बौद्ध धर्माचे पुनरुत्थान करा आणि बुद्धधर्म : हाच खरा समतेचा धर्म !
बौद्ध धर्म हा अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचं धर्म आहे, ज्याला धर्मांतर करण्याची आवड नाही. बुद्धधर्म अखंड समतेचा, प्रेमाचा, आणि शांतीचा धर्म असून, त्याला स्वतंत्रतेचा आणि स्वाध्यायाचा मोल आहे. हे अद्वितीय धर्म आपल्या समाजात फिरवण्यासाठी, आपल्या मानवी परंपरेत नवे उद्यान सुरू करण्यासाठी, आणि समाजाच्या सर्वांत सौम्य स्वरूपाला पुन्हा साकार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या विशेष ब्लॉगमध्ये, आपल्याला बौद्ध धर्माच्या महत्त्वाच्या संदेशांची मान्यता देण्यासाठी, त्याचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि त्याच्या पुनरागमनाच्या प्रशंसा करण्यासाठी आणि बौद्ध धर्माच्या संदेशांच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांच्या उद्यानातून उद्भवलेला एक अत्यंत प्राचीन धर्म आहे. हे धर्म मानवतेच्या मूल्यांच्या मुलाखतीत विश्वास करते आणि समाजात समतेचा, प्रेमाचा, शांतीचा आणि क्षमाचा आदर्श प्रस्थापित करते. बुद्धधर्मातील मूल सिद्धांत म्हणजे ‘चार नोब्ले ट्रुथ्स’ (Four Noble Truths) आणि ‘आठ अस्थायी ध्यानाची अष्टपैलू’ (Eightfold Path) या अद्वितीय सिद्धांतांवर आधारित आहे.
बौद्ध धर्मात, समग्र मानवसमुदायातील सर्व जीवन रूपे, जातिवाद, असमानता आणि हिंसाच्या विरोधात लढण्यात मानवतेचा महत्त्वाचा संदेश दिला जातो. त्यामुळे, बौद्ध धर्माचा पुनरुत्थान म्हणजे समाजात समतेच्या आणि आपल्या प्राणी सहभागाच्या मूल्यांच्या पुनरागमनाच्या प्रचारासाठी प्रयत्न करणे. आजच्या संदर्भात, बौद्ध धर्माचे पुनरुत्थान आवश्यक आहे कारण हा धर्म समाजातील समतेचा, शांतीचा, आणि प्रेमाचा मार्गदर्शन करतो आणि समुदायात भ्रष्टाचार, असमानता, आणि हिंसा यांच्यावर विरोध करतो.
बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाच्या अधिक विचारांसाठी, धर्माच्या मूल्यांच्या समजूतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी सामाजिक, मानविक आणि आर्थिक परिस्थितीत बौद्ध धर्माचा महत्त्वपूर्ण अवलंब केला जाऊ शकतो.
बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाचा एक महत्त्वाचा पहिला कदम हा शिक्षण आणि ज्ञानाच्या महत्त्वाच्या प्रमोटीची प्रेरणा करणं आहे. ध्यान, ध्यान, आणि धर्मचिंतन ह्या सर्व प्रथमच्या बौद्ध सिद्धांतांमध्ये आहेत. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ह्या मूल्यांच्या विचारांच्या प्रसारासाठी प्रोत्साहित केलं जाणे आवश्यक आहे.
दुसरं महत्त्वाचं कदम हा समाजातील अशा संस्कृतींचा समर्थन करणं आहे ज्यामध्ये समतेच्या, प्रेमाच्या, आणि शांतीच्या मूल्यांच्या सानिध्य आहे. बौद्ध धर्मानंतर समाजात सर्वांना समानतेचं विश्वास करावं आणि विविधतेच्या मूल्यांच्या विरोधात लढण्यात संलग्न असणं महत्त्वाचं आहे.
आणि शेवटी, बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानात आपलं स्वतंत्रतेचं, स्वाध्यायाचं, आणि आत्मनिर्णयाचं महत्त्वपूर्ण भाग आहे. ह्या धर्माच्या सिद्धांतांच्या आधारावर, लोकांना त्यांच्या स्वतंत्रतेला सहलंदार बनवण्याची शिक्षा दिली जाऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सामाजिक आणि मानविक परिवर्तन सोपवण्यात मदत होईल.
संग्रह – बौद्ध धर्माचे पुनरुत्थान करा(रंणूल दि. ३-१२-५४)
सभ्य गृहस्थ हो,
मला या पवित्र ठिकाणी अधिवेशनास बोलविल्याबद्दल येथील चालक मंडळीचे प्रथमतः आभार मानतो.
या ठिकाणी जमलेले आपण सर्व बुद्धानुयायी आहोत. जगातील इतक्या राष्ट्रांतून बौद्धधर्म प्रचलित असला तरी देखील त्याचा प्रसार जितक्या झपाट्याने व्हायला पाहिजे तितका झालेला नाही, हे मला मोठ्या खेदाने म्हणावे लागते. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये सिलोन आणि ब्रह्मदेश ही दोन राष्ट्र बौद्धधर्माभिमानी या दृष्टीने बरीच आघाडीवर आहेत असे दिसते. परंतु माझ्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्रांची बौद्धधर्माच्या प्रचाराची कार्यपद्धती अगदीच वाखाण्याजोगी नाही. सिलोमनमधील श्रीमंत स्त्रियादेखील खूप पैसे दान देतात. पण
धर्माच्या नावाने जमा होणारे हजारो रुपये ते धार्मिक उत्सव प्रसंगी निरर्थक खर्च करतात. घरादारांना व झाडांन विजेचे दिवे लावून हवी ती आरास करण्यास ते पैसे खर्च करतात. त्याऐवजी धर्मासाठी खर्च होणारा पैसा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी खर्च झाला पाहिजे. असे माझे स्पष्ट मत आहे. रैश्वर्य नि शोभा या गोष्टी भगवान गौतमबुद्धांना मुळीच पसंत नाही. देशात धर्म प्रचाराच्या संस्था निर्माण कून त्या मार्फत महात्मा गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचे बी पेरावे. पण हे आपले सिलोनी बंधू असे का करीत नाहीत. याचे
मला मोठे नवल वाटते. तसेच या देशातील (ब्रह्मदेशातील) लोकही धार्मिक उत्सवाप्रित्यर्थ हजारो रुपये खर्च करतात. ते मी वर सांगितल्याप्रमाणे खर्च केले, तर अल्पावधीतच आपणाला बोद्ध धर्माचा प्रसार करता येईल.
भारत देशाविषयी बोलावयाचे झालेच तर मला मोठ्या दुःखाने म्हणावे लागते की ज्या देशात गौतम बुद्धाचा जन्म झाला त्याच देशात त्याच्या धर्माचा लोप व्हावा अशी विचित्र घटना का घडी? तुमच्यापैकी फारच थोड्या राष्ट्रांना त्याची कल्पना असेल की हिंदुस्थानात ब्राह्मणांनी आपले हिंदुधर्माचे वर्चस्व पुष्क ळ वर्षांपासून अबाधितपणे चालू ठेवले आहे. परंतु ब्राह्मणांना मी आव्हान देतो की कोणत्याही निष्पात पंडिताने बौद्धाच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करवी. माझी खात्री आहे की मी कधीही राहणार नाही.
त्याचा पराभव केल्यावाचून प्राचीन काळी हिंदुधर्मात यज्ञविधीमध्ये गाईचा बळी दिल्याने स्वर्गप्राप्ती होते, असे ब्राह्मण म्हणत असत. बुद्धाचा त्यांना उघड सवाल आहे की, अशा रीतीने जितक्या कालावधीत स्वर्गप्राप्ती होत असेल त्यापेक्षाही अधिक लवकर आपल्या वडिलांचा बळी दिल्याने स्वर्गप्रआिप्ती होईल,
एकेकाळी अशा रीतीने वागणारे ब्राह्म आता गोहत्या प्रतिबंधक प्रचार करीत आहेत. हा एक गौतम बुद्धाच्या अहिंसा तत्त्वाचाच मोठा विजय आहे.
मग हे लोक आपल्या बापाचा बळी का देत नाहीत ? ब्राह्मणाव्यतिरिक्त ब्राह्मणेतरपक्ष भारतात बराच मोठा आहे.
ब्राह्मणांच्या खुळ्या कल्पना :
धर्माविषयी त्यांचीही स्थिती केविलवाणी झाली आहे. हजारो दव दैवता या देशामध्ये ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत. कोणत्या देवाची उपसाना केल्याने मोक्ष मुक्ती मिळेल हे त्यांनाही समजत नाही. आपल्या बौद्धधर्मात मोक्ष स्वर्ग या खुळ्या कल्पनांना स्थान नाही. उलट मानवी जीवित सुखासमधानाने घालवावयाचे असेल तर मानवाने शुद्धाचरण, अहिंसा, समता आणि बंधुत्व या गोष्टींचाच अवलंब करावा, त्याशिवाय त्याला दुसरा मार्गच नाही. या गोष्टी गौतम बुद्धाच्या धर्मातील तत्त्वे म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि हीच तत्त्वे मी माझ्या सहा कोटी अनुयायांना सांगितली आहेत, ती त्यांना पटली आहेत. पैशांच्या अभावी मी त्यांच्यासाठी आज काहीच करू शकलो नाही. तरी पण अल्पावधित मला योग्य ती साधने
उपलब्ध झाली की बौद्ध धर्माचा प्रसार भारतात केल्यावाचून मी कधीही राहणार नाही. (टाळ्या)
बौद्धधर्माचे पुनरुत्थान
मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्धधर्माच्या पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी करून टाकल्या आहेत. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी जी घटना तयार केली तीत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे, ही एक गोष्ट दुसरी म्हणजे राष्ट्राध्याक्षांच्या राजवाड्याव गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिले चरण धम्मचक्र परिवर्तनाचे घातले असून ते मी ब्रह्मदेशांचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मालासेकर यांच्या दृष्टीत्पत्तीस आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले.
तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पर्लमेंटच्या निशाणावर अशोकचक्र हे भारत सरकारचे प्रतिक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करतांना मला हिंदु, मुसलमान, खिश्चन, व इतर पार्लमेंटच्या सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन मी पार्लेमेंट मध्ये केले होते.
बुद्धधर्म : हाच खरा समतेचा धर्म !
संग्रह – (३ एप्रिल १९५५ रोजी चॅनटून यांच्या सत्कारप्रीत्यर्थ सिद्धार्थ कॉलेजातील सभेत दिलेले भाषण जनता ९-४-५५)
लोकशाहीचे प्रामुख्याने दोन शत्रू आहेत. एक म्हणजे हुकूमशाही आणि दुसरी म्हणजे माणसा-माणसात भेद मानणारी नीती किंवा संस्कृती. अमेरिकेत स्वातंत्र्यासंबंधी उद्गार काढताना बकल प्रतिपादितो की, हुकूमशाहीमुळे निर्माण झालेली शक्ती किंवा सामाजिक संघटना कायम टिकू शकत नाही. कारण हुकूमशाही प्रेरणा ही मुळातच अबाधित स्वरूपाची नाही. ती प्रेरणा काढून घेतली की, ती संघटना गडगडते आणि म्हणूनच कम्युझिनमची राजवट ही अबाधित नाही. तयाप्रमाणेच माणसामाणसात भेद करणारी नीती सामाजिक, आर्थिक, भेद बुद्धिपुरस्सर करणारी संस्कृती ह्या दोन्हीही लोकशाही स्वरूपाला मोठे धोके आहेत.
हिंदू धर्मापुरते बोलायचे झाल्यास त्याचे प्रामुख्याने तीन ढोबळ वर्ग पडतील. पहिला खालचा पददलित वर्ग. ह्या वर्गाची सामाजिक व आर्थिक गळचेपी धर्माने घालून दिलेली आहे. दुसरा वर्ग हा ब्राह्मणेतर व मागासलेले वर्ग याचा आहे. हा वर्ग तुलनात्मदृष्ट्या स्थितीप्रज्ञ असा आहे. या वर्गात स्थित्यंतर व बदल व्हायला शिक्षणाच्या अभावी, नव्या जाणिवेच्या अभावी थोडा जास्त वेळ लागेल. तिसरा व शेवटचा वर्ग म्हणजे ब्राह्मण व तत्सम जातीचा आहे. या वर्गासाठी मात्र या धर्मात विशिष्ट अधिकार व हक्क आहेत. हा वर्ग त्यांच्या अधिकारावर व उपभोगावर अतिक्रमण झाल्यास कालानुरुप बदलत राहील पण वेळीच प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना धर्माने दिलेले उच्च स्थान टिकवायचे आहे व म्हणूनच त्यांना अशा त-हेचा धर्म मुद्दाम टिकवावयाचा आहे. त्याची दृष्टी होणाऱ्या बदलाकडे पाहाते व त्यांचे विचार वेदापलीकडे निर्भेळपणे जाऊ शकत नाही. पण बहुजन समाजरची उपेक्षा करू शकत नाही. आणि म्हणूनच मी माझ्यवरची
सर्व टिका लक्षात घेऊनही, बुद्ध धर्माच्या, या देशाती, भविष्याविषयी अगदी आशावादी आहे. विष्णूच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य व
पायातून शूद्र निर्मिती यावर आधारीत झालेली हिंदु धर्मरचना ही मनावतेचा अपमान करणारी, बुद्धीचा भेद करणारी व ईश्वाराचा द्रोह करणारी अशीच आहे. आणि अशा त-हेच्या धर्मरचनेत समता कधीच नादू शकत नाही. व्यक्तिविकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच संपूर्ण विचारांती मला वाटते की, खालच्या वर्गाने या विचार सरणीविरुद्ध बंड पुकारले पाहिजे. नव्हे ती त्यागली पाहिजे. याचा अर्थ असा की, अशा त-हेचा हा धर्म सोडून सर्व समतेची मानवी ऐक्याची घालून दिलेली बुद्धाची शिकवणूक त्याने अंगिकारली पाहिजे. म्हणून माझ्या सर्व बांधवांना शेवटची हाक देत आहे, की मुक्ती साधावायची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या. पाश्चिमात्य इतिहासाकडे पाहिले तर राज्य आणि धर्म यांचे विभक्तीकरण करून जी युद्धे झाली ती त्या इतिहासातील मोठी चूक आहे. धर्माची मानवी जीवनातून अशी फारकत करता येत नाही. धर्म उलट मानवी जीवनाचे सर्वांग ओहे अधिष्ठान आहे. ती सर्व बाबींची मूळ अंतःप्रेरणा आहे. ही गोष्ट कुणीही विचारवंत दुर्लक्षू शकत नाहीत. रोमचा ऱ्हास ह्या गीबनने लिहिलेल्या पुस्तकातील काही भाग वाचला तर एक गोष्ट स्पष्टपणे निदर्शनाला येते की, खिश्चन धर्माची चाहूल लागताच उमरावांच्या जुलमाला कंटाळून निवाऱ्यावाचून संध्याकाळच्या जेवणाची फिकीर करीत रस्त्यावर भटकणाऱ्या गुलामनांची ता`पहिल्यांदा जीवन मुक्ती म्हणून कवटळला. रोम देशात गुलामांनीच खिश्चन धर्माचं पाहिलं पाऊल उमटविलं हा एक मोठा ऐतिहासिक दाखला आहे. आणि म्हणून भोवतालच्या परिस्थितीचतचं अवलोकन
करता आपल्यावर होणाऱ्या अन्याय व जुलमातून बुद्ध धर्माचे बिजारोपण झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदुधर्म विषमतेवर आधारभूत झाल्याचे मी स्पष्ट केले आहेच व दुसरा मोठा पौर्वात्य धर्म मुसलमानी धर्म हा होय. हा धर्म बंधुभावाबद्दल ख्यातनाम आहे. पण ही बंधुता त्यांच्या धर्मापुरतीच मर्यादित आहे. त्यात
प्रामुख्याने मानवता बौद्ध धर्म सर्व मानवांचा समानतेचे अधिकार देतो. त्या धर्मातच मानवी जीवनातील योग्य तो आदर आहे. त्यात अशा त-हेची भेदनीती नाही. बौद्ध धर्म धर्म हाच खरा समतेचा धर्म आहे. मी या कार्याला थोडा उशीर केला याबद्दल मला थोडे वाईट वाटते. नाही तर मी आजमितीला त्या बीजारोपणाची फळं पाहिली असती. माझ्या समाजातील शेकडा ९० लोक माझ्या म्हणण्याला रुकार देतील याबद्दल मला यत्किंचितही संदेह वाटत नाही. टीकाकार काहीही म्हणोत. मला मात्र बौद्ध धर्माचे या देशात पुनः जोमाने पुनर्जीवन होणार आहे याचे स्पष्ट दृश्य दिसत आहे व त्याबद्दल मला तिळमात्रही संदेह वाटत नाही.
सद्यस्थितीत माणसाला धर्माची काय जरूरी आहे. अशा अर्थाची टीका काही लोक करतात. पण मला वाटतं हे लोक मानवी समाजाच्या धारणेसाठी धर्माची किती आवश्यकता आहे हीच गोष्ट विसरतात. मानवी समाजाला धर्माने दोन देणग्या दिल्या आहेत आणि त्या म्हणजे मानवी जीवनात ऐक्य अबाधित करणारी मानसिक प्रेरणा निर्माण करणे धर्मामुळेच मानवी पैक्याला पोषक असे विशिष्ट तऱ्हेचे मानसिक वातावरण निर्माण होऊ शकते. व दुसरे म्हणजे मानवी समूहात धर्मच समता निर्माण करू शकतो. या दोन महत्त्वाच्या कसोटींमुळे सद्यस्थितीत समता निर्माण करून चांगल्या त-हेने लोकशाही नांदावयाची असेल तर धर्माची अत्यंत आवश्यकता आहे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.