ताडोबाची जंगलवारी – ताडोबा ची थोडक्यात महिती
ताडोबा – Tadoba हे भारतातील एक मोठे जंगल आहे जिथे बरेच वाघ राहतात. हे सरकारद्वारे संरक्षित आहे आणि रॉयल बेंगाल टायगर नावाच्या वाघांचे विशेष निवासस्थान आहे. या वाघांना पाहण्यासाठी लोक ताडोबाला भेट देऊ शकतात, परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जंगलात वाघ पाहण्याची खात्री नसते. जंगल इतर प्राण्यांचे निवासस्थान आहे आणि स्थानिक जमातींद्वारे त्यांची काळजी घेतली जाते. ताडोबात येणारे पर्यटक या परिसराची चांगली माहिती असलेल्या मार्गदर्शकांसह सफारीवर जाऊ शकतात. हे एक विशेष ठिकाण आहे जिथे निसर्ग संरक्षित आहे आणि लोक जंगलाचे सौंदर्य अनुभवू शकतात.
ताडोबा हे भारतातील एक खास ठिकाण आहे जिथे वाघ मोठ्या जंगलात राहतात. हे वाघांचे संरक्षण असलेल्या मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. जंगल खूप जुने आहे आणि त्यात बांबूची बरीच झाडे आहेत. लोक ताडोबाला भेट देऊ शकतात आणि त्यांच्या नैसर्गिक घरात वास्तविक वाघ पाहू शकतात. वाघ सुरक्षित राहावेत यासाठी सरकार जंगलाची काळजी घेते. जंगल खूप मोठे आहे, 1,750 चौरस किलोमीटर व्यापलेले आहे आणि आत जाण्यासाठी 19 विविध मार्ग आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील एक मोठे ठिकाण आहे जिथे वाघ जंगलात राहतात. हे महाराष्ट्र राज्यात आहे आणि स्थानिक देव आणि नदीच्या नावावरून त्याचे नाव आहे. या भागात गोंड लोक नावाच्या जमातीचे निवासस्थान होते आणि त्यांचे वंशज अजूनही जवळपासच्या गावात राहतात. लोकांना सफारीवर घेऊन जाणारे गाईड बहुधा एकाच टोळीतील असतात.
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात 120 हून अधिक वाघ जंगलात मुक्तपणे फिरतात. बहुतेक पाहुण्यांना हे भव्य प्राणी पाहण्याची संधी असते, काहींना डझनभर किंवा त्याहून अधिक वाघही दिसतात. मात्र, वाघ दिसण्याची शाश्वती नाही कारण ती नशिबावर अवलंबून असते. उद्यान हे वाघांचे नैसर्गिक अधिवास आहे आणि कोणताही प्राणी पिंजऱ्यात ठेवला जात नाही. स्थानिक मार्गदर्शक आणि ड्रायव्हर तुम्हाला वाघ दिसण्यासाठी सर्वतोपरी मदत करतील, परंतु शेवटी ते नशिबावर अवलंबून आहे. जंगलाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि वाघांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात पाहण्याची संधी घेण्यासाठी ताडोबाला भेट द्या.
ताडोबाची जंगलवारी
रात्रीचे साडेतीन वाजलेले.
एरवी आपण गाढ झोपेत असण्याची ही वेळ. त्यातून फेब्रुवारी महिना. मस्त थंडी पडलेली. अशा वेळी थोडं जाड पांघरुण घेऊन आपण झोपेच्या स्वाधीनच झालेलो असतो. पण आम्हाला नागपूरवरून ताडोबाच्या जंगलापाशी सकाळी सहा वाजता पोचायचं होतं. ते अंतर होतं दोन-अडीच तासांचं. म्हणून मध्यरात्रीच उठलो.
डोळ्यांवरच्या झोपेला कसंबसं दूर करत चहा घेतला आणि मग मात्र उत्साहानं भराभर सारं आवरून थंडीचे उबदार कपडे चढवून पहाटे साडेतीन वाजताच निघालो.
एरवी चंद्रपूरच्या बाजूनं एखाद्या दिवसाचा सोयीस्कर मुक्काम करून जंगलात दोन- तीन वेळा शिरण्याची आणि एखाद्यातरी फेरीत वाघ बघण्याची संधी घेतली असती. पण यावेळी हातात फक्त एकच दिवस होता; म्हणून अपरात्री उठून आम्ही जंगलची वाट धरली. पहाटे दिशा अंधूकशा उजळत असताना आम्ही जंगलफेरीसाठी उघड्या जीपमध्ये जाऊन बसलो.
मोजक्या सहाच गाड्या या वेगळ्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत जातात. द्वार म्हणजे द्वार नाहीच. एक नाका; एक चौकी म्हणा हवं तर, ती तेवढी वाटेपाशी उभी. तेच प्रवेशद्वार. परवानगीचे रीतसर सोपस्कार करून आमची सगळी वाहनं एका-पाठोपाठ आत निघाली. आमच्या जीपमध्ये आम्ही चौघं माणसं आणि जीपच्या ड्रायव्हरशेजारी एक गाईड बसलेला. आम्ही सहाजण आमचा आमचा एक रस्ता निवडून जंगलात निघालो.
शहरी माणसासाठी जंगल हीच केवढी अद्भुत गोष्ट आहे !
ते तर खऱ्या अर्थानं सृष्टीचं राज्य असतं. जमीन आणि पाण्याचं, वाऱ्याचं आणि झाडांचं, पाखरांचं आणि प्राण्यांचं जग…
बिनीचे कुमारांसाठी, ना जोपासणारे मासिक जंगलात जाताना मनातल्या मनात एक प्रतिज्ञा म्हणायची असते; हे तुम्हाला माहीत आहे का? शाळेत शिकताना ‘भारत माझा देश आहे…’ अशी प्रतिज्ञा म्हणतो ना आपण, तशीच ही प्रतिज्ञा आहे. तिथे जाताना म्हणायचं, ‘हे जंगल माझंच आहे. इथले वृक्ष आणि इथल्या वनस्पती हे माझे नातलग आहेत. इथले प्राणी आणि पक्षी हे माझे बांधव आहेत. माझ्यासारखे तेही या विशाल सृष्टीचे घटक आहेत. त्यांना कोणतीही इजा मी करणार नाही. ते कसे जगतात हे पाहाण्यासाठी आणि निसर्गाचे जवळून दर्शन घेण्यासाठी मी या जंगलात प्रवेश करीत आहे.
या जंगलाच्या पावित्र्याला धक्का लागेल आणि त्याचे सौंदर्य कमी होईल असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही, याची मी काळजी घेईन. ज्ञान संपादन आणि आवश्यक तेथे स्वसंरक्ष एवढ्याच कृती माझ्याकडून घडतील आणि या अरण्यप्रदेशाचा आनंद मी बरोबर घेऊन जाईन, यासाठी मी स्वतःशी वचनबद्ध आहे.’
ही प्रतिज्ञा पाठ करून म्हणायची नसते. तिच्यातलं प्रत्येक वाक्य अर्थ समजून घेऊन म्हणायचं आणि मग जंगलात प्रवेश करायचा. तसं केलं, की जादू झाल्यासारख्या काही गोष्टी ‘त्या एका इशाऱ्यासरशी सारं रान स्तब्ध झालं. पक्ष्यांचेही आवाज नाहीत. हरणांचा कळपही स्तब्ध उभा ! सगळ्यांचे कान टवकारलेले; चाहूल घेणारे ! अशातच ‘तो’ आम्हाला दिसला…
पुढे गेल्यावर एका पाणथळीच्या जागेत एक चपळ वाघीण दिसली. आमची चाहूल लागल्यावर, एकदा तिनं मान उचलून आमच्याकडे
पाहिलं…
क्षणभर काळीज त्या नजरेनं लक्कन हललं….’
ताडोबाच्या जंगलातील व्याघ्रदर्शनाचं हे अनोखं दृश्य ! उत्सुक डोळ्यांनी, सजग कानांनी, उत्साही मनाने अनुभवलेलं !… कविमनाच्या लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी जंगलवारीचा हा थरारक अनुभव चित्रदर्शी शब्दांत येथे साक्षात जिवंत केलाय ! आपोआप नाहीशा होतात. म्हणजे तुमच्या काना-मनावर आणि तुमच्या पापण्यांवर असलेले नेहमीच्या जगातले सगळे थर हळूहळू नाहीसे होतात. ओळखीचे आवाज, ओळखीचे नजारे सगळे दूर जातात. मग ऐकायला यायला लागतात पाखरांचे वेगवेगळे स्वर.
आपल्याबरोबर कुणी पक्ष्यांचा दोस्त असेल तर तो सांगतो, ‘अरे, हा सूर्यपक्षी (सनबर्ड) बघा. आणि तो बघा, सर्पट क्रेस्टेड ईगल – गरुडाची ही जात आहे एक. हा रॉबिन आणि ही हिरळी…’
मग आपल्याला जंगली कोंबड्या दिसतात किंवा डोक्यावर पिवळी रेघ असलेली बदकं दिसतात. अचानक चमकत्या राखी-रुपेरी रंगाची झाडं दिसतात. गाईड म्हणतो, “ही भुताची झाडं!”
आपलं मन म्हणतं, ‘छे! असं भूतबित कुठे असतं का?’
पण मग लक्षात येतं की, ‘अरे, ही झाडं चमकताहेत आत्ता, दिवसासुद्धा. मग रात्रीच्या अंधारात एकदम ही पांढरी झाडं चमकून उठली तर ती भुताची झाडंच वाटणार ना!’
जंगलवाटा झाडीमधून वळत निघालेल्या. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात झाडांचे माथे सोनेरी जावळासारखे दिसणारे. ‘स्वच्छ, ताजी हवा. वाहनांच्या धुराचा लवलेश नसलेली. आपल्यासारखे चार-दोन गाड्यांमधले प्रवासी जातात आणि त्या हवेत नैसर्गिक नसलेला धूर सोडून येतात. एरवी जंगल कसं त्याच्याच नादात हलणारं-डोलणारं. माथ्यावर फैलावलेलं नितळ निळं आभाळ. आपल्या कामांच्या रोजच्या धावपळीत आभाळाकडे, ढगांकडे, दिवसभरातल्या बदलत्या उजेडाकडे पाहायला वेळ कुठे होतो आपल्याला?
तिथे त्या निवांत वेळी पाण्याच्या आरशात काठावरची झाडं आणि माथ्यावरचं आभाळ स्वतःचं प्रतिबिंब पाहात असताना आपण तिथे आहोत हेच विसरायला होत होतं.
तेवढ्यात एखादं हरीण दूरवर दिसलं आणि जंगलाच्या दुसऱ्या बाजूच्या नाक्यापाशी आम्ही पोचलो. ड्रायव्हर गाडीची नोंद करायला नाक्यापाशी गेला. तेवढ्यात बाजूला तिथे उभ्या असलेल्या दोन जीपगाड्यांमधली माणसं एकदम ओरडली, “चला चला ! कॉल आलाय!” म्हणजे काय? ड्रायव्हर धावतच परत आला. “काय झालं?” आम्ही ड्रायव्हरला विचारलं. तोवर आमच्या ड्रायव्हरनं सफाईनं
गाडी वळवली. “वाघ आहे. इथेच जवळ,” गाईड म्हणाला. त्याचे शब्द अजून पुरे ऐकायचेच होते; तोच समोर-अगदी समोर रस्त्याच्या एका बाजूने येऊन एका भल्या मोठ्या वाघानं रस्त्यावर पाऊल टाकलं! आमची गाडी जागीच खिळल्यासारखी थांबली.
अवघ्या पाच-सहा फुटांवरून डौलात रस्ता ओलांडून वाघ पलीकडच्या झाडीत घुसला. आम्ही रोखलेले श्वास सोडले.
पिवळाधमक पट्टेरी वाघ ! मग सुरू झाला त्या वाघाचा मागोवा. आमच्या गाड्या जंगलातल्या कच्च्या वाटेनं हळूहळू त्या देखण्या वाघोबाला समांतर जात राहिल्या. झाडांच्या हिरव्या दाटीतून पिवळ्या उन्हासारखं त्याचं अंग अधूनमधून दिसत राहिलं आणि काय नवल । पुन्हा एकदा तो तसाच, पूर्वीसारखाच झाडोऱ्यातून बाहेर आला. आम्ही चकित ! गाड्या जागीच खिळल्या. ‘अरे बापरे!’, ‘पाहा पाहा!’, ‘श्श्ऽऽ बोलू नका !’ क्षणात हे आवाज उमटले आणि शांत झाले. त्या स्तब्धतेत तो देखणा वाघ पुन्हा एकदा आमची दखलही न घेता रस्ता ओलांडून निघून गेला. तो दूरवर दिसत राहिला तोपर्यंत आंम्ही त्याला पाहात राहिलो.
मग मात्र परत सगळे पांगले. तृप्तीनं. खुशीनं गाड्या माघारी वळल्या. आम्हीही परत आमच्या जंगलवाटेच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. डोळे त्या भल्याथोरल्या वाघाच्या दर्शनानं निवले होते. शिवाय जंगल तर ताजंतवानं करणारं होतंच. आम्ही अगदी आनंदात रमतगमत संथपणे पुढे चाललो होतो. इतक्यात एक विचित्र आवाज कानावर आला. ‘घीची घीजी चीजीss’ असा काहीतरी विचित्र स्वर होता तो. गाडीवाल्यानं आणि गाईडनं एकमेकांकडे पाहिलं आणि गाडी जागीच उभी केली. तो म्हणाला,
“माकडानं इतर प्राण्यांना दिलेला सावधगिरीचा इशारा आहे हा. वाघ जवळ येतो आहे याचा इशारा.”
त्या एका इशाऱ्यासरशी सारं रान स्तब्ध झालं. इशारा देणाऱ्या माकडाची झाडावरून खाली आलेली लांब शेपटी तेवढी डाव्या बाजूला दिसत होती. बाकी सगळं स्तब्ध. पक्ष्यांचेही आवाज नाहीत. उजव्या हाताला एक हरणांचा कळप उभा होता. गाडी अगदी आवाज न करता हळूच दोन-तीन फूट पुढे सरकल्यावर आम्हाला तो कळप स्पष्ट दिसला. लहान लहान हरणं आणि मध्ये मोठी हरणं अशी सगळी अगदी शांत उभी, ती हलत नव्हती. आवाज करत नव्हती. सगळ्यांचे कान
टवकारलेले. चाहूल घेणारे… मग एक मोठं पण नाजूक हरीण हललं. ते उजव्या बाजूला जिकडून माकडानं इशारा दिला होता तिकडे आलं. एका जागी उभं राहून त्यानं कानोसा घेतला आणि मग एका दिशेनं तोंड करून ते दीर्घ आणि उंच अशा आवाजात ओरडलं, थांबलं. पुन्हा तसंच ओरडणं आणि ओरडताना एक पाय आपटणं. बस्स्. तो आवाज. ते पाय आपटणं आणि आणखी काहीही नाही. सगळीकडे नुसती एक भयचकित करणारी स्तब्धता !
आम्ही काही वेळ तसेच त्या थरकाप करणाऱ्या आवाजानं थिजून गेल्यासारखे हालचाल न करता बसून राहिलो आणि मग हलक्या आवाजात ड्रायव्हरला गाडी पुढे घ्यायला सांगून हळूहळू तिथून दूर गेलो. जिवाच्या भीतीनं जनावरांनी एकमेकांना दिलेले ते सावधगिरीचे इशारे मात्र विलक्षण होते. आम्ही जंगलातलं एक अनोखं दृश्य पाहिलं होतं. जंगलानं जणू आम्हाला त्याच्या कुशीत ओढून घेऊन एक रहस्य दाखवलं होतं. आम्ही चूपचाप परतीच्या वाटेला लागलो.
परतताना एक चपळ वाघीण एका पाणथळीच्या जागेत दिसली. आम्ही उंचावर होतो आणि झऱ्याचं पाणी खालच्या बाजूला वाहत होतं. फार खाली नव्हे, आठ-दहा फूट खाली. पण वर झाडांची दाटी होती. फांट्यांमधून आम्ही तिला खाली स्पष्ट पाहिलं. तिलाही आमची चाहूल लागली की काय कोण जाणे, एकदा तिनं मान उचलून आमच्याकडे पाहिलं. क्षणभर काळीज त्या नजरेनं लकक्न हललं. मग ती शांतपणे वळली आणि मागच्या उंचवट्यावर चढून दूर निघून गेली.
आम्हीही जंगलवाट सोडून शहराकडे धावणाऱ्या रस्त्यावर आलो. मनात आलं, जगाच्या पाठीवर अशी कितीक जंगलं असतील; डोंगर, नया आणि वाळवंटं असतील ! किती अद्भुत, किती रंगीत आणि किती नवलाची आहे ही सृष्टी ! तिचे नजारे पाहायचे, वेगवेगळ्या ऋतूंमधलं तिचं रूप निरखायचं तर एक जन्मदेखील पुरणार नाही. पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा उत्सुक डोळे, सजग कान आणि उत्साही मन घेऊन सृष्टीचं दर्शन घेतलं पाहिजे. तिला आनंदानं अनुभवलं पाहिजे. एखादी जंगलवारी तुम्हाला इतकं शहाणं करत असेल तर आणखी
काय हवं?
मग तुमही कधि येती तोडब्याल… आवडलाअसल्यस नक्की प्रतिक्रीया कळवा कमेंट मधे….