अफजखान वधाची राजनीति व अफजलखान वधानंतरची राजनीति
छत्रपती शिवाजी महाराजांची – Shivaji Maharaj कथा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची भागीदारी. त्यांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण क्षणामुळे, मराठ्यांची आणि हिंदवी स्वराज्याची उजळणी झाली. अफजलखान वध – Afzal Khan Slaughter व मार्गाने शिवाजी महाराजांना अपना विकसित करणारे राजनीतिज्ञ आणि सैन्यवीर असून, त्यांचे कृती व विचार आपल्या समयातील समाजाला आदर्श मार्गदर्शन करीत आहेत. याचा सर्वात महत्त्वाचा आविष्कार त्यांच्या नेतृत्वाखाली रचलेल्या आपल्या स्वराज्याचा असा विशेष उद्दीपक आहे ज्याने भारतीय इतिहासात सन्मानीय स्थान सुरू केला.
अफजखान वधाची राजनीति Afzal Khan Slaughter
Politics of Afzal Khan Slaughter
सामान्य व्यक्ती कुटील केव्हा बनतो. कपटी, लोभी, धूर्त लोक सर्व सुमार्ग बंद करतात. तेव्हा सामान्य व्यक्ती कुटीलनितीचा मार्ग स्वीकारतो. अफजलखान स्वराज्यावर चालून आल्यामुळे त्याचा कपटी स्वभाव आणि बळ याला पराभूत करण्याचा राजनीतिचा सामान्य उपाय बंद झाला होता.
त्याला कुटीलतेने मारावे लागणार होते. स्वराज्याला बलशालीपणा प्राप्त करून किंवा स्वतःच्या बळाने त्याला मारणे शक्य नव्हते. तर योग्य वेळ साधनू कुट राजनीतिच्या मंत्राच्या प्रभावाखाली आणून त्याची मती गुंग करायची होती. नंतरच कुटीलतेचा घाव घालून घात करायचा होता. अफजलखानाच्या कपटी स्वभावानुसार कपटी राजनैतिक चाली व महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली कुट राजनीती याचे असामान्य दर्शन या प्रकरणात होत आहे.
भारताच्या इतिहासातील स्वराज्याला उभारी देणारे व महाराजांच्या राजनैतिक कुटील प्रयोगाचे महत्त्वाचे कुट युद्ध म्हणजे ‘अफजलखानाचा वध’ होय. जेव्हा व्यक्ती राजनीति खेळते तेव्हा त्याला मानसशास्त्राची पुरेपूर जाणीव असावी लागते. जो मानसशास्त्र जाणतो तो व्यक्तींचा स्वभाव जाणतो. जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा शत्रू असो अथवा मित्र त्यांचा स्वभाव जाणतो आपल्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवू शकतो. महाराजांनी या प्रतापगडच्या युद्धात मानस शास्त्राचा, राजकीय कौशल्याचा आणि साम, दाम, भेद व शेवटी दंडाचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. गुप्त कारस्थानाने जे कारस्थानी युद्ध खेळले जाते त्याचे आदर्श आणि उत्कृष्ट उदाहरण है ‘प्रतापगडचे युद्ध’ आहे.
महाराजांनी गुप्तहेराचे महत्त्व ओखळले होते. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेर खाते अतिशय चतुर आणि बातम्या काढण्यात महाराजांपर्यंत पोचवण्यात तरबेज होते. महाराजांनी संपूर्ण शत्रूच्या प्रदेशातून शत्रूच्या बातम्या मिळवण्यासाठी एक प्रकारे हेरांची साखळी बनवली होती. आतापर्यंत महाराजांनी गुप्तहेरांच्या मदतीने शत्रूची प्रत्येक वेळची चाल ओळखून त्या आधारे शत्रूला शह देण्यासाठी त्याच्या पुढच्या चालीची रणनीति आखली होती. शत्रूला अंदाजही येणार नाही अशी व्यूहरचना आणि अभिनव कल्पना व प्रत्येक वेळी नव्या युद्धतंत्राचा वापर करून महाराज आपली योजना किंवा चाल शत्रूला ओळखू देत नव्हते. त्यामुळे शत्रूला महाराजांचे कारस्थान शेवटपर्यंत ओळखने दुर्लभ होऊन बसायचे. महाराजांच्या कुटी राजनीतिच्या जाळ्यात शत्रूची पूर्णपणे फसगत व्हायची. अफजलखानाच्या वधाच्या कुटील जाळ्याचे भाग उलगडण्यास सुरूवात होत आहे. त्याचा उलगडा पुढील प्रमाणे केला आहे.
दररोज स्वराज्याचा विस्तार वाढत होता. नवीन प्रदेश स्वराज्याला जोडला जात होता. महाराजांच्या आक्रमणाच्या वार्ता दररोज आदिलशाही दरबाराला जात होत्या. महाराजांचे विस्ताराचे धोरण असेच चालू राहिले तर आदिलशाही धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शिवाजीचा कायमचा काटा काढण्यासाठी काहीतरी निर्णायक पाऊल उचलणे गरजेचे बनले होते. आदिलशाहीवर आलेले औरंगजेबाचे संकट टळले होते. औरंगजेब दख्खन सोडून उत्तरेकडे गेला होता व दिल्लीच्या राजकारणात गुंतून पडला हेता. हीच वेळ आदिलशहास अनुकूल होती. यावेळी आदिलशहाचा संपूर्ण कारभार बडी बेगम पहात होती.
यापूर्वी महाराजांना रोखण्यासाठी आदिलशहाने वेळोवेळी प्रयत्न केले होते. पण त्यात यश आले नव्हते. शहाजीराजांना पत्र पाठवून रोखण्यास सांगितले होते. परंतु शहाजीराजांनी ‘पोरगं माझं ऐकत नाही. तुमचे तुम्ही पाहून घ्या.’ असे कळवले होते व महाराजांपासून राजकीय अलिप्तता स्विकारली होती. आदिलशहाने महाराजांवर पाठवलेला
सरदार फतेहखान याचाही पूर्ण पराभव झाला होता. इतर अनेक सरदारांचा पराभव करून पराक्रमाने स्वराज्य निर्माण केले हाते. त्यामुळे महाराजांच्या पराक्रमाबद्दल संपूर्ण धास्ती बाळगून होते, महाराजांचा व त्यांच्या स्वराज्याचा कायमचा निकाल लावणे अत्यावश्यक बनले होते. परंतु आदिलशाही समोर महत्त्वाचा प्रश्न पडला होता की, शिवाजीवर कोण चालून जाणार, कारण महाराजांची धास्ती आणि शहाजीराजांचे आदिलशाही मधील बहुतेक सरदारांबरोबर मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे आपणहून कोणताही सरदार महाराजांवर चालून जाण्यास तयार नव्हता.
महाराजांनी बडी बेगम समोर एक आव्हानाची परिस्थिती निर्माण केली होती. आव्हानाची परिस्थिती दोन कारणामुळे निर्माण होते एक अंतर्गत शत्रु व दोन बाह्य शत्रू.
अशा स्थितीत राजनीतिचा नियम म्हणतो, कोणत्याही राज्यात जेव्हा अशा परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा तेथील राज प्रामुख्याने राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करण्याचे आपल्या सरदारांना आव्हान करावे. यावेळी त्यांना विविध अमिषे दाखवावीत.
Politics of Afzal Khan Slaughter
महाराजांचे आदिलशाही वरील संकट दूर करण्यासाठी अफजलखानाला आव्हान केले. व त्याच्यावर विश्वास दाखवून त्यांच्यावर ही मोहिम सोपविली. कपटी पराक्रमी व बलाढ्य ताकद असलेल्या अफजलखानाने हे आव्हान स्वीकारले.
जेव्हा एखादी व्यक्ती अथवा सरदार अशी आव्हानाची परिस्थिती स्विकारते तेव्हा त्या व्यक्तीचा उत्साह वाढवायचा असतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्याच्या क्षमतेची प्रशंसा करावी लागते. त्याचे पराक्रमाचे, कर्तृत्वाचे गुण गाऊन उत्साह द्विगुणीत करण्यासाठी त्यास मौल्यवान वस्तू धन, अलंकार बक्षिस द्यावे. यावेळी अफजलखानाचा उत्साह वाढवण्यासाठी आदिलशहाने त्याची स्वतःची खास रत्नजडित कट्यार दिली. तसेच मौल्यवान भेटवस्तू व अलंकार दिले.
अफजलखानाची मोहिम प्रचंड होती. जवळजवळ तीन वर्षे चालेल एवढी संपत्ती व भरपूर फौज दिली होती. महाराजाविरुद्ध अतिशय
काटेकोरपणे नियोजन केलेली ही मोहिम होती. अफजलखानाला मोहिमेचे संपूर्ण अधिकार दिले होते. तसेच आदिशाहीची कोरी फर्माने ही दिली होती. शिवाजीराजांविरुद्ध अफजलखानाला कसल्याही प्रकारे अचडण येऊ नये याची काळजी घेऊन मोहिम आखली होती. अफजलखान स्वतःची बलसंपन्नता पाहून घमेंडीने फुलून गेला. व त्याचा ताकदीवरचा अलंकार वाढत चालला हेता. त्याचा हाच ताकदीचा अहंकार घात करणार होता. बडी बेगमने अफजलखानाला सांगितले होते की, शिवाजीस दोस्ती करून एकांतात बोलावून ठार मारणे अशा प्रकारचा सल्ला दिला होता. याचा स्पष्ट अर्थ होता की, अफजलखान महाराजांशी दोस्ती करून कपटाने ठार मारणार होता.
महाराजांच्या गुप्त हेरा मार्फत अफजलखानाच्या मोहिमेची बातमी मिळाली. महाराजांनी आपल्या गुप्तहेराचे प्रस्थ अफजलखानाच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी साखळीद्वारे विखरण्यात आले. अफजलखानाने विजापूर सोडल्यापासून महाराजांनी अतिशय विचारपूर्वक आपले धूर्त डाव टाकण्यास सुरूवात केली. अफजखान मोहिमेवर निघाल्याच्या पहिल्याच दिवशी मुक्कामाच्या ठिकाणी त्याचा मानाचा, सर्वात पुढचा निशाणीचा ‘खतेलष्कर’ नावाचा हत्ती मेला. महाराजांनी आपल्या गुप्तहेरांमार्फत हत्तीवर विषप्रयोग केला.
राजनितीच्या सिद्धांतानुसार महाराजांनी आपल्या गुप्तहेरांमार्फत अफजलखानाच्या छावणीत परस्परांच्या शत्रुत्वाचा परिणाम आहे. अशी आगळीक उठवून दिली व खानास अपशकून झाला, अपशकून झाला अशी अफवा खानाच्या फौजेत पसरवली गेली. यातून महाराजांनी खानाला मानसिक धक्का देऊन त्याचे मनौधर्य खच्ची करण्याचे काम केले. महाराजांनी आपला पहिला डाव गुप्तहेरांकरवी यशस्वी केला.
यावेळी आदिलशहाने अफजलखानाचे मनौधर्य खच्ची होऊ नये व खान उत्साहित ठेवण्यासाठी स्वतःचा खास बिनीचा हत्ती अफजलखानाकडे पाठवला.
अफजलखान कपटी होता. त्याने फौजेसह तुळजापूरकडे जाण्यास प्रारंभ केला. तुळजापुजरची भवानी ही महाराष्ट्राची कुलदेवता होती. या कुलदेवतेवरच हल्ला केला तर शिवाजीराजा आपोआप चिडेल. धार्मिक ठिकाणी हल्ला करून अफजलखान महाराजांना मोकळ्या मैदानात येण्यास उद्युक्त करत होता. एकदा शिवाजीराजा मोकळ्या मैदानात आल्यास शिवाजीस पराभव करून पकडणे सोपे जाईल म्हणून अफजलखान हा धूर्त डाव खेळत होता.
ज्यावेळी अफजखानाने तुळजापूरकडे आपला मोर्चा वळवला महाराजांना याची लगेच बातमी मिळाली. महाराजांनी अतिशय विचारपूर्वक डाव टाकण्यास सुरूवात केली. अफजलखान हा पूर्णपणे धर्मांध होता. इस्लामचा कट्टर असून हिंदूबद्दल त्याच्या मनात तिरस्कार होता. अफजलखान स्वतःला ‘दीन दात बुतशिकन’ व ‘दीन दार कुफ्रशिखन’ म्हणजे धर्माचा सेवक व मुर्तीपुजेचा विध्वंसक आणि धर्माचा सेवक व काकरांचा नायनाट करणारा म्हणत होता. त्याचे आचारणही चांगले नव्हते. याची महाराजांना पूर्ण माहिती होती. अफजलखान हा नक्की तुळजाभवानीवर घाव घालणार व महाराजांना मोकळ्या मैदानात खेचण्याचा प्रयत्न करणार व स्वताः ची भीती पसरवणार महाराजांनी हा डाव ओळखून अफजलखानाच्या हल्ल्या अगोदर आपल्या गुप्तहेरांकरवी मंदिरातील पुजाऱ्यांमार्फत भवानीची मूळ मूर्ती हलवली गेली. आणि त्याच्या जागी दुसरी मूर्ती ठेवली गेली.
अफजलखानाने तुळजापूरवर आक्रमण केले. आणि मंदिरातील भवानी आई फोडली. आणि याचा फायदा महाराजांनी घेतला व आपल्या गुप्तहेरांच्या साह्याने अफजलखान हा हिंदुविरोधी असून त्याचे आचारण योग्य नाही. त्याचा वध होणे आवश्यक असून तो मेलेलाच बरा अशा प्रकारची मानसिकता तयार केली. यामुळे जे सरदार व रयत म्हणत होती की, शिवाजीचे आता काही खरे नाही. तीच रयत व सरदार म्हणू लागले की, अफजलखान मारला पाहिजे त्याचा वध व्हावा. जो मनुष्य सत्य धर्माच्या विरुद्ध आचरण करतो त्याचा युद्ध स्थळी वध होणे आवश्यक आहे.
अफजलखानाचा महाराजांना मोकळ्या मैदानात खेचण्याचा डाव वाया गेला होता. यावेळी खानाच्या फौजेने दुसरे धार्मिक क्षेत्र पंढरपूरवर आक्रमण केले. यावेळी पांडुरंगांची मूळ मूर्ती हलवून त्या जागी दुसरी मूर्ती ठेवण्यात आली. महाराज गुप्तहेराच्या मदतीने अफजखानाच्या चालीस उत्तर देत होते आणि खानाविरोधात सर्वांची भूमिका तयार करत होते.
पंढरपूरवरून खानाने मलवडीस लष्करी तळ दिला. यावेळी खानाने महाराजांना शरण आणण्यास व मोकळ्या मैदानात खेचण्यासाठी दुसरा डाव टाकला. अफजलखानाने महाराजांचे मेव्हणे, सईबाईंचे भाऊ फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांना कैद केले. अफजलखानाने मेव्हण्यास कैद करून महाराजाच्या मर्मस्थानावर बोट ठेवले हाते. राजकारणारत व्यक्तीची मर्मस्थाने हीच वर्मस्थाने असतात. अफजलखानाने बजाजी नाईक निंबाळकरांना साखळदंडात बांधून, त्यांची सुंता केली जाईल व तोफेच्या तोंडी दिले जाईल असे घोषित केले. महाराजांनी यावेळी संयम राखला, अविवेकी होऊन बजाजी राजाची सुटका होणार नव्हती.
अशा स्थितीमध्ये कोणत्याही राजाने निर्णय घेताना संपूर्ण सारासार विचार करून बुद्धीपूर्वक निर्णय घ्यावा, महाराज राजनीतिच्या चाली खेळण्यास वाक्कबगार होते. त्यांनी बजाजी राजेंची सुटका करण्यासाठी विचारांती निर्णय घेतला. ज्यांचे बजाजी नाईक निंबाळकाशी सौंदर्याचे संबंध आहेत व ज्याचे वजन खानापाशी आहे. असे मातब्बर सरदार नाईकजी पांढरे यांच्याशी बजाजी राजेंच्या सुटकेविषयी गुपचूपपणे बोलणी केली व प्रयत्नांनी बजाजींची सुटका करण्याचा शब्द टाकला. महाराजांच्या शब्दाखातर बजाजीविषयी नाईक पांढरे यांनी नेटाने बोलणी लावली. शेवटी खानाने ६० हजार दंड व
नाईकजी पांढरे यांचा जामीन होऊन बजाजीराजेंची सुटका केली. महाराजांना उघड्या मैदानात खेचण्याचा अफजलखानाचा दुसरा डावही व्यर्थ गेला.
पावसाळा जवळ आला होता. तसे स्पष्ट संकेत दिसू लागले होते. अफजलखान वाईचा सुभेदार होता व आपला मोर्चा त्याने वाईकडे
वळवला. पावसाळा संपेपर्यंत त्याचा मुक्काम वाईलाच राहणार होता. महाराजांनी मनोमन निश्चित केले होते की, अफजलखानाला जावळीत आणून मारला पाहिजे. आणि या चार महिन्यातच अफजलखानाच्या वधाची योजना तयार होणे आवश्यक होते. महाराज आपल्या कुटनैतिक चातुर्याने अफजलखानाच्या बुद्धीत भ्रम निर्माण करून त्यास जावळीत आणायचे होते. कारण अफजलखान बलवान होता आणि जेव्हा शत्रू बलसंपन्न असेल तेव्हा विजयाची इच्छा धरणाऱ्या राजाने दोघांचे बलाबल ज्ञान जाणून घ्यावे लागते. अफजलखान हा शत्रू बलवान होता. अशावेळी आपल्याला लाभलेल्या देशाच्या परिस्थितीचा, शक्ती व युक्ती याचा उपयोग केला पाहिजे.
युद्धनीति म्हणजे जेव्हा आपले शत्रूच्या तुलनेत बळ कमी असते, सैन्य कमी असते, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्या जवळील उपलब्ध साधन सामग्रीचा व भौगोलिक परिस्थितीचा प्रभावीपणे उपयोग करावा.
महाराजांनी त्यासाठी प्रतापगड व जावळीचा प्रदेश निश्चित केला होता. हा प्रदेश अफजलखानाच्या सैन्यास प्रतिकूल होता व महाराजांच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या हालचालीस अनुकूल होता. या प्रदेशाचा उपयोग प्रभावीपणे करण्याचा महाराजांनी ठरवले होते.
अफजलखान स्वतः एक बलाढ्य योद्धा होता. त्याच्याजवळ भरपूर फौज होती. व तो सर्व दृष्टीने सामर्थ्यवान होता. राजनीति म्हणते शत्रू कितीही सामर्थ्यवान असला तरीही तो पराभूत होऊ शकतो.. कारण त्याच्याकडे त्याच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी लागणारी योजना किंवा कारस्थान दुर्लभ असते. म्हणून कारस्थान शक्ती श्रेष्ठ असते.
बुद्धीच्या जोरावर राजनीतिच्या मार्गावर आपल्या नेत्रांनी चालणारा राजा थोडक्या श्रमाने उत्तम कारस्थान रचू शकतो व बलसंपन्न व सामर्थ्यसंपन्न शत्रूलाही सामादी उपायाने व कटु राजनीतिच्या उपायांनी आपल्या व्यक्तींच्या व गुप्तहेरांच्या मदतीने गुप्तपणे योजना तयार करून शत्रूचा संहार करू शकतो. यावेळी शत्रू सामर्थ्यवान बलवान होता. परंतु या सर्वांहून वरचढ मानली जाणारी योजकशक्ती महाराजांजवळ
होती आणि त्यामुळे महाराजांचा विजय निश्चित होता.
अफलजखानाची लष्करी छावणी वाईला पडली होती. तो वाईचा सुभेदार असून त्याला वाईच्या संपूर्ण भागाची माहिती होती. महाराजांचा मुक्काम प्रतापगडी होता. महाराजांनी प्रतापगडचा प्रदेश आपल्या अंतिम योजनेसाठी निश्चित केला होता, त्यामुळे महाराज प्रतापगडी राहून खानाच्या छावणीतील संपूर्ण तपशील जाणून घेत होते.
अफजलखान महाराजांच्या मोहिमेवर नामजाद झाल्यानंतर आदिलशहाने मावळ खोऱ्यातील देशमुख मंडळींना अफजलखानाच्या फौजेत सामील होण्यासाठी फर्माने येऊ लागली. अफजलखानाने स्वतः तशी कडक पत्रे देशमुख मंडळींना पाठवली होती. काही देशमुख मंडळी, स्वार्थ, लोभ, वतन यासाठी खानास सामील झाली. त्यामध्ये खंडोजी खोपडे देशमुख, मुत्रवळीकर मसुरचे सुलतानजी जगदाळे, विठोजी हैबतराव, केदारजी खोपडे ही मंडळी सामील झाली. अफजलखान देशमुख मंडळींना आपल्याकडे ओढून स्वत चे बळ वाढवत होता.
राजनीतिचा नियम आहे फोडा, लोकांमद्ये दुफळी माजवा, झोडा राज्य करत स्वतः बलसंपन्न व्हा!
जेव्हा राज्यावर कोणते संकट येते तेव्हा आपले कोण ? व वेगळा कोण? हे समजते. संकटकालीन परिस्थितीमध्ये निष्ठावान माणसाची ओळख होते.
आदिलशहाचे असेच एक कडक फर्मान कान्होजी जेधे यांसआले. यावेळी कान्होजी जेधे फर्मान घेऊन थेट महाराजांपाशी आले. महाराजांनी कान्होजींच्या निष्ठेची परिक्षा घेतली आणि खरोखरच कान्होजींनी वतानावर पाणी सोडले. महाराजांशी निष्ठा दाखवली. महाराजांनी कान्होजींवर देशमुखमंडळी महाराजांच्या बाजूने वळवण्याची कामगिरी दिली. यावेळीच महाराजांनी कान्होजींना त्यांचे कुटुंब ढमढेऱ्यांच्या तळेगावला हलवावे अशी सूचना केली. कारण जेधे यांचे कारी हे गाव रोहिड्याच्या पायथ्याशी येते व तेथे अफलजखानाच्या फौजेचा हल्ला करण्याचा धोका होता. यावरून महाराजांचे आपल्या प्रजेच्या लहान सहान धोक्याकडे, लक्ष असायचे. व सर्वांची काळजी घ्यायचे. जो
राजा आपल्या कुटुंबाची एवढी काळजी घेतो. अशा राजावर असंख्य लोक आपले जीवन ओवाळून टाकतील. कारण त्यांना आपल्या कुटुंबाची, मृत्यूंची चिंता नसते. त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी तो राजा सक्षम असतो.
स्वराज्यावर अफजलखानाचे महाभयंकर संकट आले होते. अफजलखानाची स्वराज्यावर नेमणूक झाल्यापासून ते वाईत येईपर्यंत लोकांची मानसिकता पाहिली तर एक भयाची स्पष्ट रेषा चेहऱ्यावर दिसत होती. आता स्वराज्याचे काय होईल? शिवाजीराजांचे काही खरे नाही. अफजलखानाचा कपटी स्वभाव, त्याचे बळ किती? अशा प्रकारची सर्वांची मानसिकता बनली होती व उत्कृष्ट योद्धा व राजनीतिज्ञ तोच जो आपल्या भीतीचा सामना करतो. आपली भीती आपल्या पायाखाली दाबतो. महाराज एक धाडसी योद्धा व राजनीतिज्ञ होते. त्यामुळे ते साहस करून प्रत्येक राजनीतिची चाल खेळण्यात पटाईत होते.
महाराजांची मुत्सद्दी मंडळीही पार घाबरून गेली होती. खाना विरुद्ध त्यांना कोणताच उपाय सापडत नव्हता. त्यांच्या वागणे, बोलणे व दररोजच्या आचरणातून काळजी व भिती स्पष्टपणे दिसत होती. महाराजांनी आपल्या मुत्सद्यास खान जावळीत आणून मारला पाहिजे. असे सांगताच, त्यांच्यामध्ये शंका निर्माण झाल्या. मुसद्दी मंडळी खानाशी तह करण्याचा सल्ला देत होती. अफजलखानाशी युद्ध केल्याने पराजय होईल असे म्हणत होती व ते योग्य होते. हे महाराजांनाही माहित होते. महाराजांनी या सर्वांची मानसिकता ओळखली होती. आता सर्वांच्या मध्ये उत्साह निर्माण करण्याची आवश्यकता होती.
राजनितीच्या सिद्धांतानुसार – जेव्हा असे संकट आले असेल तेव्हा आपल्या व्यक्ती आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी व लोकांमधील शत्रूची भिती नाहीशी करून त्यांच्यामध्ये उत्साह संचार करण्यासाठी राजाने ‘आपणास सर्व जाणण्याची शक्ती आहे व आपल्याला देवी, देवता प्रसन्न आहेत असे प्रसिद्ध करावे व आपल्या लोकांत उत्साह संचार करावा, ही उत्कृष्ट राजनीति आहे. याद्वारे स्वपक्षावर व शत्रूपक्षावर प्रभाव टाकून नियंत्रण ठेवता येते. महाराजांनी आपल्या लोकांमध्ये उत्साह संचार
करण्यासाठी साक्षात ‘भवानी आईने’ दृष्टांत दिला की, ‘चिंता करू नको तुझ्यावर आलेले संकट निवारण होईल यश तुला मिळेल.’ हे आपल्या मुत्सद्दी मंत्र्यामध्ये सांगितले व उत्साह संचार केला. महाराजांनी गुप्तहेरांच्या मदतीने भवानी आईचा दृष्टांत साऱ्या सैनिकामध्ये पसरवला व अनेक चमत्कार सांगून आपल्या सैन्यामध्ये उत्साह संचार केला. आता सर्व मुत्सद्दी व सैनिक हर्पून गेली. व तेच आता म्हणू लागले की माझ्या राजाला जगदंबेचा साक्षात्कार झाला. महाराजांच्या हातून नक्की अफजलखानाचे पारिपत्य होणार.
अफजलखान वाईत लष्करी तळ देऊन बसला होता. आपले सरदार पाठवून त्याने स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. महाराजांची लहान लहान ठाणी त्यांने जिंकून घेतलेली होती. महाराजांनी आपण अफजलखानाला भयभीत झालो आहोत हे दाखवण्यासाठी कोणत्याचाही प्रकारचा प्रतिकार करू नये. अशा आज्ञा आपल्या सैनिकास दिल्या होत्या. खानाने विजापूर सोडल्यापासून वाईत येईपर्यंत महाराजांनी कोठेही खानाच्या फौजेला विरोध केला नाही. प्रत्यक्ष कोठेही युद्धास सामोरे गेले नाहीत. कारण खानाच्या मनात शिवाजीराजा भितो हा भम्र उत्पन्न करायचा होता आणि तो यशस्वीपणे केला होता. अफजलखानाने विजापूर सोडल्यापासून महाराजांनी खेळलेल्या यशस्वी डावपेचांचे पहिले चरण संपले होते.
जेव्हा व्यक्ती कुटीलपणे योजना तयार करते तेव्हा त्याचे हृदय कलुषित होते व ते होणारच परंतु त्याचा आत्मा कलुषित झाला नाही पाहिजे. महाराजांनी अफलजखानवधाची योजना तयार केली होती. महाराजांच्या आयुष्यातील प्रथमच सर्वात मोठी कुटील योजना होती. जेव्हा व्यक्ती आपल्या शत्रूवर कुटील योजनेचा प्रयोग करतो तेव्हा तो प्रयोग करण्यासाठी त्याच्या मनाची दृढता असावी लागते. महाराजांनी जेव्हा स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती तेव्हाच त्यांचे मन दृढतेने भरलेले होते. त्यांचे मस्तक कोणत्याही भयंकर आपत्तीत स्थिर राहून त्यास यशस्वीपणे तोंड देऊ शकेल असे बनले होते. या भारताच्या भूमीत आपले हिंदूचे राज्य असावे. त्यासाठी स्वराज्य निर्माणाचे कार्य अंगीकारले होते.
स्वराज्याचे लक्ष्य संपूर्ण न्याय संगत होते. या स्वराज्याच्या मार्गात अफजलखान आला होता त्या अफजलखानाला मारणे आवश्यक होते.
तेव्हाच स्वराज्य मोकळा श्वास घेऊ शकणार होते. स्वराज्याचे लक्ष्य न्याय संगत होते मग त्यासाठी त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी कोणताही कुटनैतिक अथवा विचित्र अनैतिक मार्ग स्वीकारला तरी तो बरोबर असेल कारण मार्ग महत्त्वाचा नसून लक्ष्य; महत्त्वपूर्ण असते.
महाराजांनी अफजलखानाला मारण्याची योजना तयार केली.
कोणतेही कारस्थान तयार करताना विशिष्ट अंगाचा विचार करून, पाच अंगानुसार योजना चालवली जाते.
१) ज्या कार्यासाठी कारस्थान गढवले आहे ते कार्य आरंभ
करण्याचा उपाय-
सामराजनीतिचा उपयोग करून खानास जावळीत आणणे.
२) द्रव्यबळ – या योजनेसाठी आवश्यक पुरेसे द्रव्य महाराजांजवळ होते.
३) पुरुष बळ या योजनेसाठी लागणारे मनुष्यबळ महाराजांजवळ होते.
कार्यापुरते सैनिक होते. आपल्या कुटील योजनेच्या साह्याने भौगोलिक स्थितीचा फायदा घेणार होते.
कार्याचे स्थळ – वाई- जावळी आणि प्रतापगडची सोंड (महराजांनी निवडलेली स्थळे शत्रूस प्रतिकूल व आपणास अनुकूल होती.) अंतिम कार्य अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या सोंडेवर होणार होता.
अफजलानाकडून भेटीची बोलणी सुरू झाल्यानंतरच योजनेस योग्य काळ होता.
४) योजनेत अकस्मात उद्भवणारी संकटे व त्याचा प्रतिकार कसा करायचा-
अफजल खानास एकट्याला भेटीस आणेपर्यंत उद्भवणारी संकटे व प्रत्यक्ष कार्याच्या वेळी महाराजांना दगा फटका होऊ शकतो.
याचा विचार केला होता.
५) कार्याचा शेवट कसा करायचा –
अफजलखानाचा वध करून त्याची संपूर्ण फौज बुडवायची होती. अफजखान वधाची योजना महाराजांनी अत्यंत काटेकोरपणे तयार केली होती. याच योजनेस घटीत रूप घ्यायचे होते. प्रत्येक राजनीतिज्ञाने योजनेच्या प्रारूपास घटीत रुप द्यायच्या अगोदर, योजनेतील प्रत्येक घटना स्वतः स्वप्नात पाहावी, कारण तीच योजनेची मुख्य पूर्वतयारी असते महाराजांनी आपले संपूर्ण लक्ष खानावर केंद्रीत केले. महाराजांनी संपूर्ण योजनेनुसार कार्यवाहीस सुरवात केली
होती. महाराजांनी योजने अनुरूप आपल्या सरदारांना प्रतापगडी येण्याची आज्ञा दिली. मोरोपंत, शामराजपंत रांझेकर, त्र्यंबकपंत, बाबाजी भोसले यांच्यावर संपूर्ण लष्करी व्यूहरचनेची जबाबदारी ध्यायची होती. रघुनाथ बल्लाळ व सरनौबत नेताजी पालकरांना घाटावर र्येण्याची ते राहणार होते.
आज्ञा दिली. तेथेच थांबून अफजलखान हा पराक्रमी व बलाढ्य योद्धा होता. त्याचा स्वभाव कपटी होता. खानाच्या रुपात स्वराज्यावर संकट आले होते. अफजलखानाच्या या मोहिमेवर संपूर्ण भारतातील शाह्यांचे व परकीय सत्तांचे लक्ष होते. मोगल, कुतुबशाही, आदिलशाह तसेच इंग्रज सिद्धी, पोर्तुगीज, डच या सर्व सत्तांचे मत बनले होते की, आता शिवाजीराजांचे काही खरे नाही. आता शिवराजीचा पराभव निश्चित आहे व अफजलखानास महाराजांना आपल्या सामर्थ्याने पराभूत करणे शक्य होते. त्याचनुसार सर्व लोक व सत्ता तसा अर्थ लावीत होत्या.
महाराजांनी कान्होजी जेध्यांवर टाकलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली होती. मावळ खोऱ्यातील देशमुख मंडळी महाराजांच्या बाजूने उभा राहिली होती. महाराजांच्या जमेची बाजू होती. नियतीचा खेळ विचित्र होता महाराजांची सखी पट्टराणी सईबाई यांचा यावेळी मृत्यू झाला. ५ सप्टेंबर १६५९ रोजी सईबाईंच्या जाण्याने महाराजांना दुःख झाले. परंतु खानाचे संकट समोर होते. स्वराज्याचा विचार करणे त्या दृष्टीने निश्चित योजना चालवण्याची गरज होती. राजनीति खेळणाऱ्या व्यक्तीने आपले दुःख बाजूला ठेवावे. राज्यावर आलेल्या संकटाचा विचार करणे आवश्यक होते.
गुप्तहेरामार्फत महाराज खानाच्या छावणीतील विविध वार्ता जाणून घेत होते. अफजलखानाच्या स्वभावाची माहिती जाणून महाराज आपल्या योजनेनुसार करणार होते. महाराज खानावर लक्ष ठेवून प्रतापगडावर होते. खानचा स्वभाव मुळचा कपटी व उतावीळ होता. अफजलखानाने आत्तापर्यंत कित्येकजनांना कपटाने मारले होते. पावसाळा संपला होता. खान वाईला मुक्कामास होता. महाराज प्रतापगडावर होते त्यामुळे खानास स्वतः दुसरीकडे जाता येत नव्हते व थेट प्रतापगडला वेढा घालण्याचे किंवा त्यावर आक्रमण करणे अशक्य होते. कारण संपूर्ण बिकट भौगोलिक परिस्थिती मध्ये प्रतपागडांचे स्थान होते. प्रतापगडला जायचे म्हटल्यास जावळीचे घनदाट अरण्य पार करावे लागणार होते. अशा पद्धतीचे ठिकाण प्रतापडच होते. पावसाळा संपल्यानंतर महाराजांनी कोणतीच हालचाल केली नाही. महाराज शांत होते. महाराजांना पूर्ण कल्पना होती की अफजलखानाचा स्वभाव उतावळा आहे. आपण शांत राहिल्यास काही दिवसात खान नक्की वाईस भेटावयास बोलवणार. याच खानाच्या डावाची वाट महाराज पाहत होते. त्यानंतरच महाराजांच्या साम राजनीतिचा अध्याय सुरू होणार, महाराज आपल्या बुद्धीबलाने खानास पराभूत करणार होते. यातूनच खानास जावळीत आणणे शक्य होणार होते. महाराजांकडे अफजलखानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास पाठवले. कृष्णाजी भास्कर प्रतापगडी आला. कृष्णाजी भास्कराने महाराजांना खानाचा तोंडी निरोप सांगितला व म्हणाला, “खानसाहेब व तुमचे वडील यांचा पुरातन भाईचारा आहे. तसेच तुम्ही आदिलशहाचा प्रदेश आणि गडकोट घेतले आहेत. तरीही खानसाहेब तुमचे सर्व गुन्हे माप करून आणखी मनसब, जहागीरी देतील. महाराजांनी खान साहेबांच्या भेटीस यावे.”
कृष्णाजी भास्कर यास महाराजांकडे पाठवून अफजलखानाने महाराज आपणास भेटण्यास यावेत. यासाठी साम आणि दंडनीतिचा उपयोग केला होता, महाराजांनी खानास पूर्णपणे जाणले होते. महाराजांनी खानाच्या या सामनीतिच्या डावाचा प्रत्यक्ष विचार केला होता. त्यानुसार
महाराजांनी आपल्या योजनेचा सकारात्मक दृष्टीने सामनीतिचा पहिला फांसा फेकला. महाराज कृष्णाजीस म्हणाले,
“जसे महाराज (शहाजी राजे) साहेब तसेच खान साहेब आम्हांस वडील आहेत.” त्यांची भेट अलबत्ता घेऊ.”
कृष्णाजीने खानाचे पत्र महाराजांना दिले महाराजांनी कृष्णाजीस मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यास निरोप दिला. कृष्णाजीची मुक्कामाच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्यात आली. परक्या शत्रुचा वकील आपल्याकडे आल्यास त्याला सुरक्षित बंदोबस्तात ठेवावे कारण शत्रूचा दुत आपल्या व्यक्तींमध्ये भेद करू शकतो. शत्रूस आवश्यक असलेली माहिती चोरू शकतो. गुप्तपणे आपल्या योजना लोकांची मते जाणून तो आपल्या शत्रूस पुरवू शकतो.
महाराजांनी खानसाहेबास भेटण्यास तयारी दाखवली होती. खानाच्या भेटीसाठी महाराज तयार होते पण खानाच्या हेतुविषयी शंका होती. खानाच्या पत्रातील मजकूर महाराजांनी वाचला, या पत्रातील मजकूरावरून एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की, खान महाराजांना भेटण्यास बोलावत होता. बोलणी तहाची करायची आहेत असे भासवत होता. खानास जर महाराजांनी घेतलेले किल्ले, प्रदेश पाहिजे होता तर त्याने महाराजांना भेटण्याची अट घातली नसती, खान महाराजांना जिवंत धरून आदिलशाही दरबारात नेणार होता.
अफजलखानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर यास महाराजांकडे पाठवून, सामनीतिच्या चालीचा वापर करून वाईत भेटण्यास बोलावून महाराजांच्या कुटील योजनेचे मुख्य चरण सुरू केले होते. महाराजांच्या अफजलखान वधाच्या योजनेचा प्रथम आरंभ होता ‘साम’ राजनीतिने खानास जावळीत आणणे.
महाराजांनी आपला वकील म्हणून गोपीनाथ पंताना पाठवण्याचे ठरवले होते. गोपीनाथ धूर्त, विश्वासू, अनुभवी व्यक्तीची पारख, शत्रूच्या बोलण्याचा अंदाज घेऊन बोलण्याच्या कलेत माहिर असलेला मनुष्य होता.
महाराजांच्या अफजलवधाच्या योजनेविषयी पंताना माहिती होते.
महाराज आपल्या सामनितीने गोपीनाथपंताच्या साह्याने राजनीतिच्या पटावरील सोंगट्या हलवणार होते. सामनितीच्या जोरावर खानाच्या मस्तिष्काबरोबर खेळून, छळाचा प्रयोग करून खानास महाराजांना भेटण्यास उद्युक्त करायचे होते. महाराजांनी आपल्या कार्यास अनुरूप असाच, वकील पंताजी गोपीनाथांना निवडले होते.
खान महाराजांना वाईत भेटण्यास बोलावत होता. परंतु महाराजांना तो जावळीत आणायचा होता. कारण जावळीत आणूनच अफजलखानाचा वध व त्याच्या सैन्याचे पारिपत्य करणे शक्य होते. अफजलखखानाला जावळीत आणण्यासाठी सामनीतिचे दोन प्रकार महाराज आपणास खूप भितात व खानाचे गुणकीर्तन हे पर्याय वापरायचे होते. यामधूनच खानाच्या बुद्धीला नशा चढवायची होती. व जावळीत येण्यास भाग पाडायचे होते.
त्याच नीतिनुसार जेव्हा दुसऱ्या दिवशी कृष्णाजी भास्कर महाराजांसमोर आला तेव्हा महाराजांनी त्यास आपले म्हणणे सांगितले, “आमच्या मनात कपट नाही. खानसाहेबांच्या सर्व अटी आम्हांस मान्य आहेत. पण खानसाहेबांनी जावळीत भेटण्यास यावे. आम्ही खान साहेबाचे अपराधी आहोत, आम्हास खानसाहबांची भिती वाटते.” महाराजांच्या राजनीतिच्या चतुर्राची यातून पूर्ण कल्पना येत होती. महाराज कृष्णाजीस म्हणाले, भेटीपूर्वी खानाने आम्हास अभयाची क्रिया शपथ घ्यावी, यासाठी आमचे पंताजी गोपनाथ यांना खानसाहेबांचे भेटीस न्यावे, महाराजांनी चतुरपणे आपण आपणास भीत आहोत भेटण्यास तयार आहोत त्यासाठी अभयाची क्रिया शपथ हवी. इतका कुटील उतावीळपणा दाखवला होता. परंतु भेट जावळीत व्हावी हा पेच टाकला होता.
महाराजांनी पंताजी गोपीनाथानां आवश्यक त्या सर्व सुचना दिल्या होत्या. पंताना सांगितले होते की, कोणत्याही प्रकारचे खानाचे मन जावळीत भेटी होण्यास वळवावे जेव्हा खान जावळीत येण्यास तयार होईल तेव्हा तो अभयाची क्रियाशपथ मागेल. त्यावेळी आपण ती निसंकोच पणे घ्यावी. दुसरे खानाच्या मनामध्ये नेमके काय आहे
हे जाणून घ्यावे. त्यासाठी सर्व मार्गाचा वापर करावा महाराजांनी पंताजी बरोबर गुप्तहेर दिले होते. तेच गुप्तहेर छावणीत घुसून खानाच्या बातम्या काढणार होते, राजनीति म्हणते जेव्हा आपला वकील शत्रुबरोबर बोलणी करण्यास जातो. तेव्हा त्याच्या बरोबर गुप्त हेर घ्यावेत. गुप्तहेराच्या मदतीने राजा शत्रूच्या सैन्यामध्ये भेद करू शकतो. मुत्सध्यामधील गुप्त माहिती सहजगत्या मिळवू शकतात.
महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ व कृष्णाजी भास्कर प्रतापगडावरून उतरून खानाच्या छावणीकडे चालले. महाराजांच्या कुट सामनीतिचा अध्याय सुरू झाला. सामनीतिचे मंत्रयुद्ध अतिशय चतुरपणाने खेळावे लागते. यामध्ये शत्रुस आपल्या योजनेची किंवा मनोवृत्तीची कोणत्याही प्रकारची अवस्था माहित न होऊ देता आपल्या कुटमंत्राचा प्रयोग करावा लागतो. या सामनीतिच्या कूटमंत्रात जो जिंकतो तो अंतिम लक्ष्य प्राप्त करतो.
कृष्णाजी भास्कर व पंताजी गोपिनाथ खानाच्या छावणीजवळ आले. प्रथम कृष्णाजी खानाच्या छावणीत गेले. खान अधिक उतावीळ झाला होता. शिवाजी नेमका काय म्हणतो हे ऐकण्यासाठी आतुर झाला होता.
कृष्णाजीने महाराजांचे म्हणणे सांगितले,
“शिवाजीस सर्व गुन्हे कबूल आहेत झालेल्या गैरवर्तनाबद्दल पश्चात्ताप आहे शिवाजीने जिंकलेला मुलुख, गडकोट व जावळीसुद्धा खानसाहेबांच्या स्वाधीन करण्यास तयार आहे. परंतु शिवाजीस भेटीसाठी वाईस येण्यास भिती वाटते. खानसाहेबांनी स्वतः जावळीत यावे.
आपल्या वकिलामार्फत शिवाजीचे म्हणणे ऐकले व खानाने गोपीनाथ पंतांना आत बोलावले. गोपीनाथापंतानी महाराजांचे पत्र खानाजवळ दिले व खानास म्हणाले,
“शिवाजी राजा भित्रा आहे. वाईत भेटी घेण्यास धीर येत नाही. जसे शहाजी राजास महाराज भितात तसे आपणांसही भितात. खानसाहेब वडिल आहेत. आपण जावळीत आलात तर राजे आपल्या भेटीस येतील.”
गोपीनाथपंतांनी कपटाने आपल्या योजनेस अनुरुप व शत्रुस विश्वास बसावा यासाठी खानसाहेबांस वडिलपणाचा मान देऊन बडिलपणाने जावळीत भेटण्यास म्हटले होते. पुत्र जैसा वडिलास भितो अशा पद्धतीने महाराज भितात असे मत प्रगट करून आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न केला होता.
गोपीनाथपंत त्या दिवशी प्रतापगडी माघारी न जाता खानाच्या छावणीत मुक्काम केला. खानाच्या मनात नेमके काय आहे हे जाणूनन घ्यायचे होते.. गोपीनाथ पंतांनी मोठी सरदार, खानाचे मुत्सद्दी मंडळी यांच्यावर धनाचा प्रयोग केला. दामनीति वापरून, सरदार व मुत्सद्दी मंडळीस खुष करून गोड बोलून खानाच्या मनातील बेत जाणून घेतला. गोपीनाथ पंताना खानाच्या गुप्त कपटी कारस्थानी बेताचा सुगावा लागला होता. खानाच्या मनात ‘शिवाजीस सल्ला करण्याच्या निमित्ताने, भेटीस बोलावून, ठार मारणार आहे. असे योजले होते.
महाराजांचे डाव अचूक पडत होते. महाराजांच्या पत्रातील लेखन ही, मला भीती वाटते, आपण वडील खानास मोठेपणा देऊन गुणकिर्तन गायले होते.
खानाने जावळीत भेटी घेण्याविषयी काहीही म्हटले नाही. गोपीनाथपंत माघारी प्रतापगडी आले. गोपीनाथपंतानी खानाची बाह्य लक्षणे आपल्या तीक्ष्ण चतुर नजरेने हेरली होती. खानाच्या मनातील ‘महाराजांना मारण्याचा बेत’ त्याच्याच सरदार मंडळीवर धनाचा प्रयोग करून जाणून घेतला होता.
गोपीनाथपंतांनी महाराजांना सर्व माहिती सांगितली. खानाच्या मनात कपट आहे हे निश्चित आले होते. खानाच्या मनात ‘सल करून मैटीस बोलवावे व मारावे’ असे होते. त्यामुळे खान आज ना उद्या जावळीत नक्की भेटायला येणार खानाला जावळीत येण्यास पूर्ण भरवसा वाटावा व आपला हेतू साध्य होईल असा विश्वास खानास घ्यायचा होता. म्हणून महाराजांनी खानाने स्वतः जावळीत यावे म्हणून पुन्हा गोपीनाथपंतांना वाईत खानाच्या छावणीत पाठवण्याचे ठरवले खानास
जावळीत आणण्याच्या योजनेस रूप घ्यायचे होते त्यासाठी खान जावळीत येण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. खानाच्या मनातील हेतू महाराजांना माहिती होता. त्यानुसार महाराजांनी सामनीतिच्या कुट शब्दप्रयोगाची योजना केली व गोपीनाथपंतास खानाच्या छावणीत पाठवले. शिवाजी राजा मित्रा आहे ही मानसिकता खानाची तयार करून शिवाजी त्याच्या हाता मध्येच आला आहे असे त्यास भासवायचे होते. गोपीनाथपंत खानासमोर गेले. ‘राजा कचदिल आहे. वाईस येण्यास भितो. आपण जावळीत ससैन्य याव. दिलासा देऊन राजास बरोबर घेऊन जावे,’
गोपिनाथपंत खानाच्या मनातील बोलले. या बोलण्याने खान जावळीत येऊन महाराजांची भेट घेण्यास तयार झाला. खानाने गोपीनाथपंताजवळ अभयाची क्रिया शपथ मागितली. गोपनिथापंतानी ती लगेच दिली.
खानाबरोबर पंतांनी शब्दांचा कुटील खेळ मांडला होता. या कुटील छळवादी मोहजालात खानास पुरते घेतले होते. या छळवादी कुटील शब्दाचा आशय स्वधर्म स्वराज्य वाचवणे होता. म्हणून हा कुटील शब्दाचा छळ योग्य नैतिक होता.
गोपीनाथ पंताच्या छळामुळे खान जावळीत येण्यास तयार झाला होता. पंतांनी तात्काळ योजनेप्रमाणे पुढील व्यूहाची आखणी करण्यासाठी, वेळ उपलब्तेसाठी एक दुसरा अर्ज खानापुढे मांडला.
‘आपण ससैन्यासह जावळीत येणारा मार्ग नीट नाही, त्यासाठी पंधरा दिवस वाईस मुक्काम करावा. रस्ता चांगला करून आपल्या सवेत हजर होईल.’ खानाने या अर्जास मंजुरी दिली.
खान जावळीत ससैन्य आला. खानाने महाराजांच्या मोहात आयुष्य गमावण्याची चूक केली होती. खानासारख्या योद्ध्याला महाराजांनी मोहिनी घातली. अफजलखान जावळीत आल्याबरोबर राजांनी भेटीस यावे असे दोन तीन वेळा. निरोप पाठवले. परंतु महाराजांनी दोन तीन वेळेस भेटीला येण्यास नकार दिला व कारण सांगितले जावळीत येण्याची भिती वाटते. खान महाराजांना भेटण्यासाठी उतावीळ झाला होता, कधी शिवाजीस मी मारतोय असे झाले होते. महाराजांनी
भेटीला नकार देऊन खान महाराज म्हणतील त्या जागी भेटण्यास तयार झाला.
महाराजांनी भेटण्याचा तपशील अतिशय विचार पूर्वक ठरवला. त्यातील सर्व अटीस खान मान्य करील असाच अटीचा तपशील ठरवला होता. या भेटीच्या अटीमधून महाराजांनी खानास पूर्णपणे वेगळे केले होते.
या अटी निश्चित करून गोपीनाथपंताना भेटीचा तपशील ठरवण्यासाठी पाठवले. महाराजांनी त्यांच्याविषयी थोडासाही अविश्वास व शंका खानाच्या मनात उद्भवू दिली नाही. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर व गोपीनाथपंतांनी भेटीच्या अटी ठरवल्या. गोपीनाथपंतांनी कुटव्यवहाराने महाराजांच्या कुटील कारस्थानानुसार भेटीचा तपशील दोघांच्या संमतीने ठरवला. अफजलखानाने भेटीच्या तपशीलाला मंजुरी दिली. महाराजांची भेट घेऊन कधी मारतो असे खानाचे झाले होते.
भेटीच्या तपशीलानुसार आपले संपूर्ण सैन्य छावणीत राहिल. खानाने पालखीत बसून सशस्त्र यावे. स्वतः बरोबर स्वतःच्या संरक्षणासाठी दहा सैनिक घ्यावेत व त्यांना शामियान्यापासून बाणाच्या टप्यावर ठेवावे. याच अटींचे पालन महाराजांनी करावे. भेटीची जागा प्रतापगडच्या पायथ्याजवळील एका माचीवर राहिल. तेथील शामियाना
महाराजांनी उभा करावा. किंवा खानाचा वध करणे हे महाराजांचे मुख्य लक्ष्य होते. वाईमध्ये जावळीत खानाच्या छावणीत जाऊन भेट घेऊन ते साध्य होणे अशक्य होते. महाराजांना खानाच्या वधाबरोबर त्याची सारी फौज बुडवायची होती. ते वाईत शक्य नव्हते तर जावळीत ससैन्य आणून विकट परिस्थितीमध्ये आपोआप कोंडले जात होते. या जावळीच्या प्रदेशात घनदाट अरण्यात, डोंगरदऱ्यात आपल्या कमी फौजेनिशी त्यांचा धुव्वा उडवणे शक्य होते. महाराजांनी खानाचे सैन्य जावळीत आणले. अफजलखानाचा वध करण्यासाठी जावळीतील सैन्यापासून त्यास वेगळे करणे आवश्यक होते. त्यामुळे भेटीस बरोबर सैन्य आणू
नये अशी अट टाकली.
महाराजांनी दुसरी अट सशस्त्र येण्याची टाकली होती. महाराजांनी विनाशस्त्र अट टाकली असती तर भेटण्यापूर्वी अंग तपासणी घ्यावी लागणार होती. खानाच्या मनातील कपट महाराजांना माहित असल्यामुळे अफझलखान भेटीच्या वेळी महाराजांना दगा करणार होता व त्यावेळी महाराजांना घातक छुप्या शस्त्राचा प्रयोग खानावर करायचा होता. कोणतीही योजना बनवताना सामान्यातील सामान्य शस्त्र ही घातक असावे. त्याने शत्रूचे मर्म भेदून प्राण घेण्यासही ते सक्षम असावे. महाराजांनी सशस्त्र येण्याची अट टाकून बलाढ्य खानास छुप्या शस्त्राने मारण्याच्या योजनेचा मार्ग मोकळा केला होता, महाराजांना वाघनखे व बिचवा या गुप्तशस्त्राचा अचूकपणे खानावर प्रयोग करायचा होता.
Politics of Afzal Khan Slaughter
महाराजांनी तिसरी अट टाकली की, स्वतः बरोबर दहा शुर संरक्षक घ्यावेत व त्यांना शामीयाण्यापासून बाणाच्या टप्प्यावर ठेवावेत याचा अर्थ असा की, प्रत्यक्ष शामियान्यांमध्ये अफजलखान एकटा राहवा व आपला कार्यभाग साधण्यात त्यांचा कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये. याच अटींचे पालन महाराज ही करणार होते.
महाराजांनी आपल्या नीतिने खानास महाराजांनी निश्चित केलेल्या ठिकाणी भेटण्यास भाग पाडले. महाराजांनी भेटीची जागा प्रतापगडच्या पायथ्याला एका माचीवर ठरवली होती. याच ठिकाणी भेटीचा शामीयाना उभा करायचा होता. शामीयाना अशा पद्धतीने उभा केला होता की, त्यातील संपूर्ण हालचाल गडावरून स्पष्टपणे दिसत होती. परंतु याच भेटीच्या शामियान्याचे ठिकाण खानाच्या सैन्यास दिसत नव्हते. महाराजांनी भेटीची जागा ही सूक्ष्मपणे विचार करून निवडली होती. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी शामियान्यामध्ये काही जरी गोंधळ झाला तरी खानाच्या सैन्यास समजणार नव्हते. महाराजांनी उभारलेला शामियाना ही अतिशय किंमती व भव्यदिव्य होता, यातून महाराजांना खानाचे मन मोहून टाकून त्याचे संपूर्ण लक्ष विचलित करायचे होते.
महाराज व अफजलखान भेटीचा दिवस शके १५८१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सहसप्तमी गुरुवार दि. १० नोव्हें. १६५९ रोजी होता उभारलेल्या शामीयान्यात दुपारी भेट व्हावी असे ठरले.
खानास एकांतात शामीयान्यामध्ये आणायचे होते. हे अतिशय जोखमीचे काम होते. महाराजांचे गुप्तहेर क्षणाक्षणाच्या बातम्या महाराजांजवळ पोहचवत होते. खानाबरोबर हिऱ्या मोत्यांचे व्यापारी आहेत हे महाराजांना समजले. त्यांनी पंताना व्यापाऱ्यास पाठवून देण्याचा निरोप पाठवला.
पंतांनी खानासमोर अर्ज केला की, ‘राजा आपल्याबरोबर आलेल्या प्रतिष्ठित सरदारांचा आपल्या सारख्या वडिलधाऱ्यांचा मानसन्मान करू इच्छितात, तरी आपणाबरोबर आलेले हिऱ्या मोत्यांचे व्यापारी यांचा सर्व माल राजा खरेदी करू इच्छितो, तर व्यापाऱ्यांना गडावर जाण्याची परवानगी द्यावी.”
खानाने लगेच परवानगी दिली. राजा सर्व माल खरेदी करतोय व्यापारीही खूष झाले. विनासायस प्रचंड संपत्ती महाराजांना प्राप्त झाली. व्यापाऱ्यांना परतीसाठी प्रतापगडचे दरवाजे बंद झाले.
महाराजांनी संपूर्ण लष्करी व्युहरचना तयार केली. खानाचे संपूर्ण सैन्य पाराच्या रानात व जावळीत होते. खानाच्या वधानंतर हे सैन्य प्रतापगडावर चालून येण्याची शक्यता धरून त्यांना रोखण्याची जबाबदारी कान्होजी जेधे व बांदल देशमुख यांच्याकडे सोपवली. पार घाटात मोरोपंत पिंगळे, शामराज पंत, त्र्यंबक भास्कर तसेच कोयनेच्या पूर्वेस बोचेघोळीच्या घाटात बाळाजी शिळीमकर व सरसेनापती नेताजींना घाटमाथ्यावर थांबण्यास सांगितले. अशा रीतीने आपल्या सैन्याच्या साह्याने संपूर्ण जावळीचा प्रदेश आपल्या व्यहूरचनेने बंदिस्त करून टाकला. जावळीतील लहान वाटा झाडे तोडून बंद केल्या. अचूक युद्धनीतिने खानाचे सैन्य कोंडले होते. तोफेच्या आवाजाचा संकेत होताच. सैन्यास तुटून पडण्याचा व खानाचे सैन्य बुडवण्याचा आदेश होता. भेटी ठरलेल्या दिवसाच्या अगोदरच्या रात्री सर्व सरदार नेमुन दिलेल्या जागी लपून बसले. महाराजांच्या कोणत्याच हालचालीची
ओळख खानास किंवा त्याच्या सैन्यास होऊन दिली नव्हती.
खान कपटी होता, विश्वासघातत्याच्या बुद्धीत बसला होता. यापूर्वी त्याने शिरेपट्ट्णचा राजा ‘कस्तुरीरंग’ याला भेटीस बोलावूल दगाबाजीने आपल्या बाहुने दाबून मारले होते कनकगिरीच्या वेढ्यात विश्वासघाताने संभाजीराजेंना मारले होते.
अफजलखानाला महाराज भेटण्यास जाणार होते. त्याच्या अगोदर महाराजांनी भेटीस कसे जावे याविषयी मुत्सद्यांबरोबर चर्चा केली. खानाचा संपूर्ण संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या वृष्टीने योग्य अशी वेषभूषा ठरवली. महाराजांनी अंगात चिखलत घातले. त्यावर कुडता त्यावर अंगरखा परिधान केला डोक्यावर भंदील व त्यावर जिरेटोप घातला. डाव्या हाताच्या पंजामध्ये गुप्त घातकी शस्त्र वाघनखे लपवले. हाताच्या आस्तनी मध्ये बिचवा लपवला. आपली तलवार व पट्टा धारण केला.
भविष्याच्या दृष्टीने स्वराज्याला नेटाची उभारी देण्यासाठी खानाचा वध होणे गरजेचे होते. व त्यासाठी आतापर्यंतचे कारस्थान खेळले होते.
खानास भेटीच्या नियमानुसार आणायचे होते. खानाच्या उतावीळ आणि कपटी स्वभावान्वये अचानक वेगळा निर्णय घेऊन योजनेस वेगळे वळण देऊ शकत होता. खानास जबाबदारीने व भेटीच्या अटीनुसार घेऊन येण्यासाठी महाराजांनी पंताजी गोपीनाथ यांना खानाच्या छावणीत पाठवले. महाराजांची संपूर्ण वेषभूषा झाली होती. महाराजांनी आपल्या हेरामार्फत खानाचा पोषाख जाणून घेतला होता. खानाने दररोजच्या प्रमाणे पोषाख घातला होता. खानाची तयारी झाली होती. त्याच्या पाठीमागे दीड हजार सैनिक उभे होते.
गोपनीथ पंताना लगेच हा धोका समजला. योजनेत आकस्मित संकट निर्माण झाले होते. तात्काळ गोपीनाथापंत खानासमोर जाऊन म्हणाले, “इतका जमाव घेऊन गेलियाने राजा माघारी गडावर जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय? त्याचा इतका सन्मान काय करावा?”
अतिशय अचूक शब्दप्रयोग केला, राजा भेटीस येणार नाही म्हटल्याबरोबर खान अटीनुसार दहा शूर संरक्षक घेऊन पालखीत
बसून निघाला. अफजलखान शामियान्यात आला तेव्हा भव्य शामियाना पाहून चकीत झाला. महाराजांनी त्याचे मन मोहून टाकले होते.
खान शामियान्यातील सरदेवर बसला. पंतांनी महाराजांना बोलावण्यासाठी जासूद पाठवला. भेट दुपारी ठरली होती. खान आल्यानंतरही थोडा भेटीस वेळ लावला. उशिरा येऊन शिवाजीराजा भितो यावर विश्वास बसवला.
महाराज भेटण्यास तयार होते. तोफेच्या जवळ पेटत्या मशाळी सज्ज ठेवल्या होत्या. खानास मारल्यानंतर तोफेचा आवाज करून आपल्या सैन्यास खानाच्या फौजेवर तुटून पडण्याचा संदेश घ्यायचा होता.
महाराजांची योजना कठीण होती. मार्ग संकटांनी भरलेला होता. भेटीच्या वेळी काय होईल हे सांगता येत नव्हते. परंतु महाराज आपल्या कार्यास रूप देणार होते. योजनेत प्रत्यक्ष कार्याच्या वेळी महाराजांचा मृत्यू झाला तर संभाजी राजेंच्या आज्ञेत राहण्याची सुचना महाराजांनी आपल्या मुत्सद्यांना केली होती.
जासूद येताच महाराजांनी शामियान्यातील व बाहेरची संपूर्ण स्थिती विचारली. शामियान्यात खानाजवळ सय्यद बंडा आहे हे समजले होते. महाराज आपल्या दहा शूर संरक्षकांनिशी निघाले. शामीयाना नजरेच्या टप्प्यात येताच थांबले व जासुदास गोपीनाथपंताना बोलावण्यास पाठवले.
गोपीनाथ पंत महाराजांकडे आले. महाराज गोपीनाथ पंतास म्हणाले, “जैसे महाराज तैसे खान. आपण खानाचा भतीजा होय. ते वडील सय्यद बंडा खानाजवळ आहे त्याकरिता शंका वाटते. हा सय्यद बंडा इतका त्यातून दूर पाठवणे.”
महाराज अतिशय सावधपणे आपले लक्ष्य खानावर ठेवत होते. सय्यद बंडा खानाजवळ राहिला असता तर महाराजांना धोका निर्माण होऊन खानाच्या वधाचा कार्यभाग साधला नसता. खान शामियान्यात
एकटा हवा होता.
गोपीनाथपंताने खानाच्या वकीलाजवळ जाऊन सय्यद बंडास दूर करण्यास सांगितले. कृष्णाजी भास्कर खानाजवळ जाऊन सय्यद बंडाविषयी सांगितले. खानाने सय्यद बंडाला दूर केला.
महाराजांनी खानास शामियान्यामध्ये एकटा केला. महाराजांनी खान एकटा करण्यासाठी खेळलेल्या राजनीतिच्या चाली यशस्वी झाल्या होत्या, महाराजांनी आपल्या सैन्यानिशी शामियान्यावर हल्ला करून किंवा शामियान्यात केगळ्या पद्धतीचा घातपात करून खानास मारता येत होते. परंतु महाराजांना अफजल खानाचा वध करायचा होता.
महाराज शामियान्यात आले. खान उतावीळ होता. दोन्ही वकिलांनी महाराज व खान याची औपचारीक ओळख करून दिली.
यानंतर भेटीचे आलिंगन दिले. महाराज सावध होते. खानाने अलिंगन देता वेळेस महाराजांची मान डाव्या बगलेत दाबली. आपली कट्यार महाराजांच्या डाव्या खुबीत खुपसली अंगातील चिलखतामुळे कट्यार खरखटली. महाराजांनी चतुरपणे योजनेतील वाघनखे व बिचवा या गुप्त शस्त्राचा प्रयोग केला. साधारण शस्त्र घातक बनले. त्याच्या साह्याने खानाचा कोथळा बाहेर काढला. मातृभूमीसाठी, स्वराज्यासाठी शत्रूच्या छातीवर, पाठीवर किंवा पोटावर वार केला तरी तो योग्यच असतो. अशा कुटील योजनामध्ये नैतिक मार्ग स्विकारणे अशक्य असते. म्हणून लक्ष्य उचीत असेल तर त्यासाठी कोणताही मार्ग अवलंब करावा. लोकांस तो अनैतिक वाटेल परंतु तो योग्य असतो. आपल्या मातृभुमीवरील संकटल्याने दूर होणार असते.
महाराजांनी गुप्त शस्त्राच्या साह्याने खानाचे पोट फाडले होते. खान मोठ्याने दगा दगा, शत्रूने मला ठार केले असे ओरडला व झोकांड्या देत शामीयान्या बाहेर जाऊन पालखीकडे जाऊ लागला. कृष्णाजी भास्करने महाराजांवर वार केला. महाराजांनी कृष्णाजीस ठार केले. यावेळी महाराजांच्या कपाळावर गव्हाएवढी जखम झाली. तेवढ्यात सय्यद बंडा महाराजांवर शस्त्र उगारून आला. जिवा महालाने त्यास ठार केले. पालखीचे भोयांनी खानास पालखीमध्ये टाकून
घेऊन चालले इतक्यात कावजी संभाजी याने भोयांचे पाय छाटले, खान खाली पडला. संभाजी कावजीने खानाचे मुंडके धडापासून कापले. खानाचे सर्व अंगरक्षक मारले गेले.
महाराज तात्काळ प्रतापगडाकडे निघाले. योजनेत ठरलेल्या प्रमाणे तोफेचा; आवाज केला. सर्व सैन्यास महाराजांनी खानाच्या फौजेवर तुटून पडण्याचा संकेत दिला. मात्र तोफेचा आवाज भेटी झाली असावी त्यामुळे दिला असावा असा ग्रह खानाच्या फौजेचा झाला. खानाच्या वधाची बातमी कळण्या अगोद सर्व सैन्यावर मराठे तुटून पडले. खान मारला हे समजातच संपूर्ण फौजेचे अवसान गळाले. महाराजांनी आपल्या सामनितीच्या कुटील चालीने खानास व त्याच्या फौजेस पूर्णपणे आपल्या चक्रव्यूहात फसवले होते. खानाची फौज
बुडाली. अनेक सरदार जंगलात पळून गेले.
महाराजांचे अफलजखान वधाचे ‘कुटयुद्ध’ याची योजना यशस्वी झाली होती. खान कपटी होता म्हणून महाराजांनी त्याचे कपटाने उच्चाटन केले.
राजनीतिनुसार जेव्हा राजा कपटचातुर्य करतो तेव्हा आपली दुष्कीर्ती होणार नाही असा सावधपणा ठेवावा लागतो. व तो महाराजांनी ठेवला होता, याच घटनेने महाराजांची किर्ती वाढली होती. महाराजांनी अफजलखानाचा वध करून स्वराज्याच्या इतिहासातील एक कुटील अध्याय समाप्त केला होता.
महाराजांच्या पुढील राजनीतिचे विश्लेषण पुढील प्रकरणात होईल.
अफजलखान वधानंतरची राजनीति
Politics after Afzal Khan Assassination
महाराजांसारख्या राजनीतितज्ञाने आपल्या बुद्धीच्या बळाने अफजलखानाचा निःपात केला होता. अफजलखानाचा वध झाल्यामुळे जगदंबा शांत झाली होती. महाराजांनी खानाचा वध केल्यामुळे संपूर्ण सत्तांना विलक्षण धास्ती बसली होती. सर्व सत्ता आपआपल्या परीने खानाच्या वधाचे विश्लेषण करत होत्या. सर्वसामान्य रयत महाराजांची किर्ती गाऊ लागली. या घटनेमुळे महाराजांना तुळजाभवानी प्रसन्न असून ते साक्षात दैवी पुरुष आहेत असे सर्वांना वाटू लागले. संपूर्ण रयतेचा विश्वास महाराजांवर बसला.
अफजलखानाच्या रुपात एक शूर पराक्रमी पण तेवढाच कपटी, नीच, धर्मांध शत्रु संपवला हेता. त्यामुळे स्वराज्याचा विस्तार करण्याची ही अनुकूल वेळ निर्माण झाली होती या अनुकूल झालेल्या स्थितीचा फायदा महाराजांनी घ्यायचे ठरवले. महाराज एक योद्धा सेनानी व उत्तम राजा होते.
राजनीतिच्या सिद्धांतानुसार एक उत्तम सेनानी व एक उत्तम राजा तोच जो मिळालेल्या विजयाचे श्रेय आपल्या सैनिकास व प्रजेस देतो. आणि मिळालेल्या विजयाच्या उत्सवात रमुन न जाता, वेळेचे महत्त्व ओळखून आपल्या राज्याच्यादृष्टीने नवीन राजकीय समीकरणे बनवतो. आपल्या राजनीतिने नव्या योजनास घटीत रूप देतो.
महाराजांनी आदिलशहाचा बलाढ्य सेनानी मारला होता. त्यामुळे संपूर्ण आदिलशाही दुःखात बुडाली होती. आदिलशहा, त्याचे सरदार, जहागिरदार, मन्सबदार, वतनदार यांच्या मनात महाराजांविषयी भिती निर्माण झाली होती. राजनीतिच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या
सयाकीच्या मनात आपल्याविषयी भिती निर्माण होते. तेव्हा ती व्यक्ती मनामध्ये भिती घेऊन त्याच्या सावटाखाली जगत असते. अशा व्यक्तीवर किंवा राजाच्या राज्यावर आक्रमण केले असता मग तो कितीही बलाढ्य असला तरीही तो मनातील भीतिमुळे परास्त होऊ शकतो.
अफजलखान वधामुळे आदिलशहावर मोठे संकट ओढवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या संकटामुळे आदिलशाहीमध्ये काळजी, चिंता आणि भिती याचे सावट होते. तर महाराजांच्या सैन्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. महाराजांनी आपल्या अनुकूल स्थितीचा आणि आदिलशहाच्या कमजोरीचा फायदा घेण्यासाठी एका मोठ्या मोहिमेचे नियोजन केले. आक्रमक चढाई युद्ध धोरणाचा स्विकार करून आदिलशहाचा जेवढा प्रदेश आपल्या स्वराज्यामधे आणता येईल तेवढा आणायचा होता. आपल्या धोरणानुसार आक्रमक चढाई शत्रु प्रदेशावर करून खटाव, कऱ्हाड, मसूर, मायणी, रामपूर कलेढोण, वाळपे, विसापुर, कोळे, कोल्हापूर व त्यापर्यंतचा संपूर्ण प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर महाराजांनी पन्हाळगड ही जिंकून घेतला. पन्हाळागड भौगोलिक दृष्ट्या अतिशय मजबूत होता. थेट आदिलशाहीवर दबाव आणता येत होता. शत्रूच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. संपूर्ण दक्षिण कोकणावर लक्ष ठेवता येत होते व पुढील मोहिमांच्या सत्ता केंद्राच्या दृष्टीने महत्त्वाचा गड होता.
महाराजांचे आक्रमण पाहता अतिशय कमी दिवसात मोठा प्रदेश स्वराज्याला जोडला होता. महाराजांच्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी रुस्तमेजमान याच्या नेतृत्वाखाली अनेक सरदार देऊन महाराजांवर पाठवले. यावेळी कोल्हापुरजवळ झालेल्या लढाईत महाराजांनी रुस्तमेज मानचा पराभव केला. महाराजांनी त्यास पळून जाण्याची संधी दिली.
महाराजांना रोखण्यासाठी आदिलशहाने औरंगजेबाला पत्र लिहिले हेोते. शत्रूचा शत्रू तो आपला शत्रू या राजनितीच्या नियमानुसार आदिलशहा
औरंगजेबास महाराजांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी विनंती करीत होता. औरंगजेब बादशहा बलाढ्य होता. त्याच्या निर्णयाची प्रतिक्षा आदिलशहा पाहत होता.
पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराजांनी रात्री मशालीच्या उजेडात गड पाहिला. अतिशय चांगला गड होता. रुस्तेमेमान यास पराभूत करून महाराज पन्हाळगडावर आले. पुन्हा नव्याने विजापूरपर्यंत धडक मारायची अशी मोहिम आखली गेली.
अफजलखानाची मालकीची तीन गलबते, दाभोळ बंदरात होती. याची माहिती महाराजांना होती. ती गलबते ताब्यात घेण्यासाठी दोरोजी या सरदारास पाठवले. परंतु या गलबतांना इंग्रजांनी संरक्षण दिले. धूर्त इंग्रजांचा कावा दोरोजीच्या लक्षात आला. इंग्रज काहीही करून दोरोजीस गलबताचा ताबा देत नव्हते. इंग्रजांच्या अशारितीमुळे महाराजांनी त्यांच्याशी त्याच पद्धतीचे धोरण स्विकारले. महाराजांचे यावेळी मुख्य लक्ष्य आदिलशहावर होते.
याचवेळी मसुरचा देशद्रोही सुलतानजी जगदाळे याचा शिरच्छेद केला. अशा दशद्रोही स्वजनांचा कायमचा काटा काढला पाहिजे अशा आप्त शत्रूपासून आपले कार्य सुरक्षित ठेवले पाहिजे.
महाराजांची विजयी घोडदौड सुरू होती. महाराजांची एक तुकडी कोकणात तर एक नेताजींच्या नेतृत्वाखाली थेट विजापुरच्या आसपास धुमाकूळ घालत होती. महाराज स्वतः मिरजेच्या कोटाला वेढाला घालून बसले होते. महाराजांचे गुप्तहेर आदिलशाहीतील राजकीय घडामोडी दररोज देत होते. मोगलांच्या अंतर्गत गोटातील बातम्या ही मिळत होत्या.
महाराजांना गुप्तहेरांकरवी मिळालेल्या बातम्याने पुन्हा राजनीति बदलणार होती. आदिलशहाने कर्नुळचा सिद्दी जौहर यास महाराजांवर पाठवले होते व आदिलशाही मोगलांचा बादशहा औरंगजेब याचाशी केलेली बोलणी ही यशस्वी झाली होती. मोगलांचा सरदार दख्खनचा सुभेदार शाईस्तेखान स्वराज्याच्या रोखाने निघाला होता.
स्वराज्य दोन्ही बाजूंनी संकटात सापडणार होते. शत्रूच्या
दोन्ही बाजूंना शह देण्यासाठी दुहेरी नीति अवलंबवावी लागणार होती. अशा विपरित परिस्थितीमध्ये महाराजांचे दुहेरी नीतिचे धोरण, यातच निर्माण झालेली पन्हाळ्याची संकटकालीन स्थिती यातून बाहेर पडण्यासाठी महाराजांच्या बुद्धीश्रृंखलातून निघालेली एक अद्भुत योजना, पन्हाळ्याच्या वेढ्यातील कारस्थान व त्यासाठी वापरलेल्या राजनीतिचे समर्पक दर्शन पुढील प्रकरण ‘पन्हाळ्याच्या वेढ्यातील राजनीति’ यामध्ये होणार आहे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.
1 thought on “Politics of Afzal Khan Slaughter and Politics after Afzal Khan Assassination | अफजखान वधाची राजनीति आणि अफजलखान वधानंतरची राजनीति”