Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ( Shri Guru Charitra ) हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.
गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.
दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.
सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे.
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे.
‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे.
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘गुरुचरित्र’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘श्री गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे
योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.
‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी’ आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.
या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.
गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्र्वरदर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे!
‘गुरुचरित्रा’चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे. ते हे की, यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच बरोबर वैदिकांच्या आचार धर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच. शिवपूजा म्हणजे ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत.
श्री गुरुचरित्र पुस्तक / ग्रंथ कशा संदर्भात आहे?
सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे आचरण कसे ठेवावे ह्याच्या संदर्भात बहुमुल्य मार्गदर्शन ॥ श्री गुरुचरित्र ॥ मधे केलेले आहे.
श्री गुरुचरित्र कधी आणि कोणी लिहिले?
‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.
श्री गुरुचरित्र वाचन / पारायण का करावे?
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात / घरात काही ना काही संकट, अडचणी, त्रास, आजारपण असतात ज्यांचे निराकरण होणे बर्याचदा कठीण असते अश्यावेळी आपल्या मनातले भाव व्यक्त करून त्याचे निराकरण व्हावे हा भाव ठेऊन प्रार्थना करणे, लहान मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आईला जसे समजते तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे परमेश्वराला माहिती असते, आपण फक्त संकल्प स्वरुपात परमेश्वरासमोर मांडायचे आणि साप्ताहाचे नियम असतील त्या प्रमाणे आचरण करत आपले चित्त परमेश्वराकडे वळवणे म्हणजेच पारायण.
नियमीत पारायण केल्यास आपल्या अडचणी कमी होत जाऊन दूर होतात तसेच घरातले वातावरण देखील शुद्ध, आंदमयी होते.

गुरुचरित्राविषयी माहिती | Shri Guru Charitra Information
श्रीसरस्वती गंगाधर विरचित ‘श्रीगुरुचरित्र’ ( Shri Guru Charitra ) हा अत्यंत प्रासादिक, रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे माहात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा, अंबरीष कथा, धौम्य ऋषींची कथा, इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले, तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्रीनृसिंह सरस्वती ह्यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. श्रीदत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती ह्या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतारकार्य ह्या अपूर्व ओवीबद्ध चरित्रग्रंथात प्रकट झालेले आहे. गुरुचरित्राच्या पहिल्या नऊ अध्यायांत श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतारकार्य प्रकट झालेले आहे. तर दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून श्रीनृसिंह सरस्वतींचे अवतारकार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे तर अकराव्या अध्यायापासूनच ह्या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो. दत्तसंप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म ह्यांचे सखोल विवरण करणारा, हा एक अजोड ग्रंथ आहे. दत्तसंप्रदायात ‘गुरुचरित्र’ वेद म्हणून मान्यता पावले आहे. पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत ह्या चरित्रग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत. ‘श्रीगुरुचरित्र’ ह्या ग्रंथाचे कर्ते श्रीसरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासक होते. सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंह सरस्वतींचे पट्टशिष्य सायंदेव ह्यांचे पाचवे वंशज होते. श्रीनृसिंह सरस्वतींच्या अवतारकार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शके १४५० (इ. स. १५२८) ह्या दरम्यान ‘गुरुचरित्र’ प्रकट झाले. ग्रंथाच्या आरंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्वपरंपरा सांगितली, त्यावरून श्रीसरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिण्यगोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईचे नाव चंपा. आश्वलायन शाखेच्या काश्यपगोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधुपुरुषाची ती मुलगी होती.
श्रीदत्ताचे वर्णन करताना नाथ म्हणतात की,
दत्त वसे औदुंबरी । त्रिशूळ डमरू जटाधारी ।। कामधेनू आणि श्वान। उभे शोभती समान ।।
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूती ।। काखेमाजी शोभे झोळी। अर्धचंद्र वसे भाळी ।।
दत्तात्रेयाचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो. दत्तभक्तांची तशी श्रद्धा आहे. म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबरतळी बसून शुद्ध भावनेने श्रीगुरुचरित्राचे सतत पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत, त्या श्रीदत्तात्रेयांना अंतःकरणापासून सांगून श्रीगुरुचरित्राचे नित्य पारायण केले, अत्यंत श्रद्धेने श्रीदत्तात्रेयांची दर गुरुवारी पूजा करून श्रीगुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली, तर सप्ताह ब समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एक लक्षात घ्या की, गुरुमाहात्म्य सांगणारा, उपासनामार्गाचे श्रद्धेय
प्रतिपादन करणारा, मानवी आचारधर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाणग्रंथ म्हणून गुरुचरित्र या ग्रंथाला दत्तसंप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे. श्रीदत्तात्रेयाच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्तसंप्रदायातील सर्वच दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे,
अंतःकरण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र ।। सौख्य होय इहपरत्र । दुसरा प्रकार सांगेन ।।५३:८४।।
सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगो यथास्थिति ।। शुचिर्भूत होवोनि शाखरिती । सप्ताह करिता बहुपुण्य ।।
ह्याचा सोपा अर्थ असा की, पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला, तर केवळ सौख्य प्राप्त होते. मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून, एकाच जागेवर बसून, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून, पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा. पावित्र्य जपून, श्रद्धेने पारायण केले, तर सर्वांत मोठा फायदा काय होतो, तर मन शांत होते, प्रसन्न होते, समाधान पावते. गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे की,
ऐसें सप्ताह अनुष्ठान । करितां होय श्रीगुरूदर्शन । भूतप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ।।५३ः ९५ ।।
‘गुरुचरित्र’ हा एक सिद्ध ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवून, पावित्र्याचे संवर्धन करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचला जावा.
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।
Complete Shri Guru Charitra PDF Download
संपूर्ण गुरुचरित्र डाउनलोड करा. (५३ अध्याय) खाली क्लिक करा
- Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्रShri Guru Charitra | श्री गुरुचरित्र दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ( Shri Guru Charitra ) हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या… अधिक वाचा: Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
- Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावाश्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा | Shri GuruCharitra Adhyay 18 अध्याय अठरावा श्रीगणेशाय नमः । जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणीं। पूर्ण केला दातारा ।।१।। गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां न धाय माझें मनु। कांक्षा होतसे अंतःकरणं । कथामृत ऐकावया ।।२।। ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं । कथामृतसंजीवनीं। आणिक निरोपीं दातारा ।।३।। येणेंपरी सिद्धासी… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा
- Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववाश्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा | Shri GuruCharitra Adhyay 9 अध्याय नववा श्रीगणेशाय नमः ।। ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन। विनवीत कर जोडून । भक्तिभावें करोनिया ।।१।। श्रीपाद कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा। विस्तारोनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ।।२।। सिद्ध म्हणे नामधारका । पुढें कथा अपूर्व देखा । तया ग्रामीं रजक एका । सेवक झाला… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा
- Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावाश्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा | Shri GuruCharitra Adhyay 10 अध्याय दहावा श्रीगणेशाय नमः । ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरींचे महिमान । केवी जाहलें परियेसा ।।१।। म्हणती श्रीपाद नाहीं गेले। आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळें । निरोपावें म्हणतसे ।।२।। सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी। अनंतरूपें होती परियेसीं । विश्वव्यापक’ परमात्मा ।।३।।… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा
- Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावाश्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा | Shri GuruCharitra Adhyay 14 अध्याय चौदावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कौतुका । प्रश्न करी अतिविशेखा। एकचित्तें परियेसा ।।१।। जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ती ज्ञानसागरा । पुढील कथा विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ऐसी ।।२।। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी। प्रसन्न झाले श्रीगुरु कृपेंसी। पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रती ।।३।। ऐकोनि… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा
- Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियमShri Guru Charitra Parayan Niyam | श्रीगुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जुन या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून… अधिक वाचा: Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम
Keywords : guru charitra marathi pdf, guru charitra marathi, guru charitra book in marathi, swami samarth guru charitra pdf in marathi, guru charitra parayan rules in marathi, guru charitra 52 adhyay in marathi pdf, guru charitra avatarnika in marathi, guru charitra 39 adhyay in marathi pdf, guru charitra book in marathi pdf, shri swami samarth guru charitra pdf in marathi, guru charitra 3 adhyay in marathi,guru charitra parayan vidhi in marathi, shri guru charitra avatarnika in marathi, shri guru charitra pdf in marathi, 52 shloki guru charitra in marathi pdf download, guru charitra 14th adhyay in marathi, guru charitra chapter 14 marathi, guru charitra kathasar in marathi, guru charitra marathi pdf download, guru charitra parayan kase karave in marathi, shri guru charitra book in marathi pdf, guru charitra in marathi translation, shri datta guru charitra in marathi pdf, guru charitra in marathi book, guru charitra kathasar marathi pdf free download, guru charitra parayan benefits in marathi, shri guru charitra marathi pdf download, 52 shloki guru charitra in marathi pdf, 52 shloki guru charitra marathi pdf download, guru charitra 2 adhyay in marathi, guru charitra marathi price, guru charitra parayan marathi pdf, sankshipt shri guru charitra marathi pdf free download, 52 shloki guru charitra in marathi, 52 shloki guru charitra in marathi lyrics, datta guru charitra in marathi, datta guru charitra in marathi pdf, full guru charitra in marathi mp3 free download, guru charitra 1 adhyay in marathi, guru charitra 1 adhyay in marathi pdf, guru charitra 1 to 52 adhyay in marathi, guru charitra 52 adhyay in marathi, guru charitra 52 adhyay in marathi mp3, guru charitra book in marathi online, guru charitra book in marathi price, guru charitra experiences in marathi, guru charitra granth marathi, guru charitra in marathi audio free download, guru charitra in marathi pdf download, guru charitra in marathi pdf free download, guru charitra katha in marathi, guru charitra kathasar marathi pdf, guru charitra marathi 14 adhyay, guru charitra marathi arth, guru charitra marathi audio, guru charitra marathi book pdf download, guru charitra marathi mp3 download, guru charitra parayan 3 days in marathi, guru charitra parayan book in marathi, guru charitra parayan marathi, guru charitra parayan miracles in marathi, guru charitra reading rules in marathi, sampurna guru charitra in marathi, sampurna guru charitra in marathi pdf, sankshipt guru charitra in marathi pdf, sankshipt shri guru charitra marathi pdf, shree guru charitra in marathi download, shree guru charitra in marathi pdf, shree guru charitra marathi, shree swami samarth guru charitra in marathi, shri guru charitra book in marathi, shri guru charitra in marathi, shri guru charitra in marathi download, shri guru charitra in marathi mp3 free download, shri guru charitra in marathi pdf free download, shri guru charitra kathasar in marathi, shri guru charitra marathi pdf, shri guru charitra parayan rules in marathi, swami samarth guru charitra in marathi, download guru charitra adhyay 18 in marathi, guru charitra 11 adhyay in marathi pdf, guru charitra 14 adhyay meaning in marathi, guru charitra 20 adhyay in marathi, guru charitra 21 adhyay in marathi pdf, guru charitra 23 adhyay in marathi pdf, guru charitra 39 adhyay in marathi, guru charitra 40 adhyay in marathi, guru charitra 53 adhyay in marathi, guru charitra all adhyay in marathi pdf