भारतरत्न राष्ट्रपती प्रणव मुखर्जी | Pranab Mukherjee
Pranab Mukherjee भारताच्या राजकीय इतिहासात एक अनमोल अंचल आहे, ज्याला भारताच्या वैशिष्ट्यातील सर्वाधिक गर्वस्त मोहर म्हणून स्वीकारले जाते. त्यातील एक उजव्या तारे, एक शिक्षित नेते, आणि एक कार्यशील व्यक्तिमत्त असून, त्याच्या व्यक्तिमत्ताची भरपूर साक्षात्कारे असतात. ह्या व्यक्तीचं नाव ‘प्रणव मुखर्जी’. राजकीय प्रणालीच्या एक महान गणितासून घालवलेल्या, त्याच्या व्यक्तिमत्तातील तरंगाने आपले स्वागत केले, आपल्या आवाजाने आपले स्वागत केले.
‘भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात तो नष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की, भ्रष्टाचाराचा मुद्दा केवळ काँग्रेस पक्षापुरताच मर्यादित नाही. भ्रष्टाचाराच्या आर्थिक घोटाळ्यात सर्वच पक्ष सहभागी असल्याने काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त आहे, असे मी म्हणू शकत नाही. काँग्रेससुद्धा भ्रष्टाचारात सहभागी आहे हे मी कबूल् करतो आणि त्याबद्दल मी जनतेची क्षमायाचना करतो.’ वरील उद्गार कोणी काँग्रेसविरोधकांनी काढलेले नाहीत. इ.स. १९९८ मध्ये काँग्रेस सरकारचे परराष्ट्रमंत्री असलेले प्रणव मुखर्जी यांनी हे उद्गार काढलेले आहेत हे मी तुम्हाला सांगितले तर ते खरे वाटणार नाही. पण स्पष्टवक्ते म्हणून ख्याती असलेल्या प्रणव मुखर्जीचे हे उद्गार आहेत, हे लक्षात ठेवा.
पुण्याच्या ‘केसरी मराठा ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी टिळक पुण्यतिथीला देशातील एका मान्यवराला लोकमान्य टिळक हा मानाचा पुरस्कार दिला जातो. एका वर्षी हा बहुमान प्रणव मुखर्जी यांना मिळाला होता. तो स्वीकारण्यासाठी ते पुण्याला आले होते. टिळक स्मारक मंदिरात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला हजर राहण्याचे भाग्य मला लाभले होते. त्यावेळी प्रणव मुखर्जी टिळकांचा गौरव करताना म्हणाले होते की, ‘भगवान श्रीकृष्ण के बाद लोकमान्य तिलकनेही गीता कही!’
जन्म, बालपण व शिक्षण
उत्तम वक्ता, लेखक आणि अभिजात बंगाली संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जीचा जन्म बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मिराती या गावी ११ डिसेंबर १९३५ रोजी एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. राजलक्ष्मी या आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. १९२० सालापासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.
१९५२ ते १९६४ पर्यंत ते काँग्रेसचे क्रियाशील सदस्य आणि पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे त्यांना १० वर्षांचा कारावास भोगायला लागला. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. अशा त-हेने राजकारणाचे बाळकडू प्रणव मुखर्जीना लहानपणी घरातच मिळाले होते.
कलकत्ता विश्वविद्यालयातून त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळवली होती. तसेच त्यांनी कायद्याची पदवीही प्राप्त केली. सुरुवातीला त्यांनी वकिली आणि प्राध्यापकी केली. त्यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. बांगला प्रकाशन संस्थेत ‘मातृभूमी की पुकार’ मध्ये त्यांनी उमेदवारी केली. त्यांचे बंगाली भाषेवर असामान्य प्रभुत्व होते. त्यामुळे ते बंगाल साहित्य परिषदेचे विश्ववस्त आणि अखिल भारतीय बंगाली भाषा संमेलनाचे अध्यक्ष झाले. ‘द
कोईलेएशन इयर्स १९९६-२०१२’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. १९५७ प्रणव मुखर्जी यांचा विवाह वयाच्या २२ व्या वर्षी दिनांक १३ जुलै रोजी शुभा मुखजींबरोबर झाला. त्यांना अभिजित व इंद्रजित असे दोन मुलगे आणि शर्मिष्ठा नावाची मुलगी आहे. त्यांचा अभिजित हा मुलगाही एकदा निवडून गेला होता. याचा अर्थ मुखर्जी घराण्याच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत, असे म्हणावयास हवे. लेखन वाचन करणे, बागकाम करणे आणि संगीत ऐकणे हे प्रणव मुखर्जीचे प्रमुख छंद आहेत.
पाच दशके राजकारण
प्रणव मुखर्जी सुमारे ५ दशके म्हणजे ५० वर्षे राजकारणात कार्यरत होते. इ.स. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. इ.स. १९७३ मध्ये ते औद्योगिक विकास विभागाचे केंद्रीय उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील झाले. त्यानंतर इ.स. १९७५, १९८१, १९९३ आणि १९९९ मध्ये ते वारंवार राज्यसभेवर निवडून आले. पण इ.स. २००४ मध्ये मात्र ते झालेल्या सार्वजत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेले. इ.स. १९८२ ते १९८४ पर्यंत ते कॅबिनेट मंत्रिपदी आरूढ झाले. इ.स. १९८४ मध्ये ते अर्थमंत्री झाले. ६ जुलै २००९ रोजी त्यांनी सरकारचे वार्षिक बजेट सादर केले. त्यामध्ये त्यांनी फ्रिज बेनिफिट टॅक्स आणि कमोडिटीज ट्रांॉक्शन टॅक्स कमी करून अनेक सवलती जाहीर केल्या. त्यांच्या काळात देशाची आर्थिक स्थिती बरोबर नव्हती. त्यामुळे माल आणि सेवाकर लागू केल्याशिवाय आपणाला गत्यंतर नाही, असे त्यांनी सर्वांना पटवून दिले. त्यामुळे अनेक कार्पोरेट अधिकारी व अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. प्रणव मुखर्जीनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम, मुलींची साक्षरता आणि स्वास्थ्य योजना यासाठी योग्य त्या निधीची तरतूद केली. त्याचप्रमाणे प्रणव मुखजींनी राष्ट्रीय राजमार्ग विकास कार्यक्रम, विद्युतीकरण आणि पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरीकरण यासारखे कार्यक्रम राबवले.
प्रणव मुखर्जी यांना राजकारणात मोठी संधी मिळाली, ती इ.स. १९६९ साली. त्यांच्यातले नेतृत्वगुण अचूक ओळखून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना निवडून आणले. त्यानंतर ते पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात तर आलेच, पण ते इंदिरा गांधींच्या निकटवर्तीय वर्तुळातही सामील झाले. यावेळी ते इंदिरा गांधींच्या किचन कॅबिनेटपर्यंत जाऊन पोहोचले. इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची नृशंस हत्या झाल्यानंतर अचानक राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. वास्तविक पाहता यावेळी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी दोन नंबरच्या स्थानावर होते. त्यामुळे सिनियॉरिटीनुसार प्रणव मुखर्जीनाच पंतप्रधानपद मिळायला हवे होते.
पण दुर्दैवाने त्यांना ते मिळू शकले नाही. इंदिरा गांधींच्या समर्थकांनी त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचले आणि त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे प्रणव मुखर्जीनी आपला ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष’ स्थापन केला. मात्र त्यांच्या पक्षाला विशेष जोर धरता न आल्याने त्यांनी राजीव गांधींशी समझोता करून आपला समाजवादी काँग्रेस पक्ष मूळच्या काँग्रेस पक्षात विलीन करून टाकला.
इ.स. १९८९ च्या सुमारास त्यांचे राजकीय नेतृत्व पुन्हा उजळून निघाले.
राजीव गांधींचा अचानक खून झाल्याने पंतप्रधानपदाची जागा पुन्हा एकदा रिकामी झाली. निदान यावेळी तरी प्रणव मुखर्जी पंतप्रधान होतील असे लोकांना वाटले होते. पण प्रणव मुखर्जीना पंतप्रधानपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आणि श्री. पी.व्ही. नरसिंहराव यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रथम प्रणव मुखर्जीची नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी आणि नंतर केंद्रीय मंत्रिपदी निवड केली. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात इ.स. १९९५ ते १९९६ पर्यंत ते परराष्ट्र व्यवहार मंत्री झाले. इ.स. १९९७ मध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
काँग्रेसचे संकटमोचक
इ.स. १९८५ मध्ये ते पश्चिम बंगाल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. इ.स. २००४ मध्ये जेव्हा मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे संमिश्र मंत्रिमंडळ सत्तेवर आले, तेव्हा मनमोहनसिंह फक्त राज्यसभेचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना लोकसभेचा काँग्रेसचा नेता होता येत नव्हते. नेहमी राज्यसभेवर निवडून येणारे प्रणव मुखर्जी नेमके याचवेळी लोकसभेवर निवडून आले. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून प्रणव मुखर्जीची निवड करण्यात आली. यावेळी प्रणव मुखर्जी बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले. प्रणव मुखर्जी हे अर्थ, परराष्ट्र, व्यापार आणि उद्योग इत्यादी खात्यांचे केंद्रीय मंत्री झाले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतृत्वपदीही त्यांची निवड करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या हृदयाचे ऑपरेशन (बायसर्जरी) झाले तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाचा सर्व राज्यकारभार प्रणव मुखर्जीच पहात असत. विरोधक लोकसभेत काँग्रेसवर हल्ला करत, तेव्हा काँग्रेसचा किल्ला एकटे प्रणव मुखर्जीच लढवत असत. त्यामुळे प्रणव मुखर्जीचा उल्लेख नेहमी काँग्रेसचे ‘संकटमोचक’ असाच करीत असत. इ.स. १९९५ मध्ये ते सार्क मंत्रिपरिषद संमेलनाचे अध्यक्ष होते. १० ऑक्टोबर २००८ रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांबरोबर प्रणव मुखर्जीनी धारा १२३ च्या समझोता करारावर हस्ताक्षर केले.
भारताचे राष्ट्रपति
प्रणव मुखर्जीची निष्ठा आणि योग्यता यामुळे ते जसे इंदिरा गांधींच्या किचन कॅबिनेटपर्यंत पोहोचले होते, तसेच ते सोनिया गांधींच्यासुद्धा विश्वासास पात्र ठरले. जेव्हा सोनिया गांधी राजकारणात निष्क्रिय होत्या, तेव्हा प्रणव मुखर्जी त्यांना अशा अडचणीच्या काळात त्यांच्या सासूबाई इंदिरा गांधी कशा धाडसी निर्णय घेत याची आठवण करून देत असत. परिणामी सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या.
२४ ऑक्टोबर २००६ रोजी प्रणव मुखर्जी भारताचे परराष्ट्र मंत्री झाले. इ.स. २००८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्याबरोबर असैनिक परमाणू करारावर त्यांनी स्वाक्षरी केली. इ.स. २००७ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ हा नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे श्रेष्ठ व ज्येष्ठ नेते आहेत. युपीए १ व युपीए २च्या सरकारमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘युरोमनी’च्या सर्वेक्षणानुसार इ.स. १९८४ मध्ये जगातील
पहिल्या पाच अर्थमंत्र्यांत प्रणव मुखर्जीची गणना केली होती. २५ जुलै २०१२रोजी काँग्रेस पक्षाच्या युपीए आघाडीने प्रणव मुखर्जीना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून जाहीर केले. यावेळी विरोधी भाजप आघाडीने पी. ए. संगमा यांना उभे केले होते. परंतु या निवडणुकीत पी.ए. संगमांचा पराभव करून ते भारताचे १३वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. पुढे भाजपचे मोदी पंतप्रधान झाल्यावरही ते काही काळ राष्ट्रपतीपदावर होते. ते काँग्रेस पक्षाचे असले तरी विरोधी पक्षांशीसुद्धा त्यांचे संबंध सदैव चांगलेच राहिले आहेत. त्यांचा उल्लेख नेहमी ‘प्रणवदा’ असाही केला जाते.
अजातशत्रू
‘प्रणवदा आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेते आहेत. दिल्लीच्या राजकारणातील अनेक गोष्टी मला प्रणवदांमुळेच समजल्या!’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. प्रणव मुखर्जी हे कट्टर गांधीवादी असले, तरी विरोधी मतांचीसुद्धा ते कदर करतात. प्रणव मुखर्जी यांनी अगदी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी काँग्रेस व भाजपविरोधी डाव्या पक्षांकडून फार मोठा गदारोळ माजवला गेला. परंतु प्रणव मुखर्जी कुणालाही बधले नाहीत. तेथे जाऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा एक थोर देशभक्त म्हणून उल्लेख करून आपले स्पष्ट आणि परखड मत मांडायलाही मागेपुढे पाहिले नाही. प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतिपदाची पहिली टर्म पूर्ण झाल्यावर इ.स. १९१७ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी त्यांना पुन्हा उभे राहण्याचा आग्रह करण्यात आला होता. पण त्यांनी निवडणुकीला उभे राहण्यास नम्र नकार दिला. ते राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला पुन्हा उभे राहिले असते, तर ते निश्चितच पुन्हा निवडून आले असते, यात काही शंका नाही. परंतु त्यांनी राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती पत्करली.
भारत सरकारने नुकताच इ.स. २०१९ सालचा ‘भारतरत्न’ हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय नागरी पुरस्कार प्रणव मुखर्जी यांना प्रदान केला आहे. प्रणव मुखर्जी हे काँग्रेसच्या युपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असताना भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष होता. सध्या भाजप हा पक्ष सत्तारूढ असून काँग्रेस विरोधात आहे. तरीही त्यांना भाजपकडून ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळाला, यावरून प्रणव मुखर्जी हे ‘अजातशत्रू’ आहेत असे म्हणावयास काहीच हरकत नाही.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.