Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi | शिवछत्रपतींची अद्भुत निर्णयक्षमता

शिवछत्रपतींची अद्भुत निर्णयक्षमता

छत्रपती शिवराय ! Chhatrapati Shivaji Maharaj !!

हिंदुस्थानच्या पाच हजार वर्षांच्या इतिहास-प्रवाहावरील एक उत्तुंग दीपस्तंभ! अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेला हा महामानव! वयाच्या चौदाव्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि चव्वेचाळीसाव्या वर्षी सोन्याच्या सिंहासनावर राज्याभिषिक्त छत्रपती झाले. इतक्या कमी काळात इतके उत्तुंग यश? या मध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्यांच्या थक्क करणाऱ्या ‘निर्णयक्षमतेचा’! मुळात निर्णयक्षमता म्हणजे तरी काय? तर आपल्या समोर कोणत्या समस्या आहेत, त्यावर मात

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi शिवछत्रपतींची अद्भुत निर्णयक्षमता

Story of Chhatrapati Shivaji Maharaj In Marathi

करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडणे व सर्व ताकद एकवटून यश खेचून आणणे. मात्र, या साठी अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. निर्णय नुसता बरोबर असून चालत नाही तर तो अचूक वेळी (टायमिंग) घ्यावा लागतो. शिवाय स्वतःच्या आणि शत्रूच्या क्षमता आणि कमतरतांचा (प्लस व मायनस पॉइंट्स) अभ्यास, साधनांची उपलब्धता, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहाणे व यशस्वी होण्यासाठी सहकाऱ्यांमध्ये संघटित प्रयत्नांसाठी उत्तुंग ध्येयवाद निर्माण करणे ! यामुळेच आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करता येते.

आता आपण शिवरायांच्या जीवनातील काही घटना, त्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्या मागचे त्यांचे चिंतन या तीन विभागात त्यांच्या निर्णयक्षमतेचे विश्लेषण करूया.

‘पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका’ हे शिवचरित्रातील एक रोमहर्षक प्रकरण म्हणून आपल्याला माहीत आहे. त्यातील शिवरायांची निर्णयशक्ती दाखवणारी ही काही उदाहरणे बघून इतर घटनांकडे वळूयात.


पन्हाळ्याची निवडShivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi पन्हाळ्याची निवड

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Choice of Panhala Fort

आदिलशहाने कर्नुलचा सुभेदार सिद्दीजौहर याला तातडीने शिवाजीराजांवर पाठवले. तसेच मोगल बादशहालाही एखादा सरदार शिवाजी राजांविरुद्ध पाठवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे दक्षिणेकडून सिद्धी आणि उत्तरेकडून शाहिस्तेखान अशा कात्रीत स्वराज्य सापडले. अशावेळी शिवाजी राजे पन्हाळगडावर गेले सिद्दीच्या वेढ्यात स्वतःला अडकवून घेतले. असा समजा राजगडकडे गेले असते तर सिद्दी त्याच दिशेने आणि निर्णय त्यांनी का घेतला? राजे येणार आणि येताना नवीनच स्वराज्यात आलेला कोल्हापूर ते राजगड हा मुलुख बेचिराख करणार. त्यामुळे तेथील प्रजेवर अन्याय होणार. ‘संकट माझ्या अंगावर आले तरी चालेल पण माझ्या मागे माझी प्रजा, माझी रयत सुरक्षित असली पाहिजे,’ असा विचार करून राजांनी पन्हाळ्यावर राहून शत्रू अंगावर ओढवून घेतला.

दुसरे कारण म्हणजे पूर्वी शहाजीराजांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला तेव्हा अदिलशहा व मोगलांनी एकत्र येऊन त्यांच्यावर आक्रमण केले होते. राजांना हा इतिहास ज्ञात होता. जर आपण राजगडाकडे गेलो तर सिद्दी आणि शाहिस्तेखान एकत्र येतील आणि युद्धात एक अधिक एक बेरीज दोन नाही तर तीन होते. हा तिसरा आकडा दोघे एकत्र आल्यामुळे त्यांच्या वाढलेल्या मनोधैर्याचा असतो. पण राजे पन्हाळ्याला राहिल्याने त्या दोन सैन्यांचे एकत्र येणे त्यांना टाळता आले.


पावसाळ्यात पलायनाचा निर्णयShivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi पावसाळ्यात पलायनाचा निर्णय

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – A decision to escape during the rainy season

राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले तेव्हा दोन गोष्टींकडे ते आशेने पाहात होते. एक सेनापती नेताजी पालकर व दुसरा सह्याद्रीचा पावसाळा. पण राजांचे दोन्ही अंदाज चुकले. सिद्दीने नेताजींचा पराभव केला व पावसाळ्यातही वेढा विस्कळीत होऊ नये म्हणून त्याने पुरेपूर काळजी घेतली. पण अंदाज चुकले तरी राजे निराश झाले नाहीत. त्यांनी प्रचंड पाऊस कोसळत असताना पलायन केले. जर राजांनी हा निर्णय घ्यायला उशीर केला असता आणि पावसाळा निघून गेला असता तर सिद्दीने आपला वेढा पूर्वर्वीपेक्षा अनेक पटींनी आवळून धरला असता. मग तेथून पळून जाणे अशक्य झाले असते. राजांनी पळून जाण्याची अचूक वेळ साधली हे मान्य करावे लागते.


घोडखिंडीत शत्रूला रोखले

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi घोडखिंडीत शत्रूला रोखले

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Stopped the enemy in the GhodKhind

राजांनी पन्हाळा सोडला. मात्र त्याची चाहूल सिद्दीला लागताच त्याने महाराजांचा पाठलाग सुरू केला. इथे लक्षात येते की सर्व सैन्य घेऊन जर राजे विशाळगडच्या दिशेने गेले असते तर तेथील सपाटीवर राजांसकट सारे सैन्य शत्रूच्या कचाट्यात सापडले असते. राजांनी घोडखिंडीत बाजीप्रभूना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शत्रूसैन्य खिंडीतच थोपवता आले व राजे विशाळगडाकडे जाऊ शकले. वास्तविक हा सारा प्रदेश स्वराज्यात येऊन फारच थोडे दिवस झाले होते. तरी घोडखिंड हेच अडवणुकीसाठी योग्य स्थान आहे, हे राजांनी अचूक हेरले; तेही पावसाळ्यात. हेच राजांचे सेनापतीत्वाचे वैशिष्ट्य !


इंग्रजांचा सूड उगवला

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi इंग्रजांचा सूड उगवला

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – British revenge

राजांनी इंग्रजांशी करार करून व्यापरी सवलती दिल्या होत्या. पण राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकल्यावर आता ‘शिवाजी संपला’ असा विचार करून इंग्रजांनी आपल्या लांबपल्ल्यांच्या दोन तोफा अदिलशाही सैन्यात पाठवल्या. शिवाय आपली निशाणे फडकवत तोफांचा मारा केला व आपल्या कृतघ्नतेचे दर्शन घडवले. राजांचा भयंकर संताप झाला; पण त्या वेळेस त्यांनी अपमान गिळला. मात्र वेढ्यातून सुटल्यावर योग्य वेळ येताच इंग्रजांवर हल्ला केला. त्यांच्या वखारी खणून काढल्या व इंग्रज कैदयांना अंधारकोठडीची शिक्षा ठोठावली. म्हणजे गुन्हेगाराला माफ करायचे नाही; पण योग्य वेळेची / संधीची वाट पाहायची आणि हल्लाबोल करायचा. शत्रूचे आव्हान संपुष्टात आणायचे, ही वृत्ती दिसते.

पन्हाळ्यावरून पळाल्यावर आता शास्ताखान या मोगल सरदाराशी संघर्ष करावा लागणार हे राजांनी ओळखले होते. एकाचवेळी दोन शत्रू अंगावर घेणे बरोबर नाही. हे ओळखून राजांनी पन्हाळा अदिलशहाला देऊन जणू मैत्रीचा हात पुढे केला. दुर्बळ झालेल्या अदिलशहानेही पन्हाळा घेऊन शांत राहाणे पसंत केले आणि राजांच्या चातुर्याने एक संकट शांत झाले.


रणांगण म्हणून प्रतापगडाची निवड

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi रणांगण म्हणून प्रतापगडाची निवड

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Selection of Pratap gad as the battlefield

अफजलखान आला तेव्हा राजगड, पुरंदर, सिंहगड असे प्रतापगडाच्या तुलनेत जास्त उत्तुंग व बळकट किल्ले राजांकडे होते. पण ते स्वराज्याच्या गाभ्यात होते व दुसरे महत्त्वाचे की त्यांच्या पायथ्यापर्यंत जाणे सहज शक्य होते. या उलट प्रतापगड हा सरहद्दीवर होता व त्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी महाबळेश्वरचे पठार ओलांडून, रडतोंडीच्या घाटाने जावळीत उतरणे भाग होते. म्हणून राजांनी प्रतापगडाची निवड केली. उपलब्ध पर्यायांपैकी त्यातल्या त्यात सर्वात उत्तम असणारा पर्याय निवडण्याची राजांची वृत्ती दिसून येते.

अफजलखान आक्रमणाच्या वेळी सारा समाज धास्तावलेला होता. अशा वेळी राजांनी प्रत्यक्ष भवानीचा आपल्याला दृष्टांत झाला, असे सांगितले. इथे राजांनी आपल्या लोकांच्या श्रद्धेचा उपयोग प्रजेचे

मनोधैर्य वाढवण्यासाठी केला.


शाहिस्तेखानावर छापा टाकायला स्वतः जाणे

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi शाहिस्तेखानावर छापा टाकायला स्वतः जाणे

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Going himself to raid Shahistekhan

शाहिस्तेखानावर हल्ला करण्याची योजना अत्यंत धोकादायक होती. या मोहिमेवर इतर कोणाला पाठवणे शक्य होते. पण राजे स्वतः गेले. यामध्ये त्यांचा जबरदस्त आत्मविश्वास दिसून येतो तसेच ‘मृत्यूला न घाबरण्याचा संस्कार’ इतरांवर करण्याची त्यांची क्षमता दिसून येते. हीच गोष्ट अफजलखानाच्या बाबतीतही. अफजलखानाला त्यांनी स्वतः ठार केले म्हणून बाजीप्रभू, तानाजी, मुरारजबाजी प्राणांची पर्वा न करता लढले होते. शाहिस्तेखानवरील हल्ल्याचा दिवस निवडणे

राजांनी लाल महालावर छापा टाकला तो दिवस निवडताना त्यांनी रमजानचा महिना निवडला. मुघल सैन्याचे रोजे चालू होते. अशा वेळी रात्री त्यांना गाढ झोप लागली असेल आणि आपल्याला आपले काम साधता येईल याची महाराजांना खात्री होती. शत्रूच्या सणाचा देखील त्यांनी स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला.


उंबरखिंड-भूगोलाचा सुयोग्य वापर

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi उंबरखिंड-भूगोलाचा सुयोग्य वापर

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Umbarkhind – Proper use of geography

कारतलबखान कोकण जिंकायला निघाला होता. कोकणात शत्रू शिरला तर स्वराज्याला पाठीमागून धोका निर्माण झाला असता. पुणे ते लोणावळा व पुढे कोकण या शत्रूच्या मार्गावरील सपाट प्रदेशात त्यांचा पराभव करणे अवघड होते. पण सह्याद्रीतील घाटातून कोकणात उतरताना त्याला पराभूत करणे शक्य होते. खानाने उंबरखिंडीची निवड केली. तिच्या भौगोलिक आकाराचा नेमका वापर करून राजांनी शत्रूची कोंडी केली आणि तीन हजार मावळ्यांकडून तीस हजार शत्रूचा पराभव केला.

सेनापतीला निर्णय घेताना भूगोलाचे ज्ञान किती आवश्यक असते ते या घटनांवरून दिसते.


राजांचा दक्षिण दिग्विजय

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi राजांचा दक्षिण दिग्विजय

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Dakshin Digvijaya of Shivaji Maharaj

राज्याभिषेकानंतर राजे दक्षिणेत गेले. तामिळनाडूतला जिंजीचा किल्ला त्यांनी घेतला. कारण राजांना हे माहीत होते की एक ना एक दिवस उत्तरेतील औरंगजेब दक्षिणेत उतरेल व ती लढाई निर्णायक असेल. अशा वेळी दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत राजांनी स्वराज्य विस्तारले. पुढे औरंगजेबाच्या आक्रमणकाळात छत्रपती राजाराम महाराज आठ वर्षे जिंजीच्या आश्रयाला राहिले.

यावरून राजांची दूरदृष्टी दिसून येते.


साजरा-गोजरा किल्ल्यांची निर्मिती

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi साजरा-गोजरा किल्ल्यांची निर्मिती

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Construction of forts Sajara – Gojara

राजांनी दक्षिण भारतात वेल्लोर हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. मग त्यांनी काय करावे? शेजारील डोंगरावर साजरा व गोजरा नावाचे दोन किल्ले बांधले.

असेच आणखी एक उदाहरण म्हणजे पश्चिम समुद्रातला जंजिरा किल्ला राजांना जिंकता आला नाही. म्हणून त्यांनी कुरटं बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आणि समुद्रावर सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न साकार केले.


पुरंदरचा तह

Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi पुरंदरचा तह

Story of Chhatrapati Shivaji Maharaj – Treaty of Purandar

राजांवर आलेल्या संकटांपैकी मिर्झाराजे जयसिंगाचे आक्रमण भयंकर होते. ज्या प्रजेचे रक्षक म्हणून राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली, ती रयत संकटग्रस्त झाल्याचे पाहून राजांचे मन हेलावले. अखेर त्यांनी माघार घेऊन तह करण्याचा निर्णय घेतला.

हा तह अपमानास्पद होता. आयुष्यभर जपलेलं स्वप्न उधळलं गेल्याचं दुःख होतं. आपल्याच लोकांमध्ये आपला प्रयोग चेष्टेचा विषय बनेल अशी शक्यताही होती. अशा वेळी, ‘उद्ध्वस्त झालो तरी बेहत्तर ! पण माघार घेणार नाही’ अशा पद्धतीचा त्यांनी घेतला नाही.

निर्णय त्यांच्या या निर्णयात, पराभवातही एखादा महामानव कसे धीरोदत्त वर्तन करतो याचे उत्कट दर्शन घडते.

कान्होजींना आलेले अदिलशाही पत्र :

अफजल आक्रमणाबरोबर बारा मावळातल्या देशमुखांना विजापूरची पत्रे आली होती. त्यात आपल्याला येऊन मिळावे याबद्दलचे आमिष आणि नाही तर धमकी हे दोन्ही होते. ते पत्र घेऊन कान्होजी

जेधे राजगडावर राजांसमोर हजर झाले. आता राजे काय उत्तर देतात हे पाहाणे उत्सुकतेचे होते.

राजांनी कान्होजींसमोर हात जोडून स्वराज्यात थांबण्याची विनंती केली नाही. उलट, ‘जर तुम्हाला खानाकडे जायचे असेल तर जाऊ शकता’ असे सुनावले. समोरच्या माणसाची निष्ठा किती पक्की आहे याची परीक्षा घ्यायची महाराजांची वृत्ती दिसून येते. मात्र, एकदा परीक्षेत खरे उतरल्यावर राजांनी लगेच कान्होजींना त्यांचा कुटुंब कबिला वाईहून तळेगाव ढमढेऱ्याला आणायला सांगितला सहकाऱ्यांच्या घरच्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे. याचाही जणू वस्तुपाठ घालून दिला.

या आणि अशा अनेक घटनांमधून राजांचे निर्णय कौशल्य दिसते. काही निर्णय हे रणांगणावरील सेनापती म्हणून तर काही प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणून अभ्यासण्यासारखे आहेत. काही निर्णय अचानक संकट आल्यावर घेतलेले तर काही प्रदीर्घ चिंतनातून आलेले. मात्र, यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय ‘बालवयामध्ये त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या निश्चयाचा’ होता. एकदा ‘काय करायचं’ नक्की झालं की ‘कसं करायचं’ याचा विचार सुरू होतो. ध्येय नक्की झालं की वाटा ठरवता येतात. साध्याच्या निश्चितीनंतर साधनांची जुळवाजुळव करता येते.

स्वराज्य स्थापनेचे इप्सित गाठण्यासाठी राजांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांच्या प्रखर ध्येयवादामुळेच निर्णय घेताना संभ्रमित अवस्था • निर्माण झाली नाही. आणि म्हणूनच शून्यातून ब्रह्मांड साकार करण्याचा चमत्कार ते करू शकले.

म्हणून तर समर्थ शिवस्तुती गाताना म्हणतात,

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।


आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.

Read More….

2 thoughts on “Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi | शिवछत्रपतींची अद्भुत निर्णयक्षमता”

Leave a Comment