आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरू नका | मीच भारताची घटना जाळी !
महामानव, समाजवादी, भारतीय संविधानाच्या शिल्पकार – डॉ. बाबासाहेब अंबेडकरांचं भाषण हा एक अत्यंत महत्त्वाचं आणि अद्वितीय घटना आहे. त्यांचं विचार आणि भाषण भारतीय समाजातील न्याय, समता, आणि स्वतंत्रतेच्या मूळ मूल्यांचा स्पष्टीकरण करतात. ह्या भाषणात त्यांनी जातिवाद, असमानता, आणि समाजातील दुर्बलता यांच्या विरोधात व्यक्तिगत आणि सामाजिक क्रियाकलाप केले. ह्या भाषणात अंबेडकरांनी भारतीय समाजातील सर्वांत महत्त्वाचं मुद्दा चित्रित केलं आणि त्यांच्या विचारांना एक नवी पराकाष्ठा दिली. या अद्वितीय भाषणाचा विशेष महत्त्व आजही आहे, कारण ते आजही आम्हींशी आपल्या समाजाच्या वास्तविकतेवर संबंधित आहेत. या ब्लॉगमध्ये, आपल्याला डॉ. बाबासाहेब अंबेडकरांचं एक उत्कृष्ट भाषण अनुवादित केलं जाईल, ज्याचा सारांश विचारला जाईल आणि त्याच्या संदेशाची महत्त्वाची मार्गदर्शन केली जाईल.
आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरू नका
संग्रह – (दि. १६/१/१९४९ रोजी मनमाड येथील सभेतील भाषण जनता दि. २३/१/१९४९)
माझे मित्र भाऊराव गायकवाड यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे मला विचारले की एखादी सभा जर ठरविली तर त्याला माझी काही हरकत आहे का? मी सभेस होकार दिला.
मुंबई इमारत फंडासाठी मला चार हजारांची थैली अर्पण करण्यात येईल असे मला सांगण्यात आले. मला चार हजारांचे आमिष दाखविण्यात आले. (प्रचंड हशा) त्यामुळे ही सभा घेण्यात आली. परंतु त्या थैलीचे काय झाले याचा खुलासा आधिच्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला नाही. रक्कम जमली व ती चोरीला गेली असेही सांगितले नाही. (प्रचंड हशा) सभेच्या शेवटी तरी याचा कुलासा होईल, अशी मला दाट आशा आहे.
अलिकडे मी बरेच दिवस राजकारणाबाबत बोलत नाही कारण मी हल्ली राजकीय बंधनात आहे.
अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारण ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकुल शंका नाही (टाळ्यांचा कडकडाट) कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. आपले राजकारण यशस्वी करण्याकरिता आपल्या समाजास मोठ्या अधिकारांच्या जागा म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे मानाच्या जागा काबीज केल्या आहेत.
संघशक्ती उभी करा :
जरी आपल्याला जागा मिळाल्या असल्या तरी भिण्याचे कारण
नाही. आपण सात कोटी लोक आहोत. आपण संघटित राहिलो तरच आपला पक्ष बलवान होईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण जर संघटित राहिलो तर जे मिळाले ते पुरेसे आहे. त्याच्या जोडीला संघशक्ती मिळाली तर कोणाचीच भीती नाही आपण जो राजकीय संघ शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन त्यालाच आपण चिकटून राहिले पाहिजे. (टाळ्यांचा कडकडाट, जयघोष) आपण जरी अल्पसंख्य असलो तरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आपणास भिण्याचे कारण नाही. (प्रचंड टाळ्या).
दुसऱ्यांशी संगनमतही करावे लागेल
दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कधी दुसऱ्या पक्षाशी संगमनमतही करावे लागेल. जो पक्ष आपले कल्याण करीत तोच आपल्याला जास्त जवळचा. ज्यांचा कार्यक्रम जास्तीतजास्त आमच्या कार्यक्रमाशी जुळेल त्या पक्षाशी आम्हाला संगनमत करायला काही हरकत नाही. मग ती काँग्रेस असो, समाजवादी असो अगर बहुजन समाजवादी असो.
वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहित आहे की आपण कळपाने राहिले पाहिजे.
झोपडी सोडून हवेलीत जाऊ नका
आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. तसे न झाल्यास ब्राह्मणेत्तर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मणेतर पक्षाची काय दुर्दशा झाली ? १९३२ सालपर्यंत आम्ही संगनदमताने काम करीत होतो. त्यावेळी काही ब्राह्मणेत्तर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेसमध्ये राहून उपयोग नाही. आत शिरून आतून पोखरुन काँग्रेसचा किल्ला फोडता येईल बाहेरून किल्ला फोडता येणार नाही. ह्या समजुतीने ता काँग्रेसमध्ये शिरले. मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. आपण आत शिरलो ती भयंकर चुक झाली असे ब्राह्मणेत्तर पक्षाच्या लोकांना वाटत आहे. आज ब्राह्मणेत्तर पक्ष नामशेष झाला आहे. ते आपली राहुटी कितपत बांधू
शकतील याबद्दल मला शंका आहे.
आम्ही झोपडी मोडन समझोता करावयाचा हे मला बिलकुल पसंत नाही. झोपडी मोडून आम्ही काहीही करणार नाही. फोल आरोप
देशघातकीपणाचा मी देशघातकी गोष्ट करतो, असा आरोप पूर्वी माझ्यावर केला जात असे पण त्या आरोपाचा फोलपणा सर्वांच्या नजरेस आता आला आहे. आमचा पक्ष देशाच्याविरुद्ध कधीच नव्हता. आम्ही देशाचा द्रोह केला नाही. ते एक कुभांड रचले होते. आमचा पक्ष शर्यतीत उतरला तर आमच्यापेक्षा कोणीच वरचढ होऊ शकणार नाही. आम्ही नेहमीच आघाडीला राहू (टाळ्या)
आपण आघाडीचे शिलेदार आहोत
आपण खरा समाजवाद प्रस्थापित करू शकू. शेतकरी, कामकरी राज्य आपणच स्थापणार, कारण आपल्यात श्रीमंत व मध्यमवर्ग नाहीतच. आपण सर्वच कामगार. आपण सर्वच गरीब. आम्ही लोकशाही निर्माण करू. इतकेच काय कम्युनिस्टांचा कम्युनिझम राजकारणात आमच्या मागेच आहे. आमचा पक्ष तात्विक सिद्धीत मागे पडेल, असे कधीच संभवत नाही. पुष्कळ पक्ष निघाले. त्या सर्वांना आमचा हेवा वाटतो. काँग्रेस पक्ष वगळल्यास हिंदुमध्ये शे. कास्टम फेडरेशनसारखा दुसरा पक्ष नाही. सर्वांचे डोळे आमच्या पक्षाकडे लागून राहिले आहेत. आपला पक्ष हा गुळाच्या ढेपेप्रमाणे असून इतर पक्ष हे मुंगळ्यांप्रमाणे आहेत. आमच्या पक्षाच्या सहकार्यासाठी हे इतर पक्ष आमच्या पक्षाला मुंगळ्यासारखे चिकटाला पाहतात. त्यांच्याविषयी
क्रांतीचे चक्र आपण फिरवू
आपण अत्यंत जागरुक असले पाहिजे. आपल्या लोकांची नीतीमिता सोज्वळ असावी. अस्पृश्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे याविषयी खात्री बाळगा. काँग्रेस म्हणते की परकीय सत्तेला हाकलून देऊन आम्ही क्रांती केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. परंतु ही अर्धवट क्रांती होय. खरी लोकशाही निदर्माण करावाची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील
खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. (टाळ्या) क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. असासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही. ते चक्र आम्हीच फिरवू (टाळ्या)
राजबंधन १९५० साली सुटले
सध्या मी राजबंधनात आहे. १९५० साली अगर तत्पूर्वी ते बंधन सुटेल किंवा संपेल. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यावेळी आपणाजवळ संपूर्ण व सगळ्या गोष्टी सांगेन. मी आपल्या समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद करून ठेवली आहे. परंतु त्या राखीव जागासाठी लायक उमेदवार मिळत नाही. जे राजकीय हक्क मिळविले आहेत त्यांची अंमलबजावणी खरोखर होत नाही. कारण तेथे अधिकारी वरच्या वर्गाचे असतात म्हणून त्या मानाच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजेत.
समाजाची प्रगती बुद्धीमान तरुणांच्या हाती
राजकरणाइतकेच महत्त्व शिक्षण संस्थेला आहे. एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धीमान, होतकरू व उत्साही तरुणांच्या हाती असते. ह्या दिशेने गेली काही वर्षे मी राजकारणाकडे थोडेसे दुर्लक्ष करून शिक्षण संस्थांकडे जास्त लक्ष पुरवित आहे. मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये सध्या २४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १६० विद्यार्थी आपले आहेत. त्यांचे साठी मी दर वर्षी २१०० रुपये खर्च करीत असतो. माझे सर्व लक्ष या गोष्टीकडे वेधले आहे. औरंगाबादला जाऊन तेथे कॉलेज काढण्याबद्दल विचार करीत आहे. हे सगळे ‘नामदेवांचे लग्न पांडुरंगाने केले’ त्याप्रमाणे आहे.
घटनेतील कलम नं. ९
घटना समितीने जो भावी राज्य घटनेचा मसुदा तयार केला आहे त्यात अस्पृश्यांच्या हक्कांची तरतूद करून ठेवली आहे. नवीन घटनेच्या ९ व्या कलमान्वये अस्पृश्यतेच्या नायनाट करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा जातिभेद. उच्चनीच भावना रद्द केली आहे. न्हाव्याने तुमचे केस कापले पाहिजे. धोयाने तुमचे कपडे धुतले पाहिजे, देवळे, खानावळी व उपहारगृहात आपणास उच्च वर्गीयांप्रमाणे वागविले पाहिजे. इतरांनी आपणास
समानतेने वागविले पाहिजे. हा कायदा जो मोडील त्यास शिक्षा करण्यासंबंधी कायदा करण्याचे अधिकार मध्यवर्ती कायदेमंडळाकडे सोपविले आहेत.
ह्याच गोष्टीची आपण किती वर्षेपावेतो मागणी करीत आहोत.
आपल्या मुख्य तीन मागण्या
आपण तीन प्रकारचे राजकीय हकक मागत असू १) आमचे प्रतिनिधी कायदेमंडळात असावेत २) लोकसंख्येच्या मानाने सरकारी नोकऱ्या राखून ठेवल्या पाहिजेत ३) स्वतंत्र संघ मिळालेत. फक्त एगच गोष्ट प्राप्त झाली नाही ती म्हणजे निवडणूकीत आपणास स्वतंत्र मतदार संघ मिळाले नाहीत, परंतु यामुळे आपला भाग्योदय थांबणार आहे असे मी मानणार नाही. जे मिळाले ते पदरात पाडून घ्यावे आणि अधिकाराकरिता मागणी करावी, अशी आपली वृत्ती असावी. अशी एक म्हण तुम्हाला माहित आहे की, ‘नेसेन तर जरीची साडी नाही तर उघडीच बसेन’ या म्हणीप्रमाणे वृत्ती असणे चांगले नाही. त्याच्याच काय पुरुषार्थ आहे.
माझ्या नावाचा जयजयकार करण्याच्याऐवजी मोलाच्या गोष्टी प्राणपणाने करा | मीच भारताची घटना जाळी !
माझ्या नावाचा जयजयकार करण्याच्याऐवजी मोलाच्या गोष्टी प्राणपणाने करा
संग्रह – (दि. १७/८/१९५२ रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलेले भाषण. जनता दि. २३/८/१९५२)
अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे. माझे काही मार्ग यशस्वी झाले. काही झालेले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे. २५ वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही कुठेही केलेले नाही. हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो.
ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कार्याची दिशा तीन पद्धर्तीची होती !
१) अस्पृश्य समाजात प्रथम स्व स्वाभिमान निर्माण करणे ! हे कार्य पृथ्वीमालाचे मला वाटले. मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता, कसा माणुसकीहीन बनला होता, याचे मी एक उदाहरण देतो. वीस पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती. ती भोजने झाल्यावर त्याच्या उष्ट्या पत्रावळ्या गोळा करून अस्पृश्य लोक उकिरड्यावरून नेत असत. काही वेळा त्यांच्यात
त्या उष्ट्या पत्रावळ्याबद्दल ‘मोठे तंटे माजत असत’ या अवस्थेत अस्पृश्य समाज होता. केवळ तो माणूसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मानण्यात तो धन्य मानीत होता. मानवी अधःपाताची ती कमाल होती.
मी गेली तीस पंचवीस वर्षे झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे. अन्यायाविरुद्ध झगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे हे काही साधेसुधे
काम नाही.
२) तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची आपल्याला पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचे सुद्धा काम मिळत नसे, आज २५ वर्षानंतर तेथे अस्पृश्य समाजाने मंत्री नेऊन बसविला आहे.
३) तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षापूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारे बंद होती ती मी उघडी करून दिली आहेत. अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप व फ्रिशिप्स मिळवून दिल्या आहेत एवढेच नव्हे तर त्यांना ‘आपले म्हणता ‘ येईल असे प्रगतिमान ‘सिद्धार्थ’ नावाचे कॉलेज मी त्यांच्यासाठी काढून दिले आहे. या कॉलेजात ३००० अस्पृश्य विद्यार्थी आहे. दरवर्षी त्यांना २००० रु. च्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. त्यांना राहण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढले आहे. तसेच औरंगाबादला याच कॉलेजाची शाखा उघडली आहे.
४) आता एक गोष्ट करण्याची माझ्या मबते अपुरी राहिली आहे. ती म्हणजे मुंबई शहरात आपल्या समजााच्या मालकीचा एक हॉल बांधण्याचा.
माझा हेतू फार भिन्न आहे. मुंबईत तर हॉल आहेत तेथे नाटके, तमाशे खेळ होतात, केवळ तशा त-हेच्या करमणुकी करण्यासाठी हॉल बांधण्याचा माझा हेत नाही. हा र्हाल बांधण्यात माझा एक महत्त्वाचा उद्देश आहे.
अस्पृश्य समजावर हरघडी स्पृश्य हिंदुकडून खेड्यावर अन्याय होत आहेत. आजच मला एक पत्र आले आहे की, औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती स्पृश्यांनी तारेचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकून त्यांचे जीवन असह्य केले आहे. अशा एक ना दोन हजारो तक्रारी प्रत्यक्ष माझ्याकडे येत आहेत. ती दुःखे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतात. ह्या दुःखाचे निावरण करण्यास एक मध्यवर्ती निधी हवा आहे पैशाची जरूरी आहे. दुसरी गोष्ट ही की, या सर्व तक्रारी एकत्र जमवून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी हवी आहे. त्या कचेरीत काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायला हवा. पण या गोष्टी जमणार कशा? तेव्हा हा हॉल बांधून झाला तर वर्षाला एक लाख रुपये
भाड्याच्या रुपाने आम्हाला मिळतील. हे ठिकाण मध्यवर्ती आहे. तेव्हा हा हॉल बांधून झाला तर ही एक मोठी अडचण दूर होईल. केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे. ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटा. मी हॉल बांधण्याचा कार्याला फार मोठे महत्त्व देतो, त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तत्काळ आपल्याला निर्दालन करता येईल. तेव्हा तीन महिन्याच्या आत तुम्ही या कार्यासाठी खेड्यापाड्यातून एक लाख रुपये जमवून पाठवा. प्रत्येक गावामधून दहा दहा रुपये जमवा आणि मुंबईला शेड्यूल्ड कास्ट इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. शांताराम आनाजी उपमाशा यांच्याकडे पाठवा. तो हॉल बांधण्यास मला दसऱ्याला सुरुवात करायची आहे. मला एक लाख रुपयांची तुट आहे. तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा दहा रुपये प्रमाणे तालुक्यातून एक एक हजार रुपये जमवून पाठविण्याचे कामाला आजपासून लागला.
मीच भारताची घटना जाळी !
संग्रह – (२-९-१९५३ रोजी विधीमंडळात झालेले भाषण जनता दि. ५-९-१९५३)
बहुमतवाल्या सरकारपक्षाने विनंती केल्यावरून मी घटना बनविली त्याला माझा नाईलाज होता. लोकमतानुसार मला घटना बनवावी लागली. भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या संरक्षणाचे खास अधिकार राज्यपालाला नसल्यामुळे त्यांचे योग्य संरक्षण झाले नाही आणि होऊ शकणार नाही.
म्हणूनच मी पहिल्याप्रथम ही राज्यघटना जाळून टाकीन.
आंध्र प्रांतात रेडी जमात बहुसंख्यांक असून सर्व मोठेमोठे जमिनदार आहेत. त्यांच्या खालोखाल जमिनीची मालकी कामा आणि काकु लोकांकडे आहे. पण खालच्या तळाला शेतीविना शेतावर मजुरी करणारा, रंजलेला व गांजलेला पददलितसमाज आहे. आंध्र प्रात निर्मिती बिल घेऊन पुढे सरसावलेलया गृहस्थांनी अल्पसंख्यांक नागरिकांचे बहुमतवाल्यांकडून होणाऱ्या अन्यायासापासून सरंक्षण करण्याबाबतचे कर्तव्य पार पाडलेले दिसत नाही. त्यांचे हे बिल कल्पनाशून्य व अविचारी असेच दिसते. त्यात पददलित जनतेच्या भविष्याबाबत व संरक्षणाबाबत काहीच केलेले नाही.
भाषावर प्रांत निर्माण करण्याआधी अल्पसंख्यांकांचे संरक्षणासाठी दोन गोष्टींची दखल घ्यावयास पाहिजे होती. पहिली अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी राज्यपालांना खास अधिकार देणे. आणि बहुभाषिक राज्यात कायद्याने नियुक्त मंडळे स्थापन करून त्यावर अल्प भाषिकांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मंत्रिमंडळाकडे किंवा राज्यपालाकडे दाद मागण्याचा हक्क होय ! स्वित्झर्लंड राष्ट्रदेखील बहुभाषिक राज्य होते. पण तेथे अल्प भाषिकांचा प्रश्न उपस्थित झाला नाही. कारण भाषिकांचा प्रश्न त्या राष्ट्रात जातीवादाने बरबटलेला नव्हता. पण भारतात या फुटीर जातीवादालाच भाषिकांचा प्रश्न म्हणून दुसऱ्या नावाने ओळखतात.
(भाषावर प्रांतरचनेमुळे भारताचे विभक्तीकरण होईल या विधानास त्यांनी जोरदार प्रतिकार केला. ते पुढे म्हणाले,) भारतातील २७ राज्यांपैकी २३ राज्ये आधीच भाषावार तत्त्वावर आधारलेली आहेत. ह्यापूर्वीच्या भाषिक प्रांताने भारताच्या एकजिनसीपणात कधीही बाधा आल नाही. इंग्लंमध्ये आजही स्कॉटलंडकरिता स्वतंत्र सेक्रेटरी आहे, वेल्स व मॉनमाऊशायर या भागाचे हितसंबंध बघणारी खास नियुक्त मंडळे बनविली आहेत. तद्वतच कॅनडात गर्व्हनर जनरलला फ्रेंच भाषा बोलणाऱ्या अल्पसंख्यांक कॅथॉलिक जमातीच्या संरक्षणासाठी खास अधिकार दिलेले आहेत. ते कसे? असे असताना भारतीय घटनेत मात्र अल्पसंख्यांकांना समतोल संरक्षणाची तरतूद केलेली नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. भाषावर प्रांतरचनेमुळे देशात जातीयवादाचे अवडंबर माजले.
भाषावर प्रांतरचनेच्या तत्त्वाचा पुरस्कार ह्या सरकारने गेली वीस वर्ष केला आणि त्याच पक्षाला आता भाषावर प्रांतरचना करताना कापरे का भरावे याचे मला आश्चर्यच वाटते, पण १९४९ पासून या सरकारने चालविलेले धरसोडीचे धोरणच याला कारणीभूत आहे असे माझे ठाम मत आहे. एका अधिकाऱ्याने आंध्रप्रांत निर्मितीसाठी स्वतःचे बलिदान करीपर्यंत सरकारने त्याकडे दुर्लक्ष करावे. हीच मोठी खेदाची गोष्ट होय ! सरकारवर कठोर होण्यापलिकडे मला दुसरा पर्याय मार्गच नाही. पण माझी खात्री आहे की जर अन्य देशात सरकारने प्रतिपादलेले तत्त्व अंमलात आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जीव द्यायला लागला असता तर कदाचित त्या सरकारला तेथील जनतेने आपल्याच अधिकारात मुठमाती दिली असती असे मला वाटते. भारतात काहीच घडले नाही. सरकारने शक्य त्या उपाययोजनांचा उपयोग करून आजचे बहुभाषिक प्रांत जसेच्या तसे कायम ठेवावे. ज्यावेळी भाषिक प्रांताशिवाय काही चालणार नाही, अशाच वेळी भाषिक प्रांत सरकारने करावे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.