छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती
‘ छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती ‘ Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi – या विषयावरचं ब्लॉग अत्यंत अद्वितीय आणि महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आणि योगदान असलेले एक अद्वितीय राजा आहेत. त्यांची वीरत्व कथा, आपल्या शौर्याची गोडी, आणि त्यांच्या राजकीय कौशल्याचं परिचय जगात अजूनही आहे.
Information of Chhatrapati Shivaji Maharaj In Marathi
शिवाजी महाराज ह्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटनांचा असलेला परिचय आणि त्यांच्या विचारांची समज सर्वांना अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतंत्रता संग्रामातील उत्कृष्ट योद्धा, कुशल राजकारणी, आणि न्यायवादी राजा म्हणून आपली अमिट प्रतिष्ठा गाठली. त्यांच्या राज्यकारभावाच्या प्रामाणिकतेची चर्चा विश्वात आहे, आणि त्यांचं राज्य विकास आणि समृद्धीच्या मार्गावर आधारित होतं.
शिवाजी महाराजांच्या जीवनातील अद्वितीय प्रकरणांची विशेषता आहे. त्यांच्या साहसी विजयांचा इतिहास, त्यांच्या धर्मनिष्ठा, आणि त्यांच्या संघर्षात भूमिमानाची उत्कृष्टता ह्यांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि राज्यकारभाव प्रतिष्ठापित केलं. त्यांच्या जीवनातील अद्वितीय घटनांची चर्चा करण्याच्या वेळी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं, राजकीय उपलब्धिंचं, आणि त्यांच्या योद्धापणाचं अध्ययन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ब्लॉगद्वारे, ह्या अद्वितीय राजा शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांची विस्तृत माहिती प्राप्त करण्याचा संधी आहे.
या ब्लॉगमध्ये, आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाच्या घटनांची, त्यांच्या बाल्यकालाची, योद्धा प्रवृत्तीची, आणि त्यांच्या राज्यकारभावाची माहिती मिळेल. ह्या ब्लॉगद्वारे, आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनातील कधीही लावलेल्या अनभ्यास प्रत्येकाला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. त्यांच्या बलिदानाची, विजयाची, आणि योजना जन्माची वाचण्यासाठी, ह्या ब्लॉगचा आपला स्वागत आहे.
१ : माता जिजाबाई – Mother of Shivaji Maharaj
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Mother Jijabai
शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला. शिवाई देवीची कृपा म्हणून शिवाजी ठेवले. त्याचे नाव त्याच्या वडिलांचे नाव शहाजी. आईचे नाव जिजाबाई.
शहाजी मोठा शूर सरदार होता. तो विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीस होता. जिजाबाई ऊर्फ जिजाऊ ही फार हुशार होती, कर्तबगार होती. तिने शिवबाला लिहायला नि वाचायला शिकविले.
इतिहास व पुराणातील गोष्टी सांगितल्या. राम-रावणाच्या गोष्टी, कृष्ण-पांडवांच्या गोष्टी. त्या गोष्टी शिवबाला खूप आवडत.
‘आपणही रामासारखे सच्छिल व्हावे. कृष्णासारखे धोरणी व्हावे. भीम- अर्जुनासारखे पराक्रमी व्हावे’ असे त्याला वाटे.
आपला मुलूख परकीयांच्या ताब्यात आहे. ते आपल्यावर जुलूम करत आहेत हे बरोबर नाही ! आपण शूर झाले पाहिजे. मोठा पराक्रम करून जुलमी लोकांना हाकून लावले पाहिजे.
आपल्या लोकांसाठी स्वराज्य निर्माण केले पाहिजे. ह्या गोष्टी जिजाऊने शिवबाच्या मनावर बिंबविल्या. एका अर्थी ती शिवबाचा पहिला गुरू होती म्हणाना !
२ : स्वराज्याची शपथ – Shivaji Maharaj
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Oath of Swarajya
शिवबाचा दुसरा गुरू दादाजी कोंडदेव. हा शहाजीचा पुणे प्रांताचा कारमारी होता. त्याने शिवबाला तरवार व दांड- पट्ट्याचे हात फिरविणे, घोड्यावर बसणे, मालाफेक वगैरे गोष्टी शिकविल्या.
तो शिवबाला आपल्याबरोबर फिरती- वर नेई. खेड्यापाड्यांत, डोंगरदऱ्यांत राहाणाऱ्या लोकांचे जीवन शिवबाला बघायला मिळे. त्या लोकांत शिवबा मिसळे. आपल्या गोड बोलण्याने त्यांना तो आपलेसे करी.
दादाजी नरसप्रभू, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर वगैरे अनेक तरुण शिवाजीच्या भोवती गोळा झाले. म्हणेल तसे वागू लागले. गड्यांनो,
तो शिवबाने त्यांना सांगितले, “ आपला मुलूख परकीयांच्या ताब्यात आहे. तो स्वतंत्र झाला पाहिजे. आपण आपले स्वराज्य निर्माण केले पाहिजे.”
सर्वांना त्याचे म्हणणे पटले. झाले ! भोरजवळील रोहिडखोऱ्या- पासून सुरुवात झाली.
रोहिडेश्वराच्या देवळात सर्वजण जमले. शिवाजीने सर्वांना महादेवाच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घ्यावयास सांगितली.
प्रथम त्याने शपथ घेतली.
त्याच्या पाठोपाठ सर्वांनी एकमुखाने शपथ घेतली. ‘हरहर महादेव !’ ची गर्जना केली. गर्जनेने रोहिडखोरे दणाणून सोडले. तेथील किल्यावर शिवाजीचे निशाण फडकू लागले.
३ : कल्याण खजिना
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Kalyan treasure
त्यानंतर शिवबाने आसपासचा बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. हळूहळू लोक शिवबाला आपला राजा मानू लागले. त्याला मदत करू लागले. त्याचे हुकुम मानू लागले.
स्वराज्य निर्माण करायचे तर किल्ले आपल्या ताब्यात हवेत. तेव्हा शिवबाने एकामागून एक किल्ले ताब्यात घ्यावयास सुरुवात केली. तोरणा किल्ला दुरुस्त कर- ताना शिवबाला मोहरांचा हंडा सापडला. शुभशकून झाला.
मग कोंडाणा किल्ला सर केला.
त्यानंतर शिवबाच्या सोबत्यांनी आणखी धाडस केले. कल्याणच्या सुभेदाराकडून विजापूराकडे खजिना जात होता, त्यावर हल्ला करून तो सर्व खजिना आबाजी सोनदेव याने ताब्यात घेतला. खजिन्याबरोबर सुभेदाराची सूनही विजापूरास जात होती. तिलाही आबाजीने पकडून आणले. त्याला वाटले, खजिन्या- बरोबरच ही सुभेदाराची सूनही महाराजास दासी म्हणून भेट द्यावी. महाराज आपल्यावर खूष होतील.आपल्याला बक्षीस देतील.
त्याने शिवबासमोर सोनेनाण्यांनी भरलेला खजिना हजर केला. महाराजांना आनंद झाला. मग आबाजीने सुभेदाराच्या सुनेस महाराजांसमोर हजर केले. ती दिसावयास फार सुंदर होती.
महाराजांनी तिच्याकडे पाहिले. ते म्हणाले, “अहाहा, काय सौंदर्य लाभले आहे तुम्हाला ! माझी आई जर तुमच्यासारखी सुंदर असती तर मीही सुंदर झालो असतो !”
नंतर त्यांनी रागाने आबाजीकडे पाहिले.
आबाजी मनात समजला. आपली चूक त्याच्या लक्षात आली. स्त्रियांना त्रास दिलेला शिवबाला आवडत नसे. त्याने सुभेदाराच्या सुनेला मानाने विजापूरला पोचविले.
मोठ्या असा राजा कोणाला आवडणार नाही ?
शत्रूच्या स्त्रियांनाही मातेसमान मानणारा राजा. थोर मनाचा राजा शिवबा !
४ : अफझलखान
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Afzal Khan
शिवबा एकामागून एक किल्ले सर करू लागला. जास्त जास्त प्रदेश आपल्या ताब्यात घेऊ लागला. त्याने मोठी फौज उभारली. कल्याण खजिना लुटला. त्यात खूप पैसा मिळाला. शिवबाचे नाव सर्वत्र होऊ लागले. मराठी राज्य वाढू लागले.
ह्या गोष्टी विजापूरच्या आदिलशहाच्या कानांवर जात होत्या. त्या वेळी त्याची आई बडीसाहेबा ही विजापूरचा कारभार पाहात होती. तिला शिवाजीचा फार राग आला.
ह्या बंडखोर पोराचा बंदोबस्त केला पाहिजे. पण हे करणार कोण ? तिला प्रश्न पडला. अफझलखान नावाचा सरदार पुढे आला. फुशारकीने म्हणाला, “मला हुकूम द्या. मी ह्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणतो.”
बडीसाहेबाला आनंद झाला. तिने खानाला खूप मोठी फौज बरोबर दिली. खान निघाला.
त्या वेळी शिवबा प्रतापगडावर होता. खानाने वाईला पोचल्यावर शिवबाला भेटीला बोलाविले.
५: खानाचा वध
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Slaughter of Afzal Khan
शिवबा मोठा चतुर. त्याने घाबरल्याचा बहाणा करून खानालाच भेटीला बोलाविले. भेटीची जागा प्रतापगड ठरली. तेथे मोठा मंडप उभारला व थाटमाट केला.
भवानीदेवीची प्रार्थना करून शिवबा मंडपाकडे निघाला. त्याने अंगरख्याखाली पोलादी चिलखत घातले होते. खिशात वाघनखे लपवून ठेवली होती.
खान हा कपटी होता. त्याचा काय भरंवसा !
शिवबा मंडपात शिरला. खान आधीच येऊन बसला होता. अबब ! केवढा धिप्पाड होता तो. त्याची भरघोस दाढी आणि झुपकेदार मिशा. चेहराही केवढा तरी क्रूर !
त्याच्यापुढे शिवबा किती लहान दिसत होता. त्याचे डोके जेमतेम खानाच्या छातीपर्यंत पोचत होते.
मग दोघांची मेट झाली. खानाने शिवबाला मिठी मारली. त्याचे डोके बगलेत धरून आवळले. दुसऱ्या हाताने कमरेचा सुरा काढला. शिवबाच्या पोटात मारला. पण शिवबाने अंगात चिलखत घातले होते. त्यामुळे त्याला काही झाले नाही.
शिवबाला खानाच्या कपटीपणाचा राग आला. त्याने वाघनखे काढली. खानाच्या पोटात खुपसली. खानाची आतडी बाहेर आली
खान मरून पडला. मराठ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाच्या सैन्याला पळता मुई थोडी झाली.
६ : बाजीप्रभू देशपांडे
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Baji Prabhu Deshpande
शिवबाने अफझलखानाला मारले, त्याच्या सैन्याचा पराभव केला ही बातमी विजापूरला कळली.
बडीसाहेबाला धक्काच बसला.
सिद्दी जोहर नावाचा एक सरदार होता. त्याला तिने खूप मोठी फौज दिली. शिवबाला पकडून आणावयास सांगितले.
शिवबा पन्हाळगडावर असल्याचे कळले. तेव्हा सिद्दीने किल्ल्याला वेढा. दिला. संपूर्ण नाकेबंदी केली. कोणालाही किल्ल्याच्या बाहेर पडणे अशक्य झाले.
आपण असेच आत राहिलो तर उपासमार होईल. बाहेर पडायलाच पाहिजे असा शिवाजीने विचार केला.
त्याने आपण शरण आल्याचा सिद्दीला खोटाच निरोप पाठविला. सिद्दीला आनंद झाला. चला, आता शिवाजीला गिरफदार करून विजापूरला नेऊ असे त्याला वाटले.
शिवबाने एका सरदाराला आपला पोशाख चढविला नि दिले सिद्दीकडे पाठवून. सिद्दीने त्याला कैद केले. सैन्याचा पहारा सैल झाला.
तिकडे शिवबा निवडक लोकांसह पसार झाला.
(खरा शिवाजी पळून गेला. गिरफदार झालेला शिवाजी हा भलताच माणूस आहे हे बऱ्याच वेळाने सिद्दीच्या लक्षात आले. त्याने लागलीच शिवाजीचा पाठलाग सुरू केला.
विशाळगडच्या वाटेवर शिवाजीला त्याने गाठले. तेव्हा घोडखिंडीत सिद्दीच्या फौजेला वीर बाजीप्रभू देशपांडे याने अडविले. शिवाजी सुखरूपपणे गडावर पोचेपर्यंत त्याने शौर्याने लढत दिली त्यात तो जखमी झाला. शिवाजी गडावर पोचल्याचे कळल्यावर तो समाधानाने मरण पावला.
७ : शाहिस्तेखानाची फजिती
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Fajiti of Shahistekhan
शिवाजीचे मराठी राज्य वाढत चालले. ही गोष्ट मुसलमान राज्यकर्त्यांना कशी आवडणार ? याचा
दिल्लीचा बादशहा औरंगजेब मामा शाहिस्तेखान शिवाजीवर चालून
आला. खूप मोठे सैन्य त्याने बरोबर घेतले. वाटेतील एकेक गाव घेत तो थेट पुण्याला आला. शिवाजीच्या लाल महालातच त्याने मुक्काम ठोकला.
आपल्या लाल महालात मुसलमानांनी राहावे हे शिवाजीला कसे सहन होणार? पण पुण्यामोवती कडक पहारा होता. मग शहरात शिरायचे कसे ?
शिवबा मोठा हुशार. त्याने काय केले, निवडक मावळ्यांसह तो एका लग्नाच्या वरातीत घुसला. पुण्यात आला.
(मध्यरात्री शिवबा साथीदारांसह लाल महालाजवळ आला. प्रवेशद्वाराजवळ पेंगत असलेल्या पहारेकऱ्यांना मारून सारेजण महालात शिरले.
महालातील लोक जागे झाले. एकच गोंधळ उडाला. मावळ्यांनी खानाच्या लोकांना कापून काढले. गडबड ऐकून खान जागा झाला. बघतो तर शिवबा समोर उभा. खानाला घाम फुटला.
घाबरून तो खिडकीवाटे पळून जाऊ लागला. तोच शिवबाने तलवारीचा वार केला. त्यामुळे खानाची बोटे तुटली. पण खान उडी मारून पळून गेला.
अशी झाली शाहिस्तेखानाची फजिती !
८ : आग्ऱ्याहून सुटका
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Escape from Agra
शाहिस्तेखानाची फजिती औरंग- जेबाला कळली. तो खूपच संतापला.
मग त्याने आपला रजपूत सरदार जयसिंह यास शिवाजीच्या समाचारास पाठविले. त्याच्याबरोबर दिलेरखान नावाच्या पठाणाला पाठविले.
जयसिंह फार मोठी फौज घेऊन निघाला. वाटेतील अनेक गावे व किल्ले त्याने सर केले. मग त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. किल्लेदार मुरारबाजीने मोठ्या शौर्याने लढा दिला. दोन हातांत दोन तलवारी घेऊन तो लढला. थेट दिलेर- खानाच्या तंबूत तो शिरला अन् दिलेरखानावर त्याने वार केला. तोच खानाच्या शिपायांनी येऊन मुरारबाजीचे डोके उडविले, तरी त्याचे धड लढत राहिले. मुरारबाजी पडला नि किल्ला शत्रूच्या हाती पडला.
जयसिंहाची फौज मोठी ! त्याच्याशी सामना करणे कठीण हे शिवबाने ओळखले. आणि त्याने जयसिंहाशी तह केला. दोघां- मध्ये समझोता झाला. शिवाजीने जयसिंहा- वर खूपच छाप पाडली. गोड बोलून त्याला आपलेसे केले. एवढेच नव्हे तर त्याला विजापूरकरांशी लढण्यास मदत केली. शिवाजी व जयसिंहाच्या मैत्रीचा फायदा घ्यायचे औरंगजेबाने ठरविले. त्याने शिवाजीला दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले.
शिवाजीलाही दिल्लीकडील परिस्थिती पाहावयाची होती. म्हणून त्याने आमंत्रण स्वीकारले.
त्यावेळी संभाजी लहान होता. त्याला शिवाजीने बरोबर घेतले. तसेच हिरोजी फर्जद, निराजी, रावजी यांसारखे शूर साथीदार बरोबर घेतले.
मजल दरमजल करीत सर्वजण निघाले.
औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्यानिमित्त आग्रा येथे दरबार भरणार होता. म्हणून शिवाजी आग्ऱ्याला येऊन दाखल झाला.
दरबार भरला. शिवाजी दरबारांत गेला. पण बादशहाने त्याचा मान ठेवला नाही म्हणून शिवबा फार संतापला. तो दरबारातून निघून गेला. तो उतरला होता त्या वाड्यात पोचला. त्याबरोबर पाच हजार सैनिकांनी वाड्याला वेढा घातला.
शिवाजी वाड्यात अडकून पडला.
शिवाजीला औरंगजेबाने कपटाने कैद केले होते.
पण शिवाजीही मोठा चतुर होता. त्याने आपल्याबरोबरच्या लोकांना उत्तरेची हवा मानवत नाही तेव्हा त्यांना परत जाऊ द्यावे असे बादशहाला कळविले.
बादशहाने आनंदाने परवानगी दिली.
सारी मंडळी दक्षिणेत परतली. निवडक लोक शिवाजीजवळ राहिले.
मग शिवाजीने आपल्याला आग्ऱ्याला राहाणे आवडते असे भासविले. तो रोज मोठमोठ्या पेटाऱ्यातून मेवामिठाई व नजराणे सरदारांना पाठवू लागला. गोर- गरिबांना दानधर्म करू लागला. सुरुवातीला ते पेटारे पहारेकरी उघडून पाहात. पण मग ते पाहिनासे झाले. पहारा दिला पडला.
ही संधी साधून एक दिवस शिवाजी व संभाजी भेटीच्या मोठ्या पेटाऱ्यात बसून वाड्याबाहेर पडले. थोड्या अंतरावर घोडे तयार होतेच. त्यावर बसून दोघेही पसार झाले. बराच वेळ वाड्यात हालचाल नाही म्हणून पहारेकऱ्यांना संशय आला. आत जाऊन बघतात तर काय, वाडा रिकामा ! !
औरंगजेबाला हे कळले. तो पहारे- कऱ्यांवर खूप रागावला. पण काय उपयोग? शिवाजी त्याच्या हातावर तुरी देऊन सटकला होता.
९ : गड आला पण सिंह गेला
The fortress came but the lion went
आग्ऱ्याहून सुटून आल्यावर शिवाजीने राज्य बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले. आपला गेलेला मुलूख व किल्ले परत मिळवायला सुरुवात केली.
गेलेले बहुतेक किल्ले परत मिळविले. एक कोंडाणा काय तो राहिला. तो घेण्याचे काम कोणावर सोपवावे ? शिवाजी विचार करू लागला. तानाजी मालुसरे पुढे आला. त्याने ही कामगिरी पत्करली. त्याचा मुलगा रायबा याचे लग्न ठरले होते. पण तानाजी म्हणाला, “आधी लग्न कोंडा-ण्याचे, मग रायबाचे !” अंधारी रात्र होती. तानाजीने यशवंती तानाजी व त्याचा भाऊ सूर्याजी बरोबर एक हजार मावळे घेऊन निघाले.
नावाच्या घोरपडीच्या शेपटीला दोर बांधला. तिला कडा चढण्यास सांगितले. ती झर झर चढून गेली नि वर कड्याला घट्ट चिटकून बसली. तसा तानाजी दोर धरून वर चढला. त्याच्या पाठोपाठ मावळे
वीर चढून गेले. वर पोचताच किल्ल्यावरील रजपूत व पठाण सैनिकांवर मावळे तुटून पडले. घनघोर लढाई झाली. किल्लेदार उदयभानू व तानाजी यांची गाठ पडली. दोघेही सारखेच शूर होते. मोठ्या शर्थीने लढले. दोघांच्या अंगांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. पण दोघेही हार जाईनात. शेवटी तानाजीचा वार उदयभानूला नि उदयभानूचा वार तानाजीला वर्मी लागून दोघेही पडले आणि मरण पावले.
सूर्याजीने तानाजीची जागा घेतली. मावळ्यांनी पठाण व रजपूतांना कापून काढले. किल्ला सर केला.
कोंडाणा सर झाला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला याचे शिवाजीला फार दुःख झाले.
तो दुःखाने म्हणाला, “गड आला पण सिंह गेला !”
त्यावेळेपासून कोंडाण्याचे नाव बदलून सिंहगड हे नाव दिले गेले.
१०: समर्थ रामदास
Information of Chhatrapati Shivaji Maharaj – Samarth Ramdas
शिवाजीला स्वराज्य स्थापनेसाठी मुसलमान सत्ताधाऱ्यांशी लढावे लागले. पण त्याच्या राज्यातील सर्व जातीच्या लोकांना तो सारखी वागणूक देई. हिंदू साधूबरोबरच तो मुसलमान फकीरालाही दानधर्म करी. सर्वांशी प्रेमाने वागे. त्यामुळे त्याच्या सैन्यात हिंदू व मुसलमान दोन्ही जातीचे सैनिक होते.
स्वतः शिवाजी वृत्तीने धार्मिक होता.
प्रतापगडावरील मवानीमातेचा तो निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन मवानीमातेने त्याला ‘भवानी तलवार’ दिली होती. तिच्या साह्याने त्याने अनेक लढाया जिंकल्या. मोठे स्वराज्य निर्माण केले. नीचामडी
समर्थ रामदास हे शिवाजीचे गुरू होते.
एकदा रामदास शिवाजीकडे भिक्षेसाठी गेले. तेव्हा शिवाजीने आपले राज्यच त्यांना भिक्षा म्हणून दिले.
शिवबाची आपल्यावरील भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले. त्यांनी राज्य शिवबाला परत दिले.
ते म्हणाले, “शिवबा, आपण स्वराज्य स्थापन केले. गोब्राह्मणाचे, देवधर्माचे रक्षण आपल्या हातून होते आहे. हे कार्य असेच करीत राहा. त्यातच मला सर्व काही मिळाले असे मी समजेन. मला गोसा- व्याला राज्य काय करायचे ? हे राज्य आपणच परत घ्या, वाढवा नि उत्तमप्रकारे चालवा. माझा आपल्याला
आशीर्वाद आहे.” मग समर्थानी राजकारणाबद्दल शिवाजीला उपदेश केला. भगवा झेंडा हा राष्ट्रीय ध्वज म्हणून वापरण्यास सांगितले.
असे म्हणतात की आपण एकमेकांना भेटल्यावर ‘राम राम’ म्हणून नमस्कार करतो, त्याची सुरुवात रामदासांनी केली.
११ : शिवराज्याभिषेक Shivaji Maharaj
Rajyabhishek of Chhatrapati Shivaji Maharaj
स्वराज्य स्थापण्यासाठी शिवाजीने तीस वर्षे खूप कष्ट घेतले. तोपर्यंत दक्षिणे- कडील सर्व मराठी मुलुखावर त्याने आपला अंमल बसविला. त्याचे राजेपण अहमदनगर व विजापूरच्या सुलतानाने मान्य केले. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यावरून त्याने स्वतःला राज्याभिषेक करवून घेण्याचे ठरविले. काशीहून गागाभट्ट नावाचा विद्वान ब्राह्मण त्यासाठी आला. रायगड हे ठिकाण राजधानी म्हणून निवडण्यात
आले. दि. ६ जून १६७४, शनिवार, त्रयोदशी या दिवशी शिवाजी महाराजांना राज्या- आला. स्नान करून भवानी भिषेक करण्यात सकाळी शिवाजीने मातेची पूजा केली. त्यानंतर त्याचे दुसरे दैवत आई जिजाबाई हिच्या पायांवर डोके ठेवून आशीर्वाद घेतला. ठरलेल्या मुहूर्तावर सिंहासनावर आरूढ झाला.
मंत्रघोष करून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांवर गंगा-यमुनादी नद्या व समुद्राच्या पवित्र पाण्याचा अभिषेक केला.
राज्याभिषेकाचा सोहळा मोठा धुम- धडाक्यात पार पडला.
त्यानंतर “गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय ! “
असा जयघोष करण्यात आला.
शिवाजीचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाले.
आपल्या या ब्लॉगला आवडलं तर कृपया आपले अनुभव आम्हाला सांगा. आपल्या प्रतिसादाने आम्हाला आनंद होईल.
1 thought on “Chhatrapati Shivaji Maharaj Story In Marathi | Shivaji Maharaj Information in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती ”