श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा | Shri GuruCharitra Adhyay 10

अध्याय दहावा
श्रीगणेशाय नमः । ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरींचे महिमान । केवी जाहलें परियेसा ।।१।।
म्हणती श्रीपाद नाहीं गेले। आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळें । निरोपावें म्हणतसे ।।२।।
सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी। अनंतरूपें होती परियेसीं । विश्वव्यापक’ परमात्मा ।।३।।
पुढें कार्यकारणासी। अवतार झाले परियेसीं। राहिले आपण गुप्तवेषीं। तया कुरवक्षेत्रांत ।।४।।
पाहें पां भार्गवराम देखा। अद्यापवरी भूमिका। अवतार झाले अनेका। त्याचेच एकीं अनेक ।।५।।
सर्वां ठायीं वास आपण । मूर्ति एक नारायण। त्रिमूर्तीचे तीन गुण। उत्पत्ति स्थिति आणि प्रलय ।। ६ ।।
भक्तजनां तारावयासी। अवतरतो हृषीकेशी । शाप देत दुर्वासऋषि । कारण असे तयाचें ।।७।।
त्रयमूर्तीचा अवतार । याचा कवण न कळे पार । निधान तीर्थ कुरवपूर । वसे तेथें गुरुमूर्ति ।।८।।
जें जें चिंतावें भक्तजनें । तें तें पावे गुरुदर्शनें । श्रीगुरु वसावयाची स्थानें । कामधेनु असे जाणा ।।९।।
श्रीपादवल्लभस्थानमहिमा । वर्णावया अनुपमा । अपार असे सांगतों तुम्हां । दृष्टान्तेंसी अवधारा ।।१०।।
तुज सांगावया कारण। गुरुभक्ति वृथा नव्हे जाण । सर्वथा न करी निर्वाण । पाहे वाट भक्तांची ।।११।।
भक्ति करावी दृढतर। गंभीरपणें असावें धीर। तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्रीं सौख्य पावे ।।१२।।
याचि कारणें दृष्टान्तें तुज । सांगेन ऐक वर्तलें सहज । काश्यपगोत्रीं होता द्विज । नाम तया वल्लभेश ।।१३।।
सुशील द्विज आचारवंत । उदीम करूनि उदत भरीत । प्रतिसंवत्सरीं यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ।।१४।।
असतां पुढें वर्तमानीं। उदीमा निघाला तो धनी। नवस केला अतिगहनीं । संतर्पावें ब्राह्मणासी ।।१५।।
उदीम आलिया फळासी। यात्रेसी येईन विशेषी। सहस्र संख्या ब्राह्मणांसी। इच्छाभोजन देईन म्हणे ।।१६।।
निश्चय करोनि मानसीं । निघाला उदीमासी। चरण ध्यातसे मानसीं। सदा श्रीपादवल्लभाचे ।।१७।।
जे जे ठायीं जाय देखा । अनंत संतोष पावे निका। शतगुणें लाभ झाला ऐका । परमानंद प्रवर्तला ।।१८।।
लय लावूनि श्रीपादचरणीं । यात्रेसि निघाला ते क्षणीं। वेंचावया ब्राह्मणसंतर्पणीं । द्रव्य घेतलें समागमें ।।१९।।
द्रव्य घेऊनि द्विजवर। निघतां देखती तस्कर । कापट्यवेर्षे सत्वर । तेही सांगते निघाले ।।२०।।
दोन तीन दिवसांवरी। तस्कर’ असती संगिकारी। एके दिवसीं मार्गी रात्रीं। जात असतां मार्गस्थ ।। २१ ।।
तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जाऊं कुरवपुरासी । श्रीपादवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ।।२२।।
ऐसें बोलती मार्गासी । तस्करीं मारिलें द्विजासी । शिर छेदूनियां परियेसीं । द्रव्य घेतलें सकळिक ।।२३।।
भक्तजनांचा कैवारी। श्रीपादराव कुरवपुरीं । पातला त्वरित वेषधारी। जटामंडित भस्मांकित ।। २४।।
त्रिशूळ खट्टांग घेऊनि हातीं। उभा ठेला तस्करांपुढतीं। वधित झाला तयांप्रती । त्रिशूळेकरूनि तात्काळ ।। २५ ।।
समस्त तस्करां मारितां । एक तस्कर येऊनि विनविता । कृपालुवा जगन्नाथा । निरपराधी आपण असे ।। २६ ।।
नेणें यातें वधितील म्हणोनि । आलों आपण संगीं होऊनि। तूं सर्वोत्तमा जाणसी मनीं । विश्वाची मनवासना ।। २७ ।।
ऐकोनि तस्कराची विनंती । श्रीपाद त्यातें बोलाविती। हातीं देऊनिया विभूति । विप्रावरी प्रोक्षीं म्हणे ।।२८।।
मन लावूनि तया वेळां । मंत्रोनि लाविती विभूति गळां। सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा एकचित्तें ।। २९ ।।
इतुकें वर्ततां परियेसीं । उदय जाहला दिनकरासी । श्रीपाद जाहले गुप्तेसी । राहिला तस्कर द्विजाजवळीं ।। ३० ।।
विप्र पुसतसे तस्करासी । म्हणे तूं मातें कां धरिलेंसी। कवणें वधिलें तस्करासी। म्हणोनि पुसे तया वेळीं ।। ३१ ।।
तस्कर सांगे द्विजासी । आला होता एक तापसी । जाहलें अभिनव परियेसीं। वधिले तस्कर त्रिशूळे ।।३२।।
मज रक्षिलें तुजनिमित्तें। धरोनि बैसविलें स्वहस्तें । विभूति लावूनि मग तूंतें। सजीव केला तव देह ।।३३।।
उभा होता आतां जवळी । अदृश्य जाहला तत्काळीं । न कळे कवण मुनि बळी। तुझा प्राण रक्षिला ।। ३४।।
होईल ईश्वर त्रिपुरारि । भस्मांगी होय जटाधारी । तुझीं भक्ति निर्धारीं। म्हणोनि आला ठाकोनिया ।। ३५।।
ऐकोनि तस्कराचें वचन । विश्वासला तो ब्राह्मण। तस्कराजवळील द्रव्य घेऊन । गेला यात्रेसी कुरवपुरा ।। ३६ ।।
नानापरी पूजा करी। ब्राह्मणभोजन सहस्र चारी । अनंतभक्तीं प्रीतिकरीं । पूजा करी श्रीपादुकांची ।। ३७ ।।
ऐसे अनंत भक्तजन । मिळून सेविती श्रीपादद्धरण । कुरवपूर प्रख्यात जाण । अपार महिमा ।।३८।।
सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरीं तूं मानसीं। श्रीपाद आहेती कुरवपुरासी । अदृश्यरूप होऊनिया ।।३९।।
पुढें अवतार असे होणें। गुप्त असती याचि गुणें । म्हणती अनंतरूप नारायण । परिपूर्ण सर्वांठायीं ।।४०।।
ऐसी श्रीपादवल्लभमूर्ति। लौकिकीं प्रगटली ख्याति । झाला अवतार पुढतीं। नृसिंहसरस्वती विख्यात ।।४१।
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगत कथेचा विस्तारू । ऐकतां होय मनोहरू । सकळाभीष्टें साधती ।।४२।।
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं नाम दशमोऽध्यायः ।।१०।।
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु । ओवीसंख्या ।।४२।।
।। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।
।। अध्याय दहावा ।। ।। वल्लभेश ब्राह्मणास जीवदान ।।
श्रीगणेशाय नमः ।। नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, “महाराज, श्रीपाद यती सूक्ष्मरूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले?”
सिद्ध म्हणाला, “श्रीगुरूंचा महिमा अतर्क्स आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे. सृष्टिचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रीरूप झाले हे सर्वमान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांना कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात. याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता, ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल.
वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापारधंदा करायचा. तो श्रीपादांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले. ‘आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत.’ असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला. तो म्हणाला, “मला मारू नका. मी निरपराधी आहे. या ब्राह्मणाला मी मारले नाही. माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही. मला क्षमा करा.”
सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले. त्याला क्षमा केली. त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, “ही विभूती या ब्राह्मणावर टाक.” तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य ! तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला. श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले ! जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला, “तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले?” तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकिकत सांगितली. तो म्हणाला, “शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता. या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने यांना मारले. तुला जिवंत केले. तो येथेच उभा होता, आता कोठे गेला काही कळलेच नाही. तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला.” ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्रीगुरू श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले घन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले.
असे आहे कुरवपूर क्षेत्राचे माहात्म्य. श्रीगुरू श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात. हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात. पुढे त्यांनी ‘नृसिंहसरस्वती’ म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले.”
नामधारक म्हणाला, “सिद्धनाथ महाराज, श्रीगुरूंचे लीलाकर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंहसरस्वती स्वामींचे चरित्र ऐकविण्याची कृपा करा.”
- Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्रShri Guru Charitra | श्री गुरुचरित्र दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ( Shri Guru Charitra ) हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या… अधिक वाचा: Shri Guru Charitra | श्री गुरुचरित्र
- Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावाश्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा | Shri GuruCharitra Adhyay 18 अध्याय अठरावा श्रीगणेशाय नमः । जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणीं। पूर्ण केला दातारा ।।१।। गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां न धाय माझें मनु। कांक्षा होतसे अंतःकरणं । कथामृत ऐकावया ।।२।। ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं । कथामृतसंजीवनीं। आणिक निरोपीं दातारा ।।३।। येणेंपरी सिद्धासी… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 18 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 18 अठरावा
- Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववाश्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा | Shri GuruCharitra Adhyay 9 अध्याय नववा श्रीगणेशाय नमः ।। ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन। विनवीत कर जोडून । भक्तिभावें करोनिया ।।१।। श्रीपाद कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा। विस्तारोनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ।।२।। सिद्ध म्हणे नामधारका । पुढें कथा अपूर्व देखा । तया ग्रामीं रजक एका । सेवक झाला… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 9 | श्रीगुरुचरित्र अध्याय – 9 नववा
- Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावाश्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा | Shri GuruCharitra Adhyay 10 अध्याय दहावा श्रीगणेशाय नमः । ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरींचे महिमान । केवी जाहलें परियेसा ।।१।। म्हणती श्रीपाद नाहीं गेले। आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळें । निरोपावें म्हणतसे ।।२।। सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी। अनंतरूपें होती परियेसीं । विश्वव्यापक’ परमात्मा ।।३।।… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 10 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १0 दहावा
- Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावाश्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा | Shri GuruCharitra Adhyay 14 अध्याय चौदावा श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कौतुका । प्रश्न करी अतिविशेखा। एकचित्तें परियेसा ।।१।। जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ती ज्ञानसागरा । पुढील कथा विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ऐसी ।।२।। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी। प्रसन्न झाले श्रीगुरु कृपेंसी। पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रती ।।३।। ऐकोनि… अधिक वाचा: Shri GuruCharitra Adhyay 14 | श्रीगुरुचरित्र अध्याय – १४ चौदावा
- Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियमShri Guru Charitra Parayan Niyam | श्रीगुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जुन या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून… अधिक वाचा: Shri Guru Charitra Parayan Information | श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे ? महत्व आणि नियम
Keyword – gurucharitra adhyay 10 , gurucharitra adhyay 10 pdf , gurucharitra 10 adhyay , gurucharitra 10 va adhyay , shri gurucharitra adhyay 10 , gurucharitra 10 adhyay in marathi , 10 adhyay gurucharitra , 10 va adhyay gurucharitra , gurucharitra adhyay 10 marathi , gurucharitra adhyay 10 pdf download