स्वराज्याची संकल्पना, पूर्वतयारी, उदय, राजनीति
शिवाजी महाराज – Shivaji Maharaj हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अनमोल गाणिमी आहेत. त्यांना स्वराज्याची संकल्पना, संकल्पक व पूर्वतयारी, स्वराज्य निर्मितीचा दृढ निश्चय व उदय, आणि स्वराज्याच्या विस्तारातील राजनीतिच्या विचारांमध्ये विशेष स्थान आहे. त्यांच्या वीरगतिदेखील स्पष्ट जाहिरातील उदाहरणे असून, त्यांचे स्वराज्य निर्माण संघर्षाच्या प्रेरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सर्वांगीण विचारांच्या अध्ययनाने स्वराज्याच्या विकासाच्या मार्गाची साधने केली आहेत.
स्वराज्याची संकल्पना, संकल्पक व पूर्वतयारी – Shivaji Maharaj
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Concept of Swarajya
‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ हा जयघोष उमटू लागला होता.
या अखंड भारतवर्षाच्या क्षितिजावर स्वराज्याचे महान स्वप्न मातोश्री जिजाऊसाहेबांनी पाहिले. प्रत्येक महान स्वप्नाचा प्रारंभ त्या व्यक्तीपासून होतो, ज्या व्यक्तीने ते स्वप्न पाहिले आहे कोणतेही महान स्वप्न एकाएकी मुर्त स्वरूप घेत नाही. स्वराज्याचे महान स्वप्न साधारण नव्हते. साधारण असते तर स्वराज्य कोणीही निर्माण करू शकले असते, स्वराज्याच्या या महान स्वप्नाला असाधारण किंमत मोजावी लागणार होती. त्यासाठी नियतीने प्रत्यक्ष जगदंबाला मातोश्री जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण केले होते.
एक स्त्री बदलू शकते या सृष्टीचे भाग्य, तिच्या निश्चयाने पुरुषास सर्वश्रेष्ठ बनवू शकते. यास इतिहासाचे प्रमाण आहे. सृष्टीच्या दर्पणामध्ये स्वराज्याचे प्रतिबिंब एका स्त्रीस मातोश्री जिजाऊस दिसत होते. स्वराज्यासाठी हट्ट धरला होता. बदलणार होत्या इतिहासाचा प्रवाह भाग्य लिहिणार होत्या स्वराज्याचं ! पण केला होता प्रजेच्या कल्याणासाठी स्वराज्याची बुलंद तटबंदी उभा करण्याचा.
स्वाभिमानाची धार बोथट झालेल्या हिंदू समाजाची जागृती करण्याची गरज होती, राजनितीच्या नैतिक नियमाचे फांसे लोकांवर फेकायचे होते. जेव्हा लोकांच्या मनातील आशा संपलेली असते. तेव्हा नैतिक नियमाचे फांसे फेकून प्रजेचा स्वाभिमान पेटवू शकतो.
हिंदुस्थानात एकही सार्वभौम हिंदू राज्य नव्हते. हिंदू समाजाला कोणीही स्वामी नव्हता. यवनी मुस्लीम आक्रमणामुळे यादवांचे,
विजयनगरचे एकछत्री हिंदू साम्राज्य लयास गेली होती. या यवनांच्या अपवित्र पदस्पर्शाने पवित्र भारतवर्षाची भूमी अपवित्र झाली होती. यवनी मुस्लीम सत्ता उखडून टाकण्यासाठी म्हणावा असा एकही वीर उत्पन्न झाला नाही. हिंदू राज्याचा राजदंड धारण करण्यास कर्तृत्वान पुरुष घडवण्याची गरज होती. नीतिमध्ये तरबेज करून राजदंड धारण करावयास लावायचा होता. दृढ निश्चयाने, स्वराज्याचा संकल्प गरजेचा होता. कारण कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी संकल्प आवश्यक असतो.
असाच संकल्प केला होता. आपल्या राज्यासाठी, रयतेच्या कल्याणासाठी स्वधर्म रक्षणासाठी, यवनी मुसलमनांच्या उच्चाटन करण्यासाठी. या हिंदुस्थानात ‘स्वराज्य’ स्थापन करायचे होते. ‘स्वराज्याची’ परिभाषा रतयेला समजून देण्याची गरज होती. त्यासाठीच स्वराज्याचा हट्ट धरला होता. राजदंड धारण करणारा आपला राजा हवा होता. स्वतंत्र राज्याची उभारणी करून, न्यायाची आणि नीतीचे राज्य उभा करण्याची आवश्यकता होती.
यवनी मुलतानाच्या सत्तेच्या परचक्रात अडकलेल्या या मऱ्हाठा भुमीत ‘स्वराज्याचे’ स्वप्न पाहिले. सन १६२६ व २७ या काळात दक्षिणेतील शाह्यांचे प्रमुख एका पाठोपाठ एक मृत्यु पावले. त्यामुळे त्यावेळची परिस्थिती अस्थिर बनली.
राजनीति नियमानुसार जेव्हा कधी अशी परिस्थिती अस्थिर बनते. तेव्हा विजयाची इच्छा धारणाऱ्या राजाने आपला फायदा करून घ्यावा. यावेळी शहाजीराजांनी एक लहान मुलाला निजामशाहीच्या गादीवर बसवून स्वतः राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न अयशस्वी झाला व मानहानी करून आदिलशहाची चाकरी पत्करावी लागली.
जे स्वप्न पाहतात तेच काहीतरी करून दाखवतात. स्वराज्याचे स्वप्न ते आता स्वप्न नव्हते तर मातोश्री जिजाऊसाहेबांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते.
स्वराज्याचा डाव फसला होता म्हणून नाऊमेद होण्याची गरज नव्हती. कारण राष्ट्रहित साधण्यासाठी एखादे अपयश आले असता का निराश व्हावे? कारण राजनीतित निपुण व्यक्तीने स्वतः महत्त्वकांक्षी असावे.
श्रीनृपशालीवाहन शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शिवनेरी गडावर मातोश्रींच्या पोटी शिवजन्म झाला. हाच बालक परिवर्तनाची नांदी होता. क्रांतीची गर्जना होती.
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Politics of Shivaji Maharaj
स्वराजाचा डाव पुन्हा मांडण्यासाठी शिवाजी राजांना योग्य घडवण्याची गरज होती. मातोश्री जिजाऊंना इतिहासाचा प्रवाह बदलायचा होता स्वराज्य स्थापन होणार होते. इतिहासाचा प्रवाह बदलून एका हिंदूच्या राज्यात परिवर्तीत होणार होते. त्यासाठी छळाचा, बळाचा, कुटील घातकी उपायांचा वापर करावा लागणार होता. शत्रूही याच पद्धतीने नानाविध आक्रमणे करणार होता. या सर्वाचा सामना करण्यास व सर्वांचा अवलंब करून स्वराज्याचा उद्योन्मुख घडून आणायचा होता. त्यासाठी महाराजांचे मन, बुद्धी आणि हृदय वज्रासारखे कठीण बनवणे गरजेचे होते. या सर्वांमध्ये संतुलन आणायचे होते.
स्वराज्य हे जीवनाचे उद्दिष्ट मानून, ते निर्माण व रक्षण करण्यासाठी मस्तिष्क बलवान करण्याची गरज होती. स्वराज्याचा संकल्प मातोश्री जिजाऊंनी केला होता. त्यानुसारच त्यांनी महाराजांचे मस्तिष्क बनवले.
कारण स्वराज्य निर्माण करतेवेळी विविध भयानक संकटाचा सामना करावा लागणार होता. व्यक्तीच्या केंद्रस्थानी मस्तिष्क असते. मस्तिष्क सर्वांगास बळ देते. शरिरातील रोग व बाह्य घातक उपसगांपासून वाचण्यासाठी चेतनेचे केंद्र मस्तिष्क असते व ते बलवान असावे.
राजकारण करणाऱ्या प्रमुख व्यक्तीची बुद्धीच राष्ट्राला वाचवत असते. त्या व्यक्तीस नेहमी बुद्धीने विचार करून निर्णय घ्यावा लागतो त्याने प्रत्येक घटनेतून बोध घेऊन शिकावे, प्रत्यक्ष मार्गावर चालताना मिळालेले शिक्षण व्यक्तीस अनुभव समृद्ध करत असते.
अभ्यासाने महाराजांचा मेंदू वज्रासारखा कठीण बनवला. आता आशा ‘स्वराज्य’ निर्मितीची होती.
स्वराज्य निर्मितीचा दृढ निश्चय व उदय – Shivaji Maharaj
अमुर्त विचार, संकल्पना तेव्हाच मूर्त स्वरूप घेतात. जेव्हा ती संकल्पना विचार वास्तवात साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
स्वराज्याच्या अमुर्त संकल्पनेला मुर्त स्वरूप देणे आवश्यक होते. म्हणूनच शहाजीराजे बंगरूळच्या जहागिरीवर जाण्याअगोद पत्नी जिजाऊसाहेब व शिवाजीराजे यांना पुण्यातील जहागिरीवर ठेवण्यात आले. तसेच शहाजीराजांच्या विश्वासातील मलठढणचे कुलकर्णी दादोजी कोंडदेव, कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार होते. यांनाही पुणे परगण्याची व्यवस्था पाहण्यासाठी नेमणूक केली. याचबरोबर अनेक विश्वासू माणसांची नेमणूक करण्यात आली.
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Concept of Swarajya & Politics of Shivaji Maharaj
एक तेजस्वी बालक व मातोश्री जिजाऊ पुण्यामध्ये आल्या संपूर्ण लवाजमा पुण्यात पोहोचला. संपूर्ण ओस पडले होते.. सगळीकडे गवत, झाडेझुडपे वाढलेली घरांची पडझड झालेली. गावात यवनांच्या भीतिमुळे लोक राहत नव्हते. संपूर्ण जमीन ओस पडली होती. कोल्हे, लांडगे हिंस्त्र श्वापद यांचा नेहमी धोका होता. आदिलशाही सरदाराने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. आदिलशहाच्या आक्रमणवेळी गणरायाच्या मंदिराचा पार विध्वंस झाला होता. तोच गणराय स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवणार होता. त्याची पुर्नप्रतिष्ठापना जिजाऊंनी केली. श्रीगणेश हा मुळ पुरुष असल्याने जगातील सर्वच उत्तम कर्तृत्वाचा शुभारंभ तोच आहे. म्हणून उत्तम कार्याच्या आरंभी त्याचे नमन केल्याशिवाय शहाणा व्यक्ती आपल्या कार्याला सुरूवात करीत नाही.
या सृष्टीचे उगमस्तान श्रीगणेश आहे. स्वराज्य स्थापनेला गणरायाचा आशिर्वाद आहे. ‘हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात खूप आहे.’ ही साद रयतेच्या व शिवाजीराजेंच्या स्वराज्याच्या कार्यात उतरावायची होती. कारण मातोश्री जिजाऊसाहेबांना आपलं राज्य निर्माण करवायचे होते. यावेळी शिवाजीराजेंच्या नावानं राज्य कारभार सुरू झाला होता. प्रत्येक निवाडा व आज्ञापत्रावर महाराजांच्या राजमुद्रेचा ठसा उमटू लागला.
‘प्रतिपंच्चंद्रलेखे व वर्धिष्णुविश्ववंदिता शाहसूनोः शिवस्यैषा ।। मुद्रा भद्राय राज ते ।।
अर्थात : प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाकडून वंदित झालेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा कल्याणार्थ विराजत आहे.
राजाला आपल्या प्रजेचे पालन व संरक्षण करण्यासाठी अनेक आज्ञा घ्याव्या लागतात राजाने आपल्या राजमुद्रेचा ठसा आज्ञापत्रावर उमटवून त्या पारित कराव्यात. त्यातूनच प्रजेला आपल्या राजाचे आदेश कळत असतात. ‘राजमुद्रा’ ही राजाची व राज्याची ओळख असते. ती राजाची व राज्याचे सार्वभौमत्वाचे चिन्हा व अस्मिता असते. राजा आपले व्यवहार ‘राजमुद्रा’ धारण करून करत असतो.
ओसाड पुण्यावर आदिलशाही फौजेने गाढवाचा नांगर फिरवला होता. आता पुन्हा पुण्याची नवीन उभारणी करायची होती. लोकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेबांनी क्रांतीकारक निर्णय घेतला. पुण्यात लोकांनी राहायला यावे यासाठी जमिनीत सोनियाचा नांगर लावून जमिनी नांगरली.
जेव्हा शत्रुकडून आपल्या देशाचे नुकसान होईल तेव्हा पुन्हा तो देश वसवणे गरजेचे असते. ज्या गावांची वस्ती नाहीशी झाली आहे किंवा नवीन ठिकाणी सोयीच्या जागी वस्ती वसवावी तसेच गावाचे सरंक्षण करण्यासाठी तट, दरवाजे बांधावेत मुख्य ठिकाणी सैनिकाचे
पहारे ठेवावेत. गावात नवीन लोक आणावेत त्यांना जमिनी द्याव्यात तसेच विशेष सोयी सुविधा पुरवून त्यांचे पालन पोषण करावे हिंस्थ पशुपासून रयतेचे संरक्षण करावे. अशा उपद्रवी पशुंच्या शिकारीसाठी बक्षिसी योजना ठेवाव्यात. अशा प्रकारच्या अनेक योजना राबवून प्रामुख्याने आपल्या देशाची स्थिती उत्तम ठेवावी.
या प्रकारच्या अनेक योजना राबवून मातोश्री जिजाऊसाहेबांनी व दादोजी कोंडदेव यांनी संपूर्ण पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था उत्तम लावली.
तसेच अनेक नवीन गावे वसवली. संकटप्रसंगी ही गावे एकमेकांना मदत करतील अशी योजना करण्यात आली. राजनीति आणि प्रशासन व्यवस्थेचे शिक्षण महाराजांना दिलें. एका महान योद्ध्याच्या रुपात महाराजांना उभारी येत होती.
शिवाजीराजांचा दहाव्या वर्षी सईबाईंशी विवाह झाला. महाराज विवाहबद्ध झाले.
नंतर काही दिवसांनी शहाजी राजांनी जिजाऊंना व शिवाजीराजांना बंगरुळला बोलावले. बंगरुळास शहाजी राजांनी शिवाजीराजांना स्वतंत्र ध्वज दिला. याचबरोबर स्वतंत्र पेशवा, सरनौबत, डबीर, सबनीस, मुजुमदार अशा विश्वासातील मुसद्दी लोकांनी शिवाजी राजांना सोबती दिल्या व स्वराज्य निर्माण धोरणास पृष्टी दिली.
जिजाऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या जिदद् आणि संघर्षाच्या जोरावर शेवणार होती स्वराज्याची मुहूर्तमेढ, न्यायाची प्रतिष्ठापना होणार होती.
स्वतंत्र्य राज्याला स्वतंत्र ध्वज मिळाला होता. ध्वजाचा रंग केसरी होता. हाच भगवा रंग संपूर्ण हिंदूची एकजूट करू शकत होता. केसरी रंग हिंदूच्या त्यागाचे व बलिदानाचे प्रतिक होता. शौर्याचे अधिष्ठान त्याला लाभले होते.
राज्याची ओळख राज्याचा ध्वज असतो. प्रत्येक राज्याला ध्वज आवश्यक असतो कारण ध्वज राज्याच्या स्वतंत्रतेच मानचिन्ह असतो. तसेच विजयाचे प्रतिक म्हणून ध्वज फडकावला जातो. सैन्याची विजयी
निशाणी ध्वज यावरून तेथील सत्तेची माहिती समजते.
स्वराज्याचा हुंकार या भारत वर्षात उमटणार होता. महाराजांच्या कपाळावर केशरी गंध कोरलेला होता. गंध है सज्जनता व साधुत्व यांचे प्रतिक असते. हिंदू धर्मनिष्ठ होते म्हणून कपाळावर केशरी रंग होता. केशरी रंग तेजाचे, शौर्याचे, त्यागाचे प्रतिक होता. केशरी रंगातला अर्धचंद्र तेजस्विता व शितलता यांचे प्रतिक होता. महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळा होती ती तुळजाभवानीच्या भक्तीचे प्रतिक व स्त्रित्वाचा सन्मान होता. ही माळ महाराज नेहमी आपल्या गळ्यात परिधान करायचे.
यवनी मुसलमानांच्या विरोधात संतांनी विद्रोह सुरू केला होता. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या किर्तनातून जनजागृती सुरू केली होती.
समर्थ रामदासस्वामी यांनी प्रत्येक गावामध्ये मारुतींची स्थापना केली. गावातील तरुणांनी मारुतीपासून प्रेरणा घ्यावी. मारुतीसारखे बलदंड शरीर प्राप्त करावे. व यवनांविरोधी उठाव करण्यास उद्युक्त करत होते. व म्हणत होते.
वन्हि तो चेतवावारे । चेतवीतांचि चेततो ।
केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे ।।
अशा पद्धतीने तरुणांना व समाजाला संतमंडळी जागृत करीत होती.
स्वराज्याचे काम नेटाने चालू होते. संपूर्श पुण्याच्या जहागिरीचा व्यवस्था लावणे गरजेचे होते. त्यासाठी संपूर्ण बारा मावळ संघटित करून त्यांना स्वराज्य कार्याशी जोडणे आवश्यक होते. हे कार्य दादोजी कोंडदेव यांनी साम, दाम, दंड भेद हे उपाय योजून पूर्ण केले.
स्वराज्यात न्यायाच्या दृष्टीने योग्य न्यायनिवाडे होऊ लागले. त्यामुळे संपूर्ण प्रजा संतुष्ट झाली. महाराजांबद्दल आत्मविश्वास, आपुलकीची भावना वाढीस लागली त्यांचा सर्वत्र आदर होऊ लागला.
शिवरायांनी आपल्या कार्याचा आरंभ व कार्याचा उद्देश सर्वांना समजावा म्हणून रायरेश्वराच्या मंदिरात शंभूमहादेवास साक्षी ठेवून शपथ घेतली. स्वराज्याच्या कार्यास जीवनभर प्रतिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
स्वराज्याची प्रतिष्ठापना करण्याचा मार्ग स्वतः महाराजांनी निवडला होता. महाराजांनी किल्ले घेण्यास सुरूवात केली. किल्ले घेणे म्हणजे उघड आदिलशाही विरोधात शत्रुत्व पत्करणे.
स्वराज्य निर्माण करायचे होते त्यासाठी संकट स्विकारावे लागणार होते. यावेळी आदिलशहाची कर्नाटकात मोहिम सुरू होती. त्यामुळे संपूर्ण फौजफाटा तिकडे गुंतला होता. व स्वतः आदिलशहा आजारी पडला होता. या दोन संधीचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी जहागिरीतील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले व राजगड बांधला त्यावर स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन झाली.
महाराजांच्या विद्रोहाच्या बातम्या आदिलशहास जात होत्या. स्वराज्याचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी गडकोट स्वतःच्या ताब्यात घेणे म्हणजे उघड उघड आदिलशाहीविरुद्ध शत्रूत्व पत्करणे कारण स्वराज्याचा विस्तार आदिलशाही प्रदेशात होत होता. आदिलशहाच्या दृष्टीने महाराजांचे त्याच्याविरुद्ध बंड होते.
कर्नाटक मोहिमेत शहाजी राजांनी नायकांची राज्ये न बुडविता त्यांना अभय दिले. त्यामुळे नायक शहाजीराजांना अनुकूल झाले. ही गोष्ट शहाजीराजांच्या विरोधी पक्षास मान्य झाली नाही. शहाजीराजांना नेहमी विरोध करणारे मुस्तफखान, अफजलखान, बाजी घोरपडे यांनी आदिलशहाचे शहाजीराजांविरुद्ध कान भरवले व शहास अनुकूल केले. मुस्तफाखानाने शहाजीस अटक करण्याची परवानगी मिळवली.
आदिलशहाचे कर्नाटकात लक्ष होते. याचा फायदा महाराजांनी घेतला व कोंढाणा जिंकून घेतला कोंढाणा जिंकल्यामुळे आदिलशहा हा गड घेण्यासाठी नक्की कोणा तरी सरदाराची नेमणूक करील हे निश्चित होते.
मुस्तफाखानाने व बाजी घोरपडे यांनी शहाजीराजांचा विश्वास संपादून एका रात्री अकस्मात हल्ला करून कैद केले. याची बातमी ही महाराजांना मिळाली. महाराजांना साहजिकच शहाजी राजेची चिंता ही निर्माण झाली.
महाराजांना गुप्तहेरामार्फत आदिल शहाच्या बातम्या मिळत होत्या. महाराजांनी जिंकलेला कोंढाणा परत मिळवण्यासाठी आदिलशहाने फतेहखानाची नेमणूक केली. याच्या मोहिमेची वार्ता हेरामार्फत मिळत एखाद्या कसलेल्या योद्धद्याप्रमाणे अचूक लष्करी व्युहरचना महाराजांनी तयार केली. फतेहखानास स्वराज्याच्या बाहेर रोखूनच त्याचा धुव्वा उडवायचा होता. या संभाव्य योजनेबद्दल महाराज विचार करत होते. राजा कोणत्या नीतीचा अवलंब करील यावर त्याचे बळ वाढत असते. राज्याचा विस्तार होत असतो. महाराजांच्या डावपेचांचा उलगडा पुढील प्रकरणात…..
स्वराज्याच्या विस्तारातील राजनीति
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Politics of Shivaji Maharaj
शिवाजी महाराजांच्या Shivaji Maharaj जीवनातील पहिले लष्करी चक्रव्यूह होते. त्यांचे नायकत्व या फतेखाना विरुद्ध सिद्ध होणार होते. फतेखानाला पराभूत करून आपल्या सैन्यामध्ये उत्साह संचार करून विश्वास निर्माण होणार होता. आपणही शत्रूच्या सैन्याच्या पराभव करू शकतो ही भावना पसरवायची होती. त्यासाठी अचूक योजना तयार करून हे युद्ध जिंकणे आवश्यक होते.
महाराजांच्या या पहिल्याच लष्करी अभियानामध्ये ते असफल झाले असते तर महाराजांच्या सेनानायकत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. सेनेने कशापद्धतीने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. म्हणून पहिल्या युद्धात विजय मिळवून दैन्यात विश्वास निर्माण करायचा होता.
फतेहखान स्वराज्याकडे येण्याच्या अगोदर महाराजांनी आपली व्युहरचना तयार केली. त्यानुसार तुरंत त्याची अंमल बजावणी केली. योजनेनुसार महाराजांनी शिरवळचे सुभानमंगळगड आपल्या ताब्यात घेतला. फतेखानाविरुद्ध संपूर्ण मोहिम पुरंदरवरून चालणार होती. महाराजांच्या मोहिमेची सुत्र पुरंदर या केंद्रावरून हालणार हे महाराजांनी निश्चित केले होते. ते पण पुरंदर निळकंठ सरनाईक यांच्या ताब्यात होता. महाराजांनी उत्कृष्ठ पद्धतीने भेद करून पुरंदरवर स्वतःचा ताबा घेतला. महाराज ससैन्य पुरंदर वर थांबले. महाराज पुरंदर वर थांबल्यामुळे फतेहखान स्वराज्यात घुसणार नव्हता. साहजिकच महाराजांवर लक्ष ठेवून पुरंदरच्या टापूत लष्करी छावणी टाकणार होता. व आपल्या सैन्याचा जोश वाढवण्यासाठी महाराजांनी जिंकून
घेतलेला सुभान मंगळ कोट आपले सैन्य पाठवून जिंकून घेणार होता. हा अचूक अंदाज महाराजांनी बांधला होता. हेच महाराजांच्या योजनेचे प्रथम चरण होते. यानुसारच फतेहखान महाराज पुरंदवर गडावर आहेत म्हटल्यावर तेथून जवळच जेजुरीच्या नजदीक बेलसर येथे लष्कराची छावणी टाकली व काही सैन्य सुभान मंगळ गड घेण्यासाठी पाठवले. सुभान मंगळगड जिंकून घेतला.
महाराजांच्या गृहीत अंदाजानुसार सर्व काही घडले होते. आता योजनेचा मुख्य डाव योजने सुरू झाले. सुभान मंगळ आपल्या हातून गेला यामुळे सैन्यामद्ये साहजिकच निराशा पसरली.
राजनीतिमध्ये सर्वात महत्त्वाची नैतिकता असते. राजा नैतिकतेच्या साह्याने प्रजेवर आपल्या सैन्यावर प्रभाव टाकू शकतो. त्यांचा विश्वास मिळवू शकतो. राजाच्या अथवा सेनानायकाच्या नैतिकतेवरून सैन्य अथवा प्रजा त्याच्याशी प्रतिबद्ध राहते. संकट समयी राजा नैतिक नियमाचे जाळे फेकून आपल्या सेनेकडून अथवा जनांकडून वाटेल ते करून घेऊ शकतो. प्रजा, सेना आपले जीवन आपल्या राजावर ओवाळून टाकण्यास तयार असतात.
युद्धनीति म्हणते एक उत्कृष्ट सेनानायक तोच तो आपल्या सैन्याला आपलेच उदाहरण देऊन त्यांचे नेतृत्व करतो व त्यांचा उत्साह वाढवतो.
यावेळी महाराजांनी आपल्या सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये वीररस वृत्तीचा उत्साह जागृत करण्यासाठी शहाजीराजांवर आदिलशहाने केलेले अन्याय, रयतेवरील अन्याय याची माहिती देऊन जोरदार भाषण दिले. व सैन्यामद्ये उत्साह निर्माण केला.
महाराजांच्या मुख्य योजनेनुसार पुन्हा सुभानमंगळवर हल्ला करून तो ताब्यात घेणे. सुभान मंगळाची पराभवाची बातमी कळण्याअगोदर एका तुकडीचा हल्ला फतेहखानाच्या छावणीवर करून माघारी घेणे, जेव्हा सुभान मंगळच्या पराभावाची बातमी फतेहखानास कळेल. तेव्हा सुभानमंगळ चा पराभव व लष्करी तळावर झालेला हल्ला यामुळे फतेहखान चिडेल व थेट पुरंद्रावर हल्ला करणार यानुसार
महाराजांनी पुरंदरवर संपूर्ण तयारी केली होती. महाराजांनी तयारी कलेली व्युहरचना अतिशय योग्य होती. महाराजांच्या पहिल्याच व्युहरचनेवरून त्यांच्या असामान्य असणाऱ्या सेनापतीची व एका योद्धद्याची भविष्यातील झेपेची कल्पना येत होती.
महाराजांच्या उत्साहपूर्ण भाषणामुळे सैनिकांमध्ये उत्साह संचारला. महाराजांनी आपल्या योजनेनुसार सुभानमंगळ गड घेण्यास सैन्यदल पाठवले. जोरदार रणसंग्राम झाला. सुभाषन मंगळ मराठ्यांनी जिंकला. इकडे महाराजांनी अकस्मात हल्ला करण्यासाठी एक तुकडी फतेहखानावर पाठवली. छावणीवर मराठ्यांच्या जोरदार हल्ला झाला. फतेहखानाने तो परतावून लावला. याचवेळी सुभानमंगळच्या पराभवाची बातमी फतेहखानास समजली आणि त्याच्या बुद्धीवरील संयम सुटला. महाराजांनी जो लष्करी अंदाज बांधला तो खरा झाला. आणि फतेहखानाने चिडून पुरंदर गडावर हल्ला कला. महाराजांनी आपले लष्करी बळ मोजले असल्यामुळे त्याचा अंदाज फतेहखानास येऊ दिला नव्हता. त्यानुसारच महाराजांनी त्यांना सहाय्यर्थ म्हणून पुरंदरगडाची निवड केली. व उत्कृष्ट व्युहानुसार फतेहखानास पुरंदराकडे खेचून आणले. पुरंदरावरील झालेल्या युद्धात फतेहखानाचा जोरदार पराभव केला. फतेहखानाचे कित्येक मातब्बदार सरदार
मृत्युमुखी पडले. फतेहखान एक मोठा सरदार होता. मोठा योद्धा होता. मात्र महाराजांच्या युद्धनीतिच्या व्युहात पूर्णपणे अडकला. फतेहखानाचा पराभव करून महाराजांनी स्वराज्यावर आलेले पहिले संकट दूर केले व मोहिम यशस्वी केली.
या मोहिमेत सेनापती बाजी पासलकर यांचे बलिदान पडले. कोणतेही मोठे कार्य बलिदान मागतात. स्वराज्याचा यज्ञ पेटवला होता. या यज्ञामध्ये कित्येक आहुती पडणार होत्या. बाजी पासलकर यांच्या बलिदानाने स्वराज्याचा रणयज्ञ धगधगत पेट धरू लागला.
शहाजीराजांना मुस्तफाखानाने कपटाने कैद केले. लवकरच आदिलशहा त्यांना ठार मारणार होता, या अगोदर हालचाल करणे
गरजेचे होते. महाराजांनी एक मुत्सद्दी डावपेच खेळला. महाराज आपल्या सैन्यानिशी शहाजीराजांना कैदेतून सोडवू शकले नसते तेवढे सैन्यबळ महाराजांजवळ नव्हते. अशा परिस्थितीत राजनिती म्हणते शत्रूहून बलाढ्य जो असेल त्याच्याकडून मदत घ्यावी. त्याला मित्र करून त्याच्याकडून आपला कार्यभाग साधावा.
आदिलशहापेक्षा मोगल बलाढ्य होते. यावेळी दख्खनचा सुभेदार मुरादबक्ष होता. महाराजांनी मोगलांशी चाकरी स्वीकारण्याची तयारी दाखवली व मुरादबक्षमार्फत आदिलशाहींवर शहाजीराजांच्या सुटकेसाठी
दबाव आणला. असा दबाव आदिलशहावर निर्माण झाल्यामुळे त्याने शहाजीराजांना सन्मानाने सोडले. त्याबदल्यात महाराजांनी जिंकेला कोंढाणा परत घ्यावा लागला. शिवाजीराजे राजनीतिमधील मुत्सद्दी डावपेच योजण्यास तयार झाले होते.
शहाजीराजांची सुटका झाल्यानांतर महाराजांनी आपले लक्ष जावळी वर केंद्रीत केले. महाराजांच्या साहाय्याने ‘चंद्रराव मोरे’ जावळीच्या गादीवर बसला होता. त्याच्या ताब्यात जावळी येताच स्वराज्याविरुद्ध कारवाया सुरू केल्या महाराजांचा गुन्हेगार रंगो त्रिमल वाकडे यास आश्रय दिला. तसेच गुंजणमावळवर आपला हक सांगितला. महाराजांनी याचा जाब विचारला पण मोऱ्यांनी उर्मट जबाव दिला. महाराजांनी जावळी स्वराज्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. जावळीचा संपूर्ण प्रदेश आदिलशहाचा होता. यावेळी आदिलशहा खूप आजारी होता. व त्याचे प्रमुख सरदार कर्नाटकातील युद्धात गुंतल्यामुळे आदिलशाहीकडून विरोध होण्याची शक्यता नव्हती.
जावळी स्वराज्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा प्रांत होता. कितीही मोठा शत्रू स्वराज्यावर चालून आल्यास त्यास जावळी जिंकणे अशक्य होते. शत्रूच्या लष्करी हालचालीच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल होता. स्वराज्याचे बळ वाढवायचे असल्यास जावळीसारखा प्रांत ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यासाठी जावळीतून चंद्रराव मोऱ्यांचे कायमचे उच्चाटन गरजेचे होते.
राजनीतिचा नियम म्हणतो, आपले कार्य देशहितार्थ असेल व या कार्यात स्वकीय, आप्त ही मंडळी अडचण, अडसर ठरत असतील तर त्यांचे कायमचे उच्चाटन करावे. त्यांचा मृत्यू घडवून आणावा.
महाराजांनी जावळीवर हल्ला केला. थोड्याच अवधीत संपूर्ण जावळी आपल्या ताब्यात घेतली. चंद्रराव मोऱ्यांचे कायमचे उच्चाटन केले. स्वराज्य सुरक्षित व बलवान केले.
पुन्हा दख्कनमधून दुःखद बातमी आली. कनकगिरच्या वेढ्यात संभाजीराजे मारले गेले. अफजखानाने विश्वासघात करून मारले होते. अफजलखान हा कपटी होता. मातोश्री जिजाऊंच्या काळजात सुडाची आग पेटली होती.
महाराजांनी जावळी जिंकल्यावर तेथील दुर्गम भोरप्या डोंगरावर दुर्ग उभा करण्याची आज्ञा दिली. कोणत्याही राजाने आपल्या राज्यातील नैसर्गिक भूरचनेचे फायदे घेऊन घेऊन युद्धाला उपयोगी पडतील अशा किल्ल्यांची उभारणी केली पाहिजे. ज्या प्रदेशात किल्ला उभा केला आहे. त्यामुळे त्या प्रदेशाचे संरक्षण होते. किंवा राजावर एखादे संकट आले असता अशा दुर्गम जंगलातील किल्ल्यांचा आश्रय घेता येतो. अशाच पद्धतीने सर्व गोष्टींचा विचार करून ‘प्रतापगडाचे बांधकाम महाराजांनी सुरू केले.
यानंतर थोड्याच अवधीत दुसरा घराभेदा आप्त सुप्याचे संभाजी मोहिते यांना कैद करून शहाजीराजांकडे पाठवले. स्वराज्यात सर्वांना समान न्याय होता.
महाराजांचे आठ विवाह झाले होते. विवाह करण्याचा हेतू मोठी सरदार घराणी स्वराज्याशी जोडावीत व स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग होणार होता.
महाराजांना आपल्या गुप्तहेरामार्फत बातम्या मिळत होत्या. मुहम्मद आदिलशहा अत्यंत आजारी होता. तो नक्की मृत्यू पावणार अशा बातम्या महाराजांना मिळाल्या. याचा फायदा घेऊन महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील उत्तर कोकण जिंकून घेतले. यानंतर इकडे विजारपूरला आदिलशहा मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर अली
आदिलशहा झाला. अली हा अनौरस असल्यामुळे दरबारात दोन गट पडले. अली आदीलशहा योग्य नाही. हा गट दख्खनच्या मोगली सुभेदार औरंगजेबाने उचलून धरला व आदिलशाही विरुद्ध युद्ध पुकारले. बीदरचा किल्ला जिंकून घेतला.
महाराजांनी धूर्तपणे याचा फायदा घेतला. महाराजांनी सोनोपंताना पत्र घेऊन औरंगजेबाकडे पाठवले, ‘मी विजापुरचा मुलुख व किल्ले घेतले आहेत. व सध्या जिंकलेला उत्तर कोकणच्या प्रदेशास औरंगजेबाने मान्यता घ्यावी.”
महाराज औरंगजेबाची मान्यता घेऊन तात्पुरती मैत्री जोडून मोगल सरहद्दीवरील प्रांत बेसावध करत होते. महाराजांनी जिंकलेला प्रदेश हा आदिलशहाचा होता त्यामुळे त्याला अडचण काहीही नव्हती. औरंगजेब त्याला नक्की मान्यता देणार हे महाराज जाणून होते. औरंगजेबाचे संपूर्ण लक्ष आदिलशाहीवर होते. महाराजांनी केलेल्या मागणीला औरंगजेबाने मान्यता दिली.
महाराजांना मोगलांना बेसावध ठेवून जो फायदा मिळवायचा होता. तो फायदा मिळवला व मैत्रीच्या धोरणानंतर अवघ्या सातच दिवसात महाराजांनी जुन्नर लुटले. श्रीगोंदा, नगरपर्यंतचा मुलुख महाराजांनी लुटून काढला. महाराजांनी अतिशय धुर्तपणे मोगली प्रदेश लुटून काढला. यामुळे औरंगजेब वैतागला मोगली सरहद्दीवर अनेक सरदार नेमले.
दिल्लीच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला. शहाजहान आजारी पडला. त्यामुळे औरंगजेबाचे लक्ष दिल्लीवर लागले. व तो उत्तरेकडे कूच करण्यास निघाला. यावेळी महाराजांनी नासीरखानच्या माध्यमातून औरंगजेबाशी बोलणी केली.
रघुनाथपंताबरोबर पत्र पाठवून झालेल्या घटनेबद्दल दुःख व पश्चात्ताप व्यक्त केला.
आदिलशाहीविरुद्ध महाराजांनी आक्रमक धोरण स्विकारले महाराजांनी अनेक किल्ले जिंकून घेतले. तुंग-तिकोना, लोहगड, विसापूर, प्रबळगड, सरसगड इत्यादी गड स्वराज्यांत दाखल झाले.
राजमाची ही घेतला महाराजांचे सिद्धयाबरोबर ही मोठ्या प्रमाणात युद्ध झाले. सिद्धयांनी पुन्हा तह केला. महाराजांना कोकण जर सुरक्षित ठेवायचा असेल तर आरमार प्रबळ असणे सत्ता याचे भाग होते. ज्याचे आरमार बलाढ्य त्याच्या हाती समुद्राची महत्त्व महाराजांना कळले. स्वतः नवीन आरमार उभे केली. पोर्तुगीज तंत्रज्ञांच्या साह्याने शत्रूच्या तोडीचे होती. दख्खनमधून उत्तरेकडे गेला होता. विजापूरावरील जोरदार आक्रमण चालू होते. स्वराज्याचा
करण्यास सुरवात आरमार बांधणी चालू औरंगजेब संकट टळले होते. महाराजांचे विस्तार चालू होता. महाराजांच्या स्वरूपात आदिलशहाला आव्हान मिळत होते . महाराजांचा कायमचा निकाल लावण्यासाठी विजापूरच्या दरबारात प्रचंड मोहिमेची तयारी चालू होती. विश्वाच्या इतिहासातील सर्वांत मोठे कुटील युद्ध, ज्या कुटनीतीने खेळले गेले .
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.