लोकमान्य टिळक भाषण
मुख्य आदर्शवादी आणि स्वतंत्रता सेनानी लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आजच्या काळातील स्पीचमध्ये संवेदनशील व्यक्तित्वाचे गम्भीरतेने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. या ब्लॉगमध्ये, आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या जीवनाच्या विविध पहाटांचे उल्लेख केले जातील, ज्यातून सर्वांच्या आजीवनातल्या मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानाची मानली जाते. यात, त्यांच्या बद्धल, त्यांच्या कार्याच्या प्रमाणे, त्यांच्या विचारांच्या आधारावर लोकमान्य टिळक यांनी कसं महत्वपूर्ण भूमिका आहे आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात योगदान केले हे सर्वांना या ब्लॉगमध्ये विस्तारपूर्वक समजले जाईल. त्याच्या उपदेशांची आणि उद्धवलींची मूल्ये, त्यांच्या विचारांची दृष्टीकोन, आणि त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या संघर्षांचा उल्लेख केले जाईल. याच ब्लॉगमध्ये, लोकमान्य टिळक यांच्या विचारांना आणि कार्यांना मराठीतून नजरेसह पाहण्याचा अवसर मिळणार आहे.
अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी लोकमान्य टिळक यांच्या विषयी काही महत्त्वाचे दोन शब्द बोलणार आहे, मला जे म्हणायचे आहे ते काळजीपूर्वक आणि शांतपणे ऐकावे.
माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो ,
आपला भारत देश गुलामगिरीत असल्यामुळे अनेक थोर महान नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले . फुले, आंबेडकर, शाहू महाराज, गांधी ,नेहरू ,आगरकर, सावरकर ,भगतसिंह ,राजगुरू, सुखदेव आदि अनेक महापुरुषांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यापैकीच लोकमान्य हे एक होते. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी चिखली या गावी झाला हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे.त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य यांचे नाव केशव होते. हे नाव त्यांना त्यांची कुलदेवता केशव नावाची होती ;म्हणून त्यांचेही नाव केशव ठेवले होते.
लाल बाल पाल असे आपण ऐकले असेल. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. या तिघांनी मिळून स्वातंत्र्यलढ्यासाठी खूप प्रयत्न केले म्हणून लाल बाल पाल तिघांची जोडी सगळ्यांच्या परिचयाची आहे.. त्यांनी इंग्रज सरकार हे या देशातून निघून जावे यासाठी अतोनात प्रयत्न केले; म्हणून यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला. टिळकांनी लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल या दोन महत्त्वाच्या लोकांसोबत भारताला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांना अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले.
लोकमान्य यांचे बालपण अतिशय खडतर होते त्यांचे वडील चिखलगावचे खोत होते. त्यांना तीन बहिणी होत्या आणि त्यांचे खरे नाव केशव होते, परंतु सर्वजण त्यांना बाळ म्हणत. त्यांचे वडील संस्कृत मध्ये पंडित होते शिवाय शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या वडिलांना गणिताविषयी भरपूर आवड होती. त्यानंतर त्यांची बदली पुण्यात झाली. पुण्यात आल्यानंतर त्यांना अनेक शिक्षक मिळाले त्यांच्या आचार विचारातून त्यांना भरपूर शिकायला मिळाले. अन्यायाविरुद्ध चिड निर्माण होत होती. अशातच त्यांच्या लहान वयातच त्यांची आई वारली आणि लोकमान्य हे सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे ही निधन झाले. त्यानंतर त्यांचे काका गोविंदपंत यांनी लोकमान्य यांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला.
लहानपणापासून लोकमान्य करारी वृत्तीचे होते एखादी चुकीची गोष्ट लादली असता ती मान्य न करता अन्याय सहन न करता त्याविरुद्ध सडेतोड बोलणे परखडपणे बोलणे हा त्यांच्या स्वभावाचा गुण होता.
एकदा शाळेमध्ये असेच विद्यार्थ्यांनी शेंगाची टरफले वर्गात टाकली होती. शिक्षक आल्यानंतर सर्व मुलांना शेंगाची टरफले उचलण्यास सांगितले, त्यामध्ये लोकमान्य सुद्धा होते. लोकमान्य यांनी स्पष्ट नकार दिला. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही’ अशा पद्धतीने त्यांनी शिक्षकांना सुद्धा स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण चूक नसताना चूक मान्य करणे हा मोठा गुन्हा आहे; म्हणून अन्यायविरोधात लढा हा त्यांच्या लहान वयातच दिसून येतो. तेथून पुढे ते जहालवादी बनले.
महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा अशाच पद्धतीचे होत गेले. त्यांना अनेक चांगले प्राध्यापक मिळाले त्यांच्याशी विचार विनिमय करून विचार जुळतात हे पाहून डेक्कन कॉलेजमध्ये शिकताना प्राध्यापक वर्डस्वर्थ यांनी त्यांच्यामध्ये असलेले इंग्रजी साहित्यविषयी गोडी निर्माण केली. गणिताचे प्राध्यापक केरू अण्णा यांची ही छाप लोकमान्य यांच्यावर पडली.
पुढे टिळकांनी खूप शिक्षण घेतले. त्यांनी वकिली ची परीक्षा पास केली. लहानपणापासून त्यांना व्यायामाची आणि खेळाची खूप आवड होती. आपल्या मित्रांसोबत ते कुस्ती सारखे खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांची तब्बेत ठणठणीत झाली होती. पुढे त्यांनी आपल्या मित्रांसोबत १९८० मध्ये ” डेक्कन एज्युकेशन सोसायटी ” ची स्थापना केली. भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा हेतू होता.
दुष्काळ सगळीकडे असताना त्यातच प्लेग हा रोग महारोग म्हणून आलेला होता,त्यातच पडलेला महाभयंकर दुष्काळ आणि त्यातच प्लेगची साथ यामुळे भारतीय लोक ह्या महामारीच्या संकटाला सामोरे जात होती. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून लोकांना संघटित होण्यास आवाहन करत होते. इंग्रज सरकार मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.प्लेगचा महाभयंकर असा संसर्गजन्य रोग आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती अशावेळी इंग्रज सरकार भारतीय लोकांवर अन्याय जुलम करत होते.”दुष्काळ विमा निधी” यामधून इंग्रज सरकार भारतीय जनतेकडून पैसा गोळा करण्याचे काम करत होते; म्हणून या निधीचा वापर लोकांसाठी करावा असा टिळकांचा आग्रह होता.त्यांनी इंग्रजांना सडेतोडपणे उत्तरही दिले.काही ठिकाणी टिळकांनी दुकानदार यांना लोकांना अन्नधान्य देण्यास सांगितले. तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खानावळी चालवल्या. मुंबईत प्लेगचा महाभयंकर रोगाची साथ आली तीच पुण्यातही येऊन ठेपली होती.
या साथीच्या रोगाला वेळीच आळा घातला पाहिजे, म्हणून ब्रिटिश अधिकारी रॅण्ड यांची नेमणूक करण्यात आली. रॅनडच्या आदेशानुसार सैन्यांनी रोगग्रस्त लोकांना वेगळे करणे चालू केले, शिवाय लोकांवर अत्याचार करू लागले; म्हणून टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून त्यांच्यावर शाब्दिक मारा चालू ठेवला. या घटनेचाच राग मनात धरून दामोदर चाफेकर यांनी 23 जून 897 रोजी रॅन्ड व त्याचा सहकारी आयरिष्ट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.. यामुळे सर्व ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला अनेकांची धरपकड सुरू करण्यात आली. दामोदर चापेकर यांना फासावर लटकवण्यात आले.
लोकमान्य टिळक यांनाही या त्यांच्या आरोपाखाली आरोप करण्यात आला पण पुरावा सिद्ध न झाल्याने त्यांना तुरुंगात नेऊ शकले नाहीत, यावर टिळकांनी केसरीमध्ये “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा अग्रलेख लिहिला यांच्या खुनानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी टिळकांनी लिहिलेले सरकार विरुद्ध लेख या राजद्रोहाच्या आ रोपाखाली त्यांना तुरुंगवास भोगाव लागला. त्यांना तीन महिन्यासाठी डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर मुंबईच्या भायखळा या ठिकाणी ठेवण्यात आले. सर्वसामान्यप्रमाणे टिळकांना तुरुंगात वागणूक दिली जात असल्याने सर्व ठिकाणी इंग्रज सरकार यांच्यावर नाराजीचा सूर उमटला, म्हणून त्यांना येरवडा या ठिकाणी पाठवण्यात आले. बारा महिने त्यांना तुरुंगवास भोगाव लागला.
लोकांमध्ये एकी नसल्यामुळे या कारणामुळे ब्रिटिश सरकार भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार करत आहे, म्हणून भारतीय जनता आपल्या घरात गणेश उत्सव साजरा करत असतात गणेश उत्सव हे घराघरात साजरा केला जात असल्याने तोच उत्सव सार्वजनिक ठिकाणी केला तर लोक संघटित होतील शिवाय महाराष्ट्राचे दैवत असणारे शिवाजी महाराज यांच्याविषयी लोकांच्या मनात आदरयुक्त भाव असल्यामुळे शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी केले तर लोक एकत्र येतील आणि लोक संघटित होण्यास आणि त्यांच्यामध्ये आपले विचार पटवून देण्यास वेळ लागणार नाही याची जाणीव लोकमान्य टिळक यांना होत गेली. म्हणून त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न केले.
इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र लढ्यात त्यांनी उडी घेतली. होमरूल चळवळीची सुरुवात टिळकांनीच केली. त्यांनी ‘ केसरी ‘ आणि ‘ मराठा ‘ हि वर्तमानपत्रे चालू केली. त्यातून त्यांनी इंग्रंजांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळेच लोकमान्य टिळकांना ‘ भारतीय असंतोषाचे जनक ‘ म्हटले जाते. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले कि ” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच “. टिळकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकले पण आपल्या भारत भूमीसाठी त्यांनी ती शिक्षा हसत हसत भोगली. मंडाले च्या तुरुंगात असताना त्यांनी “गीता रहस्य” हा महान ग्रंथ लिहिला.
टिळक आगरकर मैत्री संबंध टिळक म्हटले की आगरकर आलेच आणि आगरकर म्हटले की टिळक हे आलेच हे सर्वांना माहीत आहे.. दोघेही चांगले कॉलेजचे मित्र होते दोघांचे विचार एकमेकांना पटत होते दोघेही देशप्रेमाने वेडे झाले होते. भारत देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते त्यांनी सरकारी नोकरी न करता आपले आयुष्य देशसेवेसाठी घालवणे उचित आहे हे ठरवलं होते म्हणून देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे त्यांचे विचार होते; परंतु त्यांच्या विचारांमध्ये एवढी तफावत होती की आगरकर हे सामाजिक सुधारणा यासाठी आग्रही होते तर टिळक हे राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी आग्रही होते.
टिळकांना अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी त्यांचे विचार होते तर आगरकर यांचे असे विचार होते की अगोदर समाज हा सुधारला पाहिजे. स्वातंत्र्य हे उशिरा मिळाले तरी चालेल यामुळे दोघांचे मैत्रीचे संबंध असले तरीही दोघांच्या मतमतांतरामुळे विचारात वैचारिक मतभेद निर्माण झाले. पण त्यांची मैत्री त्यांची देशनिष्ठा हे मात्र एकमेकांना पूरक अशीच होती.
आज आपण खूप उत्साहाने सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरी करतो. त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. सार्वजनिक उत्सवामुळे लोक एकत्र येतात. त्यांच्यात आपुलकी निर्माण होते. म्हणून त्यांनी हे उत्सव सुरु केले. त्या काळात ह्या सार्वजनिक उत्सवामुळे त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची भावना जागृत केली. त्यांच्या ह्या कामामुळे लोकांनी त्यांना ” लोकमान्य ” म्हणजे लोकांना मान्य असलेले अशी पदवी त्यांना बहाल केली. लोकमान्य भारतीय असंतोषाचे जनक म्हणून नावारूपास आले होते. लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती. लोकमान्य याचा अर्थ लोकांनी स्वीकारलेले, लोकांना मान्य असलेले लोकमान्य हे त्यावेळी लोकांच्या मनामध्ये प्रभाव टाकत होते, म्हणून लोकांना ते हवेसे वाटत असल्यामुळे लोकांनी दिलेली ही त्यांना उपमा होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणाच असा त्यांचा परखडपणे विचार होता.
लोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत झाले. लोकमान्य टिळक यांना सहा अपत्य होती त्यापैकी एक लहानपणीच वारला होता, त्यापैकी तीन मुली आणि दोन मुले राहिले त्यांच्या पत्नीचे नाव तापीबाई होते हे नाव त्यांचे लग्नाच्या अगोदरचे होते. लग्नानंतर त्यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवले. ज्यावेळी लोकमान्य हे ब्रह्मदेशात तुरुंगात असताना तापीबाई यांचे निधन 7 जून 1912 रोजी झाले. ह्या कोकणातील त्यांना त्यांचे गाव लाडघर होते. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.
टिळकांकडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप आहे. आपण पण त्यांच्या प्रमाणे खूप शिकले पाहिजे. आपल्या भारत देशावर नेहमी प्रेम केले पाहिजे. नेहमी खरे बोलले पाहिजे. मोबाईल पेक्षा आपण मैदानात आणि खेळात वेळ घालवला पाहिजे. सर्वानी आदराने आणि प्रेमाने राहिले पाहिजे.
अशा पद्धतीने आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी माझे चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल या ठिकाणी गुरुजनवर्ग आणि विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा लोकमान्य टिळक यांना शतशः अभिवादन करतो आणि माझे भाषण थांबवतो.
अश्या ह्या महान नेत्याला माझे शतश नमन !
जय हिंद जय महाराष्ट्र !
या शेवट होण्यापूर्वी, आपल्याला आपल्या लोकमान्य टिळक यांच्या जीवनातल्या महत्वाच्या अंशांवर विचार करण्यासाठी प्रेरित केले गेले. त्यांच्या उपदेशांच्या साथीच, आपल्याला आपल्या स्वप्नांच्या मार्गाला स्पष्टीकरण आणि प्रेरणा मिळावी हीच आशा आहे. आपल्याला संघर्षांतील धैर्य, समर्थ विचारधारा आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांसाठी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील अद्वितीय संघर्ष आणि समर्थ दृष्टिकोन आदर्श सापडेल. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांची विशेष महत्त्वाची देवाण होईल. त्यांच्यासोबत, आपण सर्वजण एकत्रित झालो असताना, आपल्याला त्यांच्या आदर्शांच्या आणि उपदेशांच्या आधारावर स्वतंत्र भारताचा आध्यात्मिक विकास करण्याची सामर्थ्य दिसेल. या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचा स्मरण करून, लोकमान्य टिळक यांना नमन!
आवडलं असल्यास कृपया आपली टिप्पणी द्या आणि सामायिक करा! 📝🔄
खूप छान