काँग्रेससारख्या राष्ट्रव्यापी संघटनेची धुरा जनतेने आणि राष्ट्रीय नेत्यांनी डॉ. राजेंद्र प्रसादांच्या हाती सोपवली. यावरूनच त्यांच्याबद्दल राष्ट्राला वाटणारा विश्वास, आदर आणि प्रेम यांची कल्पना करता येईल.
जी गोष्ट काँग्रेसच्या अध्यक्षपदाची, तीच भारताची घटना बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीच्या अध्यक्षपदाची! घटना समितीमध्ये भिन्नपक्षीय, विद्वान, कायदेपंडित, संस्थानिक यांची खोगीरभरती होती. या सर्वांना सामावून घेणारा व्यापक दृष्टीचा नेताच अध्यक्ष म्हणून हवा होता. स्वाभाविकपणे सर्वांनी यासाठी पसंती दिली ती डॉ. राजेंद्र प्रसादांच्या नावालाच ! अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना ते म्हणाले, ‘मी या क्षणापासून कोणत्याही एका पक्षाचा, धर्माचा किंवा जातीचा उरलो नाही. देशाच्या सेवेसाठी झटणारा एक सेवक बनलो आहे!’ आणि खरोखरच राजेंद्रबाबू निःपक्षपातीपणाने वागले. काही लोकांची अशी कल्पना आहे की, डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे नामधारी अध्यक्ष होते. पण ही कल्पना चुकीची आहे. प्रकृती साथ देत नसतानादेखील घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसादांनी या तीन वर्षांत जे अथक परिश्रम केले, त्याला तोड नाही. घटना समितीत काम करताना त्यांनी आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. गांधीजींच्या जीवनाचा आदर्श राजेंद्रप्रसादांसमोर सदैव ध्रुवताऱ्याप्रमाणे अटळ असे. त्यापासून ते रेसभरही मागे सरत नसत.
राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष असताना घडलेली घटना महत्त्वाची आहे. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी मिठावर कर लादण्याचा ठराव मांडला होता. समितीचे सदस्य या ठरावाला अनुकूल होते. परंतु राजेंद्र प्रसाद मात्र अस्वस्थ झाले होते. त्यांच्या डोळ्यांसमोर १९३० सालची गांधीजींची दांडी यात्रा तरळत होती. त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि त्यांचे अनुयायी मिठावर कर बसवायला तयार झाले. इतक्या लवकर लोक गांधीजींना कसे काय विसरले? वेदनापूर्ण स्वरात बोलू
डॉ. राजेंद्र प्रसाद ताड्कन उठून उभे राहिले आणि लागले, गांधीजींनी दांडीयात्रा काढून ज्या मिठाचा सत्याग्रह केला, त्या मिठावरच जर तुम्ही कर अध्यक्षपद लादणार असाल, तर स्वराज्याची घटना तयार करणाऱ्या या समितीचे भूषविणे मला प्रशस्त वाटत नाही!’ डॉ. राजेंद्र प्रसादांचा हा रुद्रावतार अवाक् झाले. सरतेशेवटी त्यांच्या सूचनेनुसार मिठावर कर समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे कामकाज २६ जानेवरी १९५० रोजी भारत हे सर्वोच्च पदाला आवश्यक असणारे २६ जानेवारी १९५० पासून पाहून सारे सभागृह बसविण्याबाबतचा प्रस्ताव गाळून टाकण्यात आला. डॉ. राजेंद्र प्रसाद घटना सुमारे ३ वर्षे चालले होते. घटनेप्रमाणे सार्वभौम प्रजास्ताक गणराज्य बनले. देशाच्या सर्व सद्गुण डॉ. राजेंद्र प्रसादांच्या ठायी असल्याने त्यांना देशाचे हंगामी राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. १३ मे १९६२ रोजी ते राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाले. सलग १२ वर्षे राष्ट्रपतिपदावर विराजमान झालेले ते आतापर्यंतचे एकमेव राष्ट्रपती म्हणावे लागतील. त्यांचे हे रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडलेले नाही आणि यापुढेही कोणी मोडेल असे वाटत नाही.
भारतीय संस्कृतीचे अभिमानी
डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारतीय संस्कृतीचे अभिमानी व हिंदू धर्मावर अपार श्रद्धा ठेवणारे सद्गृहस्थ होते. मूलतःच राजेंद्रबाबूंचा ओढा धार्मिक व आध्यात्मिक गोष्टीकडे अधिक होता. राष्ट्रपती झाल्यावर राष्ट्रपती भवनातही लहानमोठे धार्मिक समारंभ ते घडवून आणीत असत. एकदा तर रामायणाचा पाठच त्यांनी सुरू केला आणि पुढे तो कितीतरी दिवस चालू राहिला. १९५२ सालची गोष्ट! वाराणसी क्षेत्रामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून वैदिक विद्वान जमा झाले होते. राजेंद्रबाबूंनी भारताचे राष्ट्रपती या नात्याने त्यांचा यथायोग्य सत्कार केला आणि आपली आदरांजली वाहिली.
त्यावेळीही तथाकथित धर्मनिरपेक्षवादी लोकांनी त्यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले होते. परंतु त्या टीकेला मुळीच न घाबरता प्राचीन भारताची उज्ज्वल परंपरा त्यांनी कायम राखली. एखादी गोष्ट पटली म्हणजे त्याबाबतीत ते कोणत्याही प्रकारची तडजोड करीत नसत. सोरटी सोमनाथाच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यातील त्यांच्या सहभागावरून त्यांचा कृतनिश्चयी स्वभाव स्पष्ट होतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गझनीच्या धर्मवेड्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले सोमनाथाचे मंदिर सरदार वल्लभभाई पटेलांनी पुढाकार घेऊन पुनःश्च प्रस्थापित केले. भारताने स्वातंत्र्याबरोबरच जशी लोकशाहीची दीक्षा घेतली तशीच निधर्मी राज्याची घोषणाही केली. परंतु निधर्मी राज्य (Secular state) याचा अर्थ धर्महीन राज्य असा नव्हे! निधर्मी राज्य याचा अर्थ प्रत्येक धर्मीयाने आपआपल्या धर्मातील उच्च आदर्शाप्रमाणे वागावे आणि एक सच्चा भारतीय म्हणून आदर्श जीवन जगावे, अशी अपेक्षा त्यात अभिप्रेत आहे. सोमनाथाचे मंदिर हा हिंदूंचा मानबिंदू होता. तो स्वातंत्र्यानंतर उजळून टाकण्यात गैर काहीच नव्हते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरे झाल्यानंतर त्याचे रीतसर उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे यात औचित्य होते. त्यामुळे राजेंद्रबाबूंनी सोमनाथाला जाण्याचे ठरविले, यात गैर ते काय होते? पण का कुणास ठाऊक, जवाहरलाल नेहरूंना ते पसंत पडले नाही. निधर्मी राज्याच्या राष्ट्रपतीने कोणत्याच धार्मिक सोहळ्यात भाग घेऊन नये, अशी त्यांची विचारसरणी होती. त्यांनी आपले हे मत राजेंद्र प्रसादांना स्पष्ट बोलून दाखविले. पण राजेंद्र प्रसादांना नेहरूंचे हे मत मुळीच पसंत पडले नाही. तेव्हा ‘वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि’ असणारे डॉ. राजेंद्र प्रसाद नेहरूंना कणखरपणे म्हणाले, ‘सोमनाथला जाण्यास मला मुळीच गैर वाटत
नाही. जसा मी सोमनाथाची पूजा करीन तसा मी मशिदीतही जाईन आणि चर्चमध्येही जाईन! अखेर या कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित राहिले, पण भारताचे पंतप्रधान नेहरूंची अनुपस्थिती मात्र त्याना जाणवल्यावाचून राहिली नाही. डॉ. आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोड बिलाला डॉ. राजेंद्र प्रसादांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे डॉ. आंबेडकरांना राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले.
साधी राहणी, उच्च विचारसरणी
डॉ. राजेंद्र प्रसादांच्या कर्तृत्वाने व सौजन्याने राष्ट्रपतिपदाला एक आगळेवेगळे वैभव प्राप्त झाले. त्यांच्या निगर्वी स्वभावामुळे व सरळ वागणुकीमुळे ते सर्वांच्या आदरात पात्र ठरले. राष्ट्रपती झाल्यावर राष्ट्रपतींचा मोठा प्रासाद त्यांना राहावयास मिळाला होता. पण त्यातील फक्त ५ खोल्या त्यांनी स्वतः साठी राखून ठेवल्या आणि सगळा भाग सरकारी खात्यांसाठी वापरावयास दिला. राष्ट्रपती भवनातील विशाल उद्यान त्यांनी आम जनतेसाठी खुले करून दिले. प्रचंड आणि सुसज्जित स्वयंपाकघर बंद करून टाकले. राष्ट्रपती झाल्यावरसुद्धा ते रेल्वेचा प्रवास तिसऱ्या वर्गाने करीत असत. राष्ट्रपती झाल्यानंतरदेखील जनसंपर्क नित्य ठेवून ते लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत.
‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ असे त्यांचे जीवन होते. पोषाखाबाबत म्हणाल तर खादीचे धोतर, डोक्यावर पांढरीशुभ्र गांधी टोपी, अंगात जाकीट व उपरणे हा त्यांचा पोषाख अनेक वर्षे होता. ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या पोषाखात थोडा बदल झाला. राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्यावर शेरवानी, चुणीदार पायजमा व बूट घालण्याची पाळी आली, तेव्हा ते काहीसे गोंधळले. पण काही दिवसांनी ते सावरले. त्यांना नवीन पोषाखाची सवय झाली. राष्ट्रपती झाल्यावर बंद गळ्याचा कोट मात्र त्यांच्या अंगावर चढला तो कायमचाच. राष्ट्रपती झाल्यावर जरी त्यांनी बडेजावाच्या अनेक गोष्टी कमी केल्या, तरी त्या पदाची काही प्रतिष्ठा परंपरेने राखणेही भाग होते. एरवी आपल्या वेशभूषेबाबत उदासीन असलेल्या राजेंद्रबाबूंना राष्ट्रपती बनल्यावर मात्र लक्ष देणे भाग होते. एकदा राष्ट्रपतींचा विशेष पोषाख शिवून आल्यावर शिलाईचे बिल किती यावे? तर २५० रुपये! हे बिल पाहून राजेंद्रबाबूंना आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला विचारले, “एवढा खर्च?” “होय, हा राष्ट्रपतींचा पोषाख आहे आणि त्या दृष्टीने एवढे बिल येणारच!” सेक्रेटरीने सांगितले. यावर राजेंद्रबाबू निरुत्तर झाले. पण अंतरात मात्र व्यथित बनले. पोस्टेजचा खर्चसुद्धा अनाठायी होऊ नये, आवश्यक तेवढाच व्हावा, असा त्यांचा कटाक्ष होता. जेथे काडीने काम भागण्यासारखे आहे, तेथे पाकिटाचा खर्च करू नये असा त्यांचा आग्रह होता. त्यावेळी राष्ट्रपती म्हणून त्यांना दरमहा १०,००० रुपये पगार होता. तो त्यांना तेवढा आवश्यक वाटत नव्हता. त्यामुळे त्यांनी तो ५,००० रुपये म्हणजे निम्म्या रक्कमेवर आणून ठेवला.
‘भारतरत्न’ सर्वोच्च किताब
डॉ. राजेंद्रप्रसादांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अनेक श्रेष्ठ सन्मान प्राप्त केले. काशी विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेने १९५० साली ‘विद्यावाचस्पती’ हा बहुमान त्यांना अर्पण केला. १९३७ साली अलाहाबाद विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज’ ही पदवी देऊन गौरवले, तर २० डिसेंबर १९४७ रोजी पाटणा विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ हा किताब बहाल केला. डॉ. राजेंद प्रसादांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून देशाची पन्नास वर्षे उत्तम सेवा केली. त्यामुळे त्या सेवेचा सन्मान म्हणून राष्ट्राने १९६२ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब अर्पण केला.
प्रकृति अस्वास्थ्यामुळे १९६२ साली ते राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाले. त्याच दिवशी राजेंद्र प्रसादांनी दिल्ली सोडली आणि १४ मे १९६२ रोजी ते परत आपल्या सदाकत आश्रमात आले. ‘सदाकत’ म्हणजे ‘सत्य’ सत्याच्या पायावर सेवेच्या उद्देशानेच ‘सदाकत आश्रम’ची प्रतिष्ठापना झाली होती. गांधीजींच्या हाकेला ओ देऊन मौलाना फजरूल हक यांनी या आश्रमाची स्थापना केली होती. सदाकत आश्रमातील कौलारू टुमदार खोल्यांचे निवासस्थान राजेंद्रबाबूंच्या स्मृतीशी निगडित झालेले आहे. या जागेत ते सुमारे २५-३० वर्षे राहिले आणि तेथेच ते शेवटपर्यंत राहिले. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावर राजेंद्र प्रसादांनी आपले उर्वरित आयुष्य सदाकत आश्रमात शांतपणे घालविले. जीवनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी १९६३ रोजी पाटणा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांचे व्याख्यान होणार होते. पण न्यूमोनियामुळे ते या समारंभाला जाऊ शकले नाहीत. त्याच दिवशी रात्री सव्वादहा वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना श्रद्धांजली वाहताना डॉ. राजेंद्र प्रसादांच्या सर्वस्पर्शी विशाल व्यक्तिमत्त्वाबद्दल सरोजिनी नायडू म्हणाल्या होत्या, “राजेंद्रबाबूंच्या भव्य व्यक्तिमत्त्वासंबंधी लिहावयाचेच झाले, तर सुवर्णाची लेखणी मधात बुडवूनच लिहिले पाहिजे. त्यांच्या अंगच्या गुणांनी सर्व भारतीय नेत्यांत ते प्रिय आहेतच. पण गांधीजींच्या निकटवर्तीय नेत्यांत त्यांचे स्थान, प्रभू येशूजवळ सेंट जॉनचे जे होते, तेच आहे।’
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.