कथा | खरी सुंदरता | व्हायला गेला राजा | सफरचंद आणि हिरू | Marathi Story

खरी सुंदरता, व्हायला गेला राजा, सफरचंद आणि हिरू, कथा

आपल्यासाठी कथा – Marathi Story खरी सुंदरता, व्हायला गेला राजा, सफरचंद आणि हिरू हा विशेष ब्लॉग तयार केला गेला आहे, ज्यात आपल्या भेटीला मराठीतून अनेक रोमांचक कथा आणि किस्से वाचायला मिळतील. या ब्लॉगमध्ये, आपल्याला भेटायला येणार असलेल्या प्रत्येक कथेत आपण खरी सुंदर विश्वातल्या चारित्रिकांची आणि अनगिण्य अनुभवांची सहमती करू शकता. त्याच्याबरोबर, हे ब्लॉग आपल्याला सफरचंद, हिरू, व्हायला गेला राजा, आणि इतर साहित्यिक गोष्टी अनुभवायला मदत करेल. आपले स्वागत आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपल्याला हे कथा संदर्भ आवडेल!


खरी सुंदरता

real beauty story

ही फार-फार जुनी गोष्ट आहे. कित्येक वर्षे झालीत त्याला.

एक भले मोठे जंगल होते. हे जंगल उंच शिखर असलेल्या एका पर्वताच्या पायथ्याशी होते. जंगलात दाट झाडी होती. जिकडे-तिकडे उगवले होते. भयानक जंगल होते ते.

हिरवेगार गवत या जंगलात निरनिराळे प्राणी वास्तव्य करून होते. भाकड, हरीण, कोल्हा, लांडगा, मोर, वाघ, मेंढी इत्यादी जनावरे जंगलात होती. ही सर्व गुण्यागोविंदाने रहात होती. कुणी कुणाच्या वाटेला जात नव्हते.

एकदा काय झाले… त्याची ही गोष्ट.

नुकताच पावसाळा संपलेला होता. त्यामुळे सारे जंगल हिरव्या रंगाने न्हाऊन निघालेले होते. सर्वत्र टवटवीतपणा दिसत होता. वातावरणात थंड हवेची झुळुक वहात होती. सूर्याची किरणे धरतीवर नुकतीच उतरलेली होती. सारे प्राणी आपल्या घरट्यात उठून बसले होते.

त्याच वेळी जंगलात एक आवाज घुमू लागला. जंगलचे प्राणी तो आवाज ऐकून सावध झाले. त्यांनी आपले कान टवकारले. जो तो आवाज ऐकू लागला.

“जंगलच्या प्राण्यांनो, ऐका! उद्या तुम्ही सर्वांनी पर्वतातून वाहणाऱ्या नदीच्या किनारी एकत्र जमावे. तेथे तुमची सौंदर्यस्पर्धा घेण्यात येईल. या जंगलातील सर्वांत सुंदर प्राण्याची निवड करण्यात येईल….”

हा आवाज देवदूताचा होता. सर्व प्राण्यांना देवदूत दिसत होता, परंतु त्याचे सांगणे संपल्यावर तो अदृश्य झाला.

साऱ्या जंगलात खळबळ उडाली. प्रत्येक प्राणी आपला स्वतःचा विचार करू लागला. आपण सुंदर आहोत का, याचा विचार त्यांच्या मनात
घोळू लागला. देवदूताचा आवाज ऐकून प्राण्यांमध्ये मंथन सुरू झाले. माकडाने नदीच्या किनारी जाण्याची तयारी सुरू केली. तो *

ANIMALS IN JUNGLE

आरश्यापुढे उभा राहिला. आरश्यात त्याने चेहरा पाहिला. डोक्यावरील केस सावरले. स्वतःशीच म्हणाला, “माझ्याशिवाय जंगलात कोण सुंदर असू शकेल ? मीच सुंदर !” असे बोलून त्याने टुणकन् उडी मारली.

माकड उड्या मारीत सभास्थानाकडे जाऊ लागले.

रस्त्यात एका झाडाखाली एक म्हातारी बसलेली होती. ती थंडीने कुंडकुडत होती. तिच्या अंगावर फाटके कपडे होते. तिने माकडाला ती त्याला

पाहिले.

म्हणाली, ” माकडा माकडा, माझ्याजवळ थांब. मला थंडी वाजत आहे. थंडीपासून माझे रक्षण कर.”

“मला वेळ नाही. जंगलात सुंदर प्राण्यांची निवड होणार आहे, तिथे मला जायचे आहे. तुझ्याजवळ थांबलो तर मला उशीर होईल.” माकड इतके बोलून चालते झाले.

त्यानंतर त्या रस्त्याने कोल्हा आला. म्हातारीने त्याला हटकले. म्हटले, “कोल्होबा, माझ्याजवळ थांब. मला थंडी वाजत आहे. माझे थंडीपासून रक्षण कर.” परंतु कोल्ह्याने म्हातारीच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. तो आपल्या तोऱ्यातच पुढे चालता झाला.

कोल्ह्याच्या मागोमाग मोर आला. मोर ठेक्यात चालत होता. म्हातारी त्यालाही बोलली. परंतु मोर तिला म्हणाला, ” मला जाण्याची घाई आहे. माझ्या सुंदरतेची आज परीक्षा आहे. बोल, मी सुंदर ठरणार ना ?”

” हो बाबा, हो. पण माझे थंडीपासून रक्षण कर.” म्हातारीने विनवले.

मोर मात्र त्यावर काही न बोलता मुकाट्याने निघून गेला.

त्यानंतर हरीण आले. म्हातारीने त्यालाही सांगितले; परंतु हरीण म्हणाले, “तुझ्याजवळ थांबल्याने मला विलंब होईल. मला सौंदर्यस्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे. माझ्याइतके सुंदर शरीर कुणाचेच नाही; त्यामुळे
माझी निवड होणार ! नाही का ?”

“हो बाबा, हो. पण मला मदत कर.” – म्हातारी.

परंतु हरिणाने छलांग मारली आणि ते निघून गेले.

त्यानंतर त्या रस्त्याने लांडगा आला. म्हातारीने त्यास हाक मारून थांबविले. लांडगा तिला म्हणाला, “का बोलविलेस मला? लवकर सांग मला वेळ नाही.”

म्हातारीने आपले म्हणणे सांगितले. त्यावर लांडगा उत्तरला, “तुला थंडी वाजते, तर मी काय करू? मला सभेला जायचे आहे. मी निघालो.”

असे अनेक प्राणी त्या रस्त्याने गेले. म्हातारीने प्रत्येकाला सांगितले, परंतु कुणीच म्हातारीला मदत केली नाही. तिच्याबद्दल सहानुभूती दाखविली नाही.
काही वेळाने त्याच रस्त्याने एक मेंढी खाली मान घालून जात होती. ती देखील नदीकिनारी सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी जायला निघाली

होती. म्हातारीने मेंढीस हाक मारली. मेंढी म्हातारीजवळ आली. म्हणाली, “काय म्हणतेस ?”

“मी थंडीने बेजार झाले आहे. माझ्याजवळ ये. थंडीपासून माझे रक्षण कर.”

मेंढी उत्तरली, “तू चिंता करू नकोस, मी तुझ्याजवळ थांबते. तू माझ्या पाठीवर बस. माझ्या पाठीने तुला ऊब मिळेल. तुला मुळीच त्रास

वाटणार नाही.”

म्हातारी मेंढीच्या पाठीवर बसली.

दिवस मावळला. रात्र झाली. थंडी वाढू लागली. तसेच जंगलात हिंसक पशुंचा आवाज येऊ लागला. मेंढी म्हातारीला हिंमत देत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मेंढी आपल्या पाठीवर बसलेल्या म्हातारीसह नदीच्या किनारी पोहोचली. तेथे जंगलातील अनेक प्राणी जमलेले होते . ते मेंढीला पाहून हसले.

सभास्थानी पोहोचल्यावर म्हातारी त्वरेने मेंढीच्या पाठीवरून उतरली आणि मंचकावर जाऊन उभी राहिली. सर्व प्राण्यांचे डोळे विस्फारले. ते तिच्याकडे पाहू लागले. ती जेथे उभी होती तेथून देवदूताचा आवाज येऊ लागला

” जंगलातील सर्व उपस्थित प्राण्यांनो ! तुम्ही मोठ्या उत्सुकतेने सौंदर्यस्पर्धेचा निकाल ऐकण्यास येथे जमलेले आहात. तुम्ही प्रत्येकजण स्वतःला सुंदर समजत आहात, परंतु लक्षात ठेवा – मूल्य तर मनाच्या सुंदरतेचे होत असते. शरीर सुंदर असले तरी मन सुंदर असावयास पाहिजे. दया, क्षमा, करुणा, नम्रता यांसारख्या गुणांनी मन ओतप्रोत

भरलेले पहिजे. मी म्हातारी नसून देवदूत आहे.!” आणि त्या म्हातारीच्या जागी देवदूत प्रगट झाला.

सर्व प्राणी आश्चर्यचकित नजरेने पाहू लागले.

“मित्रांनो, तुम्ही ज्या मेंढीला हसलात, तीच खरी सुंदर आहे. तीच माझ्या परीक्षेत उतरली आहे. या भयंकर थंडीत तिने दुसऱ्याला मदत करण्याच्या जाणीवेने स्वतःला अर्पित केले. हीच खरी सुंदरता आहे. आजपासून मेंढीच्या शरीरावर सुंदर केस येतील. या केसांमुळे ऊब निर्माण होईल.” असे बोलून देवदूत अदृश्य झाला.

नंतर सर्व प्राणी खजील होऊन परतले. आज सुध्दा मेंढीच्या केसांपासून लोकरीचे कपडे बनवितात. त्या कपड्यांमुळे ऊब निर्माण होऊन थंडीपासून रक्षण होते.


व्हायला गेला राजा…!

Story of king

गुणानंद नावाचा एक राजा होता. तो फार दयाळू होता. एकदा तो आपल्या राज्याची पाहणी करीत चालला होता. एका ठिकाणी उकीरड्यावर लोळणारं एक गाढव त्याला दिसलं. त्या गाढवाची त्याला फार दया आली. त्यानं त्या गाढवाला आपल्या घोड्यांच्या तबेल्यात नेण्याची सेवकांना आज्ञा दिली. सेवकांनी गाढवाला घोड्यांच्या तबेल्यात नेले. मग राजाने त्या गाढवाला स्वच्छ धुण्याची आज्ञा दिली. राजाची आज्ञा ऐकताच तबेल्याचा प्रमुख तबेलदार धीटपणे राजास म्हणाला,

“महाराज, या गाढवाला धुऊन काय उपयोग ?”

तबेलदाराच्या प्रश्नावर किंचित रागावून राजाने विचारले,

“उपयोग नाही असं तुला का वाटतं ?”

शांतपणे तबेलदार उत्तरला,

“महाराज, गाढवाला कितीही धुऊन पुसून स्वच्छ केलं, तरी ते उकीरड्यावर लोळून घाण होणारच. उकीरड्यावर लोळणं हा त्याचा स्वभावधर्मच नाही का ?”

” मी या गाढवाचा घाणेरडा स्वभावधर्म बदलून टाकीन !”

राजाच्या आत्मविश्वासपूर्ण उद्‌गारावर गालातल्या गालात हसत तबेलदार म्हणाला,
महाराज, एखाद्या प्राण्याचा मूळ स्वभावधर्म बदलणं कसं शक्य आहे ?”

” मी ते शक्य करुन दाखवीन ! तू अधिक शंका कुशंका न काढता या गाढवाला शक्य तितक्या त्वरेने स्वच्छ करण्याची व्यवस्था कर.

” जशी आपली मर्जी ” म्हणत तबेलदाराने सेवकांकडून त्या गाढवाला सुगंधी साबण लावून स्वच्छ धुऊन घेतले. मग राजा म्हणाला, “ आता या गाढवाला कुठेही सोडू नका. घोड्यांच्या तबेल्यातच याची सर्व व्यवस्था करा.

राजाच्या आज्ञेनुसार सेवकांनी त्या गाढवाला घोड्यांच्या तबेल्यातच बांधून त्याच्या चारा पाण्याची सर्व व्यवस्था उत्तम केली.

दुसऱ्या दिवशी राजाने उत्सुकतेने त्या तबेल्यास भेट दिली, ते गाढव अगदी स्वच्छ दिसेल अशी राजाची कल्पना होती, पण प्रत्यक्षात पाहातो तर त्या गाढवाचे सर्वांग घाणीने बरबटलेले. ते पाहून राजाला फार राग आला. त्याने तबेलदारास बोलावून घेतले अणि दरडावून विचारले,

या गाढवाला कुठेही न सोडण्याची मी आज्ञा दिली • असताना तू याला घाणीत लोळण्यासाठीच सोडले होतंस की काय ?”

राजाच्या प्रश्नावर नम्रपणे तबेलदार म्हणाला, “महाराज, मी या गाढवाला कुठंही सोडलेलं नव्हतं. हवंतर कुणालाही विचारुन खात्री करुन घ्या !”

राजाने प्रत्येक सेवकाला विचारुन खात्री करुन घेतली तरी
त्याचे समाधान होईना. शंका घेत त्यानं तबेलदाराला विचारलं,

” गाढव जर कुठंही गेलेलं नव्हतं, तर मग याचं सर्वांग घाणीनं कसं बरबटलं ?”

राजाच्या शंकेचं निरसन करीत तबेलदार म्हणाला, महाराज, स्वतःच निर्माण केलेल्या घाणीत हे गाढव लोळून त्यानं स्वतःचं अंग घाणीत बरबटून घेतलं. शेवटी ते आपल्या गुणावर गेलं.

” मी याला घोड्याचा मान देईन ! मग याचा स्वभावधर्म नक्कीच बदलेल ! ” राजाच्या उद्‌गारावर तबेलदार नुसताच हसला. राजाला तो आपला अपमानच वाटला. तो अगदी इरेलाच पडला. लगेच त्याने गाढवाला स्वच्छ करुन मिरवणुकीच्या घोड्यासारखं सजविण्याची आज्ञा दिली. त्यानुसार सेवकांनी गाढवाला स्वच्छ धुऊन पुसून त्याच्या अंगावर घोड्याची झूल चढवली. गळ्यात मण्यांच्या माळा घातल्या. कपाळावर रंगीबेरंगी गोंडे लावले. राजाला खूप समाधान वाटले. आनंदाने तो गाढवावर बसला आणि सऱ्या नगरातून त्या गाढवावरुन स्वतःची मिरवणूक काढण्याची आज्ञा दिली.

त्या आज्ञेनुसार नगरातून राजाची मिरवणूक निघाली. राजाला हार घालण्यासाठी प्रजाजनांची झुंबड उडू लागली. त्या घाईगर्दीत काही हार गाढवाच्या गळ्यात पडू लागले. हार गळ्यात पडूलागताच ते गाढव अगदी हुरळून गेलं. आपणच राजा आहोत अशा भ्रमात लाथा झाडीत, मोठमोठ्याने ओरडत सैरावैरा उधळू लागलं. राजा गाढवावर अगदी बेसावधपणे बसलेला होता.
स्वतःला सावरता सावरता तो दलदलीने भरलेल्या एका खड्ड्यात कोसळला. त्याचे सर्वांग चिखलाने माखून निघाले. राजाची ती केविलवाणी अवस्था पाहून प्रजेचा त्या गाढवावरील संताप अनावर झाला. चार चपळ तरुणांनी त्या गाढवाला पकडून काठ्यांनी बदडतच राजापुढे हजर केले. इतक्यात राजाचा प्रधान आपली तलवार सरसावून पुढे आला आणि आवेशाने त्या गाढवाला ठार करणार इतक्यात राजा म्हणाला, “याला मृत्युदंडाइतकी कठोर सजा देऊ नका. माझ्यावर हा लाजिरवाणा प्रसंग ओढवला त्यात माझीही चूक आहेच.”

“कोणती ?”

या गाढवाची पात्रता नसतानाही मी याला घोड्याचा मान दिला ही चूक माझीच. त्याची सजा मला मिळालेलीच आहे.”
पण महाराज, घोड्याचा मान पेलण्याचीही पात्रता नसताना या गाढवानं राजाचा मान मिळण्याची अपेक्षा बाळगली. त्यामुळेच पुढील सर्व अनर्थ घडला. या त्याच्या अपराधासाठी गाढवाला कोणती सजा द्यायची ?”

प्रधानाच्या प्रश्नावर थोडा वेळ विचार करुन गंभीरपणे राजा उद्गारला,

या मूर्ख प्राण्याची पात्रता अवजड ओझी वाहण्याचीच आहे !

याला लोणाऱ्याच्या स्वाधीन करा म्हणजे तो याला योग्य ती सजा देईल !”

राजाच्या आज्ञेनुसार प्रधानाने त्या गाढवाला लोणाऱ्याच्य स्वाधीन केले. तेव्हापासून गाढव लोणाऱ्याकडे अवजड दगड वाहाण्याची सजा भोगत आहे. लोक म्हणू लागले, गेला राजा, पण मिळाली जन्मठेपेची सजा !”


सफरचंद आणि हिरू

hiraman parrot story

फार मोठे जंगल होते ते. त्या जंगलात अनेक प्रकारच्या पशु-पक्ष्यांचे वास्तव्य होते. ते जंगल म्हणजे एक मोठे नैसर्गिक प्राणी संग्रहालयच होते म्हणा ना !

हिरामण नावाचा एक पोपट त्या जंगलात राहात होता. त्या जंगलातील पंशु-पक्षी हिरामणला हिरू नावानेच संबोधीत. हिरू तसा हुशार होता. चाणाक्ष होता. त्याची सर्वांशी मैत्री होती. जंगलातील पशु- पक्षी त्याच्यावर प्रेम करायचे.

दररोज सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करून हिरू जंगलात भ्रमंतीसाठी बाहेर पडायचा. चारापाणी शोधायचा. अनेकांच्या भेटीगाठी घ्यायचा. आकाशात मुक्त विहार करताना हिरूला खूप आनंद वाटायचा. झाडांच्या फांदी-फांदीवर बसताना त्याला मौज वाटायची. त्यामुळे हिरू नेहमी प्रसन्न असायचा.

एकदा काय झाले • हिरू आकाशात उडत उडत खूप दूर निघून गेला. उडता-उडता त्याची जमिनीवरील सफरचंदाच्या झाडावर पडली. त्या झाडाला एक भलेमोठे सफरचंद लटकलेले त्याला दिसले. सूर्याच्या प्रकाशात ते सफरचंद चमचम चमकत होते. असे सफरचंद हिरूने कधी पाहिलेले नव्हते.

सफरचंद पाहून हिरूच्या चोचीला पाणी सुटले. त्याने सफरचंदाकडे झेप घेतली. हिरूने सफरचंदाला चोच मारली… तो काय आश्चर्य ! चोच मारताच त्या सफरचंदाला असलेला दरवाजा उघडला आणि हिरू त्या दरवाज्यातून आत गेला. आत जाताच दरवाजा बंद झाला. त्या सफरचंदात जणू हिरू झाला बंदिस्त !

प्रथमतः हिरू घाबरल्यागत झाला. हे काय झाले, असे त्याला वाटले.
सफरचंद आतन खूप मोठे हेते. हिरू चोहिकडे न्याहाळू लागला.

त्याला तेथे एक गुहा दिसली. तो त्यात हिंमत करून आत शिरला. बऱ्याच वेळानंतर तो गुहेच्या बाहेर पलिकडे निघाला. तेव्हा त्याला एक आंब्याचे झाड दिसले. त्या झाडावर चांदीच्या रंगासारखे आंबे होते. आंबे बघून हिरूने आपली चोच उघडली. तो उडाला आणि आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बसला.

हिरू थकल्यासारखा झाला होता. त्याला भूकही लागली होती. म्हणून त्याने विचार केला की, ‘आपण या झाडावरील एक आंबा खाऊ, त्यामुळे आपली भूक व तहान मिटेल.’

हिरूने आंब्याला चोच मारली. चोच मारताच हसण्याचा जोराचा आवाज तेथे घुमला. ते हसणे जणू मेघगर्जनेसारखे होते. ते हसणे ऐकून हिरू ज्या फांदीवर बसला होता, त्या फांदीवरून पडता पडता वाचला.

ज्या आंब्याला चोच मारली होती, त्यातून एक राक्षस प्रगट झाला.
त्याचे हसणे आक्राळविक्राळ होते. तो हसतच हिरू पोपटाला म्हणाला, तू पण सफरचंदाच्या लोभाने येथे आलास? येथे जो येतो, तो परत जात नाही. येणाऱ्याला मी खाऊन टाकतो. तू तर माझा एक घाससुध्दा नाहीस….!”

परंतु मोठ्या चपळाईने स्वतःला वाचविण्यासाठी हिरू त्या फांदीवरून उडाला. उडताना त्याने राक्षसाच्या डोळ्याला जोराने आपली चोच मरली. तेव्हा राक्षस किंचाळला. त्याचा डोळा रक्तबंबाळ झाला.

पोपटाने डोळ्याला मारलेल्या चोचीमुळे राक्षस क्रोधाने चवताळला. तो हिरूवर तुटून पडला. परंतु हिरू आपले पंख फडकवीत राक्षसाला चकवू लागला. हिरू पुढे आणि राक्षस मागे असे दृश्य होते. आता या राक्षसापासून वाचणे कठीण आहे असे हिरूला वाटले.

त्याचवेळी दुसऱ्या पंखांचा फडफडाट हिरूच्या कानावर आला. त्याने आवाजाच्या दिशेन पाहिले. तेव्हा त्याला भिंतीवर एक झरोका दिसून आला. त्या झरोक्यातून हिरू पलिकडे गेला. तेथे एका पिंजऱ्यात एक दुसरा पोपट बंद असलेला हिरूला दिसला.

पिंजऱ्यातील पोपट हिरूला म्हणाला, “अरे मित्रा, तू येथे कसा फसलास ? पण हे बघ, घाबरू नकोस. आत तू या पिंजऱ्यावर बस. तू जोपर्यंत या पिंजऱ्यावर बसलेला राहशील, तोपर्यंत राक्षस तुझे काहीही करू शकणार नाही.”

हिरूने तसेच केले. तो पिंजऱ्यावर बसला.

थोड्या वेळाने त्या झरोक्यातून आपल्या जादूच्या सामर्थ्याने राक्षस तेथे आला. पिंजऱ्यावर बसलेला हिरू बघून तो मनातून चपापला. त्याने हिरूला भीती दाखविण्याचा अणि धमकावण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु हिरू पिंजऱ्यावर बसलेलाच राहिला. तेव्हा राक्षसाने त्या जागी जादूने जोराने वाहणारा वारा सुरू केला. वीज चमकू लागली. ढगांची गर्जना सुरू झाली. त्यामुळे पिंजरा हेलकावे खाऊ लागला. हिरूचे पाय पिंजऱ्यावरून निसटू लागले. हिरू हैराण झाला.

हिरूची स्थिती बघून पिंजऱ्यातील पोपट हिरूला म्हणाला, “मित्रा,
घाबरू नकोस. आता मी सांगतो तेवढे प्रयत्नपूर्वक काम कर. या पिंजऱ्याचा हा दरवाजा उघड. दरवाजा उघडताच मी उडून जाईन. मी मुक्त झालो म्हणजे हा राक्षस मरून पडेल.”

हिरूने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पिंजऱ्यातील पोपट झदिशी उडाला. पोपट पिंजऱ्यातून बाहेर पडताच राक्षस चक्रावला आणि जमिनीवर कोसळला. जोराचा वारा बंद झाला. ढगांची गर्जना थंडावली. विजेचे चमकणे मावळले. राक्षस मरून पडला.

आता हिरूने बाहेर पडण्यासाठी उड्डाण केले. उडता-उडता तो आंब्याच्या झाडाजवळ आला. तेथे बरीच मंडळी जमलेली होती. त्या मंडळीत एक राजा, राजकुमारी आणि इतरजण होते. त्यांना राक्षसाने बंदिस्त केलेले होते; परंतु राक्षस मेल्याने ते मुक्त झालेले होते.

“तुम्ही कोण ? या आंब्याच्या झाडाखाली कसे?” हिरूने त्यांना विचारले. त्या मंडळींनी आपला परिचय देऊन त्यांच्यावर ओढवलेली सर्व हकिगत सांगितली. नंतर हिरूने पण त्यांना आपला सर्व किस्सा

सांगितला. “तू मोठा हुशार दिसतोस. तुझ्यामुळे आम्ही दुष्ट राक्षसाच्या पंजातून सुटलो. हे तुझ्या साहसाचेच फळ आहे. जे साहस करतात, ते सफल होतात. हिरू, तुला त्रिवार धन्यवाद !” राजा बोलला.

नंतर सर्व सफरचंदातून बाहेर पडले. जाताना हिरू पोपटाने ते सफरचंद तोडून फेकून दिले.


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Leave a Comment