बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त
बौद्ध धर्म हा एक अत्यंत महत्त्वाचं आणि संघटित धर्म आहे ज्याला भारतीय समाजातील महत्वाच्या भूमिका मिळाली. ह्या धर्माचा उदय आणि अस्त ह्याच्यात खूप काही लपवलं गेलं आहे. बाबासाहेब अंबेडकर यांचं ह्या विषयावरचं भाषण हा एक अत्यंत महत्त्वाचं आणि समजोत्साहक आहे.
या भाषणात, अंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या उदयाच्या कारणांची आणि त्याच्या अस्ताच्या कारणांची चर्चा केली. त्यांनी बौद्ध धर्माच्या संस्थापकांच्या योजना, त्याच्या प्रचाराचे माध्यम, आणि धर्माच्या मूल्यांचे संरक्षण कसे जाणारे आहे, हे सर्व विचारले. त्याच्या भाषणात, अंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या सांस्कृतिक, सामाजिक, आणि धार्मिक प्राधान्यावर गंभीरतेने विचार केले आणि त्याच्या अस्ताचे कारण कसे होते, हे त्यांनी स्पष्टपणे विचारले. त्यांच्या भाषणात अस्ताचे कारण कसे असतात आणि बौद्ध धर्माचा पुनरुत्थान कसा होईल, ह्याच्यावर त्यांनी विचार केले.
संग्रह – (वाय.एम.बी.ए. कोलंबोद्वारा आयोजित विश्व बौद्ध भ्रातृत्व संमेलनात दि. ६ जून १९५० रोजी दिलेले भाषण)
बंधू आणि भगिनींनो,
एखाद्या विषयांच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ्य ज्ञान होत असते. म्हणून ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण स मजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्त्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदुधर्म होता हे मत मला मान्य नाही. हिंदुधर्म तर सर्वात शेवटी, विचाराची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रकारांनंतर ब्राह्मण धर्मामध्ये आले आणि ब्राह्मण धर्माचे रुपांतर हिंदु धर्मामध्ये झाले. बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णामध्ये विभाजन होण्यासाठी विरोध होता. या चातुर्वर्ण्यची सुरुवात ब्राह्मण धर्माने केली होती. फ्रान्सकरिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्त्वाची आहे तितकाच बौद्ध धर्माचा भारतातील उदयही महत्त्वाचा आहे.
वैदिक शिकवणिनुसार आचरण करणे सोपे आहे. वैदिक लोक मुख्यतः यज्ञ पूजक होते. वैदिक आर्याची जवळजवळ तेहतीस आराध्य दैवते होती, असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत. या देवतांच्या पूजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते. कृषियुगातील त्या आर्यांना गो धन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत होते. म्हणून त्या आपल्या देवतांची पूजा गाईचा यज्ञात बळी देऊनच करीत असत. यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा ठरला. यज्ञामध्ये असंख्य पशुंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशू यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्गप्राप्ती होते अशी यज्ञकांची श्रद्धा होती, ‘वैदिक हिंसा, हिंसा न भविति’ अर्थात वैदिक यज्ञात आलेली हिंसा हिंसा नव्हे.
यज्ञामध्ये सर्रास प्राणिहत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्यांचे मास खाण्यास योग्य होते अशा बकऱ्या, मेंढ्या, गाई यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्त्व वाढले आणि ब्राह्मण वादाचा उदय झाला. या ब्राह्मणवादाने समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णामध्ये विभाजन केले. चार वर्णाची स्थापना करून समाजात विषमता निर्माण करणे ब्राह्मणावादाचा मुख्य हेतू होता. कारण त्याशिवाय ब्राह्मणांचे प्रभुत्वी स्थापन करणे संभवनीय नव्हते. आपल्या श्रेष्ठत्वाच्या प्रस्थापनेसाठी ब्राह्मणांनी काही मंत्रांची रचना केली आणि त्याद्वारे ते ब्राह्मणांची ब्रह्माच्या मुखातून, क्षत्रियाची बाहूतून, वैश्यांची मांड्यातून व शूद्रांची ब्रह्मांच्या पायापासून उत्पत्ती झाली, असा प्रचार करू लागले. यामुळे ब्राह्मण सर्व वर्णाचे गुरु व सर्वर्वीश्रेष्ठ आहेत, असे त्यांचे सांगणे होते. परंतु भगवान बुद्धांनी त्यांचे खंडन केले. ते म्हणतात, “जशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसेच ब्राह्मण होतात. ब्राह्मणांच्या स्त्रीयां ऋतुमती होतात, गर्भवती होतात, नऊ मासपर्यंत गर्भपोषण करतात. प्रसुत होतात, मुलांना स्तनपान करतात असेच इतर सर्वत्र दिसून येते. अशा स्थितीत ब्राह्मण ब्रह्महाच्या मुखातून निघाले. शुद्र त्याच्या पायापासून निघाले. असे ते म्हणू तरी कसे शकतात, जन्माने कोणीही शूद्र वा ब्राह्मण होत नाही. तर माणूस करणीमुळे ब्राह्मण किंवा शुद्र ठरतो.”
यापुढे भगवान म्हणाले, “जटा, दाढी, गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राह्मण होत नाही. जो सत्यानुसार व धर्मानुसार आचारण करतो, जो काया वाचा मनाने कोणतेही पाप करत नाही, जो काम क्रोध रहित आहे, जो वृत्ती, शीलवाहन, अनुत्नुक, दाऊत आणि जितेन्द्रित आहे, जो तृष्णारहित व संशयरहित आहे, जो राग, द्वेष, मदविहीन आहे, जो शोकरहित निर्मल व शुद्ध आहे. ज्याने भवचक्रात लोटण्यास कारणीभूत होणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे. ज्याने रति व आरतीचा त्याग केलेला असून त्यामुळे तो शांतिचत्त आहे, जो गंभीर, प्रज्ञावंत, मेधावी, मार्ग अमार्गाचा ज्ञाता आहे आणि तो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणू शकतो.”
तुम्हीही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी साह्यकारी होऊ शकतो, ज्यात मानवाच्या मुक्तीचे द्वार खुले आहे, आणि ज्यात मानवामानवात भेदभाव नसून समता आहे तो धर्म, धर्म संज्ञेला पात्र ठरू शकतो. ज्या धर्माचे मूलतत्त्व मानवामानवात भेद निर्माण करणे हेच आहे, तो धर्म सत्यम म्हणण्याच्या लायकीचा नाही. ब्राह्मण धर्माने मानव समाजात भेदाच्या दऱ्या निर्माण केल्या. त्याने स्त्रियांच्या व शुद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली. भगवान बुद्धांच्या धर्माचा प्रधान हेतू मानवी समता हा आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आहे. हिंसेचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्यांचे एक प्रमुख अंग आहे. कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की, त्याला स्वर्ग मिळाला, असे बौद्ध धर्माने सांगितले नाही. बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत असे मला म्हणावयाचे आहे. बौद्ध धर्माच्या उदयास एखादा शुद्र राजा होऊ शकेल ही कल्पना करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की, बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शुद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झालीर. गणतंत्रीय राज्य – पद्धती ही बौद्ध काळाची देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणीनंतर इ. पू. २७४ पर्यंत बोद्ध धर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापती अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंदगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्य कला, चित्रकला,
मूर्ती कला, इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला येथील विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता.
प्रश्न असा निर्माण होतो की, जो धर्म इतका मोठा, श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशी होता. त्यामुळे मी त्याला दोष देत आहे, सम्राट अशोकाने आपल्या कारकीर्दीद बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते. त्यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची भरपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते.
बौद्ध ग्रंथांवरून दिसून येते की भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यामध्ये जवळ जवळ शेकडा ६० ब्राह्मण होते. ब्राह्मण लोक भगवान बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धाचा व त्यांच्या धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धर्मात जातिभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणांगत होऊन सिद्ध भिक्षू बनू लागले व धनिकाद्वारा व राजाद्वारा त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही व बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या ते मार्गाला लागले.
भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता, प्रदेश-देवता, वन-देवी, नद-नदी-देवी, इत्यादी देवता होत्या व त्यांची पूजा होत होती. त्याप्रमाणे कुलदेवताही होत्या. राजलोक व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुदा ब्राह्मणद्वारा होत असे. त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पुजेसाठी
जाणारे ब्राह्मण राणीच्या मध्यस्थीने राज्यशासनावर आपला प्रभाव चालवीत असत. या प्रभावाचा उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणाऱ्या बौद्ध धर्माची पाळेमुळे खणून काढण्याचा ते प्रयत्न करीत. सम्राट अशोकाच्या काळात या कुलदेवता पूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो मी बौद्ध धर्माच्या मार्गाने अनुकरण करीत असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही देवी देवतांची पूजा करायची गरज नाही. आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकाऱ्यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्ती काढून टाकल्या. हा ब्राह्मणांवर मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिद्ध झाले. ब्राह्मण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की, सर्व राजेलोक मेल्यानंतर नरकात जातात. कारण राज्यशासन चालविताना त्यांना पुष्कळशी पापकृत्ये करावी लागतात. यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राह्मण लोक राज्यकारभार आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते. मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरी, मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत त्याचप्रमाणे कायदे कानून तयार करीत होते, परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खूप मोठी हानी झाली तेव्हा राज्यासन न चालविण्याच्या आपल्या सिद्धान्ताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नाला लागले.
अशा त-हेच्या अगणित घटना भारतीय वाङ्मयात सापडतात. काही ठिकाणी असेही आढळून येते की, जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते तेथे त्याना धार्जिणे असलेल्या क्षत्रियांना हाताशी धरून किंवा त्यांना समोर करून म्हणजे त्याला आपल्या हातातील बाहुले बनवून राज्यकारभार ते करीत असत. अशा प्रकारे पुन्हा ब्राह्मणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला. आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला.
ब्राह्मणी शासनाधिकाराची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन घडून येण्यामध्ये दिसून येते. भारतीय इतिहासकारांनी या महान घटनेला महत्त्व दिले नाही. ही फार दुःखाची गोष्ट आहे. वस्तुतः ही भारतीय
इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. अंतिम मौर्य सम्राट महाराला बृहद्रथाचा सेनापती पुष्पमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. याचा गुरु पतंजली हा होय. पतंजलीने योगविद्या बौद्धापासूनच मिळविली होती. परंतु नंतर हा बौद्धाचा शत्रू बनला. यांच्या सल्ल्यानुसार सेनापती शृंगवंशीय पुष्यमित्राने बृहस्थाला ठार मारले व मौर्यवंशांच्या बदलती आपल्या शृंगवंशाच्या नावाने ब्राह्मणी राज्य चालविले. या ब्राह्मणी राज्याने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोहोचविले. ब्राह्मणी धर्माच्या पुनस्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्म भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ही फार मोठी ऐतिहासिक घटना होय.
भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यास विदेशी आक्रमणेही कारणीभूत ठरली असे मानण्यात येते. परंतु युनानी लेकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला झळ पोहोचली नाही. याउलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य केल्याचेही पुरावे इतिहासासत आढळतात. गुप्त काळात भारतावर हुणाची आक्रमणे झाली. परंतु गुप्त राजाकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतातच स्थायिक झाले. यांच्याकडूनही बौद्ध धर्माला झळ पोहाचचली नाही. याउलट पेशावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती. त्याने तक्षशीला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धाची चौथी धर्म संगीती (धर्मसभा) भरविली होती. या धर्मसंगीतीच महायान मार्गाचा उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध्ये लिहिले जाऊ लागले. विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक छळ पोहोचला. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते. त्यांनी बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड केली व भिक्षूना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून चोलधारी भिक्षूना सैनिक समजून त्यांचा सहार केला. जे भिक्षु त्या भीषण रक्तापातातून वाचले ते नेपाळ, तिबेट, चीन इत्यादी देशात पळून गेले.
नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्र व भोजपत्रावर लिहिलेले दोन हजार ग्रंथ होते. व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठविले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तेथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले. मुसलमान बनविले. आणि बौद्ध मूर्तीची तोडफोड केली, ग्रंथालये जाळली व विवाह नष्ट केले. माझे काही हिंदु मित्र मला विचारतात की मुलसामनानी आक्रमकांनी हिंदु मूर्ती व हिंदु मंदिरांचीही नासधूस केली आहे ना? यावर माझषे उत्तण असे की, जितकी बौद्ध धर्माची नासधुस त्यंनी केली तितकी हिंदु धर्मची केली नाही. याचे कारण असे की, बहुधा सर्वच ब्राह्मण, गृहस्थ होते आणि ते आपल्या परिवाराहस आपल्या घरीत रहात असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खूण नव्हती. परंतु बौद्ध भिक्षु मात्र कुटुंबरहित, चोलधारी आणि विहारात राहत असतं, आणि त्यांना सहज ओळखता येत होते. त्यामुळे हिंदुंची प्रसिद्ध जरी मंदिरे मुसलमानांनी फोडली असली तरी त्यांच्या धर्मागुरुंना व पुरोहितांना हानी पोहचली नाही.
दरम्यानच्या काळात शैव योग्यांनी शैवधर्माचा व ब्राह्मणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. वैष्णव आणि शैवामध्ये जोरदार संघर्ष झाला. शेवटी ब्राह्मणांनी शैवांना ‘रुद्र’ बनवून आपणामध्ये सामील करून घेतले, व शैव आणि वैष्णव यांचे ऐक्य झाले. सध्याच्या काळात हिंदुधर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे. पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता परंतु आता ती अहिंसेची शिकवण देतो. बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदु धर्माने आत्मासत केली. प्रतिमा, चैत्य, विहार आणि भिक्षु इत्यादी दृष्टीने आज भारतात बौद्ध धर्म नसला तरी तात्त्विक रुपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.